आज मार्केट्मध्ये दम नव्हता. ग्रोकला स्क्रीनशॉट देऊन विचारलं होल्ड करू एक्झिट ग्रोक ने विचार करून लगेच एक्झिट करायला सांगितलं. तेव्ह्ढयात कशानंतरी लक्ष विचलित झालं आणि माझी पोझिशन गडगडली. मग चिडचिड करत बाहेर पडलो.
पण मार्केटचा राग कशावर काढायचा म्हणून पाव करावा असं मनात आलं. पावासाठी कणीक तिंबणे थेरप्युटीक असते. जवळ-जवळ ४-५ वर्षे पाव घरात केलाच नव्हता. मग धडाधड सगळी कपाटे शोधून सामान बाहेर काढल.
Bread (yeast)
२०० ग्रॅम मैदा
१/4 टीस्पून yeast
१०० मिली पाणीr
5 ग्रॅम मीठ
तेल
Baking time 30 min
सोअरडो ब्रेड हे माझं अंतीम साध्य आहे. कुणी केला असल्यास इथे अनुभव शेअर करावेत.
प्रतिक्रिया
24 Jul 2025 - 9:56 pm | कानडाऊ योगेशु
पाव घरी बनवता येतो हे मला माहिती नव्हते. म्हणजे बनत ही असावा पण बेकरीत मिळतो तसा बनत नसेल. पण तुमच्या प्र.चि मध्ये तर खर्याखुर्या बनपाव सारखा पाव दिसतो आहे.
25 Jul 2025 - 9:04 am | युयुत्सु
वेळखाऊ प्रकरण आहे. पण त्यात अनेकांना अध्यात्मिक आनंद मिळतो. तुम्ही पण अवश्य करून बघा.
25 Jul 2025 - 10:25 am | Bhakti
हे आता पण काही शतकांपूर्वी पावामुळे लोक बाटले जायचे!किती शोकांतिका.
4 Aug 2025 - 2:58 pm | संजय पाटिल
पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात.
4 Aug 2025 - 3:08 pm | अभ्या..
पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात.
हा खरेतर मला आधिपासून पडलेला प्रश्न आहे.
महाराष्ट्रात, किंबहुना देशात कित्येक सहस्त्रके सर्व प्रकारच्या मांसाहाराची परंपरा आहे. अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी हा तसा फारसा अनोळखी प्रकार नसावा बहुजन हिंदूंना. अगदीच धार्मिक कारणामुळे पूर्णपणे शाकाहारी असणार्या काही अल्प जमाती सोडल्या तर अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी लावलेला पाव तो सुध्दा विहिरीत टाकला अन त्या विहिरीचे पाणी प्यायले तर आपला धर्म बुडेल ही भीती कशी बरे निर्माण झाली असावी?
4 Aug 2025 - 3:21 pm | युयुत्सु
जुन्या पिढ्यांमध्ये शुद्ध आणि अशुद्ध, स्वच्छ आणि अस्वच्छ या कल्पनांचा पगडा (तसा तो आता ही आहे, पण वेगळ्या स्वरूपात - आता एक्स्पायरी डेट्चे माहात्म्य बरेच आहे) खुप होता. मुळात समुद्रगमन निषिद्ध, मग समुद्रमार्गाने आलेल्यांच्या सर्वांचा 'विटाळ' मानला जाऊ शकतो. टिळकांना विलायतेला जाऊन आल्यावर 'प्रायश्चित्त' घ्यावे लागले होते, असे कुठे तरी वाचले होते.
2 Aug 2025 - 1:45 pm | असंका
कसा झाला होता? किती पाव तयार झाले? प्रुफिंग किती वेळ / वेळा केलं? थोडा जास्तच खरपूस झालाय असं फोटोत वाटतंय, तर ते खरंच जास्त भाजलं गेलंय का? हलका झालाय का?
थोडे जास्तच प्रश्न आहेत, जमलं तर सांगा!!
2 Aug 2025 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह ! क्या बात है. मस्त झालाय पाव.
-दिलीप बिरुटे
2 Aug 2025 - 2:49 pm | युयुत्सु
श्री० बिरूटेसर,
मनःपूर्वक धन्यवाद!
बाय द वे - तुमच्या छळवादाबद्दल सहानुभूती आणि मी एकटा नाही या भावनेने बराच धीर आला.
2 Aug 2025 - 2:49 pm | युयुत्सु
श्री० असंका
पाव बर्यापैकी हातात बसला आहे. पाणी, तापमान (रूम टेंपरेचर) आणि यीस्ट्चा दर्जा याचा मेळ घालता आला की पाव जमायला लागतो. तुम्ही पाव करणार्या लोकांचे व्हिडीओ बघितले तर त्यांच्यात एकसमानता नाही. वर केलेला पाव एकंदर दीडतास १+ १/२ असा प्रुफ केला. म्ह० १ तास आंबवल्यावर कणिक तिंबली मग अर्धा तास वाट बघून ओव्हन मध्ये टाकला. या वेळेत यीस्ट पिठातच मिसळले. सहसा ३५-३८ सें० कोमट पाण्यात अगोदर सक्रिय करून घेतो.
मला स्वतःला खरपूस भाजलेला म्ह० क्रस्ट जळलेला पाव अ तिशय आवडतो. अजून ५ मि० ठेवायला हवा होता.
2 Aug 2025 - 4:02 pm | असंका
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद!!
अजुन एक, टेंपरेचर काय ठेवले होते, का फक्त ग्रील केलंय?
आणि वर रंग यायला ब्रशिंग केलंय का, आणि कशाने...?
(किती पाव झाले, आणि हलका कितपत झालाय?..)
3 Aug 2025 - 8:28 am | युयुत्सु
माझ्या ओव्हनमध्ये तापमान नियंत्रित होत नाही पण वॉटेज सेट करता येते. त्यामुळे फक्त ८०० वॅटला ग्रील केले आहे. ब्रशिंग केले नाही, केले असते तर आणखी चमक आली असती. पाव हलके पण त्यातलं पाणी कमी झालं की वाढतं. घरी केलेला पाव दोन दिवसांनी मुरला की जास्त चांगला लागतो. बर्याच दिवसांनी करत असल्यामुळे एकच केला होता.
4 Aug 2025 - 6:53 am | असंका
ओके!!या माहितीवरून आता पुढे जाता येइल..!!
धन्यवाद!!_/\_
4 Aug 2025 - 3:28 pm | सोत्रि
पाव झक्कास दिसतोय, चवीलाही फक्कड असावाच. मलाही खरपूस भाजलेला पाव विषेश आवडतो.
- (पाववाला) सोकाजी