गूगल ट्रेन्ड्स २०२४

माहितगार's picture
माहितगार in राजकारण
4 Mar 2024 - 4:45 pm

मागच्या आठवड्यात दक्षिणेतील मुख्यमंत्री आणि एक राज्यस्तरीय मुख्य विरोधक असा गूगल ट्रेंड शोध घेऊन लेख लिहिला पण अनवधानाने तो माझ्याकडून डिलीट झाला होता. दक्षिणेतील राजकीय नेत्यामध्ये जगन मोहन रेड्डी आंध्रातच नव्हे तर भारतातही अधिक शोधले जात असलेले नेते असावेत असे गूगल ट्रेंड्स दाखवत होते. आज प्रशांत किशोर यांचे जगन मोहन रेड्डी अँटी इन्कुम्बन्सी आणि मध्यमवर्गीय अ‍ॅस्पिरेशनल वोटर्स योजनांच्या अभावामुळे मागे पडतील असे भाकीत केले आहे म्हणून गूगल ट्रेंड्स पुन्हा एकदा तपासले तर आंध्रात गूगल ट्रेंड्सवर अद्याप तरी जगन मोहन रेड्डी तेलगु देशमच्या चंद्राबाबु नायडूंच्या बरेच पुढे आहेत असे दिसते.

बाकी भारतातील राजकीय तुलना प्रतिसादांच्या माध्यमातून येत्याकाळात वेळ मिळेल तशा जोडण्याचा मनोदय आहे.

मोदींकडे दाक्षिणात्य भाषा येऊन दक्षीणेत पुरेसा लोकप्रीय असा प्रभावी नेता अद्याप नसल्यामुळे भाजपाची प्रगती होत असली तरी अद्याप त्यास सावकाशच म्हणणे क्रमप्राप्त ठरते. असो.

* या पुर्वीची गूगल ट्रेन्ड्स विश्लेषणे मी मुख्यत्वे इतरांच्या धाग्यांत प्रतिसाद स्वरुपात केली असल्याने त्यांचे जुने संदर्भ देणे शक्य झालेले नाही. मनुष्यस्वभावाबाबत माझा अंदाज लोक सहसा स्वतःच्या आवडत्या गोष्टींच्या शोधात अधीक असतात आणि त्यांचा अंशतः का होईना परिणाम गूगल सर्च आणि गूगल ट्रेन्ड्स मध्ये दिसून येतो. मागच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काही आठवडे आधी गूगल ट्रेंड्स मध्ये शरद पवारांचा प्रभाव इतर महाराष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत वाढल्याचे आठवते. पण गूगल ट्रेंड्स मध्ये महाराष्ट्रीय नेत्यात राज ठाकरे बर्‍यापैकी आघाडीवर असत पण त्याच्या लोकप्रयतेचे परिवर्तन मतात झालेले दिसले नाही याचे विश्लेषण मतात परिवर्तन होण्यासाठी दुसर्‍या फळीतही सुयोग्य नेतृत्वाची अंशतः गरज, काही लोकप्रीय आश्वासनांच्या घोषणा आणि लोकांना नको असलेले न बोलणे याची दक्षता असे फरक असतील असे वाटले. असो

* अनुषंगिकाव्यतरीक्त आवांतर आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार.

प्रतिक्रिया

हे कोण व्यक्ती आहेत असं किती लोक शोधत आहेत एवढेच गूगल ट्रेंडमध्ये कळेल. त्यांचा आणि लोकप्रियतेचा किंवा निवडून येण्याचा संबंध काही नसेल.

