मेघदूत..... (ऐसी अक्षरे ..मेळवीन -१०)
आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस
कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे चित्र काढले.हे चित्र पाहून वाटत ‘काय होती मी,आता नुसती ठोकळी झालीये’.
विंध्य,विदिशा नगर,वेत्रवती सरिता,अवंती नगरी,सिंधू नदी,शिप्रा ,महाकाल नगरी ,देवगिरी,व्योमनदी,गंगा,,चंबल,ब्रम्ह्वार्ता,कुरुक्षेत्र ,सरस्वती नदी,क्रौंचगिरी,कैलास,मानस सरोवर आणि मग अलका नगरी असा मार्ग १५-२० श्लोकामध्येसांगताना कालिदास भूगोलाचाही अभ्यासक होता हे समजते.या श्लोकांमध्ये निसर्ग सौंदर्य वर्णित केले आहे.मेघदूतमधला प्रमुख रस ‘शृंगार रस’!
नदीलादेखील एक सौदर्यवती ललना भासवली आहे(श्लोक २८)
चिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः
संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः ।
निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य
स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥
मेघाला त्या नदीचा प्रियकर सांगितला आहे (श्लोक ३१,४०).
गम्भीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ।
प्रवेशम् तस्मात् तस्याः तस्मात् कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्यान् मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि ॥
शृंगारिक रतक्रीडेचे श्लोक केवळ शहारे देणारे आहेत (श्लोक ३७,३८,४१)
तस्याः किं चित् करधृतमिव चित् करधृतमिव प्राप्तवानीरशाखं नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम् ।
मुक्तरोधोनितम्बम् प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः ॥ ४१
ह्याच बरोबर भक्ती रसाचे श्लोक आहेत.मेघाला महाकाल शंकाराची पूजा करण्यासाठी तुझ्या मेघ गर्जना डमरूसम त्या मंदिरात घुमू देत(श्लोक ३४,३६)पुढे हिमायात पोहचल्यावर शंभूची अर्चना करावी सांगितले(श्लोक ५६).
अप्यन्यस्मिञ् जलधर अप्यन्यस्मिञ् महाकालमासाद्य काले स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः ।
कुर्वन् संध्याबलिपटहतांकुर्वन् संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीयां आमन्द्राणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम् ॥गर्जितानाम्
कार्तिकेयाचे सेवा करण्यासाठी मेघ तुझे जल येथे उतरू दे(श्लोक ४३).
उत्तरमेघ –
उत्तरमेघाचा प्रमुख भाव विरह आहे.अलकानगरीत पोहचल्यावर मेघा तुला अवंती नगरी कशी दिसेल याचे सौंदर्यात्मक विवेचन आहे.(श्लोक २ ते १२)आणि तेराव्या श्लोकामध्ये यक्षाचे घर नेमके कसे ओळखायचे याचेवर्णन आहे,दारी इंद्रधनू तोरण...
तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन ।
यस्योपान्ते कृतकतनयः कान्तय वर्धितो मे हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः ॥
तिथे विरहाने तळमळनाऱ्या पत्नीचा दिनक्रम कसा संथ निरस झाला असेल ,ती सतत अश्रू ढाळत असेल (श्लोक ४४ ).मुखावरील तेज ,केसांची रया,रात्रीची तिची घालमेल ,एकांत व्याकुळ रात्री कशा ती जगात असेल हे सांगितल्या आहेत.
अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुना गाढतप्तेन तप्तं सास्रेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन ।
उष्णोच्छ्वासं समधिकतरोच्छ्वासिना दूरवर्ती सङ्कल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः ॥
दोघांच्या प्रणयाच्या रात्री काही श्लोकात शृंगार रसात सांगितल्या आहेत.
अशा माझ्या प्रिय पत्नीला तू मेघा माझे कुशल सांग ,तिच्याविना मीही येथे तळमळतो आहे,आता केवळ चार मास धीर धर!असा निरोप सांग(श्लोक ५३)तिच्या कुशलतेचा निरोप घेऊन तू मेघा त्वरित माझाकडे निघून ये ही याचना यक्ष मेघदूताला करतो(श्लोक ५४)
कच्चित् सोम्यकच्चित् व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे प्रत्यादेशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि ।
निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव ॥
-भक्ती
आषाढस्य प्रथमदिन.वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे चित्र राहिले द्यायचं!
सुदंर
योग्य दुवा
कर्नल काका
शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही.हो शांताबाईंनी भाषांतर केले आहे ते जरा समजायला कठीणच आहे.कुसुमाग्रजांनी भाषांतर केलेलं मेघदूत सहज सुंदर आहे,ते वाचा.कालच..
समयोचित लेख !
चांगला प्रश्न आहे.नक्की
झिंज्या उपटायची गरज काय?
बायका ह्या मुळातच शहाण्या
आहा...!
कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी
कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतंअगदी!निसर्ग वर्णनही अप्रतिम!दैवी प्रतिभा-कालिदास.छानच लेख
धन्यवाद