वाहतूकदारांच्या संप

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in काथ्याकूट
9 Jan 2009 - 1:57 pm
गाभा: 

नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर उठून सुप्रभाती चालत चालत रेल्वे स्टेशन पर्यंत रहदारी नसलेल्या रस्त्यावरुन जाण्याची मजा कधी अनुभवली आहे ?

कालपर्यंत कंपनीने दिलेल्या गाडीतून आरामात जाणारा बॉस ८.०५ च्या ठाणे लोकल मधे लोंबकाळत उभा आहे आणि ऑफीस मधे पोचल्या पोचल्या संध्याकाळच्या गाड्यांचे वेळापत्रक विचारुन एकत्र जाण्याचे आश्वासन देत आहे असा विचार तरी कोणी करील का ?

पण असे घडायला सुरवात झाली आहे.
निमित्य वाहतुकदारांचा संप
काही दिवसांपुर्वी चालू झालेल्या वाहतुकदारांच्या संपाकडे कॉमन मॅनचे फारसे लक्ष नव्हते. मला काय त्याचे अशी सर्वसाधार्ण मनोवृती होती. पण आज ५ -६ दिवसांनंतर त्याचे चटके सर्वसामान्याना जाणवू लागले आहेत.
या सर्व परिस्थितीचा लाभ उठवत तेल कर्मचारी ही आपापल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. या दोन्ही गोष्टींचा पहिला फटका पेट्रोल, डिझेल यांच्या उपलब्धतेत झाला आहे.
पेट्रोल बरोबर इतर अनेक जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा भासु लागला तर परिस्थिती आणखी चिघळेल. काल पर्यंत मी या गोष्टीचा विचार केला नव्हता मात्र काल वाहनातील पेट्रोल संपल्यावर परिस्थितीची जाणीव झाली.
संपकरी लोकांच्या मागण्या काय आहेत याची फारशी माहिती नाही. कदाचीत त्यांच्या मागण्या रास्त ही असू शकतील. परंतु सरकार आणी संपकरी यांच्यातील बोलणी संपलेली नाहीत. तडजोड केंव्हा होणार याची कल्पना नाही. परिस्थिती अशीच राहिली तर आणखी बर्‍यास संकटांचा सामना करायला लागेल ? तुम्हाला या संपाचा परिणाम जाणवू लागला आहे का ?

प्रतिक्रिया

सुनील's picture

9 Jan 2009 - 2:03 pm | सुनील

गाडीतील पेट्रोल आत्ताच २५% वर आले आहे. उद्या आणि परवा गाडीबरोबरच स्वतःलाही मस्त आराम द्यायचा विचार आहे. तोवर संप मिटला तर ठीक (बहुधा मिटेलच) नाहीतर सोमवारी एक्स्टेंडेड आराम!!

बाकी रस्त्यांवर रिक्षा कमी असल्यामुळे बरे वाटत होते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चंबा मुतनाळ's picture

9 Jan 2009 - 2:44 pm | चंबा मुतनाळ

सरकारने लश्कराला पाचारण केले आहे. लश्कर पेट्रोल/डीझेल च्या दळणवळणास उपयोगात आणले जाईल, तसेच ते संपात सामील असलेल्या रिफायनरीज पण चालवील.

मला वाटत होते PSU वाले संपावर जाऊ शकत नाहीत म्हणून

गुंड्या's picture

9 Jan 2009 - 3:15 pm | गुंड्या

भारत पेट्रोलियमनं संप संपल्याचं जाहीर केलं आहे

तिमा's picture

9 Jan 2009 - 5:40 pm | तिमा

आता आपल्या देशांत आणीबाणी लावण्याची वेळ आली आहे. बाहेरची इतकी संकटे असताना सरकारला सहकार्य करायचे सोडून अडवणुक करणे म्हणजे अराजकाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. जो उठतो तो सामान्य माणसाला पिळतो!