दिवाळी अंक २०२२ - हुस्नवाले तेरा जबाब नही..

बाजीगर's picture
बाजीगर in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 9:42 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{text-align:justify;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}

.mi-image {max-width:100%;height:auto;margin-top:16px;margin-bottom:16px;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19);}

शकील बदायुनी - हुस्नवाले तेरा जबाब नही..✒️
एक देखणा शायर, दिगंत कीर्तिमान प्रतिभेचा धनी.

1

ना मै सपना हूँ,  ना कोई राज हूँ
एक दर्दभरी आवाsssज हूँ
पिया देर ना कर आ मिल....
जरा देख ले आकर परवाssssने
तेरी कौनसी है मंजिल
कहीं दीप जले कहीं दिल...|
दुश्मन है हजारो यहाँ जान के
जरा मिलना नजर पेहचाsssनके
दुश्मन है हजारो यहाँ जान के
जरा मिलना नजर पेहचानके
कई रूप में है कातिल
जरा देख ले आकर परवाने
तेरी कौनसी है मंजिल
कहीं दीप जले कहीं दिल|
ओ ओ ओ ओ ओ
https://youtu.be/kKnyg_ZkFlY

परफेक्ट वातावरणनिर्मिती.. असंही हिंदुस्थानी समाजमनाचा असंतुष्ट आत्मा वगैरेवर विश्वास व त्याचं आकर्षण आहेच. प्रेक्षक स्पेल बाउंड मंत्रमुग्ध होतात. पिक्चर हिट, लता फिल्मफेअर घेऊन आजारपणानंतर स्टाइलिश कमबॅक करते.. सर्व इतिहास सर्वांनाच पाठ आहे.

पण स्टोरीलाइनच्या मागणीनुसार अंतर्ज्ञानाने फिल्मच्या कॅरॅक्टरमध्ये जाऊन असे चपखल शब्द लिहिणं, जे कथेत साखरेप्रमाणे विरघळून जातील, एवढे प्रभावी ठरतील की हे कुणीतरी लिहिले आहेत हेच लोक विसरतील, ह्याला भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य?

हे लिहिणारा गीतकार देखणा होता... शकील बदायुनी.

शकीलचा अर्थ हँडसम, देखणा, व्यवस्थित, नीटनेटका. तो कवी रुबाबदार, देखणा होता आणि वेलड्रेस्ड, बुटांना पाॅलिश केल्याशिवाय कधीच घराबाहेर पाऊल टाकलं नाही आणि ही शार्प बुद्धी.. काव्यमय विचार.. त्या काळात तरुणींच्या मनाची किती व्याकूळ अवस्था होत असेल त्यांच्या सानिध्यात? पण त्यांच्या मनात एक लहान मूलही दडलं असावं.

हम भी अगर बच्चे होते,
नाम हमारा होता गबलू बबलू
खाने को मिलते लड्डू,
और दुनिया कहती 
happy birthday to you

हे कालच्या ब्रह्मास्त्रमध्येसुद्धा वापरलंय! म्हणजे कसलं एक्स्पायरी डेट नसलेलं गाणं लिहिलंय शकील यांनी! काय असेल ते असो, त्यांचं प्रत्येक गाणं निशाण्यावरच लागलं, दिल का निशाण्यावर.

गुंतागुंतीची सिच्युएशन आहे.. हिरोइनचा हिरोवरचा विश्वास साफ उडालाय, हिरोला सफाई द्यायचीय, पण तिला काहीही ऐकायचं नाहीये, इतकंच नाही, तर आजच्या रात्रीनंतर कधीच तोंडही पाहायचं नाहीये. लिहा गाणं.. आणि हो, गाणं हिटच व्हायला पाहिजे. शकील यांनी सिगारेट पेटवली असेल, धुरात त्यांच्या अंतर्दृष्टीसमोर परिस्थिती साक्षात दिसली असेल, विचारात हरवत पेन कागदाला लागला असेल, अनवधानाने राखेचा बोटांना चटका बसला असेल, तो चटका शब्दांत उतरला असेल, ती नाही ऐकत तर काय समजावयाचं? फक्त प्रणाम करून निघून जाऊ या...

