रॉबी डिसिल्वा-एका मनस्वी कलाकाराचा प्रवास(ऐसी अक्षरे....मेळवीन-१३)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
11 Dec 2023 - 3:08 pm

A

लेखिका वीणा गवाणकर यांच्या सहज सोप्या भाषेतल्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एका आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकाराची ओळख करून देणारे पुस्तक!

रॉबी डिसिल्वा वसई येथील पोपसाव भागात लहानाचे मोठे झाले.अत्यंत गरिबीतून वाट काढत होते पण आयुष्याशी प्रामाणिक हा गुण त्यांच्यात होता.आई वारल्यानंतर सावत्र आईचे मायेचे छत्र लाभले,त्यामुळे कुटुंब हेच त्यांचा सतत अग्रस्थानी होते.कलाकार अपघाताने घडत नाही तर ती जाणं ,उर्मी जन्मजात असावी लागते.पण डिसिल्वा याला अपवादच म्हणावे लागतील.पदवीला प्रवेश घेण्यासाठीचे पैसे नव्हते ,वेळही गेली तेव्हा कमी फी मध्ये अर्धवेळ पदवी मिळवता येते ,हे समजल्यामुळे त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये रेशनिंग ऑफिसमध्ये काम करत असताना १९५१ साली प्रवेश घेतला.

कलर अप्लिकेशनचे काम करत असतांना ते चुकले की शिक्षक सरळ तो कागद फाडत असत....नव्हे रॉबीचे काळीज फाटत असे .कारण एक आण्याचा पेपर रॉबी पायी चालत जावून बस भाडे वाचवून मग विकत घेत असत.कधी त्यांच्याच घराजवळ राहणा-या जे जे मधल्या सधन मुलाने खिडकीतून टाकलेले एका बाजूचे कोरे पेपर ते सरावासाठी वापरत.अशा या परिस्थितीनेच त्यांना चुकणे आपल्याया परवडणार नाही ,काम मन लावूनच व्हायला पाहिजे हे शिकवले असावे.लवकरच त्यांनी जेजे मध्ये अनेक विषयात नैपुण्य मिळवले.क्यलिओग्राफिमध्ये,टायपोग्राफीमध्ये त्यांना आवड होती.त्यामुळे त्यांना स्टुडन्त कॉग हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.यापुढे प्रत्येक संधीचे रॉबी यांनी अक्षरशः सोनेच केले.

अनेक बक्षीसे मिळवली.त्यामुळेच त्यांना ‘मेनी प्राईजेस’ असे टोपण नावही मिळाले.चतुर्थ वर्षात त्यांना अप्लाईड आर्टचा फेलोशिफही मिळाली.याच काळात त्यांनी स्पर्धेत पाठवलेले एक डिझाईन भारतीय डाक विभागाने तिकिटावरही समाविष्ट केले होते.पुढील उच्च शिक्षणासाठी ते लंडन मधील प्रसिद्ध सेन्ट्रल स्कूल ऑफ आर्ट मध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवला.या साठीच्या खर्च एक धार्मिक संस्थेने ठराविक व्याजदराने कर्ज देत उचलला.लंडनमध्ये शिकत असतानाही गरिबीशी संघर्ष सुरूच होता.अनेक रात्री उपाशी राहणारे,ना ना प्रकारच्या नोकरी करणारे,त्यामुळे शरीराची होणारी अवहेलना हे प्रसंग वाचतांना वाईट वाटते.पण यातूनच रोबींची गुणवत्ता कमालीची होती जी बहरतच गेली.त्यामुळे दुसऱ्या वर्षी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली.इथे त्यांना अनेक जागतिक दर्जाचे शिक्षण ,शिक्षक मिळाले.

१९६० ला लंडनहून ते कला क्षेत्राची पंढरी इटली येथील बोजेरी स्टुडीओत काम शिकू लागले.तिथे ते ग्राफिक डिझाईन ,इंडस्ट्रीयलं पैकेझिंग ,जाहिरात क्षेत्रात उत्कृष्ट काम करत राहिले.पण त्यांचा ओढा लंडनकडे असल्यामुळे ते परत दीड वर्षांनी लंडनला परतले.केलॉग ,प्लेयर बचलोर,कालवे प्युअर ओई,स्टारलिंग हॉटेल,ब्रीटाइन सी फूड,इत्यादी इत्यादी अनेक उद्योगांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले.हे सर्व असतांनाच कौटुंबिक ओढही वाढू लागली १९६७ साली ते मुंबईत परत आले.

भारतात ग्राफिक क्षेत्रातील कामाचा वेग लंडनपेक्षा १०-१५ वर्षांनी मागे होता.तसेच त्यांना इथल्या हितसंबंध जपणाऱ्या व्यवस्थेशी सामना करावा लागला.अनेक अनुभवानंतर रॉबीनी स्वत:ची जाहिरात कंपनी सुरु केली.कैडबरी,ब्रीटाइना ,यांच्या उत्पादनाच्या आवरणाचे डिझाईन त्यांनी केले.आपल्या भावांना,भाच्यानाही त्यांनी या क्षेत्राची ओळख आणि सुंदर वाट दाखवली.पुढील प्रकरणात “गाव तसे चांगले”यात वसई गावातल्या लोकांना हा जागतिक दर्जाचा ,लंडनमधील प्रतिष्ठित FCSDपुरस्कार असणारा कलाकार आपल्यात आहे ही जाणीव तशी उशीरच झाली,तेव्हा अनेक पुरस्कार त्यांनी दिले,विविध कमिटीवर त्यांची नेमणूक केली.आयुष्याच्या उतार काळात योगा सतत ,नियमित केल्याने,गरजा नेहमीच कमी ठेवल्याने रॉबी तंदरुस्त होते.त्यांना राज्य नवशक्ती जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. एका व्रतस्थासारखे अलौकिक तेजाने ते जगले.

वीणा गवाणकर याही वसईत राहणाऱ्या,एके दिवशी बँकेत त्यांची रॉबीशी अचानक ओळख झाली.हळू हळू अनेक भेटीतून त्यांना समजले रॉबी हे जागतिक कलाकार आपल्यात आहेत हे अनोखे आहे.२०१६ साली हे पुस्तक त्यानी हे पुस्तक प्रकाशित केले.पुस्तकासाठी सुनील महाजन यांनी एका गोधडीची प्रस्त्वाना आकर्षक मांडणीत करत लिहिली आहे.रॉबी यांनी तयार केलेल्या अनेक लोगो,कलाकृतींची चित्रे यांची पुस्तकात रेलचेल आहे.शेवटच्या परिशिष्ट मध्ये रॉबी यांच्या कार्याची टाइम लाईन आहे.

२०२१ साली वयाच्या ९१ व्या वर्षी रॉबी हे जग सोडून गेले.

-भक्ती

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

भागो's picture

13 Dec 2023 - 10:44 am | भागो

पुस्तक समिक्षा आवडली.
उत्सुकता वाढली आहे. ह्या वसईकरांनी मराठी भाषा सरुद्ध केली आहे.

सरुद्ध नाही समृद्ध ! क्षमा करा. चूक माझीच आहे.

नठ्यारा's picture

15 Dec 2023 - 12:18 am | नठ्यारा

Bhakti,

वीणा गव्हाणकर व्यक्तिचित्रण करण्यांत सिद्धहस्त लेखिका आहेत. प्रेरणादायी हे अगदी चपखल विशेषण तुम्ही वापरलं आहे. पुस्तक परिचय आवडला.

-नाठाळ नठ्या