दिवाळी अंक २०२२ - पेडगावचे शहाणे

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 2:30 pm

मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून पेडगावची लढाई (चित्रलेख)





१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०

प्रतिक्रिया

उत्तम मांडणी. पण या लढाईत हंबीरराव मोहिते याचा संदर्भ काय आहे ? कदाचित ते असावेत, पण यासंदर्भात काही उल्लेख मिळालेत का ?
बाकी बहादुरखानाने हा किल्ला उभारुन त्याला आपले नाव दिले असे म्हणतात. विशेष म्हणजे या किल्ल्यात असलेली मंदीर तुलनेने सुस्थितीत दिसतात. मोघलांची कीर्ती बघीतली तर ती मंदीर भुईसपाट करुन मशीदी उभारणे हे प्रकार झालेले दिसत नाहीत.

दुर्ग विहारी म्हणतात, सरसेनापती हंबीरराव या मोहिमेत सहभागी झाले होते तो संदर्भ काही आहे का?
जर शिवाजी महाराज या मोहिमेत सहभागी झाले होते असे म्हटले जात नाही. अशा संदर्भात ही जोखमीची मोहिम सरसेनापती हंबीरराव राव यांच्या नेतृत्वाखाली करणे साहजिक आहे. शिवाय ह्या मोहिमेत घोडदळाची करामत महत्त्वाची आहे. ऐतिहासिक कागदावरील पुरावे तसे सुचवतात का हा विचार मागे पडतो.

कंजूस's picture

6 Nov 2022 - 7:27 pm | कंजूस

तसेच माहिती वाचली.
तुमच्या छंदाला भरपूर खाद्य मिळो.

अपेक्षित आहे.

तिमा's picture

8 Nov 2022 - 10:53 am | तिमा

लेख चांगला व माहितीपूर्ण आहेच. पण सांभाळा, हल्ली इतिहासावरुनच मारामार्‍या चाललेल्या आहेत. काही लोक, खास करुन, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ठेकेदार झाले आहेत. ते म्हणतील तोच इतिहास अशी परिस्थिती सध्या आहे.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 11:03 am | मुक्त विहारि

जबरदस्त

कर्नलतपस्वी's picture

8 Nov 2022 - 2:04 pm | कर्नलतपस्वी

माहितीपुर्ण लेख. वरील प्रतिसादाशी सहमत. हल्ली "हम करे सो कायदा", प्रमाणे " हम बोले सो इतीहास " असा पायंडा पडत चाललाय. अभ्यासक, इतिहासकार यांना अजीबात महत्त्व दिले जात नाही.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 12:39 am | शशिकांत ओक

लेखन करताना लक्षात ठेवून काम करा हा सल्ला भावला.

शशिकांत ओक's picture

10 Nov 2022 - 4:42 pm | शशिकांत ओक

या मोहिमेवर कशी चपखल बसते यावर प्रतिक्रिया येतील असे वाटले होते.
लढाई तशी लहान असली तरी त्याचा प्रभाव भावी घटनाचक्रात प्रतिबिंबित होतो असे वाटते.

सरिता बांदेकर's picture

10 Nov 2022 - 4:51 pm | सरिता बांदेकर

इतिहास वाचायला नेहमी आवडतो.
तुम्ही छान मांडणी केली आहे.
लिहीत रहा वेगवेगळ्या घटनांबद्दल.

शशिकांत ओक's picture

10 Nov 2022 - 6:35 pm | शशिकांत ओक

तुम्ही छान मांडणी केली आहे.
लिहीत रहा वेगवेगळ्या घटनांबद्दल.

सरिता बांदेकर आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
युद्धस्य कथा रम्य: म्हणतात ते उगीच नाही!
आपल्या व अन्य नवीन सदस्यांच्या माहितीसाठी -
शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण लढायांचे सादरीकरण करण्यास मिपावरील फोरम सदैव उदारपणे संधी देतो.
इथे आधी सादर केलेल्या धाग्यातून अनेक ईबुक ची निर्मिती झाली.
नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित बॅनर्स प्रदर्शन शिवाजी महाराज म्युझियम येथे मांडले आहे.
शक्य असेल तेव्हा जरूर पहायला जावे.

आधे इधर जाव आधे उधर जाव
बाकी मेरे पीछे आवो...

