बेसुरा मी

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
5 Sep 2023 - 12:20 am

तुम्हाला एखाद्या व्यक्ती बद्दल मन कलुषित करायच आहे, सोप्प आहे, आपण आपल्या परिचितांच्या कानात फक्त एव्हढच बोलायचं कि “बाबारे त्या अमुक तमुक पासून जरा जपून बरं!!” बस्स, ती व्यक्ती कितीही चांगली असली सगळ्यांशी किती हि आपुलकीने वागू दे, सगळे जण त्या व्यक्ती पासून थोडं फटकूनच वागतात. तुम्ही म्हणाल कि आता हे काय मध्येच. पण मंडळी हो, मागील काही दिवस Selective Ignorance चा इतका दीर्घ अनुभव घेत आहे.

आपल्या भारत देशात तुम्ही सरळमार्गी असणे म्हणजे जगण्यासाठी नालायक. आणि सध्या जे काही तज्ञ त्यांचे ज्ञान पाजळतात ते एकदम दिव्य. जर तुम्ही धंदा करणारे असाल आणि जर तुम्ही तुमचा आयकर १०लाख भरत असाल तर तुमच्याकडे म्हणे २० लाख गुप्त धन असलेच पाहिजे, आता का तर तुम्ही धंदा करता..........

जेव्हा एखादा मूर्ख (सरळमार्गी) धन्देवायिक एखादया अशिला बरोबर ६ महिने मुद्देसूद अभ्यास करून एखादी ऑर्डर मिळवतो आणि जेव्हा त्याच्या वितरकाकडे त्याची मागणी नोंदवितो, त्यावेली त्या वितरकाचा Inside sales manager त्याच्या दुसऱ्या गबर व्यावसायिकाला त्याची माहिती देऊन, अशिला बरोबर संगनमत करून किंमत तोडून ती ऑर्डर अलगद घालतो तेव्हा ते योग्यच असले पाहिजे कारण प्रचंड अर्थबळ असल्या मुर्खांकडे नसते पण नुसत्या ज्ञानाच्या आणि सचोटीने जग चालते असा पुस्तकी विश्वास.

अशील देखील काही कमी नसतात असल्या मूर्खांना अभ्यास करायला लावतात आपल्याला योग्य वस्तूंना शोधायला सांगून मग शेवटी त्याची बोली लावतात आणि परत गबर व्यावसायिक येऊन मलई खाऊन जातात.

नंतर असल्या मुर्खांसाठी न्यायालये आहेतच................

आपण पुस्तकात वाचतो एक अमुक व्यक्ती सचोटीने व्यवसाय करून खूप पुढे आला वगैरे, पण खरतर खऱ्या जगात असे कधीच होत नाही. मागे एकदा नागपूरला एका दुध उत्पादक संघाची एक ऑर्डर होती, नेहमीप्रमाणे सचोटीवाला मूर्ख अभ्यास करून तेथे गेला आणि निविदा भरून आला. थोड्या दिवसांनी त्याला उत्पादक संघाकडून फोन आला भेटायला या, हा वेडा गेला, तिथे त्याला सांगण्यात आले कि तुम्ही दिलेलं उत्पादन एकदम योग्य आणि वाजवी आहे, पण निविदेची तारीख संपल्यावर आमच्या अध्यक्षांच्या मुलाने याचप्रकारच्या उत्पादनाची कंपनी काढली आहे, त्यामुळे आता आम्ही त्याची निविदा मंजूर करत आहोत तुम्ही फक्त एव्हढंच करा तुमचे उत्पादन अध्यक्षांच्या मुलाच्या कंपनीला त्याच किमतीला द्या आणि मोकळे व्हा, तसही यात तुमचे नुकसान नाही, आणि यापुढे सगळ्या गोष्टी अशाच करू.

शेवटी आजकाल आवडलेली एक ओळ बोलून आपली (कदाचित कायमची) रजा घेतो.
“सांसो के साथ अकेला चल रहा था, सांसे चली गयी तो सब साथ चलने लगे!!!!”

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

5 Sep 2023 - 9:01 am | विवेकपटाईत

धंद्यात सर्वजण स्वतःचा फायदा बघतात. बाकी अभ्यास धंद्याच्या ट्रिक्सचा असतो पुस्तकी ज्ञानाचा जास्त फायदा नसतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Sep 2023 - 1:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

सरळमार्गी लोकांनी धंदा करुच नये की काय? की हे फक्त काही काही ठिकाणीच घडते?

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

7 Sep 2023 - 2:01 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

काळजी घ्या. हे ही दिवस जातील.

उन्मेष दिक्षीत's picture

7 Sep 2023 - 2:57 pm | उन्मेष दिक्षीत

असलं काही लिहू नका हो ! तुम्हीही इग्नोर करा, दुसरे काय वाट्टेल ते करु देत ! तुम्ही तुम्हाला पाहीजे ते करा.
आपके लीये बस आपकी सांसे काफी है !