दिवाळी अंक २०२२ - रव्या-खव्याची करंजी

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 9:18 am

6


दिवाळीतल्या फराळाचा बराच वेळखाऊ प्रकार करंजी! यामध्ये सुके-ओले खोबरे, रवा-पीठ, पंचखाद्य, पिठीसाखर असे अनेक सारण भरता येऊ शकते.

तर करू या रवा आणि खवा सारणाच्या करंज्या.

साहित्य

पारीसाठी

दीड वाटी मैदा

एक वाटी रवा

दूध

मोहनसाठी दोन मोठे चमचे तूप

चिमूटभर मीठ

करंजीसाठी सारण

एक वाटी खवा

एक वाटी रवा

एक वाटी गूळ

एक वाटी पिठीसाखर

सुकामेवा पूड

तळण्यासाठी तेल


1



कृती

करंजीसाठी वरील प्रमाणात मैदा व रवा एकत्र करावा. चिमूटभर मीठ टाकावे. तूप कडकडीत गरम करून मोहन म्हणून घालावे. कोमट दुधात मध्यम सैल पीठ मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे.

सारणासाठी एक वाटी रवा तुपात खमंग भाजावा. बाजूला एक फुलपात्र पाणी उकळावे, त्यात गूळ घालावा. नंतर त्यात रवा टाकावा. भरड भरड रवा होतो. ओलसर नको.

खवा लालसर भाजावा. ताटात काढून कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर टाकावी. एकत्र मिश्रण करावे.

रवा-गूळ आणि खवा-पिठीसाखर अशी वेगवेगळी सारणे एकत्र करावीत. सुकामेवा पूड टाकावी.

पारीसाठी लाट्या बनवण्यासाठी मळलेल्या पिठाची मोठी जाडसर पोळी लाटून त्यात तुपात फेसलेला मैदा यांचे मिश्रण सर्वत्र लावून घ्यावे. गोलाकार रोल करून लाट्या कापून घ्याव्यात.

एक एक लाटी लावून सारण भरून फिरकीने करंजीचा आकार द्यावा. गरम तेलामध्ये मंद आचेवर करंज्या तळून घ्याव्यात.


3



शुभ दीपावली!

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

5 Nov 2022 - 11:16 pm | सौंदाळा

मस्तच
खरं म्हणजे आता चकली, लाडू, चिवडा, शेव याचे तितकं अप्रूप राहिले नाही. हे पदार्थ कायम खाल्ले जातात.
आमच्याकडे करंजी मात्र फक्त दिवाळीतच केली जाते. त्यामुळे करंजी हा फराळातला खास आवडीचा पदार्थ.
रव्या खव्याची करंजी पहिल्यांदाच पाहिली आणि कृती आणि फोटो बघून ही नक्की आवडणार असे वाटतेय. खायचा योग कधी येतोय बघू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2022 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त दिसतेय करंजी. आवडली.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

6 Nov 2022 - 10:03 am | गणेशा

भारी..
आमच्या कडच्या पेक्षा खुप वेगळी पण छान वाटते.

पहिल्यांदा मला करंजी आवडत नसे, पण गेल्या तीन चार वर्षांपासून करंजी खुप्पच आवडते...

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Nov 2022 - 10:54 am | ॲबसेंट माइंडेड ...

मस्त. फोटोही छान.

एकदम टेम्प्टिंग झालीय करंजी

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 3:02 pm | कर्नलतपस्वी

तुमच्या पाककृती पारंपारिक व छान असतात. एकदा खायला यावयास हवे

Bhakti's picture

7 Nov 2022 - 3:14 pm | Bhakti

माझ्या सोमिवरच्या एकामागच्या एक पाककृती पाहून मैत्रिणी म्हणाल्या तू बोलावते का तुझ्याकडे धाड टाकू :)
वैज्ञानिक व्हायची हौस इकडे भागवते !

स्वधर्म's picture

7 Nov 2022 - 4:55 pm | स्वधर्म

नेमेचि दिवाळीत फक्त येणार्या नेहमीच्या पदार्थाल वेगळा ट्विस्ट देऊन केलेली खास पाककृती आवडली. खायचा योग केंव्हा ते मात्र बघावे लागेल. प्रत्येक पायरीचे फोटो टाकून मेहनत केलेली दिसते. धन्यवाद.

सरिता बांदेकर's picture

7 Nov 2022 - 9:57 pm | सरिता बांदेकर

मस्त रेसीपी.नक्की करणार.
लेक येणार आहे तीन वर्षांनी घरी. नवीन काय करायचं हा प्रश्न होता तो मिटला.
पण मला जमली पाहिजे तुझ्यासारखी .

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 10:49 pm | मुक्त विहारि

फोटो मस्तच आले आहेत

श्वेता व्यास's picture

8 Nov 2022 - 5:00 pm | श्वेता व्यास

क्या बात है, मस्तच झालेल्या दिसताहेत करंज्या. तोंपासू

सुक्या's picture

9 Nov 2022 - 5:42 am | सुक्या

तोंपासु.

श्वेता२४'s picture

9 Nov 2022 - 2:18 pm | श्वेता२४

उचलून तोंडात टाकावी वाटतेय.

गोरगावलेकर's picture

10 Nov 2022 - 12:34 pm | गोरगावलेकर

रेसिपि, फोटो दोन्ही आवडले. या प्रकारेही करून पाहीन पुढच्या दिवाळीला.

Bhakti's picture

10 Nov 2022 - 12:48 pm | Bhakti

सर्वांना खुप खुप धन्यवाद!

करंजी हा दिवळीच्या फराळातला अत्यंत आवडता प्रकार! पहिला फोटोच कसला कातिल आहे... आधिच्या संपल्यात, आता आईला अशा प्रकारे परत बनवायला सांगावे लागणार 😀