ओपनहायमर नोलन‌ कलाकृती

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
24 Jul 2023 - 3:08 pm

D
यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी.
अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे चरित्र आहे.या‌ पुस्तकावरून प्रेरणा घेत नोलनने एक जबरदस्त बायोपिक बनवला आहे.
भौतिक शास्त्राच्या अनेक शाखांपैकी पुढे क्वांटम फिजिक्स, न्यूक्लियर फिजिक्स या शाखेने कमालीचे संवेदनशील संशोधन अणू-भंजन /अणू विखंडन जगाला बहाल केलं.आणि बाटलीतला जिनी बाहेर पडला अणुबाँब बनून.हा जिनी बाटलीत परत टाकता येणार नाही तरीही त्याचा वापर करावा लागला ते घडवणार्या पैकी एक ओपनहायमर.
सिनेमात नोलनच्या शैलीप्रमाणे प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता माणूस म्हणून येणाऱ्या पिढीसाठी चांगलं उत्तम द्यायला बांधील आहात हे अधोरेखित करायला सांगितले आहे. काही सीन ब्लॅक अँड व्हाइट (जेव्हा ओपनहायमर/परिस्थिती अणुबाँबच्या समर्थनात आहे.)तर रंगीत सीन जेव्हा ओपनहायमर अणुबाँबपासून दूर जाण्याचा लोकांचा,सृजनाचा विचार करतो तेव्हा येतात असं मला वाटतं.
सिनेमाच्या सुरुवातीला खुप व्यक्ती सतत येत राहतात, त्यासाठी माझा होमवर्क कमी पडला.हे बरेचसे शास्त्रज्ञ होते ज्यांची नावं आज पर्यंत शाळा , महाविद्यालयात पुस्तकात वाचली आहेत.
याच दरम्यान महायुद्ध, कम्युनिस्ट, सोशलिस्ट यांचे संदर्भ येत राहतात.यावर ओपनहायमर आधी डाव्या विचारसरणीचे होत,हे समजले.हळूहळू काही नावांभोवती सिनेमा फिरू लागतो कैथरिन ,लेस्ली ग्रोव्ह,जिन,टेलर,लारेन्स,बोरिस,नील बोर्ह,फ्रंक ओपनहायमर इत्यादी (ही यादी खूप मोठी आहे)यांचं योगदान मैनहट्टन प्रोजेक्टसाठी बहुमूल्य आहे.
लॉस एलामोस,न्यू मैक्सिको येथे ओपनहायमरच्या म्हणण्यानुसार शहरच वसवलं.हजारो लोक गुप्तपणे अमेरिकाच्या 'महासत्ता' होण्याची तयारीत आहेत.प्रेशर आहे जर्मनीच्या आधी अणुबाँब बनवण्याचे.तीन अणुबाँब प्लुटोनियम २३९, युरेनियम २३५ युरेनियम २३९ हे तयार झाले.
ट्रायल -ट्रिनिटीचा प्रसंग त्यावेळच्यानुसार हुबेहूब चित्रित झालाय...आधी हजार सूर्याचा प्रकाश काही मिनिटे आणि मग धडकणारा आवाज...प्रकाशाचा वेग ध्वनी पेक्षा जास्त आहे तेच शाळेत असतानाही हेच उदाहरण शिकवला होतं ना.
ओपनहायमरलाही धडकी भरते..गीतेतला श्लोक आठवतो ज्यात कृष्ण म्हणतो..

"काल: अस्मि लोकक्षयकृत्प्रविद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त:।।"
..."आता मी काळ आहे जो जगाचा नाश करणार आहे."
ओपनहायमरला भगवद्गीताने आयुष्यात समतोल राखण्यासाठी मदतच केली होती असे वाचनात आले.