लढाई किंवा लूट कुणी केली यापेक्षा कशी झाली याकडे खरतर जास्त लक्ष द्यायला हवं पण लोकांना मूळ मुद्दाच कळत नाही बऱ्याचदा.
तुमच्या अरेखनांमुळे लढाई समजायला सोपी झाली आहे __/\__

त्याचे नियोजन कसे करावे आणि कामगिरी फत्ते झाली की तो माल राज्य कारभारात कसा वापरावा, शत्रूचे किती सैन्य मारले गेले, किती जखमी झाले? आपले काय नुकसान झाले याचा रिपोर्ट महाराजांच्या समोर कसा सादर करावा याची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्याला प्रस्तूती भावली वाचून आनंद झाला.

श्वेता व्यास's picture

14 Nov 2022 - 2:33 pm | श्वेता व्यास

सादरीकरण आवडले.
लढाई समजायला वर्णन, नकाशे आणि इतर चित्रांमुळे मदत झाली. धन्यवाद.

चित्रलेख (आणि लेखनाचा हा वेगळा प्रयोग) आवडला 👍

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2022 - 12:11 am | श्रीगुरुजी

उत्तम मांडणी व सादरीकरण. रंगीबेरंगी लेख खूप आवडला.

शशिकांत ओक's picture

15 Nov 2022 - 10:01 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
चित्र लेख हा टर्मिनेटर यांनी प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ही चित्रे वर्तमानपत्रातील रंगित पुरवणीत २ किंवा ३ दररोज सादर करता येतील का? आपले काय मत आहे? शक्य असेल तर कोणाला संपर्क साधावा? मार्गदर्शन केलेत तर बरे.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2022 - 3:56 pm | टर्मीनेटर

मध्यंतरी मिपा सदस्या 'नागनिका' ह्यांची हंपी विषयक सचित्र लेख मालिका वर्तमानपत्रातील रंगित पुरवणीत प्रकाशित झाली होती. त्यांना व्य.नि. केल्यास मार्गदर्शन मिळु शकेल!

शशिकांत ओक's picture

18 Nov 2022 - 12:40 am | शशिकांत ओक

पाहू त्यांचा काय सल्ला मिळतोय.

चांदणे संदीप's picture

18 Nov 2022 - 10:20 am | चांदणे संदीप

नकाशे आणि स्लाईड्स स्वरूपातल्या मांडणीमुळे समजायला सहज सोपे झाले आहे. माझ्या मुलीलाही आवडले. शोलेतल्या जेलरचा संदर्भही चपखल.
इतिहासातल्या लढाया/कारवाया यातले मायक्रो मॅनेजमेंट हा ढोबळमानाने दुर्लक्षित लेखनप्रकार आहे असे मला वाटते. आपण त्यावर सातत्याने लिहीत आहात हे कौतुकास्पद. धन्यवाद.

सं - दी - प

शशिकांत ओक's picture

18 Nov 2022 - 4:51 pm | शशिकांत ओक

नमस्कार, आपल्या मुलीला हे प्रेझेंटेशन आवडल्याचे आवर्जून लिहिल्या बद्दल विशेष धन्यवाद.
तिला आणि इथल्या मिपावरील सदस्यांना व त्यांच्या शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वाचायला सोईचे होईल असे ईबुक माध्यमातून अल्प किमतीत लढायांची प्रेझेंटेशन्स उपलब्ध आहेत.
मिपावर ती जाहिरात वाटेल म्हणून कदाचित ती लिंक इथे देणे मान्य होणार नाही.
9881901049 यावर व्हॉट्सअ‍ॅप करून ती लिंक मला देता येईल.

ओकसाहेब माहीती महीतीपूर्ण आहे, चित्रे सुध्दा पूरक आहेत पण जी मांडणी केली आहे ती अगदी शिकाऊ वर्ड, पॉवरपॉइंट शिकलेल्या माणसाने केल्याप्रमाणे आहे. ती फारच भडक, उथळ आणि चीप वाटते आहे. इतके सारे फॉन्ट्स, तेही वेगवेगळ्या मोठ्या साईजचे, त्यात त्याला इफेक्ट्स, अअगदी डोळ्यांना खुपणारे काम आहे. राग मानू नका पण इतक्या सुंदर माहीतीला असे चीप प्रेझेंट करु नका. एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा डीटीपी ऑपरेटरला तुमचे इनपुटस द्या. त्या डिझाईनमध्ये तुमचे डोके चालवू नका कारण ते तुमचे काम नाही. तो जे देईल त्यात मजकूर वगैरे फक्त सुधारणा करुन पब्लिश करा अन्यथा प्रिंट करा. ते अधिक चांगले दिसेल, लोक आनंदाने विकतही घेतील.
अधिक उणे शब्दाबद्दल आणि सल्ल्याबद्दल आगाऊ माफी पण कदाचित हे डिझ्झाईन, मांडणी तुम्ही उत्साहाने स्वतः शिकून करत असताल किंवा नवशिक्याकडून करुन घेत असताल कामे पण मार्केटमध्ये विषयापेक्षा प्रेझेंटॅशनला जास्त महत्त्व असते तेंव्हा अशा भडक डिझाईनमुळे चांगला विषयही चीप होऊन मागे पडू नये इतकीच इच्छा.

