वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
13 Apr 2023 - 3:41 pm

तब्बल चार वर्षांनंतर दिल्लीच्या पुस्तक मेळाव्याला भेट दिली. तीन-चार पुस्तके ही विकत घेतली. अचानक लक्ष अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि उत्तम कागदावर छापील वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियावर गेले. माझ्या सारख्याला या पुस्तकातले काही एक कळणे शक्य नव्हते. तरीही वनस्पति विश्वकोशाची विवरणिका मागून घेतली. विवरणिकात वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाची इत्यंभूत माहिती तर होती या शिवाय प्रत्येक खंडाची वेगळी माहिती होती. जगात पहिल्यांदाच हे कार्य ते ही भारतातील एक संस्था करत आहे, हे वाचून गर्व झाला. विवरणिका आणि यू ट्यूब वरून ही माहिती मिळविली. त्या आधारावर हा लेख.

वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया हा औषधी वनस्पतींचा एक बहु-विपुल संग्रह आहे. जगभरात सर्वत्र विखुरलेल्या सर्व पारंपरिक औषधी वनस्पतींचे ज्ञान आणि त्यांचा व्यापक उपयोग एकाच पुस्तकात एकत्रित करणे हा या विश्वकोशाचा उदेश्य आहे. जगभरात एकूण 3.6 लाख वनस्पतींची विविधता उपलब्ध आहे. आणि, यापैकी अंदाजे 60,000 वनस्पती जगातील पारंपरिक औषधी प्रणालींत वापरल्या जातात. भविष्यात या वनौषधींचा मानव जातीच्या हितासाठी आधुनिक वैज्ञानिक रीतीने अनुसंधान करून विविध रोगांवर औषधी निर्मित केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय पारंपरिक औषधी ज्ञानाला पेटंट चोरांपासून वाचविणे हा ही एक उद्देश्य आहे.

या विश्वकोशात जगभरात बोलल्या जाणार्‍या सुमारे 1,700 प्रादेशिक भाषांमध्ये जगातील सुमारे 60,000 औषधी वनस्पती, 7500 वनस्पति वंश 50000 वनस्पति प्रजाती ज्यात 6 फायलोजेंनिक गट, 1024 टेरिओडोफाइट्स, 850 बुरशी, 274 ब्रायोफाइट्स, 378 शैवाल, 44794 एंजियोस्पर्म्स, 536 जिम्नोस्पर्म आहेत. यात व 6 लाख Bibliographic sources, 2.5 लाख वनस्पतींचे समानार्थक शब्द, 12 लक्ष स्थानिक नावे, 1300 ज्ञात रोगांवर 2200 हून अधिक औषधींचे वर्णन आहे. या शिवाय औषधी वनस्पतींची प्रामाणिक 30500 कॉनव्हास चित्रे, 35000 रेखाचित्रे ही आहेत. या शिवाय यात यूरोपियन, अमेरिकन, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि एशिया खंडातील औषधी प्रणाली आणि त्यात वापरणार्‍या औषधिंसाठी वेग-वेगळे खंड ही आहेत. शेवटच्या खंडात उपसंहार आहे.

हा विश्वकोश 109 खंडात पूर्ण होणार आहे. या विश्कोशाच्या निर्मितीत 900 शास्त्रज्ञ ज्यात भारतीय, विदेशी 25 पोस्ट डॉक्टरेट, 50 पीएचडी धारक, क्लिनिकल संशोधक, वनस्पति शास्त्रज्ञ, वर्गीकरण शास्त्रज्ञ, सूष्म जीव शास्त्रज्ञ, biotechnologist आणि इतर शास्त्रज्ञ. या शिवाय 31 आयटी विशेषज्ञ आणि इतर 120 आयुर्वेदिक डॉक्टर, 40 भाषा शास्त्री. या सर्वांचा समन्वय साधणारे शेकडो निस्वार्थी कार्यकर्ता आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अधिकान्श शास्त्रज्ञांनी अल्प मानधनात किंवा सेवा भावनेने कार्य केले आहे. अन्यथा हे कार्य पूर्ण करणे असंभव होते. या विश्वकोशाचे आज पर्यन्त 70 खंड प्रकाशित झाले आहे. पहिल्या खंडाचे प्रकाशन माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते 3 मे 2017ला झाले होते.

