मिपा कला संग्रहालय - ३ .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in मिपा कलादालन
14 Jul 2024 - 11:54 am

नमस्कार मिपाकर हो !
मिपा कलादालन ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा सुरु करत आहे : .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.
ह्या धाग्यावर ऐतिहासिक व्यक्ती , किंवा प्रसंग ह्यांची चित्रे द्यावीत.
प्रतिसादात हे टेम्प्लेट वापरल्यास सर्वांनाच सोयीचे होईल .

प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव

प्रतिसाद :
चित्राचे नाव
चित्रकाराचे नाव :
इंटरनेटवरील लिंक
पर्यायी लिंक:
सर्व चित्रांची लिंक :
चित्र :

टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2024 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले

चित्राचे नाव :पेशवा दरबार
चित्रकाराचे नाव : थॉमस डॅनियल
इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell
चित्र :
1

टिप्पण्णी : हे माझ्या आवडत्या चित्रांपैकी एक. ह्या चित्रावरुन पेशवा काळात असलेल्या शनिवार वाड्याची भव्यता आणि समृध्दी दिसुन येते. पेशव्यांच्या बैठकी मागे श्री गणेशाची भव्य मुर्ती (की चित्र? ) होते असे ऐकुन आहे, मात्र ह्या चित्रात श्री विष्णुंची चतुर्भुज रुपातील मुर्तीही दिसत आहे !

Bhakti's picture

15 Jul 2024 - 11:58 am | Bhakti

पशुपति
सिंधू संस्कृती मोहोर एक शिल्प
A
माहिती नाही हे या धाग्यात बसते की नाही पण एक ऐतिहासिक चित्रण/शिल्प/मोहोर काय योग्य वाटेल त्यात हे बसवावे.
कधी कधी ना एखाद्या प्रश्नावर अनेकदा तिथंच घुटमळते, उत्तर का मिळत नाही हे सतावते.तेव्हा मी हे शिल्प आठवते.म्हटलं तर याचं उत्तर मिळालं हा प्राण्यांनी वेढलेला त्यांचा देव पशुपती आहे.तर काहींचं म्हणणं ही दुर्गा देवी,तर काही हा योगी शिव,तीन मुख?चार मुख?
अशी ना ना प्रश्न याभोवती जमा होतात.उत्तर जे तुम्हाला समाधान देईल ते!

आंद्रे वडापाव's picture

21 Feb 2025 - 3:47 pm | आंद्रे वडापाव

पशुपती.... पशुपती.... वैगरे करत .. लगेच आपण भारतीयांनी हवेत जायची गरज नाही ...
एखाद्या गोऱ्या माणसाने (इंग्रजाने ) संशोधन वैगरे करून ही मुद्रा शोधली आणि तिला पशुपती वैगरे म्हटलं तर लगेच आपण भारतीयांनी ...
बघा बघा आमची संस्कृती यंव आणि त्यांव करण्याची तशी गरज नसते..

तत्कालीन मूलनिवासी वैगरे जमातीतील एखादा पारंपरिक पोशाख वैगरे असेल तो, कुठल्यातरी कार्यक्रमाचा .... त्याचेच चित्रण मातीच्या मुद्रेत केले गेलं असेल ...

p

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2025 - 4:10 pm | प्रसाद गोडबोले

है शाब्बास . असं लिही असं लिही . म्हणजे लगेच साहित्य अकादमी .
=))))

(संदर्भ: देऊळ चित्रपट)

आंद्रे वडापाव's picture

21 Feb 2025 - 5:02 pm | आंद्रे वडापाव

अहो असं काय बोलताय राव !!

तो फोटो दत्ताच्या एका अवताराचा आहे...

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2025 - 6:48 pm | प्रसाद गोडबोले

आवडीत दत्त सवडीत दत्त =))))

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2025 - 2:51 pm | प्रसाद गोडबोले

नुकतेच चित्रगुप्त काका ह्यांच्या सोबत आमचे औंधचे म्युझियम पाहण्याचा योग आला ... तिथे पाहिलेले हे एक अफलातून चित्र

ओलेती
एस.जी. ठाकूर सिंग
Oleti

माझ्या माहितीप्रमाणे हे चित्र दीनानाथ दलाल यांनी काढलेले आहे.

आंद्रे वडापाव's picture

26 Feb 2025 - 11:17 am | आंद्रे वडापाव

हे राम...

सुरिया's picture

26 Feb 2025 - 12:30 pm | सुरिया

दीनानाथ दलालांनी अशाप्रकारची बरीच चित्रे केली असली तरी हे त्यांचे नाही. शैली वेगळी आहे. अ‍ॅनॉटोमी दलाल साकारत तशी नाहीये. मुख्य म्हणजे ठाकूर सिंगाची सही आहे डाव्या बाजुला खाली. दलाल मुख्यत्वे कमर्शिअल कामे करीत. कॅलेंडर वगैरे साठी जरी असे चित्र केले तरी त्यांची लफ्फेदार सही असली असती. अगदी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या शिष्यांनी जरी काम केले तरी त्यावर त्यांच्याच सहीतला द हे अक्षर एका छोट्या त्रिकोणात बसवलेली स्वाक्षरी असायची.
तस्मात हे चित्र दलालांचे नाही.

राघव's picture

27 Feb 2025 - 5:53 pm | राघव

तुमच्यामुळे माझी माहितीतील चूक सुधारली. धन्यवाद! :-)

अफलातून वगैरेर वाटले असेल हे चित्र तर वास्तविक पाहता गोडबोल्यांना एक अनाहूत सल्ला द्यावा वाटतो.
अध्यात्म, अभंग, अर्थ पुरेसे आहे. उगी कलेच्या उंटाच्या कशाला मागे लागता?
तुमची चुकलीय ती ट्रेन. द्या सोडून.

प्रसाद गोडबोले's picture

26 Feb 2025 - 11:25 pm | प्रसाद गोडबोले

राम :)

विवेकपटाईत's picture

27 Feb 2025 - 12:13 pm | विवेकपटाईत

नंदी  हडप्पा
जिथे शिव पशुपति असतो तिथे नंदी ही असतो - सिंधुघाटी वैदिक सभ्यता

आंद्रे वडापाव's picture

27 Feb 2025 - 4:05 pm | आंद्रे वडापाव

हीच का तुमची सिंधू घाटी सभ्यता ??

ज्या सावरकरांना मानता . त्यांनीच एक प्रश्न विचारला होता.

गाय ही जर माते समान, तिचे मल मुत्र प्राशन करणे जर पवित्र ...
तर तुमच्या जन्मदात्या आईचे सुद्धा मल मुत्र प्राशन तुम्ही का करत नाही ??

सदर फोटोतील व्यक्ती तथाकथित डॉक्टर आहे ..
फोटो पाहून वाटतं .. खरं आहे ... शिकला म्हणजे अक्कल असेलच असे काही नाही ... शेवटी शहाणपण स्वतःच्या डोक्याने विचार करून येतं ...
.
.
.

a

सुरिया's picture

27 Feb 2025 - 1:27 pm | सुरिया

सिंधुघाटी वैदिक सभ्यता

काहीही फेकतो हा माणूस बिनधास्त.
काय संबंध सिंधू संस्कृतीचा आणि वेदाचा आणि वैदिक धर्माचा?
आणि असेल तर त्या बैलाच्या वर लिहिलेले वाचून दाखवा बरं. वेदात असेलच ना हि लिपी.