मद्रासकथा-२

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
6 Nov 2022 - 11:53 pm

.
भारतातील पहिल्या महिला आमदार .

भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती. तेव्हा पेरियार यांची भूमिका काय होती?

त्याची अंमलबजावणी करण्यात पेरियार यांची भूमिका होती. जस्टिस पार्टीचे विघटन होत असल्याने सहा वर्षे या विधेयकाची अंमलबजावणी झाली नाही. पेरियार यांनी रागाच्या भरात काँग्रेस सोडली तेव्हा ते चांगलेच आक्रमक झाले. पूर्वीही होते, पण आता ते जास्त झाले. त्यांना संपूर्ण समाजाची रचना एका झटक्यात सपाट करायची होती.

जात नसणार. लिंगभेद नाही. शिवाशिवी नाही. बालविवाह नाही. मंदिरात देवदासी नसतील. मनुस्मृती नाही. देवता नसतील. ब्राह्मणांकडून लग्नही होणार नाही. कोणतेही धार्मिक संस्कार होणार नाहीत. एकूणच, त्यांच्या मते, मद्रासचा संपूर्ण हिंदू समाज शून्यातून एक नवीन सुरुवात करेल.

या क्रांतिकारी वृत्तीने त्यांची प्रतिमा ब्राह्मणेतर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत होती. ते द्रविडांचा स्वाभिमान जागृत करत होते. त्यांच्या मते, या सर्व ब्राह्मणी प्रथा आणि जातिवाद आर्यांनी लादला होता, ज्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ते देव-देवतांच्या प्रकरणांच्या पुस्तिका (विचित्र देवरकाल कर्तु - विचित्र देवांचे कारनामे) छापून वितरित करत होते. त्यात विष्णू, ब्रह्मा, शिव या सर्वांना प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांची खोडसाळ उत्तरे देण्यात आली होती.

या नव्या ब्राह्मणविरोधी लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुब्बरायन यांनी जस्टिस पार्टीच्या पाठिंब्याने सरकारी पदे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ब्राह्मणेतरांसाठी ४४ टक्के आरक्षण लागू केले.

चेंगलपेट येथे पेरियार मोठ्या जनसमुदायासमोर म्हणाले,

"आजपासून मी माझे आडनाव 'नायकर' सोडत आहे, आणि तुम्हा सर्वांनी तुमचे आडनाव सोडावे अशी माझी इच्छा आहे"

अडचण अशी होती की पेरियार यांचा वेग प्रचंड होता आणि सामान्य लोकांचा वेग त्यांच्याशी बरोबरी साधत नव्हता. प्रभावशाली ब्राह्मणेतरांना आपले आडनाव किंवा धर्म सोडायचा नव्हता. तसेच त्यांना समाजरचनेतील आपले स्थानही गमवायचे नव्हते. आरक्षणानंतर ब्राह्मणबहुल प्रश्न मिटला होता, त्यामुळे त्यांचे काम निघाले होते.

पण पेरियार जोरात पळत होते. कोणत्याही पुजार्‍याशिवाय, कुंडली न जुळवता, जातिभेद न ठेवता आणि अशुभ राहूच्या काळात 'स्वाभिमान विवाह' ते लावू लागले. असे सुमारे आठ हजार विवाह त्यांनी लावून दिले.

1928 मध्ये त्यांनी एक पुस्तिका लिहिली - 'स्त्रिया गुलाम का असतात?'

आजच्या पुरोगामी भारतीय स्त्रियांनाही ही पुस्तिका पचनी पडणार नाही. बरं त्या काळी पाश्चात्य समाजातल्या स्त्रियाही तितक्या मोकळ्या नव्हत्या जितकं पेरियार सांगत होते. त्यांना पवित्र स्त्रीची 'संकल्पना' उखडून टाकायची होती. पेरियार यांच्याप्रमाणे महिलाही आक्रमक होत होत्या.

1930 मध्ये, भारताच्या पहिल्या महिला आमदार मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी मद्रास विधानसभेत म्हटले, "अध्यक्ष महोदय! मंदिरांमधून देवदासी प्रथा बंद करण्यात यावी, अशी विनंती मी सभागृहाला करत आहे."

राष्ट्रवादी नेते सत्यमूर्ती म्हणाले, “ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती अशा प्रकारे नष्ट करू शकत नाही."

