अहिंसावादी - म्हणजे काय ? (गांधीवाद नाही )

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
2 Feb 2009 - 3:38 pm
गाभा: 

मी जैन !

त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला) एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून.

आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते... ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट !

जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की वनस्पती व झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ? एखाद्याने एखादाचा जीव घेणे / विनाकारण जीव घेणे म्हणजे हिंसा हाच अर्थ मला माहीत आहे व शक्यतो तुम्हाला ही.

आपण खाण्यापासून ते कागदापर्यंत अनेक कारणांनी वनस्पती / झाडे ह्यांची हत्याच करत आलो आहोत की मग ? कारण जगदिश चंन्द्र बोस ह्यांचे संशोधन आपण मान्य करतो ( जगाने मान्य केले) म्हणजे आपण मानतो की वनस्पती सजीव आहे त्यानुसार आपण एखादी वनस्पती तोडली तर ती हत्याच ना ? मग आपण अहिंसावादी कसे ?

जर आपण स्वतःला अहिंसावादी म्हणतो तर आपण उठता बसता अनेक हत्या करतो हे कोणालाच माहीत नसावे ? अनेक प्रकारच्या केस्मेटीक क्रीम मध्ये व्हेल मासा पासून प्राप्त केलेले तेल (चरबी) वापरली जातेच की, मागे मॅड टिव्ही वर पाहीले जे ब्रेश आपण आपल्या मुलाला चित्रकलेची आवड लागावी म्हणून विकत आणून देतो त्या ब्रेश साठी अनेक छिछुंदर ( * मराठी शब्द) ह्या प्राणांची हत्या केली जाते ! एका छिछुंदर चा जीव घेतला तर फक्त दहा ब्रेश तयार होता आता बोला.

सर्वात सर्व जागी सहज पणे मिळणारे डिझेल / प्रेट्रोल व इतर त्यांचे उप पदार्थ हे पण जैविक इंधन आहे ... म्हणजे कोणाकडून तरी हत्या झालीच ना.. भले ती निसर्गाकडुन होऊ दे !

काही गोष्टी जश्या.. बुट / चपला / पर्स / वायरींगचे सामान / हिरे छाटणीचे काम लहान मुलांच्या कडून अत्यंत अत्याचार करुन करुन घेतले जातात... त्यांना मानसिक / शारिरिक इजा केली जाते म्हणजे ती देखील एक प्रकारची हिंसाच ना :?

आपण अजारी असल्यावर काही दवादारु करतो.. मेडीसीन खातो / पीतो ! काही अशा मेडीसीन मध्ये देखील काही जिवांची हिंसा करुनच त्याच्या तील उपयोगी द्रव्य / पदार्थ वापरला जातो ..

जर वर दिलेल्या उदाहरणांना तुम्ही गरज म्हणत असाल तर मग आपण हिंसेचेच समर्थन करतो असे वाटत नाही का ?

आपण पुर्ण पणेच परजीवी आहोत असे तुम्हाला वाटतं का ?

जर आपण परजीवी आहोत मग आपण अहिंसावादी कसे ठरतो :?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

2 Feb 2009 - 3:40 pm | अवलिया

वा!

--अवलिया

सुचेल तसं's picture

2 Feb 2009 - 3:45 pm | सुचेल तसं

वा!!!

अवांतरः छिछुंदर म्हंजे उदीर असावा (किंवा चिचुंद्री किंवा साळिंदर)

अवलिया's picture

2 Feb 2009 - 3:47 pm | अवलिया

राजे चिचूंद्रीचा राग उंदरावर काढतात...

--अवलिया

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 3:46 pm | विनायक प्रभू

लवकर अवलंबुन राहावे लागते असा जीव शोध. मग काही वर्षे तरी असे प्रश्न पडणार नाहीत. नंतर उत्तराची गरज वाटणार नाही.
रोज हिंसा करावी लागते ना?
अगे आई गे जै का चा कांय खरां नाय गे.

दशानन's picture

2 Feb 2009 - 4:11 pm | दशानन

=))

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

झेल्या's picture

2 Feb 2009 - 3:47 pm | झेल्या

पब्लिसिटी स्टंट.....आणि खर्‍या अर्थाने काथ्याकूट.