टर्मीनेटर's picture

4 Mar 2024 - 6:55 pm | टर्मीनेटर

+१
बाकी तामीळनाडूचे 'के. अन्नामलाई' सध्या गुगल सर्च आणि समाजमाध्यमांत चांगलेच ट्रेंड मध्ये आहेत. नुकतीच त्यांनी पुर्ण केलेली राज्यव्यापी ('एन मन एन मक्कल') पदयात्रा भलतीच यशस्वी झालेली दिसत आहे. अर्थात तामीळनाडूतील जवळपास सर्व माध्यमे सत्ताधारी किंवा विरोधातील द्रविड पक्षांच्या हातात असल्याने तामीळी जनतेचा प्रचंड असा उस्फुर्त प्रतिसाद मिळालेल्या त्या पदयात्रेला बिलकुल प्रसिद्धि दिली गेली नाही हा भाग वेगळा! हिंदुत्वाची पाठराखण करत, विभाजनवादी 'पेरीयार' संस्कृतीला राज्यातुन उखडुन टाकण्याचे जाहिर अश्वासन देणारा माजी आय.पी,एस. अधिकारी असलेला आणि तामीळनाडूचा भावी मुख्यमंत्री म्हणुन नावारुपाला येत असलेला हा धाडसी युवा नेता कर्नाटकातल्या आपल्या पोलीसी कारकिर्दीत रीअल 'सिंघम' म्हणुन का ओळखला जात होता हे जाणुन घेणे रोचक आहे.
आपण तर बुवा फॅन झालोय ह्या धडाकेबाज 'अन्नामलाई'चे!

- टर्मीनेटर (मोदी का परीवार)

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2024 - 10:48 pm | चौथा कोनाडा

तेजस्वी सुर्या आणि के. अन्नामलाई दक्षिणेतील (किंवा भारतातीलही) आगामी मोदी शहा ?

अहिरावण's picture

4 Mar 2024 - 7:51 pm | अहिरावण

कुणी काहीही शोधो... राहुल गांधींची लोकप्रियता अबाधित राहणार हे निश्चित.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2024 - 9:53 pm | मुक्त विहारि

ते परमपूज्य व्यक्तीमत्व आहे...

ते सध्या पीठ लिटर मध्ये मोजतात .

बाकी, अद्यापही मी, ढाई हजार पाच सौ रुपये... म्हणजे नक्की किती रुपये? हे मोजू शकलेलो नाही...

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2024 - 10:49 pm | चौथा कोनाडा

राहुल गांधींची लोकप्रियता अबाधित राहणार हे निश्चित.

राहुल गांधी नसले तर भारतीय राजकारण आणि भारतीय मनोरंजन सृष्टीची कल्पनाही करवत नाहीये !

अलीकडे तामीळ मंडळींना तमीळ पंतप्रधान असे स्वप्न पहाण्यास प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न असल्याचे अमीत शहांचे प्रयत्न आहेत. (डेक्कन हेराल्ड दुवा). या मुद्याकडे भाऊ तोरसेकरांनी अलिकडेच लक्ष वेधले आहे (यंदा दक्षिणेतला पंतप्रधान होईल असे अमित शहा कशाला म्हणाले ?). तोरसेकरांच्या म्हणण्यानुसार अमीत शहा मोजक्या शब्दांचे धनी आहेत आणि जुमले बाज नाहीत.

तामीळनाडूस राष्ट्र्वादी धारेत आणण्याच्या दृष्टीने भाजपीय पेटलेले असतील तर नवल नाही. के. अण्णमलई यांच्या रुपाने भाजपास स्थानिक लोकप्रीयता उपलब्ध करण्यास सक्षम एक चांगला तामीळ चेहराही मिळाला आहे. एक साधी सोपी शक्यता वाराणसी प्रमाणे नरेंद्र मोदी तामीळनाडूतून लोकसभेची निवडणूक लढवतील तरीही तामीळनाडूतून निवडून आलेला पंतप्रधान असे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असेल. मोदींचे वय सध्या ७३ आहे आणि ७५ ला राजकीय निवृत्ती किंवा पक्षाध्यक्षपद-राज्यपाल-राष्ट्रपती अशा काही जबाबदारीचा मोदी विचार करणार असतील का? आणि असे झाले तर तुम्हाला के.अण्णामलई यांच्या खरेच सधी लगेच वाढत आहेत असे वाटते का ? ओपीनीयन पोल्स मध्ये के. अण्णामलई यांची स्थिती माहित नाही पण गूगल सर्च मध्ये त्यांची आणि भाजपाची स्थिती चांगलीच सुधारत असून कदाचित अण्णाद्रमुकचा काही मतदार वर्ग फोडण्यात त्यांना यश येईल का अशी शंका वाटते. भाजपा जर तामीळनाडूस पंतप्रधानपद देण्याबाबत खरेच गंभीर असेल तर राजकीय अनुभवाच्या दृष्टीने के. अण्णामलई अगदीच नवखे ठरतात मग एखादे नाव सुटत नाहीए ना?