जर्मनीने शरणागती पत्करली पण ओपनहायमरमधला वैज्ञानिक आपल्या बांम्बचा प्रभाव पाहण्यासाठी उत्सुक होता? त्यालाही ठाऊकच असणार अणुबॉम्बने मोठी जीवितहानी होणार पण हिरोशिमा आणि नागासाकी घडतं ओपनहायमर अणुबॉम्बचा जनक होतो.
आणि पडद्यामागच्या लेविस स्ट्रास (रॉबर्ट जॉन डाउनी जूनियर अबबब कमाल अभिनय :)हा अध्याय १९५४ ला सुरू होतो.एका देशप्रेमीला थेट कम्युनिस्ट हेर म्हणून आरोपित केलं जाते. यात खुद्द आईन्स्टाईन त्याला हा खटला सोडून द्यायला‌ सांगतो पण ओपनहायमर आपण चूक नाही तेव्हा लढा लढायाचा हे ठरवतो.....
शेवटचा प्रसंग दोन महान‌ शास्त्रज्ञांना समजलं आहे की जिनी आता एक नाही अनेक बनणार...जग परत पूर्वीप्रमाणे नसणार...चेन रियाक्शन सुरू झाली आहे....

-भक्ती

मुक्तकचित्रपटप्रकटनप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

होय.
छान धावतं वर्णन.

कर्नलतपस्वी's picture

24 Jul 2023 - 6:04 pm | कर्नलतपस्वी

परिचय दिला आहे.

बघायला हवा. आपल्या परमाणू सारखा आहे का?

जवळच 93 एव्हेन्यू मधे लागला आहे.

मी परमाणू नाही पाहिला.
ओपनहायमरसाठी महायुद्धाच्या काळातील राजकारण-कम्युनिस्ट-रशिया यांचा होमवर्क करुन जा.

मुक्त विहारि's picture

24 Jul 2023 - 8:23 pm | मुक्त विहारि

बाराला दहा कमी

ह्या पुस्तकांत , डायनामाईट ते हायड्रोजन बाँब, हा लेखाजोखा उत्तम घेतला आहे

कंजूस's picture

24 Jul 2023 - 7:11 pm | कंजूस

ज्या पुस्तकावर सिनेमा आधारित आहे ते वाचायचं आहे.

प्रचेतस's picture

24 Jul 2023 - 7:25 pm | प्रचेतस

बघणार आहेच पण वेळेअभावी ओपेनहायमरला जायला अजून जमलेले नाही.

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2023 - 7:54 pm | धर्मराजमुटके

माझ्या मुलाला बघायचा आहे पण इंग्रजी चित्रपट म्हटल्यावर थोडी भिती वाटते. इंग्रजी चित्रपटात लोणी आणि आग जवळ आले की लोणी लगेच वितळून जाते. तस्मात आपण चित्रपट पाहिला असेल तर ओपनहायमर ने अणुबाँम्ब बनवताना रिकाम्या वेळेत लोणी आणि आगीचे प्रयोग केल्याचे काही चित्रण आहे काय चित्रपटात ते कळवा. नसेल तर चित्रपट मुलाबरोबर पाहावा म्हणतो.

कंजूस's picture

24 Jul 2023 - 8:06 pm | कंजूस

एका बातमीनुसार . . .
भारतात वितरीत करण्याच्या प्रिंटमध्ये नवनीत_अग्नी दृष्यात काळा झगा घालून पुन्हा चित्रीकरण केलं आणि U प्रमाणपत्र मिळवलं.
खरोखरच अणू विज्ञान माहिती करून घ्यायचं असेल तर A brief history of time - Hawking वाचणे उत्तम. मराठी भाषांतरही निघाले आहे.
बाकी मार्केटिंग.

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2023 - 8:24 pm | धर्मराजमुटके

बातमी नको. कोणी चित्रपट पाहिला असेल त्याने माहिती दिली तर बरे होईल.

लोणी आग जवळ येते पण इतकं प्रकरण तापलं नाही.लेकरू लवकर विसरेल.
कंकाकानी दिलेली माहिती बरोबर आहे.शेवटी ओपनहायमरपण माणूस आहे ना ;) (हा हा)

प्रेक्षकांना आणि वाचकांना खेचण्यासाठी..

पुस्तकात - लोणी आग वर्णन
आत्मचरित्रात - एखादा गौप्यस्फोट
सिनेमा (हिंदी) - गाणी भावनात्मक,प्रेम मुख्य.
सिनेमा (इंग्रजी) -लोणी आग ,थरारक पाठलाग
सिनेमा (तमिळ) - हाणामारी ,एक जण वीस जणांना झोडपतो.
सिनेमा (मराठी)- शाब्दिक हाणामारी फक्त

तुषार काळभोर's picture

24 Jul 2023 - 9:54 pm | तुषार काळभोर

पण गेल्या आठवड्यात बायकोने बाईपण(दोनदा!) आणि मी मिशन इम्पॉसिबल पाहून या महिन्याचं पिक्चरचं बजेट संपवलंय. त्यात पुढच्या आठवड्यात प्राईमचं नूतनीकरण आहे. त्यामुळे हा आता ऑगस्टमध्ये पाहावा लागेल. तोपर्यंत थेटरात राहावा, ही अपेक्षा!