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

दशानन's picture

2 Feb 2009 - 3:53 pm | दशानन

>>पब्लिसिटी स्टंट.....

हे मला उद्देशून आहे का :?

असेल तर मला असला फालतु गीरी पणा करायची गरज नाही.

बाकी आपण खव मध्ये बोलु !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

झेल्या's picture

2 Feb 2009 - 4:00 pm | झेल्या

जे उगाचच टोकाचा अहिंसावाद मांडतात किंवा त्यावर अगदी तावातावाने चर्चा करतात त्यांच्याबद्दल....

तुम्ही म्हणता तसे पूर्ण अहिंसा ही केवळ काल्पनिक गोष्ट वाटते.

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

टारझन's picture

2 Feb 2009 - 10:11 pm | टारझन

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

अजुन एक पब्लिकसिटी श्टंट .. :) :) :)

- फेक्या
मी वाचलेलं ( लिहा आणि वाळवा आणि इतरांणाही लिहवा(लिहायला सांगा..)! )

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2009 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

राजे, च्यवनप्राश चांगलेच मानवलेले दिसत आहे मेंदुला !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

फुस्स's picture

2 Feb 2009 - 3:54 pm | फुस्स

आपण अजारी असल्यावर काही दवादारु करतो.. मेडीसीन खातो / पीतो ! काही अशा मेडीसीन मध्ये देखील काही जिवांची हिंसा करुनच त्याच्या तील उपयोगी द्रव्य / पदार्थ वापरला जातो ..

मेडिसीन खातो ते पण काही जीवांची हत्या करण्यासाठीच.

असा विचार करायचा म्हणजे मरूनच जायला हवे.

दशानन's picture

2 Feb 2009 - 3:56 pm | दशानन

असे असेल तर मग अहिंसेचे नाटक कश्यासाठी :?

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

झेल्या's picture

2 Feb 2009 - 4:00 pm | झेल्या

आपण अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करूया...

ज्याला अहिंसा पटणार नाही त्याचा गेम वाजवून टाकू या...खल्लास..! :)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 4:00 pm | शंकरराव

बरे आहे चालु द्या...
गरज वाटल्यास निसर्गनियम्, सुक्ष्मजीवांचाही विचार करा...,

लिखाळ's picture

2 Feb 2009 - 4:12 pm | लिखाळ

गरज आणि चैन यांचा विवेक करता आला पाहिजे हे या वरचे आणि या सारख्या अनेक प्रश्नांवरचे उत्तर असावे.
-- लिखाळ.

SwanandSolanke's picture

2 Feb 2009 - 4:21 pm | SwanandSolanke

जिवो जिवस्य जिवनम....

अवलिया's picture

2 Feb 2009 - 4:39 pm | अवलिया

म्हणजे काय हो?

--अवलिया

धमाल मुलगा's picture

2 Feb 2009 - 4:33 pm | धमाल मुलगा

आमचा आपला 'नडगीफोडवाद' !
त्यामुळे तुमचं चालुद्या, टैम आला की करु एकेकाच्या नडग्या जाम ;)

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Feb 2009 - 4:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे आपले विचार खुप विचार करण्या सारखे आहेत
अवांतर फक्त विचार करन्यासाठी अंमलबजावणी केलि तर न खाता पिता ठार मेलो म्हनुन समजा

दशानन's picture

2 Feb 2009 - 4:41 pm | दशानन

आपण अहिंसावादी आहोत हा काही लोकांचा भ्रम आहे ! त्यावर उत्तर शोधन्याचा प्रयत्न आहे.

>>अवांतर फक्त विचार करन्यासाठी अंमलबजावणी केलि तर न खाता पिता ठार मेलो म्हनुन समजा

=))

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Feb 2009 - 5:08 pm | ब्रिटिश टिंग्या

अहिंसावाद म्हणजे लष्कर-ए-खरडा!