निर्मला सितारामनांमबद्दल तुम्हाला काय वाटते. तामीळनाडूत त्यांची स्थानिक लोकप्रीयता मर्यादीत असली तरी तामीळ चेहरा या व्याख्येस त्या पात्र ठरतात. व्यक्तीशः अर्थमंत्रीपदा पेक्षा आतरराष्ट्रीय व्यापार निगोशीएट करण्यात त्या अधिक प्रभावी राहील्या आहेत असे मला वाटते. व्यक्तिगत मत बाजूला ठेऊन त्या अंबानी, अडाणी इत्यादी पदद्यामागच्या गटासही स्विकार्य वाटल्या तर शहा म्हणतात त्या शब्दात दम खरेच असूही शकतो. ( अर्थात सद्द्य भाजपा नेतृत्व कधी नुसतीच जुमलेबाजी करतात तर कधी आश्चर्यचकीत ही करून सोडतात हे.वे.सा.न.ल.)

* तामीळनाडू गूगल ट्रेंड्स के. अण्णामलई, एम के. स्टालीन, निर्मला सिथारामन

* तामीळनाडू गूगल ट्रेन्ड राहुल गांधी, नरेन्द्र मोदी, एम. के स्टालीन

* तामीळनाडू गूगल ट्रेन्ड्स पक्ष नावानुसार हा ट्रेन्ड वेग्वेगळ्या कालावधीसाठी बदलून पाहीला तर भाजपाचा वाढता प्रभाव दिसून येतो मताच्या टक्केवरीवर प्रत्यक्ष काय परीणाम शक्य आहे हे पहाण्यासाठी या नावांचा तामीळलिपीतून गूगल ट्रेन्ड तसेच ओपीनीयन पोल्स बघावी लागतील.

ज्या ४ दिवंगत माजी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रीयांनी गेल्या वर्षाभरात गूगलले आहे त्यात प्रथम क्रमांकावर यशवंतराव चव्हाण (गूगल शोध अंक १७), विलासराव देशमुख (गूगल शोध अंक १०), वसंतराव नाईक (गूगल शोध अंक ८), वसंतदादा पाटील (गूगल शोध अंक ३)

* गूगल ट्रेंड संदर्भ

उपरोक्त गूगल ट्रेंड शोधातून मोरारजी देसाई आणि मनोहर जोशी हि नावे वगळली आहेत, कारण मोरारजी देसाईंच्या नावाचा राजकीय प्रभाव असा महाराष्ट्रात आता नसावा, मनोहर जोशींचे अलिकडे देहावसान झाल्यामुळे गूगल ट्रेन्डमध्ये प्रभाव एवढा आला की इतर माजींची गणना गूगल ट्रेड दाखवू शकत नव्हते.

यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक, मनोहर जोशी यांचे सध्याचे राजकीय उत्तराधीकारी कोण असे तुम्हाला वाटते?