आंद्रे वडापाव's picture

25 Jul 2023 - 9:52 am | आंद्रे वडापाव

ओपींहायमेर हा सिनेमा ' ऍक्वायर्ड टेस्ट ' प्रकारातील कलाकृती आहे.

ज्यांना नोलान चे दिग्दर्शित चित्रपट शैली माहीत आहे त्यांना आवडेल ...

कलाकृती मूल्य अत्युच्च दर्जाची असून ... निव्वळ मसालापट पाहण्याची सवय असणार्यांच्या पदरी निराशा येऊ शकते ...

नोलान नेहमीच आपल्या प्रेक्षकांना बुद्धिमान असल्याचे गृहीत धरूनच चित्रपट काढतो (म्हणजे प्रेक्षकांना बाळबोध ... सगळं काही मँनसप्लेनिंग करून सांगणारा दिग्दर्शक नव्हे ).

कारण चित्रपट पाहताना , आपल्याला (किलिअन मर्फी, रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर , मॅट डेमन , रामी मलिक, एमिली ब्लण्ट ... अशी ) तगडी स्टारकास्ट ची नावं वाचून आलेल्या बऱ्याच जणांच्या चेहेऱ्यावर एकप्रकारचा अपेक्षाभंग दिसत असतो, कि जो ते लपवण्याचा आतोनात प्रयत्न करत असल्याचे दिसते ...

सोत्रि's picture

25 Jul 2023 - 11:24 am | सोत्रि

कलाकृती मूल्य अत्युच्च दर्जाची असून ... निव्वळ मसालापट पाहण्याची सवय असणार्यांच्या पदरी निराशा येऊ शकते ...

सहमत!

- (सिनेमा आवडलेला, नोलानचा फॅन) सोकाजी

आंद्रे वडापाव's picture

25 Jul 2023 - 5:47 pm | आंद्रे वडापाव

निव्वळ मसालापट पाहण्याची सवय असणार्यांच्या पदरी निराशा येऊ शकते ...

बाकी "ओपेनहाइमर" आणि "भगवद्गीता" , या दोन शब्दाचे सुरेख को रिलेशन घालून
या चित्रपटाची एका विशिष्ट समाज गटात पद्धतशीर मार्केटिंग घडवून आणण्यात
या अमेरिकी मार्केटिंग कंपनीला खूपच मिळालंय आपण आजूबाजूला पाहताच आहोत ...

आजच्याच एका वृत्तपत्रातील बातमीनुसार ...
राम गोपाल वर्मा यांनी ...

"ओपेनहाइमर" आणि "भगवद्गीता" ,यांचा येनकेन प्रकारे परस्पर संबंध असल्याचे
पाहून, अति हर्षित झालेल्या अश्या लोकांच्या, मोठ्या समुदायातील सुमारे ०.००१%
लोकांनी भगवद्गीता कधी पूर्ण वाचली असेल का ?

अश्या आशयाचे विधान समाज माध्यमात केले ... ते पुरेसे बोलके निदर्शक आहे ..

पुरुशान प्रति सेक्सिस्म पन सेक्सिस्म असतो.

आंद्रे वडापाव's picture

25 Jul 2023 - 9:30 pm | आंद्रे वडापाव

पुरुशान प्रति सेक्सिस्म

कसं काय ब्बा ? पुरुषां प्रती सेक्सिस्ट ??

mansplaining
/ˈmanspleɪnɪŋ/
nounINFORMAL
the explanation of something by a man, typically to a woman, in a manner regarded as condescending or patronizing.

https://www.misalpav.com/node/50510
हा धागा आज आठवला.कोअमी यांनी बरोबर एक वर्षापूर्वी ओपनहायमर विषयी सांगितले होतं.किती समानता आहे नंबी-ओपनहायमर मध्ये!

मग Mady ला भारताचा नोलन म्हणायचं का ;)

"सिनेमात नोलनच्या शैलीप्रमाणे प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता माणूस म्हणून येणाऱ्या पिढीसाठी चांगलं उत्तम द्यायला बांधील आहात हे अधोरेखित करायला सांगितले आहे."