विना हिंसा उच्चभ्रूंना वठणीवर आणण्याचा रामबाण उपाय!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

कलंत्री's picture

2 Feb 2009 - 9:42 pm | कलंत्री

सत्य आणि अहिंसा अशी दोन तत्वे अशी आहेत की ज्यावर भारतीय लोकांनी प्रचंड खल केला आहे, अनेक धर्म निर्माण केले आहे, अनेक वादविवाद केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खर्‍या अर्थाने ही तत्त्वे अंगी बाणवण्याचाही प्रयत्न केला आहे.

त्यातही हिंसा-अहिंसाच्या स्थुल आणि सुक्ष्माचाही विचार करायला पाहिजे. समजा कोणी समाजाच्या नाशाची तयारी / विचार करीत असेल तर त्याच्या स्थुल हिंसेच्या कृतीत अहिंसेच्या सुक्ष्म विचाराचाच विचार केला आहे असे मानावे लागते.

त्यामुळे याच्यावर सरळ सरळ असा कोणताही नित्कर्ष काढणे अवघड आहे.

महावीरजीच्या जीवनात ते एकदा एका जंगलातुन चालले असताना त्यांना एका विषारी सर्पाने दंश केला. दंश केल्यावर रक्त येण्याऐवजी तेथून दुध वाहु लागले. ते पाहताचा त्या सर्पाला आश्चर्य वाटले. तो महावीराला शरण गेला आणि मी काय करायला हवे असा प्रश्न विचारला. ज्ञानी आणि करुणेने महावीर बोलले की वृथा हिंसा करु नको. त्यावर त्या सर्पाने सर्वकष अहिंसेचा मार्ग स्विकारला आणि तो कोणालाही त्रास / दंश न करता राहु लागला. हे पाहताच आजूबाजूचे लोक त्याला दगडं, काठ्या मारु लागले. तो घाबरत घाबरत जगु लागला. काही काळानंतर परत एकदा महावीर त्या जंगलातून जात असताना त्याना आपल्या शिष्याची ( सर्पाची ) आठवण झाली. सर्पही त्यांचीच वाट पाहत होता. सर्प त्यांना पाहताच आपले दुखणे सांगु लागला, लोक त्रास देतात इत्यादी इत्यादी. महावीर त्यावर उत्तरले, की तुझा स्वभाव हिंसेवर जगणे असे आहे, त्यामूळे जीवित्वासाठी तु योग्य ती हिंसा करीत जा, माणसे ही काही तुझे भक्ष्य नाहीत. त्यांना फुत्काराद्वारे घाबरवत जा म्हणजे तेही तुला त्रास देणार नाही. अश्या प्रकारे त्यांनी त्याच्या प्रकृतीअनूरुप उपदेश केला. ( महावीर - चंडकौशिक अशी कथा प्रख्यात आहे.)

बाकी नंतर कधीतरी

राजे,
मुद्दा करेक्ट आहे, पण प्रॅक्टिकल नव्हे. लिखाळांनी दिलेल्या "गरज आणि चैन यांचा विवेक करता आला पाहिजे" या मताशी मी ५०० टक्के सहमत आहे, आणि त्याचबरोबर कलंत्रींशीही.

मुळात प्रत्यक्ष हिंसा आणि अप्रत्यक्ष हिंसा हा भेदही समजून घ्यायला हवा, असं मला वाटतं.
प्रत्यक्ष हिंसा म्हणजे आपल्या कृतीने दुसर्‍याला विनाकारण इजा पोचवणं. अप्रत्यक्ष हिंसा म्हणजे कृतीची क्षमता असताना आपल्या कृती न करण्याने दुसर्‍याला इजा होणं. (हे मी नव्हे, सनातन हिंदू धर्म सांगतो.)

कुणी माथेफिरू एखाद्या निष्पाप मुलीला रस्त्यात भोसकतो किंवा ईव्हन छेडतो (होय, छेडणं ही मानसिक इजा, म्हणून हिंसा आहे), अश्या वेळी मी त्याला वाजवला, तर ती हिंसा नव्हे! उलट तेव्हा मी जर हिजड्यासारखा हातावर हात बांधून बघत बसलो, तर मी ही त्या हिंसेत सामील आहे. आणि अप्रत्यक्ष हिंसा अधिक वाईट, कारण समर्थ असूनही मी *टांच्या जुड्या बांधत बसलो, हिंसा घडू दिली, असा याचा अर्थ होईल!