अहिरावण's picture

13 Mar 2024 - 1:32 pm | अहिरावण

उद्धव ठाकरे

माहितगार's picture

13 Mar 2024 - 3:10 pm | माहितगार

ओके

दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे गूगल शोध अंक १४ आणि आर आर पाटील गूगल शोध अंक ४ घेऊन महाराष्ट्रीय लोकांच्या अद्याप स्मृतीत आहेत गूगल ट्रेंड

अशोक चव्हाण काँग्रेसी संस्कृतीतील असल्याने राणे-राऊत स्टाईल मास मेडीया प्रसिद्धि बातम्यात रहाणे त्यांना तेवढी साधणे अवघड जात असेल? अशोक चव्हाणांनी अलिकडेच पक्षांतर केल्याने त्यांना ३ गूगल शोध अंक मिळालेले दिसतात. आदर्श प्रकरणात राजकीय फसगत झाली नाहीतर मुख्यमंत्री असताना अशोकरावांनी पत्रकारांना आनंदीत ठेवलेले होते शिवाय महाराष्ट्राचे सांस्कृतीक धोरण बनवण्याची स्त्रॅटेजिक खेळी केली होती , २०१४च्या लोकसभेत अशोक चव्हाणांना काँग्रेसने लोकसभेतील नेता केले असते तर काँग्रेसचाही फायदा झाला असता आणि अशोकरावही आनंदात राहीले असते. पण त्यानंतर त्यांनी मौन पाळले. छ. संभाजीनगरच्या नामांतराच्या उबाठा मंत्रिमंडळाच्या निर्णयाला साथ दिल्याने त्यांना स्वतःच्या परंपरागत ओवेसीप्रेमी मतदार सोबत राहील हे साशंकीत होते या परिस्थितीत राज्यसभा व्हाया भाजपा शिवाय त्यांना मोठा पर्याय नव्हता. अशोक चव्हाणांना राज्यसभेत बोलण्याची संधी आणि मंत्रीपद मिळाले आणि संधीचे सोने केले तर राष्ट्रीय राजकारणात त्यांना स्थान अजूनही निर्माण करता येऊ शकते. पण स्थानिक मतदारांवर प्रभाव किती शिल्लक आहे ते मराठवाड्यातून अशोकराव भाजपास किती खासदार निवडणूकी निवडून आणण्यात यशस्वी होतातयावर त्यांचे प्रादेशिक राजकीय भविष्य ठरेल नसता एखाद्या राज्याचे राज्यपालपद घेऊन समाधान मानावे लागेल.

नारायण राणे प्रसिद्धी माध्यमात राहण्या ईतपत विधाने करतात आणि पत्रकार प्रसिद्धी देतात एवढे करून २च गूगल शोध अंक मिळताना दिसतात. आता १६ गूगल शोध अंकासह या शोधगटात बाजीगर नक्कीच आहेत शरद पवार. गूगल ट्रेन्ड्स शोध

अहिरावण's picture

13 Mar 2024 - 2:02 pm | अहिरावण

पण शरद पवार यांना मुख्यमंत्री म्हणून शोधले गेले की अजितदादांचा "काका" म्हणून???

माहितगार's picture

13 Mar 2024 - 2:30 pm | माहितगार

:) ते डिटेल्सही पाहू

आता या गूगल ट्रेंड शोधात उद्धव ठाकरे (गूगल शोध अंक ९) आणि देवेंद्र फडणवीस (गूगल शोध अंक १०) जोडल्या नंतरचा गेल्या १२ महिन्यातील शोधांचा रिझल्ट पहा आणि आधीच म्हटल्या प्रमाणे बाजीगर शरद पवार (गूगल शोध अंक १६)
जरा वेळ नारायण राणे आणि अशोक चव्हाण नावे बाजूला ठेऊन गेल्या ९० दिवसाचा गूगल ट्रेंड पाहीला तर शरद पवार गूगल शोध अंक २४ फडणविस गूगल शोध अंक १४ आणि उबाठा गूगल शोध अंक १३. मी कॅल्कुलेटर वर मांडलेले त्रैराशिक बरोबर असेल तर गेल्या ९० दिवसात शरद पवारांनी जराशी प्रगती तर फडणवीस आणि उबाठांनी एकेक अंक गमावला आहे.