आज की रात मेरे
दिल की सलामी ले ले
दिल की सलामी ले ले.
मैने चाहा की बता दूँ मैं हक़ीक़त अपनी
तूने लेकिन न मेरा राज़ ए मुहब्बत समझा
मेरी उलझन, मेरे हालात, यहाँ तक पहुंचे
तेरी आँखों ने मेरे प्यार को नफ़रत समझा

अब तेरी राह से बेगाना चला जाएगा
कल तेरी बज़्म से दीवाना चला जाएगा
शम्मा रहे जाएगी परवाना चला जाएगा
आज की रात मेरे दिल की सलामी ले ले

https://youtu.be/YYNCNyfNIOQ

पियानोचे सूर छेडत देखणा दिलीपकुमार सौदर्यवती वैजयंतामालीकडे पाहत रफीसाबच्या सुंदर आवाजात गातो.. रिच सिच्युएशन.

हुस्न से चाँद भी शरमाया है
तेरी सूरत ने ग़ज़ब ढाया है
हाय इन प्यार में डूबी हुई आँखों की क़सम
हाय इन प्यार में डूबी हुई आँखों की क़सम
आदमी क्या है फ़रिश्तों के बहक जाएँ क़दम
बिन पिए मुझपे नशा छाया है
तेरी सूरत ने गज़ब ढाया है
हुस्न से चाँद भी शरमाया है 
तेरी सूरत ने गज़ब ढाया है

https://youtu.be/8eqzH3PaUiM

७५० गाणी, गझल, कविता आहेत म्हणे, काय काय वाचणार आपण तरी. माझं अतिशय आवडतं आणखी एक गाणं -

जान ए बहार हुस्न तेरा बेमिसाल है
आयी है मेरे पास तू इस आन बान से
उतरी हो जैसे कोई परी आसमान से
मैं क्या कहु खुशी से अजब मेरा हाल है
जान ए बहार हुस्न तेरा बेमिसाल है

https://youtu.be/Q6dVti1YVwM

ह्याच आवडत्या गाण्यातला हा अंतरा मात्र मला आवडत नाही (झाकून ठेवण्याचा, अप्पलपोटेपणा मला अतिरेक वाटतो, व्यक्तिस्वातंत्रावर हल्ला वाटतो.)

हाय ये तेरी मस्त अदाएं ये बाकपन
किरणों को भी मैं छूने न दूँगा तेरा बदन
तुझसे नज़र मिलाए ये किसकी मजाल है

कोहिनूर (१९६०) -

मधुबन में राधिका नाचे रे
गिरिधर की मुरलिया बाजे रे|
पग में घुँघर बाँध के
घुँघटा मुख पर डाल के
नैनन में कजरा लगा के रे|
डोलत छम-छम कामिनी
चमकत जैसे दामिनी
चंचल प्यारी छब लागे रे|

https://youtu.be/FtObMbpIJLQ

मुग़ल-ए-आज़म (१९६०) -

मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे
मोरी नाजुक कलईया मरोर गयो रे
कंकरी मोहे मारी, गगरिया फोर डारी
मोरी सारी अनारी भिगोय गयो रे
नैनों से जादू किया, जियरा मोह लिया
मोरा घूँघटा नजरियो से तोड़ गयो रे

https://youtu.be/ZIsQrjt86HA

प्यार किया तो डरना क्या (?!) यात काय विचारांची उंची गाठलीय त्यांनी, मधुबाला प्रेमामुळे निर्भय होऊन शक्तिमान जिल्ले इलाहीला विचारते,

परदा नहीं जब कोई खुदा से
बंदों से परदा करना क्या?
जब प्यार किया तो डरना क्या.

https://youtu.be/IkyxGIH152Q

ह्या ओळी ऐकून उन्मत्त बादशहाची नजर विचारपूर्वक खाली झुकते. हा सीन अतिशय नाट्यपूर्ण आणि पटणारा ठरतो, कारण नौशाद व शकील बदायुनींच्या चर्चेतून उतरलेल्या त्या ओळींचा भावार्थ असावा.

(थोडं विषयांतर - आज शाळा-काॅलेज-हायकोर्टमध्ये मुद्दाम निर्माण केलेल्या वादाला शकील बदायूनी ह्यांनी हे सार्वकालीन सत्य, उत्तर देऊन ठेवलेलं आहे, पण राजकीय होळी पेटवून त्यात आपली पोळी भाजणार्‍यांना हे ऐकायचं नाहीये, असो.)
(हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे की,
- इस गाने को शकील बदायुनी ने १०५ बार लिखा था, जिसके बाद ही वे नौशाद साहब को उनकी पसंद तक पहुँचा सके|
- इस गाने को बनाने और शूट करने में १०० लाख रुपए लगे थे|
- इस गीत को सुप्रसिद्ध शीश-महल में शूट किया गया था|)
 
रहा गर्दिशों में हर दम मेरे इश्क़ का सितारा, 
तेरी महफ़िल में किस्मत आज़मा कर हम भी देखेंगे,

https://youtu.be/uSyIF_xWwao

त्यांनी खूप भजनंसुद्धा लिहिली. त्यांनी लिहिलेली भजनं आजसुद्धा मोठ्या आवडीने ऐकली जातात.  