अहिंसा ही समर्थाची असावी, भ्याडाची नव्हे. भ्याडाचं ते फारतर पांघरूण होत असेल, कारण होणारी हिंसा अप्रत्यक्ष असल्यामुळे पटकन त्याला जबाबदार धरला जात नाही.

म्हणून तुमच्या "आपण अहिंसावादी नाही" या वाक्याला माझा नम्र पण ठाम नकार आहे. जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते तर करायलाच हवं, नाही का? उद्या तुम्ही (तुम्ही म्हणता त्यातली) पूर्ण अहिंसा स्वीकारली, आणि कुणी सुरा घेऊन (माफ करा,) तुमच्या कुटुंबाच्या पुढे उभं राहिलं, तर काय कराल? प्रतिकार, की अहिंसा (जी वास्तविक अप्रत्यक्ष हिंसा आहे) ?

आणि दिनक्रमातल्या हिंसेबद्दल बोलायचं, तर जीवो जीवस्य जीवनम हे ही आहेच की... त्याला आपण टाळू शकत नाही. या सार्‍याबद्दल प्रातःस्मरणांमधे, संध्यावंदनात, इतकंच काय, यज्ञातही कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याबद्दल खेद व्यक्त केला जातो. यज्ञामधे किंवा पुरश्चरणामधे या हिंसेबद्दल प्रायश्चित्त घेणं हा ही एक महत्वाचा विधी आहे. इलाज नाही, म्हणून ते केलं गेलं ही भावना जागी रहावे, त्यात माज येऊ नये, याकरता.

पण ते अटळ आहे. जग असं आहे, म्हणून सगळे जिवंत आहेत.

निसर्गानेही ही अटळ हिंसा मान्य केली आहे. बायोस्टॅटिस्टिक्स मधला (जैवसांख्यिकी) कुणी जाणकार अधिक नीट सांगेल, पण भक्ष्य आणि भक्षक यांचं प्रमाण नेहमी समतोल राहतं. भक्षकांच्या गरजेला पुरूनही भक्ष्य नेहमीच पुढे शिल्लक राहतं, म्हणून दोघांच्याही पुढच्या पिढ्या टिकतात. उदाहरणार्थ सामन किंवा ईल्स हजारो अंडी घालतात, आणि शार्क अगदी मोजकी. कारण कमी शार्क्स भरपूर छोटे मासे खातात.

अवांतरः भारताचे थोर (?) अहिंसावादी नेते (जणू अहिंसा ही संकल्पना यांनीच जन्माला घातली...) गांधी यांच्या नावावर प्रचंड अप्रत्यक्ष हिंसा आहे! असो... कालाय तस्मै नमः
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

दशानन's picture

3 Feb 2009 - 10:02 am | दशानन

तुमचा ग्रह असा झाला आहे शक्यतो की मी स्वतःला अहिंसावादी समजतो / दाखवतो नाय !

चुकुन देवाकडून गफलत झाली व जैनाच्या घरात जन्मलो ;)

माझे सगळे झाडून पाहूणे मला शिव्यांची लाखोली वाहतात.. फक्त नावातच जैन आहे.. कर्म सगळे क्षत्रियांचेच आहे मी आमच्या पंजोबांच्या - आजोबांच्या गुणावर गेलो आहे ते सेनेत होते ;)

खाली धनजंय ना उत्तर दिले आहे !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

धनंजय's picture

3 Feb 2009 - 3:10 am | धनंजय

जगदिश चंद्र बोस यांच्याबद्दल आपण शाळेमध्ये वाचले. तेव्हा तुम्ही घरच्यांशी, वडीलधार्‍या मंडळींशी चर्चा केली होती का? त्यांनी काय सांगितले?

मी पूर्वी एका जैन कुटुंबाच्या घरी जेवायची सोय केली होती. पण त्यांच्या घरी (अगदी-अगदी क्वचित) चिकन केल्याचे आठवते. त्यांच्या घरी गणपती सुद्धा बसवला होता. त्यांच्याशी धार्मिक चर्चा झाली नाही.