मुथुलक्ष्मी स्वतः एका देवदासीची मुलगी होती आणि एक वैद्य होती. त्यांनी प्रत्युत्तर दिले "मी आदरणीय आमदारांना विनंती करेन की त्यांनी आपल्या मुलीला नृत्य आणि गाणे शिकवावे आणि तिला मंदिरात आजीवन देवदासी बनवून संस्कृतीचे रक्षण करावे."

एका महिलेचा हा प्रतिसाद तामिळ समाजात अकल्पनीय होता. पेरियारांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता एकच खात्रीलायक शस्त्र होते. एक शस्त्र जे पेरियारना काही काळ राजकारणातून दुर्लक्षित करणार होते. ते शस्त्र होते राष्ट्रवाद.

त्यावेळी देशाच्या दुसऱ्या टोकाला गांधी मीठ तयार करण्यासाठी दांडीयात्रेला निघाले होते. मुथुलक्ष्मी रेड्डी स्वतः विधानसभेचा राजीनामा देऊन त्यांच्या आंदोलनात सामील होणार होत्या. हळूहळू संपूर्ण मद्रास गांधींच्या मागे चालू लागला. पेरियार कुठेतरी मागे राहिले.

दलित किंवा मागास जातींची कोणतीही लॉबी असू नये जी त्यांना हिंदूंपासून वेगळे करेल यावर गांधी ठाम होते. याला ते इंग्रजांची 'फाळणी' नीती म्हणत असत, पण ब्राह्मणवाद ही इंग्रजांची उपज नाही हेही त्यांना माहीत होते. ही समाजरचना इंग्रजांनी केलेली नाही. तसेच ब्रिटिशांनी 1930 पूर्वी दलितांना विशेष आरक्षण किंवा प्रतिनिधित्व देऊन विभाजन केले नाही. मिशनरी दलितांचे धर्मांतर करूनही त्यांना समाजात राजकीय प्रतिनिधित्व किंवा उच्च स्थान देत नव्हते.

पण गांधी बहुजन समाजाची ही लाट कशी थांबवनार होते? मनुस्मृतीचे दहन केवळ मद्रासमध्ये होत नव्हते, तर मुंबईतही ती जाळली जात होती. मुंबईत नेतृत्व पेरियारांपेक्षा कितीतरी पटीने अधिक तर्कशुद्ध आणि विद्वान माणसाच्या हातात होते.
.

25 डिसेंबर 1927 रोजी मुंबईतील महाड येथील तलावासमोर उभे राहून आंबेडकर म्हणाले,

"मित्रांनो,हा तलाव सार्वजनिक मालमत्ता आहे. पण त्याचे पाणी सार्वजनिक नाही. सवर्ण हिंदूंनी आम्हाला हे पाणी पिण्यास बंदी घातलीय. गंमत म्हणजे हे पाणी मुस्लिम पिऊ शकतात, ख्रिस्ती पिऊ शकतात. कुत्री आणि मांजरी देखील पिऊ शकतात. पण तुम्ही अस्पृश्य त्याला स्पर्शही करू शकत नाही, ते पिणे तर दूरच. तुम्ही प्राण्यांपेक्षा कनिष्ठ आहात का?

सवर्ण हिंदू असेतर शांत आणि अहिंसक असतात. ते जीवहत्येचा निषेध करतात, सात्विक जीवन जगतात. केवळ गायच नाही तर सापही पवित्र मानतात. मग तुम्हाला अपवित्र का मानतात?

हे पाणी काही अमृत नाही की ते पिऊन तुम्हाला अपार आनंद मिळेल. पाणी शेवटी पाणी आहे. माझा सत्याग्रह फक्त याच मुद्द्यावर आहे की या पाण्याचे सेवन करून तुम्ही माणसाच्या दर्जाला यावे. आपण प्राण्यापेक्षा कनिष्ठ समजले जाऊ नये. हा केवळ प्रतिकात्मक उपक्रम आहे.

हिंदू समाजाची प्रगती करायची असेल, तर या चार वर्णांच्या विषमतेपासून आणि या घृणास्पद अस्पृश्यतेपासून मुक्त व्हावे लागेल. आपल्या सर्वांचा वर्ण एकच असाव। समानतेचा वर्ण

जोपर्यंत तुम्ही अहिंसेचा मार्ग धराल तोपर्यंत आम्हीही तुमच्यासारखे अहिंसक आहोत, असा इशाराही मी देऊ इच्छितो. उच्चवर्णीयांनी हिंसाचार केला तर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.