फ़िल्म - बैजू बावरा (१९५२)

मन तड़पत हरि दर्शन को आज
मोरे तुम बिन बिगड़े सकल काज
विनती करत हूँ रखियो लाज
तुम्हरे द्वार का मैं हूँ जोगी
हमरी ओर नज़र कब होगी
सुन मोरे व्याकुल मन का बात

रफीसाब, नौशादसाब आणि शकील बदायुनीसाब हे तिघंही मुसलमान हिंदुस्थानी संस्कृतीत किती एकरूप झाले होते, खोटा धर्मांधपणा नव्हता त्या तिघांकडे, अतिव श्रद्धेने त्यांनी ह्या गीताची जबाबदारी पार पाडली, कहाँ गये वोह लोग? आता लोक खुजे झालेत.

https://youtu.be/tz7C0MEaMfQ

कैसे कहूँ (१९६४)

मनमोहन मन में हो तुम्हीं
मोरे अंग अंग तुम्हीं समाये
जानो य जानो न हो तुमही
मनमोहन मन में

देख देख तोरी छब साँवरिया
देख देख तोरी छब साँवरिया
बनी है राधा तुम्हरी बाँवरिया
रोम रोम तुम्हरे गुण गाये
मानो या मानो ना हो तुम्हीं
मनमोहन मन में

https://youtu.be/CNewjRj0_qY

अमर (१९५४)

इन्साफ का मंदिर है ये भगवान का घर है
कहना है जो कह दे तुझे किस बात का डर है
है खोट तेरे मन मे जो भगवान से है दूर
है पाँव तेरे फिर भी तू आने से है मजबूर
हिम्मत है तो आजा, ये भलाई की डगर है
दुःख दे के जो दुखिया से ना इन्साफ करेगा
भगवान भी उसको ना कभी माफ़ करेगा
ये सोच ले हर बात की दाता को खबर है
हिम्मत है तो आजा, ये भलाई की डगर है
है पास तेरे जिसकी अमानत उसे दे दे
निर्धन भी है इंसान, मोहब्बत उसे दे दे
जिस दर पे सभी एक हैं बन्दे, ये वो दर है

https://youtu.be/G_DMF4fQaA4

हिंदुस्थानी अध्यात्माचा त्यांचा व्यासंग अफाट असणार, त्याशिवाय असं हुकमी धार्मिक गाणं कुणी लिहू शकणार नाही. त्यांनी लिहिलेली भजनं लोकप्रिय झाली. त्यांचं सर्वोच्च लोकप्रिय 'हरी ओम, मन तरपत हरी दर्शन..' आजही ऐकलं जातं.

सलग तीन वर्षं सर्वोत्तम गीतकार फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळवून हॅट्रिक साधली.
१९६१ - चौदहवीं का चांद हो, 
१९६२ - हुस्न वाले तेरा जवाब नहीं, (घराना)
१९६३ - कहीं दीप जले कहीं दिल (बीस साल बाद)

नेटवरून खालील माहिती मिळाली -
शकील बदायुनी मसउदी : (उर्दू: شکیل بدایونی) (जन्म : ०३ ऑगस्ट १९१६. निधन - २० एप्रिल १९७०) - शकील बदायूनी मसऊदी का जन्म स्थान उत्तर प्रदेश का शहर बदायूँ है। यह एक उर्दू के शायर और साहित्यकार थे। लैकिन इन्होंने बालीवुड में गीत रचनाकार के रूप में नाम कमाया। पहला ब्रेक 1947 में आयी फिल्म में मिला। नौशाद साहब की धुन में लिखे अफसाना लिख रही हूं दिले बेक़रार का, आंखों में रंग भरके तेरे इंतज़ार का काफी हिट हुआ

शैलेंद्र, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, इंदीवर,एस.एच. बिहारी, हसरत जयपुरी, कमर जलालाबादी, राजेंद्र कृष्ण, निरज असे महारथी तळपत असताना, शकील उजेडी राहिले उजेड होऊन हे सोपं नव्हतं.