15 वर्षांपूर्वी हे कार्य करण्याचा संकल्प आचार्य बालकृष्ण यांनी केला होता. पण हे कार्य हिमालय पर्वत सर करण्यापेक्षा ही कठीण होते. विषय वेगळा आहे पण आचार्य बालकृष्ण यांनी हिमालयातील 25000 फूट उंच पर्वत शिखर बिना ऑक्सीजन सर केले आहे. हिमालय पुत्र असल्याने त्यांच्यासाठी हे कार्य कठीण नव्हते. त्यांची 15 हून जास्त वर्षांची तपस्या आणि जगभर पसरलेल्या वनस्पति क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांच्या मदतीने हे महत्त कार्य पूर्णत्वेच्या मार्गावर आहे.

एक-एक टप्प्याने या कार्याची सुरवात झाली होती. पहिले कार्य आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या वनस्पतींचा शोध घेणे. आज 700च्या जवळ वनौषधींचा वापर आयुर्वेदात होत आहे. पण औषधींची वास्तविक संख्या जाणण्यासाठी आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या औषधींचा शोध घेणे गरजेचे होते. या साठी देश विदेशांत सुरक्षित पांडुलिपींचा शोध घेणे आणि त्यांचे डिजिटली करण्याचे कार्य हाती घेतले. 60000 हून जास्त पांडुलिपी ज्यात 50801 ताडपत्री पांडुलिपी सहित 63 लाखाहून जास्त पानांचे डिजिटलीकरण केले. यात आयुर्वेद सहित 18 विषय आहेत. दोन डझनहून जास्त प्राचीन आयुर्वेदिक पुस्तकांचे प्रकाशन ही केले. या पुस्तकांचा लाभ आयुर्वेदिक शिक्षक, विद्यार्थी सहित औषधी निर्मात्यांना ही होणार. या शिवाय पेटेंट सुरक्षित करण्यात ही मदत मिळेल. हे कार्य अद्याप ही सुरूच आहे. भारतात सापडणार्‍या 20000 वनस्पतींपैकी जवळपास 1000 हून जास्त वनौषधींचा वापर भारतातील विभिन्न पारंपरिक चिकित्सा पद्धतीत होतो. आचार्य बाळकृष्णाच्या मते भारतातील अजून 5 ते 7 हजार वनस्पतींचा वनौषधींच्या रूपाने होऊ शकतो. त्यासाठी अनुसंधानाची गरज आहे.

पतंजली हर्बल गार्डनची स्थापना करण्यात आली. या हर्बल गार्डनचा मुख्य उद्देश्य भारतात उपलब्ध औषधी वनस्पतींचे जतन करणे आणि त्यांचा प्रसार करणे. संपूर्ण भारतातील 1,000 हून अधिक औषधी वनस्पती, झुडपे, झाडे, लता, ह्या सर्वांचा उपयोग वैज्ञानिक समुदाय आणि सामान्य जनता या दोघांनाही होत आहे.

पतंजली रिसर्च फाउंडेशन हर्बेरियम (PRFH)ला न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन, यूएसए द्वारे मान्यता प्राप्त आहे. भारताच्या विविध भागातून पूर्व आणि पश्चिम हिमालय आणि उच्च गंगेच्या मैदानातील टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्सचे 10,000 वनस्पती 2,000 हर्बेरियम शीट्स वर आहेत. नाममात्र शुल्क देऊन विद्यार्थी आणि संशोधक दोघेही येथे वनस्पती ओळखीचे प्रमाणपत्र मिळवू शकतात.

