हरिश्चंद्र-शशक+

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
10 Mar 2023 - 1:53 pm

तू कुठे इकडे?कोण गेलं?

थंडीत जळत्या सरणा समोर तो एकटाच बसला होता.

जास्तच कुरेदल्यावर,तो आपली रामकथा सांगू लागला.

"बाप कबाडी होता.रस्त्याच्या कडेला कबाडातच मेला. या जगात तो आणी मीच.

जाणाऱ्या येणाऱ्यानां वाटत होते बेवडा आहे. दोन चार गाडीवाल्यांनी पाच दहा रूपायाच्या नोटा फेकल्या आणी पुढल्या जन्मासाठी पुण्य कमावलं.शेवटी तिथल्याच एका हातगाडीवर टाकला व मसणात विल्हेवाट लावली.

छडा गिरधारी, ना लोटा ना थाली.

सरकारी लोक देतात थोडेफार.

जो ना दे उसका भी भला......

नाव काय तुझं,करतोस काय!

यात्री निवास मधला स्वागत कारकून,नाव माहित नाही पण सगळे हरिश्चंद्र म्हणतात.

दिवसा हाॅटेलात काम करतो व रात्री बेवारस प्रेतांचा वारस बनतो.

हाच छंद आहे माझा.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

11 Mar 2023 - 8:54 am | चित्रगुप्त

कथा आवडली. असा छंद असणारे लोक असणेही गरजेचे असते. (गोनिदांचे छंद माझे आगळे' आठवले)

सौंदाळा's picture

15 Mar 2023 - 5:30 pm | सौंदाळा

आवडली.

विवेकपटाईत's picture

15 Mar 2023 - 6:34 pm | विवेकपटाईत

कथा आवडली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Mar 2023 - 7:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

शब्द मोजायला हे वापरा, म्हणजे सोपे जाईल

https://wordcount.com/