प्यार किया तो डरना क्या
मधुबनमें राधिका नाचे रे
नैन लड जै है तो मनवा मा
मिलते ही आँखे दिल गया
दुख भरे दिन बितो रे भैय्या, अब सुख आयो रे

भरी दुनिया में आखिर दिल को
समझाने कहा जाए
मोहब्बत हो गई जिन को
वह दीवाने कहा जाए
लगे हैं शम्मा पर
पहरे, ज़माने की निगाहों के
जिन्हें जलने की हसरत है

वो परवाने कहा जाए
मोहब्बत हो गई जिन को
वो दीवाने कहा जाए
भरी दुनिया में आखिर दिल को
समझाने कहा जाए

सपने सुहाने लडकपन के मेरे नैनोमे डोले  one of the finest song

घ्या, पुन्हा त्यांची आठवण आली,
लो आ गयी उनकी याद
वोह नही आये.

एका स्त्रीच्या मानसिकतेत जाऊन एक दुखीयारी स्त्रीच विचार करते आहे, हे हुबेहूब कसं लिहू शकले ते? दो बदन (१९६६) /रवि /शकील बदायुनी/ लता 

लो आ गयी उनकी याद
वो नहीं आये

दिल उनको ढूंढता है, ग़म का सिंगार कर के
आँखें भी थक गयीं हैं, अब इंतज़ार कर के
इक सांस रह गयी है, वो भी न टूट जाये
लो आ...

रोती है आज हम पर, तन्हाईयाँ हमारी
वो भी न पाये शायद, परछाइयाँ हमारी
बढ़ते ही जा रहे हैं, मायूसियों के साये
लो आ...

लौ थरथरा रही है, अब शम्म-ए-ज़िन्दगी की
उजड़ी हुई मुहब्बत, मेहमाँ है दो घड़ी की
मर कर ही अब मिलेंगे, जी कर तो मिल न पाये
लो आ...

https://youtu.be/dgGnEXDLxSY

अदबशीर वागणं, सुंदर विचार करणं, दुसर्‍यांचीही शेरोशायरी लक्षात ठेवणं आणि दुसर्‍यांच्या शायरीचा उल्लेख करून त्या शायरला खूश करण्याचा प्रयत्न करणं हे त्यांना जमत होतं. पण त्यांच्या यशाने जळणार्‍या आणि तुमची शायरी चुकली असा उघड हल्ला करणार्‍यांना कसं उत्तर द्यायचं हे त्यांना माहीतच नव्हतं, अशा वेळी नम्रपणा घेऊन "मी सुधारणा करीन, तुमच्यात बारकाईने पाहाण्याचा मोठा गुण आहे" अशीच भूमिका त्यांनी घेतली. यावर "आता काय सुधारणा करणार? गाणं रेकाॅर्ड तर झालंय" हेही ऐकून घेतलं.

अन्नू कपूर, मशहूर शायर निदा फाजली यांच्या हवाल्याने सांगतात, ग्वाल्हेरमध्ये एक मुशायरा त वरिष्ठ कवि हजरत नातिक गुलाम, शकील यांच्यावर भडकले,

चौदवीका चांद हो, या आफताब हो

ही शायरी चुकली, मीटरमध्ये बसत नाही. तुम्ही बदायुनीचं नाव खराब केलं.
ते, तुम चौदवीका चांद हो, या तुम आफताब हो असं पाहिजे होतं (?!!) असं म्हणणार्‍या नातिक यांना चालीचं मीटर, मात्रा वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मत्सराने अंध व बधीर झालेल्यांना सांगणं व्यर्थ होतं. पैशासाठी तुम्ही बदायुनीचं नाव खराब केलंत, आता रेडिओवर सारखं लागतं, आम्हाला ऐकावं लागतं. ह्या मुशायरात अशा घोर अपमानाचं हलाहल त्यांनी प्यायलं, पण उलट दुरुत्तर दिलं नाही.

निसर्गाला त्यांचं देखणंपण पाहवलं नाही, टी.बी.ने, मधुमेहाने त्यांना पोखरलं.

