न्यूत की द्यूत?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 May 2024 - 3:47 pm

आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे. त्यांना त्याचा कोरीयात अजूनही खेळल्या जाणार्‍या पुरातन न्यूत खेळाशी साधर्म्य असण्याची शक्यता त्यांनी त्याच्या चक्राकार टिंबाकृती आणि चक्रास काटकोनातून छेदणार्‍या दोन व्यासांवरून वर्तवली असल्याची शक्यता दिसते.

हा न्यूत (Yunnori / यूत) या कोरीया आणि पूर्व आशियातील संस्कृतीचे संदर्भ या खेळास जोडले गेल्याचे दिसते. मी खेळाच्या अधिक अभ्यासासाठी वेळ देऊ शकलो नाही पण एका दक्षिण भारतीय महिलेचा खेळाचा काहीसा अभ्यास केलेला हा युट्यूब व्हीडियो मिळाला. दक्षिण भारतीय महिलेने केलेले घोडे आणि तबेल्यांचे उल्लेख सूचक वाटतात.

प्राचीन काळापासून भारताची पूर्व आशियाशी बरीच देवाण घेवाण आहे. न्यूत / यूत आणि द्यूत यात अंशत: उच्चारसाम्य असल्याचा विचार मनात आला तसे विचार मनात न ठेवता मिपाकरांशी शेअर करावा म्हटले.

संस्कृतीइतिहासमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

पचिसी - दक्षिण भारतात लहानपणी खेळलोय मी

ऋग्बेदातील अक्ष सुक्त आठवले.

https://www.nios.ac.in/media/documents/bgp/Sr_Secondary_Hindi/Vedadhyan_...

अहिरावण's picture

9 May 2024 - 7:39 pm | अहिरावण

aa

हल्ली गाय, शेण, गोमुत्र यांना तुच्छ मानण्याची वृत्ती बोकाळली आहे. ऋग्वेदात गायीचे अपार महत्व आहे. आपली संस्कृती गाय, गोमय, गोमुत्र यांना पवित्र मानते. आपले पुर्वज याच पावित्र्याला जपत आपली संस्कृती वर्धिष्णू ठेवत आणि वसा पुढे देत. आज अचानक त्यांना बाजुला सारुन आपण महान आहोत हा विचार मानणे म्हणजे आपले पुर्वज नाकारणे. असो. ज्याची त्याची जाण समज

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 8:28 pm | अमरेंद्र बाहुबली

सावरकरांच्या गायी बद्दलच्या विचारांवर आपलं मत काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 8:29 pm | अमरेंद्र बाहुबली

असो. हा धागा राजकीय नाही. चुकून इथे प्रतिसाद दिला. इथे चर्चेची आवश्यकता नाही.

अहिरावण's picture

9 May 2024 - 8:36 pm | अहिरावण

>>>सावरकरांच्या गायी बद्दलच्या विचारांवर आपलं मत काय?

तुमच्याशी कोणत्याही पद्धतीची चर्चा, वाद, संवाद, विचारांची देवाण घेवाण, ख्यालीखुशाली, विचारपुस, आपुलकीचे वा शत्रुत्वाचे संप्बंध ठेवण्याची माझी इच्छा नाही.
यासंबंधी कोणताही बदल होईल असे मला वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी मित्र नाही, शत्रु नाही. परिचित नाही, अपरिचित नाही. केवळ एक परका.
तुम्ही माझ्याबद्दल हवे ते बोलण्यास, लिहिण्यास, विचार करण्यास स्वतंत्र आहात. माझ्याबद्द्ल काहीही लिहिले अक्षरशः काहिही लिहिले तरी मी विचारणार नाही अथवा प्रतिवाद करणार नाही.

हा जाहीर शेवटचा तुम्हाला दिलेला प्रतिसाद. विषय संपला.

चौकस२१२'s picture

10 May 2024 - 5:57 am | चौकस२१२

सावरकरांचे फक्त अर्धे विचार घेऊ नका सगळे घ्या हिंमत असेल तर आचरणात
जरूर पडली तर गाय हि खावी ह्याच अर्थ जे हिंदू जे गायचं काय मास हि खात नाहीत याना डिवचण्याचा डाव म्हणून मुद्दामून बीफ पार्टी करावी याचे समर्थन सावरकरांनी केलं नाही
ह्याला विंग्रजीत चेरी पिकिंग असे म्हणतात

भारताबाहेर पडल्यावर नेहमी हा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही हिंदू गाय/ बैल का खात नाही , यावर " धर्मात निषिद्ध आहे म्हणून " असे अजिबात ना सांगता त्यामागची सामाजिक, शेती. अर्थ हे कारण आहे ( गाय जिवंत असून तिचा जास्त उपयोग आहे एकदा मारून नाही निदान तेवहा जेवहा भारतासारख्या देशात गायची पैदास करणे त्यानं जगवणे एवढे सोपे नवहते "
आता हा तर्क प्रत्येकाला कुठे समजवत बसायचा असा विचा रकृं पूर्वी कोणतरी हुशार व्यक्तीने त्याला धार्मिक स्वरूप दिले असावे ( हा माझा तर्क )

असे सांगितल्यवा र्बहुतेक जण समजून घेतात

स्पष्टीकरण मी गोमास खाल्ले आहे परंतु ना खाणाऱ्यांचा पूर्ण आदर

माहितगार's picture

10 May 2024 - 7:06 am | माहितगार

विवीध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी याचा मी आग्रही असतो पण अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरानी अभ्यासपूर्ण चर्चेचा रसभंग होतो. ह्या धाग्यात नवा आणि वेगळा विषय आहे तो नेहवीच्या वाद विवादांनी हायजॅक होऊ देणे सयुक्तीक नाही यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे आणि संपादकांनी अनुषंगिक नसलेले सर्व प्रतिसाद उडवावेत अशी नम्र विनंती

माहितगार's picture

9 May 2024 - 10:57 pm | माहितगार

@अहिरावण आपण वर झालेल्या अनुषंगिक नसलेल्या विषयांतराकडून धागा लेखाच्या मूळ विषयाकडे येऊ.