माहितगार's picture

13 Mar 2024 - 2:45 pm | माहितगार

सद्य मंत्रिमंडळातील ३ हयात आजी-माजी उपमुख्यमंत्र्यामध्ये गेल्या ९० दिवसासाठीच्या शोधात छगन भूजबळ (गूगल शोध अंक ७), अजित पवार (गूगल शोध अंक १५), देवेंद्र फडविस (गूगल शोध अंक १७)

* सगळे लेख आणि प्रतिसादातून दिलेले गूगल ट्रेंड अंक ज्या दिवशी तपासून मिपावर लिहीत आहे त्या प्रमाणे ह्याच लिंक काही आठवड्यांनी / महिन्यांनी / वर्षांनी उघडल्यास त्या-त्या भविष्यकालीन तारखेचे रिझल्ट दिसण्याची शक्यता हे वे सा. न, ल.

माहितगार's picture

13 Mar 2024 - 2:55 pm | माहितगार

शरद पवार - अजित पवार गेल्या ९० दिवसासाठी ट्रेंड शरद पवार नक्कीच आघाडी टिकवीन आहेत.

गेल्या ९० दिवसांसाठीच्या शोधात स्थानिक नेत्यात एक्नाथ शिंदे शरद पवारांवर केवळ २ गूगल शोध अंकानी आघाडी टिकवून आहेत. (गूगल ट्रेन्ड उबाठा, शिंदे, श.प., दे. फ., अ.प.)

राज ठाकरे गूगल शोध अंकात तुर्तास तरी बरेच पिछाडीस गेलेले दिसतात. सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे , संजय राऊत यांना पुरेसे गूगल शोध अंक मिळण्यासाठी अद्याप बरीच मेहनत करणे बाकी आहे. ज्यांना ह्या नावात रस आहे त्यांनी वेगळा शोध घेऊन पाहून घ्यावे.

माहितगार's picture

13 Mar 2024 - 3:03 pm | माहितगार

वरच्याच शोधात उबाठांच्या ठिकाणी रागांना ठेऊन पाहीले. खरे तर ट्रेंद्सला एकावेळी ५ ची मर्यादा आहे नाहीतर रागांना उबाठा सोबत ठेवले असते तर महाराष्ट्रात आघाडी आणि युती यांची काटेकी टक्कर (ओपीनीयन पोल्सनी पण वर्तवली आहे.) महाराष्ट्रात रागा शिवाय काँग्रेसला राज्यस्तरीय पर्याय कोणता हा प्रश्नच आहे. तरी पण एन डि ए ने गाफील रहाणे टाळावयास हवे.

माहितगार's picture

13 Mar 2024 - 3:09 pm | माहितगार

वरचा ट्रेंड पाहीलात? आता अपंच्या जागी नमोंना ठेऊन पहा मी वर टक्कर काटे की म्हटले तरी नमोंची गूगल शोधातील संपूर्ण एकाधिकार शाही अद्यापतरी अबाधित आहे.

अर्थात स्थानिक गरजांनुसार स्थानिक नेते मंडळी अगदी निवडणूक फॉर्म भरे पर्यंत किती उड्या मारतात त्यावर प्रत्यक्ष निकालांवर बराच परिणाम होईल.

ह्या सगळ्यात जरांगे पाटील? राजकीय फायदा बहुधा श. प. नाच झाला असावा. असो

अहिरावण's picture

14 Mar 2024 - 11:14 am | अहिरावण

अंतुले, भोसले कुणाला आठवतात तरि का? निदान प्रतिष्टान तरी???