वैदिक नामकरण पद्धती: जगात ३.६ लाख वनस्पती प्रजाती आहेत आणि त्यांच्या वैज्ञानिक नावांची संख्या जवळपास १३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे भ्रम निर्मिती होते. या शिवाय वनस्पति शास्त्रज्ञांना वनस्पतींची नावे लक्षात ठेवणे ही कठीण होते. संस्कृत एक वैज्ञानिक भाषा आहे. भाषातज्ञ आणि आयुर्वेदिक दिग्गजांच्या सहाय्याने "वैदिक नामकरण पद्धती" विकसित केली. वैदिक नामकरण वनस्पतींच्या बाह्य आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर जोर देते आणि अशा अर्थपूर्ण पद्धतीने क्युरेट केले गेले जेणेकरून वनस्पतींचे लिंग आणि फायलोफजेनिक गट निर्दिष्ट करण्या बरोबरच कोणत्याही विशेष उपकरणाचा वापर न करता वनस्पतींचे आयडेटिफिकेशन करता येईल. या शिवाय भविष्यात सापडलेल्या वनस्पतींना देखील नाव दिले जाऊ शकते, अशा प्रकारे वैज्ञानिक समुदायासाठी एक सुलभ डेटाबेस तयार केला जाऊ शकतो. वनौषधी विश्वकोश हा पहिला ग्रंथ आहे ज्यात जगातील सुमारे ६०,००० औषधी वनस्पतींना संपूर्णपणे नवीन संस्कृत नामावली (द्विपदी नमुन्यात) कुटूंबापासून ते वंश आणि प्रजाती स्तरापर्यंत देण्यात आली आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने नामकरणाच्या उत्पत्तीचा आधार आहे. वैदिक नामकरण पद्धतीने ठेवलेल्या नावांचा वापर अंतराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रांनी ही स्वीकृत केला आहे.

औषधी वनस्पतींच्या चित्रांचे संग्रहालाय: विश्वकोशच्या निर्मितीत सर्वात मोठी समस्या वनस्पतींच्या चित्रांची होती. अधिकान्श उपलब्ध फोटो किंवा चित्रांचे कॉपी राइट असण्याची संभावना होती. या शिवाय त्यांच्या प्रमाणिकते वर ही प्रश्न चिन्ह येऊ शकत होते. यासाठी नव्याने जगातील सर्व वनस्पतींचे कॅनव्हास पेंटिंग्ज नव्याने काढण्याचा निश्चिय केला. अनेक वनस्पति शास्त्री आणि चित्रकारांच्या मदतीने औषधी वनस्पतींचे 35000 कॅनव्हास पेंटिंग्ज आणि 30000 रेखाचित्रे नव्याने काढण्यात आली. या कार्यात ही अनेक वर्ष लागले. या चित्रांचा वापर वनौषधी विश्वकोश मध्ये केला आहे. हे संग्रहालाय वनौषधींचे जगातील सर्वात मोठे संग्रहालाय आहे.

या वनस्पति विश्वकोशाचा उपयोग वनस्पती शास्त्रज्ञ, पारंपरिक डॉक्टर/ वैद्यांना होणार आहे.जगातील विभिन्न वांनौषधींवर अनुसंधानाचा नवीन मार्ग ही उघडेल. वाढत्या हर्बल औषधी उद्योगाला याचा लाभ मिळणार. वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाचा प्रत्येक खंड 800 ते 1000 पानाचा आहे. प्रत्येक खंडाची किंमत ही जवळपास 7000 रु आहे. यावर प्रश्न विचारल्या वर उत्तर मिळाले, विश्वकोशच्या निर्मितीत लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि खर्च पाहता, ही किंमत अत्यंत कमी आहे.

शिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 May 2023 - 5:58 am | कुमार१

चांगली माहिती.