जर कुणी संगितप्रेमीने त्यांच्या कबरीला कान लावून ऐकलं, तर कदाचित हेच भजन ऐकू येईल -

इन्साफ का मंदिर है ये भगवान का घर है
है पास तेरे जिसकी अमानत उसे दे दे
निर्धन भी है इंसान, मोहब्बत उसे दे दे
जिस दर पे सभी एक हैं बन्दे, ये वो दर है

मधुमेह वाढल्याने त्यांनी फक्त ५४व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला....

तेरे रस्ते की मैं एक धूल हूँ उड़ जाऊंगा
साथ मेरे मेरा अफ़साना चला जाएगा
कल तेरी बज़्म से दीवाना चला जाएगा
शम्मा रहे जाएगी परवाना चला जाएगा
आज की रात मेरे दिल की सलामी ले ले
दिल की सलामी ले ले

https://youtu.be/4zXG2Q7qxeA

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

6 Nov 2022 - 8:09 am | शशिकांत ओक

बदायूं च्या शकील यांच्या गीत रचना सादर करून नौशाद, रवी हेमंत कुमार वगैरेंच्या आठवणी जाग्या झाल्या.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Nov 2022 - 11:06 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख आहे.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2022 - 5:07 pm | तुषार काळभोर

गीतकारांना शब्द कसे सुचतात...
संगीतकारांना जादुई सुर कसे सुचतात...
त्यात भाव असतात, मात्रांचं गणित असतं.
तेही मागणी केल्याबर. On Demand.
या गोष्टींचा नेहमी विस्मय वाटतो.

गीतकारांना शब्द कसे सुचतात...तेही मागणी केल्याबर. On Demand.

अगदि असेच प्रश्न मलाही पडायचे! मागे युट्युबवर माझे सर्वात आवडते गीतकार 'समीर' ह्यांची एक मुलाखत बघण्यात आली होती, त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. जवळपास सर्वच जुन्या गीतकारांचे उल्लेख, काही किस्से/गमती-जमतीअसलेली हि मुलाखत सर्व संगीतप्रेमींनी पहावी अशी आहे.

चांदणे संदीप's picture

7 Nov 2022 - 8:51 am | चांदणे संदीप

आवडला.

सं - दी - प

संपादक महाराज , आणि ओकसाहेब,अ.माईंडेड-सर,काळभोर जी, संदीप जी धन्यवाद.

तेवढं फाँट बदलायचं बघा प्लीज.
मराठी वाचक असे ही कमी आहेत, ह्या फाँट ने अजून कठीण होतयं.

बाजीगर's picture

8 Nov 2022 - 11:09 am | बाजीगर

ह्या फाँटमुळे रसभंग होऊ शकतो.

संगितप्रेमीने त्यांच्या "कवटीला" कान लावून
असं कुणी वाचू शकतो....

बाजीगर's picture

8 Nov 2022 - 11:09 am | बाजीगर

ह्या फाँटमुळे रसभंग होऊ शकतो.

संगितप्रेमीने त्यांच्या "कवटीला" कान लावून
असं कुणी वाचू शकतो....

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 11:46 am | मुक्त विहारि

संयत भाषेत लिहिले आहे आणि ते पण मनापासून ...