माहितगार's picture

14 Mar 2024 - 11:36 am | माहितगार

जो देत-घेत नाही तो नात्यातही नको आणि नेत्यातही नको म्हणणार्‍या महाराष्ट्रीय जनतेला नेतेही तसेच मिळत असतील तर ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच आहे आणि मग आदर्श प्रतिष्ठान आणि आणखी कितीतरी याचे सोयर सुतक असण्याचे काही कारण नाही.

इंदिरागांधींनी दर दोन वर्षांनी उभ्या केलेळ्ञाआ बुजगावण्या माजी मुख्यमंत्र्याची महाष्ट्राला आठवण कमी असेल तर नवल नाही. तसे अतुलेंना जरासे गुगलले जात असावे पण राजकीय प्रभाव म्हणता येईल एवढे नव्हे

देशाचा मुख्य नेता म्हणून तमिळ चेहरा शोधतात का?

गूगल मुख्य म्हणून असलेला तमिळ चेहरा टिकणार का?

माहितगार's picture

19 Mar 2024 - 11:58 am | माहितगार

प्रश्न समजले नाहीत. एनीवे किमान काही ओपीनीयन पोल्सच्या मते अण्णा द्रमुकची जागा भाजपा घेईल. संदर्भ

ते बहुधा अन्नामलाई संदर्भात बोलत असावेत

* गूगल ट्रेंड तुलना भाजपा आणि काँग्रेस पक्षांची
* रागा - मोदी गूगल ट्रेंड तुलना ( भारत जोडो यात्रा सांगता समारोहाचा प्रभाव आत्ताच पाहून घ्या, नंतर लिंक उघडली तर ती नंतरच्या काळासाठी अपडेट होईल)

वरील प्रतिसादात लिंक चुकलेली दिसते
* रागा - मोदी गूगल ट्रेंड तुलना लिंक अपडेट

माहितगार's picture

19 Mar 2024 - 7:23 pm | माहितगार

अलिकडे राहुल गांधींनी आपल्या राजकीय भाषणात हिंदू धर्मातील शक्तिस आव्हान देऊ केले आणि मोदींनी ते आव्हान स्विकारत असल्याचे म्हटले आहे.

गूगल ट्रेन्ड वर या आव्हानांचा काही परिणाम होतो का हे अधुन मधून अभ्यासता यावा साठी
हा गूगल ट्रेन्ड दुवा

बिहारी मतदारांमध्ये राम विलास पासवानांचे राजकीय उत्तराधिकारी श्रेयासाठी राम विलास पासवानांचे भाऊ पशुपति कुमार पारस (जे आता पर्यंत मोदी मंत्रिमंडळात होते) आणि सुपूत्र चिराग पासवान यात टक्कर असते. भाजपाने चिराग पासवानांना जवळ केले आणि पशुपतिकुमार नाराज झाले.

मी वर उल्लेख केवळ बिहार असा नाही तर बिहारी मतदार केला आहे कारण ती मंडळी भारतभर आहेत.

या दोघात गूगल ट्रेन्ड मध्ये वरचढ कोण?

बिहार सर्व नेते गूगल ट्रेन्ड हा ट्रेन्ड मागचे ५ वर्षे, १२ महिने, ९० दिवस या वेगवेगळ्या कालावधीसाठी पहा. नितीश कुमारांवर अलायन्स बदलावरुन टिका होत असली तरी गूगल ट्रेन्ड मध्ये मागच्या ९० दिवसात ते फायद्यात दिसताहेत.

माहितगार's picture

19 Mar 2024 - 9:34 pm | माहितगार

लालू, नितीश, मायावती, अखिलेश देशभरात उत्तर भारतीयात या चौघातील गूगल ट्रेन्ड वरचढ कोण?

राहुल गांधी, नितीश कुमार गूगल ट्रेन्ड तुलना गेल्या १२ महिन्यासाठी मग गेल्या ९० दिवसासाठी पहा गेल्या ९० दिवसात नितीश कुमारांना गूगल सर्च वर तरी फायदा झाला आहे. हे राजकीय मत परिवर्तनात त्यांना वापरता येईल?

