सुरेश भट यांच्या अनेक गीतांपैकी मनाला चटका लावणारे हे गीत दोन वेगळ्या गायकांनी वेगळ्या चालीने म्हणलेले , नक्की ऎका
https://www.youtube.com/watch?v=h8IxIyWkJBw
https://www.youtube.com/watch?v=T6RE9Q9xpTM
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले
वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल
विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल
सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल
जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल
जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
– सुरेश भट
संगीत – सुधीर मोघे
गायक - श्रीकांत पारगावकर
प्रतिक्रिया
17 Feb 2023 - 12:23 pm | कर्नलतपस्वी
सुरेश भट यांची प्रत्येक कविता एक वेगळा अनुभव आहे.
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ।
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही ।।
जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाणे ।
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही ।।
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो ।
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही ।।
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ।
एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही ।।
वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले ति-हाइत ।
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही ।।
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा ।
लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही ।।

17 Feb 2023 - 12:36 pm | चौकस२१२
हो ना .. अनेक कविता ...
सुरेश भट, खानोलकर , जी ए यांच्या जीवनात काय अशी दुःखे होती कि त्यांचयकडून अश्या कलाकृती निर्माण झाल्या असाव्यात ?
जयवंत दळवी यांचं लेखात हि कधी कधी करुणता असते पण असं कधी वाटलं नाही कि ते दुखी असावेत ( याला कारण असे असावे कि त्यांचे करुणा नसलेलया कथा पण आहेत
19 Feb 2023 - 1:20 pm | कुमार१
आवडलीच !