बाजीगर's picture

8 Nov 2022 - 2:56 pm | बाजीगर

खूप आभार

चित्रगुप्त's picture

8 Nov 2022 - 11:42 pm | चित्रगुप्त

शकील बदायुनी यांच्यावरील या उत्कृष्ट लेखाबद्दल अनेकानेक आभार. पार 'त्या' काळात नेलेत राव.
'त्या' काळातले हिंदी चित्रपटसंगीत म्हणजे अक्षय आनंदाचा अनमोल खजिना आहे (तेंव्हा 'बॉलिवुड' हे सवंग, निर्बुद्ध नाव प्रचलित झालेले नव्हते) गावा -गावात पानपट्टीच्या दुकानांवर अहोरात्र हा खजिना विनामूल्य लुटला जायचा. सगळे वातावरण त्या अद्भुत संगीताने भारलेले असायचे. कधीकधी भर पावसातसुद्धा रेडियोवर लागलेले आवडते गाणे पूर्ण ऐकायला भिजत थांबल्याचे आठवते.
मात्र पुढील काळात 'टीनकनस्तर पीटपीटकर गला फाडकर चिल्लाना" छाप गाणी बोकाळल्यावर त्या आनंदाला ग्रहण लागले, आणि गाणी ऐकणेच नकोसे झाले.
मध्यंतरीचा बराच काळ असा गेल्यावर आता पुन्हा तूनळी वगैरेवर ती गाणी ऐकण्याची सोय झाली, तसेच उदाहरणार्थ 'हेमन्तकुमार म्युझिक ग्रुप' वगैरेंमुळे चाळीस-पन्नास वादकांच्या ताफ्यासह अनिल वाजपेयी (रफीची गाणी) मुख्तार शाह (मुकेश), संपदा गोस्वामी, संगीता मेलेकर वगैरेंच्या आवाजात ती गाणी त्या त्या वाद्यांसह गाता-वाजताना बघण्याता येऊ लागली आहेत, हे अहोभाग्यच म्हणावे लागेल.
त्या काळच्या पिच्चरांमधे शिरीमंतांचा बंगला म्हटला की मोठ्ठा पियानो असायचाच, आणि तिथे हीरो आला की तो त्या पियानोला बडव बडव बडवायचा, आणि आपली 'दिल की बात' नायकिणीपर्यंत पोहोचवताना प्राण वा तत्सम व्हीलनाच्या मनात शंकेचे काहूर माजवायचा. अर्थात गाणी मात्र अप्रतिम असायची.
("आजकी रात मेरे दिल की सलामी ले ले" मधील सौदर्यवती ही वैजयंतीमाला नसून वहिदा रेहमान आहे ना ?)
'प्यार किया तो डरना क्या' मधील मधुबाला बघताना का कुणास ठाऊक, आजही डोळे पाणावतात.
अवांतरः "जाने बहार हुस्न तेरा" मधील 'किरणों को भी मैं छूने न दूँगा तेरा बदन...' सारख्याच, ओपीच्या "तुम्हारा चाहने वाला खुदाकी दुनिया मे" मधल्या "तुम्हारे हुस्न की तारीफ आईना भी करे, तो मै तुम्हारी कसम है के तोड दूं उसको" या ओळी पण मला पटत नाहीत.

शशिकांत ओक's picture

28 Nov 2022 - 9:06 am | शशिकांत ओक

त्या काळच्या पिच्चरांमधे शिरीमंतांचा बंगला म्हटला की मोठ्ठा पियानो असायचाच, आणि तिथे हीरो आला की तो त्या पियानोला बडव बडव बडवायचा, आणि आपली 'दिल की बात' नायकिणीपर्यंत पोहोचवताना प्राण वा तत्सम व्हीलनाच्या मनात शंकेचे काहूर माजवायचा.

त्या शिवाय आर्त भावना जागवायला ट्रंपेट, सेक्सोफोन, शहनाई वगैरे वाद्ये तत्पर असतात.

बरोबर चित्रगुप्त सर. चूक दूरुस्ती बद्दल धन्यवाद.
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप आभार,सुंदर लिहीलय आपण.
सहमत.

टर्मीनेटर's picture

12 Nov 2022 - 5:38 pm | टर्मीनेटर

'सुर'मयी लेख आवडला 👍
नव्वदच्या दशकातील संगीत क्षेत्रातला सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या पिढीचा प्रतिनिधी असलो तरी वर दिलेल्यांपैकी अनेक एव्हरग्रीन गाणीही खूप आवडतात.

बाजीगर's picture

19 Nov 2022 - 1:15 pm | बाजीगर

खूप आभार

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 12:10 pm | श्वेता व्यास

शकील बदायुनी यांच्या गाण्यांचे रसग्रहण आवडले.
इतकी वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार गीते त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला मिळत आहेत हे भाग्य आहे.
शकील शब्दाचा अर्थ माहिती नव्हता, छान अर्थ आहे.
अवांतर: या नावाशी समानार्थी मराठी/संस्कृतमध्ये काय नाव असेल हा विचार करतेय.

बाजीगर's picture

19 Nov 2022 - 1:13 pm | बाजीगर

धन्यवाद श्वेता जी.

नेटवर पाहीले, सुंदर या शब्दासाठी समानार्थी शब्द
सुंदर = कलित, ललाम, मंजुल, रुचिर, चारु, रम्य, मनोहर, सुहावना, चित्ताकर्षक, रमणीक, कमनीय, उत्कृष्ट, उत्तम, सुरम्य।

श्वेता व्यास's picture

19 Nov 2022 - 3:58 pm | श्वेता व्यास

धन्यवाद :)

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2022 - 5:09 pm | चौथा कोनाडा

सुंदर गाणी,
सुंदर संकलन,
सुंदर लेखन !

पुर्ण लेख गाणी म्हणतच वाचला !

मेजवानी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !