नमस्कार मीपाकर, सर्वांना सर्वांच्या शुभेच्छा!
तर एकजण म्हणत होता की टेली कॉलिंगची एजन्सी काढावी, त्याने मला विचारणा केली की यात तुला काही अनुभव आहे का?
तर ते असो, एखाद्याला टेलीकॉलिंगची एजन्सी म्हणजे तो कंपनीकडून कॉन्टॅक्ट घेणार व स्वतःची एक टीम बनवून कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणार.
पण असे क्लाइंट्स कुठे मिळतात आणि आपण त्यांना कुठली सेवा देत आहोत असे सांगायचे असते?
भारतातील किंवा भारताच्या बाहेरच्या देशात कुठल्या फिल्डमध्ये व काय सांगून असे क्लाइंट्स मिळू शकतात?
बस हे काही प्रश्न आहेत तो व्यक्ती स्वतः कॉल सेंटरमध्ये काम केलेला आहे पण त्याला स्वतःला क्लाइंट्स कसे मिळवायचे याचे ज्ञान नाही.
म्हणून माझे ज्ञान कमी पडत होते म्हणून इथे लिहीत आणि विचारत आहे.
कृपया एक नंबर सहकार्य करावे !
परत सर्वांना सर्वांच्या शुभेच्छा!