तसे जुगारी जुगार (पैसा) खेळ किंवा खेळ नसलेल्या कोणत्याही भविष्यात काय होणार हे निस्चित न सांगता येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर लावू शकतो. द्यूत शब्दामुळे जुगाराची आठवण होणे स्वाभाविक असले तरी आपण इथे न्यूत / द्युत यांचा मुख्यत्वे खेळ म्हणून विचार करतो आहोत.

एनीवे आपण दिलेल्या ऋग्वेद ऋचांमध्ये नेमके कोणते शब्द संबंधीत खेळा बद्दल किंवा जुगारा बद्दल आहेत हे समजून घेण्यास आवडेल .

पहिल्या प्रतिसादात लिंक आहे त्यामधे बरीच माहिती आहे

माहितगार's picture

9 May 2024 - 11:39 pm | माहितगार

या संस्कृत कोशात अक्ष शब्दाच्या अर्थात जुगार आणि चाक ह्या दोन्ही अर्थांचा समावेश दिसतो त्या शिवाय अक्षद्युत असा शब्दही दिसतो आणि न्यूत हा खेळही वर्तुळाकार असणे इथे लक्षात घेण्यासारखे असावे असे वाटते.

माहितगार's picture

10 May 2024 - 7:46 am | माहितगार

जिज्ञासूंसाठी इंग्रजी विकिपीडियावर गॅम्ब्लेर्स लॅमेन्ट लेख दहावे मंडल लेख दुवे.

एक वेगळा अनुषंगिक प्रश्न मनात आला की महाभारतातील धर्मराज युधिष्ठीराचा द्यूतातील सहभाग काल्पनिक नाही असे समजले तर धर्मराज युधीष्ठीराने ऋग्वेदातील अक्ष सुक्तास प्रमाण मानून द्य्ट्य खेळण्यास नकार द्यावयास हवा होता किंवा महा भारतातील प्रसंग आधी झाला / लिहिला यातुन ऋग्वेदातील ऋचेची प्रेरणा असेल तर महाभारत प्रसंगाचा उल्लेख ऋग्वेदातील सुक्तात आला असता. एक अशीही शक्यता असू शकते का की अक्ष सुक्त आणि महाभारतातील द्युत प्रसंग लिहिणार्‍या व्यक्ती एकच असतील किंवा समकालीन असतील? मला वाटते तीसर्‍या शक्यतेचा अभ्यास व्हावयास हवा कारण मी जर जुगार सट्ट्यावर टिका करणारा साहित्यिक असेन तर सुक्तही लिहीन आणि स्पष्ट करणारे कथानक लिहिन त्यामुळे एका लेखन प्रकारात दुसर्‍या लेखनाचा उल्लेख करणे गरजेचे किंवा सयुक्तिक वाटणार नाही.

अहिरावण's picture

10 May 2024 - 12:34 pm | अहिरावण

तुम्ही नक्की कोणते पेय घेता हो ? नाही म्हणजे इतके भन्नाट विचार कसे उत्पन्न होतात? :)

परंपरा मोड

परंपरेनुसार व्यासांनी महाभारत लिहिले आणि व्यासांनीच ऋग्वेद संहीता संपादीत केली असे मानले जाते.

परंपरा मोड समाप्त

महाभारत लेखन काल इसपु २ ते ४ शतक
ऋग्वेद इसपु १००० ते १५००
कदाचित आज जसे अनेकांना वेद, पुराणातील नेमके माहित नसते तसेच दशग्रंथी पाठांतर करणा-यांव्यतिरीक्त फारसे कुणाला ऋग्वेद सुक्त, अर्थ माहीत नसावे. पाठांतर करणा-या सर्वांनाच ते माहित असतील असे नसावे.

महाभारत ज्या लेखकाने/लेखकांनी लिहिले त्यांना हे सुक्त माहित होते वा नव्हते हे माहित नाही. माहित असेल तर सुक्ताचा उल्लेख न करता कथानकात खुबीने वापर केला. एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.

माहितगार's picture

10 May 2024 - 2:55 pm | माहितगार

आज अक्षय तृतीये निमीत्ताने आंब्याचा रस घेतला. तसा मागच्या महिन्यापासून चालूच असल्यामुळे शरीरात वाढलेल्या साखरेचा प्रमाद असल्यास ठाऊक नाही.

एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.

हे माहित नव्हते

अहिरावण's picture

10 May 2024 - 7:22 pm | अहिरावण

>>>हे माहित नव्हते

हे धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड

माहितगारांना माहित नव्हते असे काही मिळाले हो... =))

मला स्वतःला काय माहित नाही ते माहित असते म्हणून माहितगार!

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली

I am wise man in the world because i know that i know nothing.
अस काहीतरी एक गोरा बोलून गेलाय ना?

अहिरावण's picture

11 May 2024 - 9:58 am | अहिरावण

मला एवढंच कळतं की मला काही कळत नाही. साक्रेटीस का कुणी असाच ग्रीक विचारवंत.