या असमानतेचे समर्थन करणारे सनातनी ग्रंथ काढून टाकून न्यायाचा ग्रंथ अंगीकारण्यासाठी मी माझ्या विरोधकांना सुचवेन.

त्याच वेळी मुंबई प्रांतात त्या तलावाच्या काठी मनुस्मृति-दहन करण्यात आले. भारतातील मद्रास आणि बॉम्बे या दोन महानगरांमध्ये एकाच वेळी मनुस्मृतीचे दहन होणे आणि पेरियार आणि आंबेडकर ह्या दोन हत्तींचे पाय रोवले जाणे ही काही सामान्य घटना नव्हती. ही आग भारतातील इतर कोणाला दिसो ना दिसो पण गांधींना त्याच्या ज्वाळा स्पष्ट दिसत होत्या.

गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या 'टायमिंग'वर चर्चा करता येईल. पण सविनय कायदेभंग आंदोलनाच्या लाटेने ती धगधगती आग काही प्रमाणात विझवली. साबरमती ते दांडीच्या प्रवासाला खादी घालून, गांधी टोप्या घालून लोक चालू लागले, काँग्रेसजनांना अटक होऊ लागल्यावर वातावरण बदलले. देशाची गुलामगिरी समाजाच्या गुलामगिरीवर भारी पडली, पेरियार आणि आंबेडकरांना तर इंग्रजांचे एजंट म्हटले जाऊ लागले. मला याला गांधींचा 'मास्टर स्ट्रोक' म्हणायचे नाही, पण त्यामुळे मुंबई आणि मद्रासमध्ये राष्ट्रवाद पेटला.

आता फाळणी करण्याची पाळी इंग्रजांची होती. 1928 मध्ये सायमन कमिशन आले आणि परत गेले. 1930-31 मध्ये गोलमेज परिषद होनार होती जिथे गांधी आणि आंबेडकर समोरासमोर येनार होते. मद्रासी दलित नेते श्रीनिवासन आंबेडकरांच्या सोबत होते. गांधींकडून राष्ट्रवादीचा टॅग हिसकावून घेण्याच्या चक्रात आणखी एक घटना घडली.

मार्च 1931 मध्ये पेरियार यांनी त्यांच्या 'कुडी आरसू' मासिकात लाहोर तुरुंगातील त्या घटनेवर लिहिले होते.

भगतसिंगाना फाशी दिल्यानंतर जे लोक गांधींना महात्मा मानत होते तेच लोक आता त्यांचा अपमान करत आहेत. कालपर्यंत लोक गांधींसोबत होते, पण आता नव्हते. आता त्यांची देशभक्ती उघडी पडली होती."
(क्रमशः)
मुळ लेखकः प्रविन झा.

इतिहास

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

8 Nov 2022 - 10:07 pm | उपयोजक

पेरियारनी दक्षिण भारत भारतापासून वेगळा करायला मदत करावी म्हणून जिन्नांना पत्र लिहिले होते. पेरियार हे समाजोध्दारक कमी आणि ब्राह्मणद्वेष्टे जास्त होते. मध्यंतरी रजनीकांत आणि चो रामसामी यांनी पेरियारचा पराकोटीचा हिंदूद्वेष जगासमोर पुराव्यानिशी समोर आणला होता.

विनायक दामोदर सावरकर ह्यांनी देखील संस्थानांना भारतात सामील होऊ नका असे आवाहान केले होते मग त्यांनाही हिंदूद्वेष्टे म्हणाल का? ज्यांच्यासाठी पेरियार लढत होते ते ब्राम्हणेतर हिंदूच होते मग पेरियार हिंदूद्वेष्टे कसे? रजनीकांतची केसांबरोबर अक्कलही ऊडाली असावी.

पॉल पॉट's picture

9 Nov 2022 - 2:53 am | पॉल पॉट

विनायक सावरकर ह्यांच्या हिंदूमहासभेने जिन्नाच्या मूस्लिम लाग सोबत मिळून सत्ता स्थापन केली होती. ते वाईट नाहीत मग दक्षिण भारत वेगळा हवा म्हणून जिन्नाकडे मदत मागीतली तर पेरियार वाईट ठरतात का?