माझे आताचे एक-दोन जैन मित्र कुटुंबाची पद्धत म्हणून पर्युषण वगैरे पाळतात, एक शाकाहारी आहे, दुसरा नाही - पण अहिंसेबाबत त्यांच्याशी चर्चा झालेली नाही.

तुमच्या घरी याबद्दल तुम्हाला काय सांगितले होते? (बाकी बाहुबली हॉस्टेलात केक खाल्ल्याबद्दल मुलाला मारहाण करून हिंसा करणारे शिक्षक तत्त्वज्ञान खूप समजावून सांगणारे नसतील असा विचार मनाला चाटून गेला.)

दशानन's picture

3 Feb 2009 - 10:52 am | दशानन

>> घरच्यांशी, वडीलधार्‍या मंडळींशी चर्चा केली होती का? त्यांनी काय सांगितले?

माझे डोकं जरा फास्ट चालतं... त्यामुळे हाच प्रश्न मी आमच्या कोल्हापुरातील लक्ष्मीसेन मठातील गणधरस्वामींना विचारला पाच मिनिटे समजवत राहीले पण जेव्हा त्यांना योग्य उत्तर देता आले नाही तेव्हा पुजेचे नाटक करत उठून गेले, त्यावेळी मी ९वीत होतो, त्यानंतर श्रवणबेलगोळ ला एक मोठे स्वामी भेटले होते प्रवासामध्ये... त्याच्या सोबतच मी काही किलोमिटर चालत गेलो होतो तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली ह्या विषयावर, त्यांनी वर कलंत्री जींनी की कथा सांगितली आहे तीच कथा मला सांगितली व म्हणाले होते की निसर्ग नियम आपण पाळायला हवा, पण जेथे जेथे मी चर्चा केली इथ मिसळपाववर देखील मला हाच सुर दिसत आहे ही निसर्ग नियम .. हे माझ्या अडचणीचे / प्रश्नाचे उत्तर नाही आहे.. आपण कळत - नकळत एवढी हिंसा करतो तर मग आपण अहिंसावादी कसे ?

माझ्या घरी पुर्वी देखील व आता देखील पुर्ण शाकाहार आहे, माझे सगळे पाहूणे व्हासा ( अंधकार होण्याआधी जेवणे व जेवणार जमीनीतून प्राप्त पदार्थ.. कांदा, मुळं..लसूण न खाणे ) करतात माझी आई देखील व आमच्या वडीलांची चुलत आई अज्जी जी सध्या ८५ वयाच्या पुढे आहे ती पण.. !

पण मी सर्वाहारी आहे... ;) सर्व चालतं !
मी हिंसा व अहिंसा ह्याची घालमेल करण्यासाठी अथवा माझा काहि अट्टहास आहे अथवा कायतरी लिहायचं म्हणून वरील मुद्दे मांडले नाही आहेत.. !
माझी बालसुलभ बुध्दीला हा प्रश्न अनेक वेळा पडला आहे त्यामुळे !

विचार करत आहे, व वाचत ही आहे शक्यतो कोणी तरी ह्या प्रश्नाबद्द्ल माझे समाधान नक्कीच करु शकेल अशी आशा.. !

* त्याच्या घरी गणपती !

आमच्या घरी पण गेली २५ वर्ष गणबती बसत होता.. बसत आहे ! माझ्या मंदिरात व डिस्कटॉप वर देखील गणपती महोदयच आहेत ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

महेंद्र's picture

3 Feb 2009 - 8:39 am | महेंद्र

वनस्पतींना मज्जा संस्था नसतात म्हणुन भाज्या, फळं शाकाहारात मोडतात.
मी शाकाहारी नाही ( पण सध्या कोलेस्ट्रोल वाढल्यामुळे शाकाहाराची कास धरावी लागली ) . पण हे कुठेतरी वाचण्यात आलंय. आठवलं म्हणुन लिवलयं!

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2009 - 11:06 am | पिवळा डांबिस

वनस्पतींना मज्जा संस्था नसतात
ह्यां जरा पटणां नाय...
तेंका सस्तन प्राण्यासारखी मज्जासंस्था नसतीत, पण मग लाजाळूची (छुईमुई) वनस्पती जरा स्पर्श झाल्यावर आपली पानां मिटून घेतां ती कशामुळे?
जाणकारांनी माहिती द्यावी....