राहुल आणि स्मृती इराणी बघा हो जरा

माहितगार's picture

24 Mar 2024 - 9:33 pm | माहितगार

स्मृती इराणी राहुल गांधी यांची अमेठी मतदार संघातील स्थिती गुगल ट्रेंड मला पहिल्या प्रयत्नात तरी आढळला नाही. (तुम्ही हि प्रयत्न करून पाहु शकता). तुमची राहुल गांधी - स्मृती इराणींच्या गूगल ट्रेन्ड तुलने बाबतीत जराशी निराशा होऊ शकते. उत्तरप्रदेशात गांधी परिवारात त्या प्रियांका गांधीच्या पुढे १ गूगल ट्रेंड पॉईंटने पुढे तर सोनीया गांधींच्या सोबत आणि राहुल गांधींच्या बर्‍याच मागे दिसतील. संदर्भ स्मृती ईराणी - गांधी परिवार गूगल ट्रेन्ड.
अर्थात गुगल ट्रेंड बद्दल अगदीच शंका करण्याची घाई करू नये उलट या प्रश्नाच्या योगाने गूगल ट्रेन्डची ऊपयुक्तता अधिक अधोरेखीत होईल केवळ तुलने साठी उत्तर प्रदेशातील इतर दोन नेत्यांसोबत (अखिलेश मायावती) हे ट्रेन्ड तपासले तर अखिलेश, राहुल गांधी, मायावती असा गूगल ट्रेंड क्रमांक लागताना दिसेल. अर्थात यात योगी आदित्यनाथांचे नाव नव्हते ते जोडून चित्र किती झटकन बदलते योगी आदित्यनाथांचा उत्तर प्रदेशातील प्रभाव अखिलेश यादवांपेक्षा दुपटीपेक्षा अधिकने दिसतो- ते या गूगल ट्रेंड मध्ये पहा म्हणजे गूगल ट्रेन्ड प्रकरणाची उपयुक्तता लगेचच लक्षात येईल.

अशी तुलना तुम्ही स्वतःही करून पाहु शकता. कोणतीही एक गूगल ट्रेन्ड लिंक घेऊन त्यातील नावे आणि भारतीय प्रदेश तुम्हालाही बदलून पहाता येतील. अगदी सोपे आहे.

माहितगार's picture

24 Mar 2024 - 9:45 pm | माहितगार

वरच्या उत्तरप्रदेश तुलनांमध्ये मोदींचे नाव नव्हते , अगदी गेल्या ९० दिवसांचा अभ्यास केला तरी नरेन्द्र मोदी खुप मोठ्या फरकाने पुढे दिसतात तरीही गेल्या पाच वर्षांची तुलना केली तर मार्च २०२३ पर्यंत जरासा उतार आला होता पण राम मंदिर उद्घाटनानंतर पुन्हा उचल घेतलेली दिसेल. संदर्भ गूगल ट्रेंड

*अर्थात हे गूगल ट्रेण्ड डायनॅमीक आहेत, कुणी काही महिन्यांम्नतर पाहिल्यास ते तेव्हा पासूनच्या मागच्या कालावधीचे म्हणून वेगळे असतील हे वेगळे सांगणे न लगे.

माहितगार's picture

24 Mar 2024 - 9:59 pm | माहितगार

अरविंद केजरीवालांची २१ मार्चला अटक झाली तर कोणत्या राज्यातील लोक त्यांना कित्पत शोधत आहेत हे पहाणे जरासे रोचक असू शकते. अरविंद केजरीवाल गूगल ट्रेड गेले सात दिवस पंजाबात अरविंद केजरीवालांच्या स्वतःपेक्षा आपच्या मुख्यमंत्री महोदयांचा स्वतःचा प्रभाव अधिक असावा. राज्यवार असे फरक असले तरी केजरीवालांना फुल न फुलाची पाकळी सिंपथी चा राजकीय फायदा होण्याची शक्यता वाटते पण काही आठवड्यानंतर गूगल ट्रेंड आणि ओपीनीयन पोल तपासणे एकुण रोचक असू शकेल,

आता पर्यंत मोदी नावावरच अधिक भिस्त असे, गेल्या ९० दिवसात भाजपा पक्ष नावाचे प्रोजेक्शन बरेच सुधारताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात अरविंद केजरीवालांचे प्रोजेक्शनही बरेच सुधारले असावे ते येत्या आठवड्यात पुढे टिकते का हा निरीक्षणाचा विषय आहे.