केवळ मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन ह्याच अपेक्षेने चित्रपट पाहणाऱ्या माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी हे वाक्य खूप महत्वाचे आहे! हे असले डोक्याला ताप चित्रपट पाहण्याची आवड नसलेल्या आमच्यासारख्यांसाठी आपले जेम्स बॉण्ड, T-800, इथन हंट, जॉन मॅक्लेन, डॉमिनिक टोरेटो, अव्हेंजर्स वगैरेच ठीक 😀

बाकी 'ख्रिस्तोफर नोलन' दादाचा आणि माझा वाढदिवस एकाच तारखेला येतो ह्या एकाच गोष्टीचे तेवढे कौतुक उरले आहे, त्याच्या चित्रपटांविषयी आता कुठलेही कौतुक वाटेनासे झाले आहे 😂

त्याचे इन्सेप्शन आणि इंटरस्टेलर हे चित्रपट पाहून निराश झाल्यावरही 'डंकर्क' हा अशीच ओपनहायमार सारखी हवा निर्माण केलेला चित्रपट अगदी 4DX मध्ये पाहूनही आवडला नव्हता! इन्सेप्शन आणि इंटरस्टेलरचे ठीक आहे ते फिक्शन होते, पण डंकर्कच्या दुसऱ्या महायुद्धातील घटनेबद्दल बद्दल भरपूर वाचलेले असल्याने त्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने आता नोलन दादाला माझ्या काळ्या यादीत टाकण्यात आले आहे!

कंजूस's picture

25 Jul 2023 - 12:31 pm | कंजूस

ऊंऊंऊंऊं.
--
नाटकीपणाने दृष्ये वाढवतो काय?

कंजूस's picture

25 Jul 2023 - 6:52 pm | कंजूस

ओपनहाइमर आणि भगवद्गीता
https://timesofindia.indiatimes.com/blogs/satyam-bruyat/bhagavad-gita-an...

(अध्याय ११)
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगदुत्थिता ।
यदि भा:सदृशीसास्याद्भासस्तस्यमहात्मन:।।१२।।

आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचितच होईल म्हणजेच होणार नाही.

आंद्रे वडापाव's picture

25 Jul 2023 - 9:06 pm | आंद्रे वडापाव

आणि या श्लोका मुळे, अणु विभाजनाचे / अणु भंजनाचे,
कुठले सूत्र म्हणे त्याला सुचले किंवा आधीच्या जर्मन शास्त्रद्यांच्या सुत्रा मध्ये दुरुस्ती केली ??

श्रीभगवानुवाच।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

याचा उत्तरार्ध देखील महत्वाचा आहे..
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ||
तू युद्धात भाग घेतला नाहीस, तरी हे योद्धे मारले जाणार आहेत...

ओपनहाईमर ने केलं नसतं तर दुसऱ्या कुणीतरी केलं असतं.
पण अणुबाँब बनला असता,
आणि जर्मनी, जपान किंवा उशीर झाला असता तर रशिया किंवा व्हिएतनाम, कुठं तरी फुटला असता, हे निश्चित!

विवेकपटाईत's picture

26 Jul 2023 - 11:27 am | विवेकपटाईत

लेख आवडला.

अनामिक सदस्य's picture

26 Jul 2023 - 1:17 pm | अनामिक सदस्य

बायका टिपिकली भावनेच्या भरात निर्णय घेतात असे म्हन्टले तर चालते?
पुरुषांबद्दलचे नकारात्मक सरसटिकरण सेक्सिस्ट नाही?

आणि इथे तर पुरुष आनि बाई चा सन्दर्भ तरी काय होता? सिनेमा बघणार्यात फक्त महिला असणार अहेत का?

आंद्रे वडापाव's picture

26 Jul 2023 - 1:59 pm | आंद्रे वडापाव

तुम्ही थ्रेड बदलून जरी, तुमचा ओरिजिनल प्रश्न झाकू पाहत असाल तर ..
तो प्रश्न इथेही विचारतो ...

mansplaining शब्दाचा वापर हा .. (कि जो तुमच्यामते "पुरुषां प्रती सेक्सिस्ट" आहे )...

पुरुषां प्रती सेक्सिस्ट कसा काय ??