महेश हतोळकर's picture

3 Feb 2009 - 12:49 pm | महेश हतोळकर

१. अंड्यात मज्जासंस्था नसते. शाकाहारातील समावेश आजून वादग्रस्त आहे.
२. मृत प्राण्याची मज्जासंस्था निष्क्रीय असते. (नैर्सगीक रित्या) मृतप्राण्यांचा आहारातील समावेश अहिंसावादी मानावा काय?
३. बेशुद्ध जीवाची मज्जासंस्था अंशतः निष्क्रीय असते. आहारातील समावेश अहिंसावादी मानावा काय?

महेंद्र's picture

3 Feb 2009 - 8:41 am | महेंद्र

हे असं काय येतय??स्क्रिन वर??
user warning: Incorrect key file for table './misavcom_misal/cache_page.MYI'; try to repair it query: DELETE FROM cache_page WHERE expire != 0 AND expire < 1233630545 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172.

सुचेल तसं's picture

3 Feb 2009 - 8:42 am | सुचेल तसं

कृपया नीलकांतना कळवावे. मलाही सेम एरर येत आहे. मी त्यांना खरड टाकली आहे.

Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon

विनायक प्रभू's picture

3 Feb 2009 - 8:45 am | विनायक प्रभू

कुणीतरी हिंसा करतो आहे का?

अवलिया's picture

3 Feb 2009 - 10:01 am | अवलिया

कोण हिंसा करतो आहे रे तिकडे? च्यामारी, गोळ्याच घालेन डोक्यात!
हिंसा चालणार नाही. नाही. नाही.
त्याकरता कितीही लोकांना मारावे लागले तरी चालेल.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

3 Feb 2009 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार

सहमत !!
I Can Kill Anyone For The Nobel Peace Prize !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2009 - 11:15 am | पिवळा डांबिस

आपण पुर्ण पणेच परजीवी आहोत असे तुम्हाला वाटतं का ?
नि:संशय होय!
जर आपण परजीवी आहोत मग आपण अहिंसावादी कसे ठरतो
अन्नाची गोष्ट सोडांन द्या....
जर तुम्ही नाकान श्वास घेत असांत आणि पाणी पीत आसांत तर तुम्ही अहिंसक असू शकणात नाय!!!!

बाकी सगळी आपल्या मनाच्या समाधानासाठी दिलेली स्पष्टीकरणां आणि मॅटर ऑफ डिफरन्स इन डिग्रीज!!

मायक्रोस्कोपिक हिंसाचारी,
पिडांकाका

दशानन's picture

3 Feb 2009 - 11:17 am | दशानन

सहमत.

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

सुक्या's picture

3 Feb 2009 - 12:20 pm | सुक्या

अहिंसा अन् त्याचा आहाराशी लावलेला संबंध हा मला तर बादरायन संबंधासारखा वाटतो. आचरट कार्टा ह्यांनी म्हटल्याप्रमाने प्रतीकाराला हिंसा म्हणने हे ही मला पटत नाही. एखाद्याने छेड काढली आनी त्याला प्रतीकार केला तर ही हिंसा हे कसे. जगण्यासाठी मांस खावे लागले तर ती हिंसा कशी? लिखाळांनी म्हटल्याप्रमाणे "गरज आणि चैन यांचा विवेक करता आला पाहिजे". जगण्यासाठी मी एक कोंबडी मारुन खाल्ली तर तो आहार होतो. परंतु केवळ मजा म्हणुन मी जर कोंबड्या मारत सुटलो तर ती हिंसा होइल.

प्रुथ्वीवर मानव्प्राणी बहुसंख्य असल्यामुळे बर्‍याच कोंबड्या मारल्या जातात हे खरे परंतु तो कुठेतरी आहाराचा भाग होतो. त्यामुळे कुनी मांसाहारी असेल त्याच्या क्रुतीतुन कुनाला इजा होत नसेल तर तो अहिंसावादी.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)