माहितगार's picture

30 Apr 2024 - 6:24 pm | माहितगार
माहितगार's picture

2 May 2024 - 2:40 pm | माहितगार

दोन दिवसपुर्वी काही अज्ञात तांत्रिक कारणाने प्रतिसाद नव्हे पण फक्त शिर्षक प्रकाशित होत होते त्यात बरीच मेहनत करून गूगल ट्रेंड दुव्यासहीत विश्लेषण उडाले.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागचा भाजपाचा छुपा उद्देश राहुल गांधी एवजी केजरीवालांना विरोधीपक्ष नेता म्हणून पुढे आणणे असेल तर अलिकडील गूगल ट्रेंड्समध्ये तरी केजरीवालांची गुगल शोध प्रीयता राहुल गांधींना ओलांडून टिकुन असल्याचे दिसते, पण अटकेमुळे वाढलेली केजरीवालांची शोध प्रीयता महाराष्ट्र, उप्र, गुजराथ या राज्यातूनही वाढणे हे भाजपाला भविष्यकाळाच्या दृष्टीने परवडणारे नसावे. राजकीय संधी साधण्यात केजरीवाल आणि राहुल गांधी सारखेच वाटतात पण जीवनाचा काही काळ सायकोफंट नसताना सामान्य नागरीक म्हणून समाजाची अनट्यूटर्ड नाडी माहिती असण्याचा केजरीवालांना फायदा होतो त्यामुळे केजरीवालांना राजकीय नेता म्हणून राहुल गांधीपेक्षा राजकीयदृष्ट्या बरेचसे अधिक परिपक्व असल्याचे सिद्ध करणे भावी काळात सोपे जाऊ शकेल हे भाजपाच्या दृष्टीने तात्कालीक फायदा दीर्घकालीक नुकसानीचे ठरू शकावे.
वि. राहुल गांधी वि. भाजपाचे फायदा नुकसान

माहितगार's picture

30 Apr 2024 - 6:24 pm | माहितगार
माहितगार's picture

2 May 2024 - 2:22 pm | माहितगार

टेस्ट

अहिरावण's picture

2 May 2024 - 2:25 pm | अहिरावण

सक्क्सेस

माहितगार's picture

2 May 2024 - 2:41 pm | माहितगार

अनेक आभार

योगी आदित्यनाथांची गेल्या दोनचार दिवसात महाराष्ट्रात काही भाषणे झाली असावीत त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातील गूगलशोध ग्राफ शरदपवारांशी स्पर्धा देऊ शकेल. मोदींचे तेच तेच ऐकुन कंटाळलेल्या मंडळीकरीता योगी आदीत्यनाथ एक चांगला बदल वाटू शकेल का? आदित्यनाथांनी कुठे कुठे सभा घेतल्या आणि प्रभाव काय पडला याचे मतमोजणीनंतर विश्लेषण रोचक असू शकेल.

पण योगी आदित्यनाथांची गूगल शोध प्रियता महाराष्ट्रात शरद पवारांशी स्पर्धा करत असताना मागच्या आठ-दहा दिवसात उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांची स्थिती बरीच सुधारून योगी आदीत्यनाथांना स्पर्धा देऊ केल्याचे दिसते आहे. अर्थात मोदी अजूनही सर्वांवर मोठी बढत टिकवून आहेत असे दिसते.