राग मानू नका पण इतक्या सुंदर माहीतीला असे चीप प्रेझेंट करु नका. एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा डीटीपी ऑपरेटरला तुमचे इनपुटस द्या. त्या डिझाईनमध्ये तुमचे डोके चालवू नका कारण ते तुमचे काम नाही. तो जे देईल त्यात मजकूर वगैरे फक्त सुधारणा करुन पब्लिश करा अन्यथा प्रिंट करा. ते अधिक चांगले दिसेल, लोक आनंदाने विकतही घेतील.

राग मुळीच वाटत नाही.
मला असे कोणी प्रवीण कलाकार मिळत नाहीत. मला चित्रकार हवे आहेत. पैसे द्यायला तयार आहे तरीही कोणी मिळत नाहीत. तोंड देखले हो हो म्हणतात. लोक मिळे पर्यंत मला थांबून राहता येणार नाही. जमेल तसे, भावेल तसे करण्याची मला गरज आहे.
आपल्याला रंगीबेरंगी व भडक, बदलते फॉंट वाटले तरी त्या मागे माझ्या संकल्पना आहेत. स्लाईड्सचा मजकूर कमी जास्त भरताना जागेचा विचार करून लिहिले जाते. असो.
आपण कोणाचे नाव सुचवलेत तर आवडेल.

चित्रगुप्त's picture

19 Nov 2022 - 2:31 am | चित्रगुप्त

@ शशिकांत ओकः सुरिया यांनी जे सांगितले आहे, त्याचेशी मी पण सहमत आहे. कधीकाळी मी या प्रकारचे काम करत असे पण आता ते सॉफ्ट्वेयर वगैरे माझेकडे नाही, आणि आता बरीच वर्षे झाल्याने ते विसरलोही आहे. मी पुण्यात असतो तर तुमचेसोबत प्रत्यक्ष बसून प्रयत्न केला असता परंतु सतत प्रवासी असल्याने ते शक्य नाही. वाटल्यास नमुन्यादाखल थोडे काही करून बघू शकतो.
बाकी हे स्लाईड- शो साठी असल्याने प्रत्यक्षात प्रोजेक्शन केल्यावर कसे दिसते तेही बघणे आवश्यक आहे. सध्या दोन ओळींमधील जागा थोडी वाढवून बघावी, त्याने वाचणे सोपे पडेल, त्यासाठी वाटल्यास मजकूरात थोडीशी काटछाट करून आटोपशीर केला तरी चालेल. असो. उगाच इथे परदेशात उंटावर बसून शेळ्या हाकणे योग्य नव्हे. तुम्ही महत्वाचे काम कसोशीने करत आहात ही फार मोठी गोष्ट आहे.

सध्या दोन ओळींमधील जागा थोडी वाढवून बघावी, त्याने वाचणे सोपे पडेल, त्यासाठी वाटल्यास मजकूरात थोडीशी काटछाट करून आटोपशीर केला तरी चालेल.

मदतीचा हात मिळाला तर आवडेल.

चित्रगुप्त's picture

20 Nov 2022 - 4:17 am | चित्रगुप्त

मदतीचा हात मिळाला तर आवडेल.

नक्कीच करु शकतो. कसे करायचे कळवावे.
हे करून बघावे: जागा मोजकीच असल्याने एकतर प्रत्येक पाटीतला मजकूर थोडा कमी करणे किंवा फॉन्ट साईज जरा छोटा करणे यापैकी एक करून ओळींमधील स्पेस थोडी वाढवता येईल. तुम्ही स्लाईड शो करता तेंव्हा किती दुरून लोक बघतात आणि जमाव किती मोठा असतो ते विचारात घेऊन त्याप्रमाणे करावे. प्रोजेक्ट केल्यावर लांबूनही वाचता आले पाहिजे.

वरील दोष घालवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. सादरीकरण करायच्या आधी ते घरच्यांना दाखवून काय वाटते याचा शोध घेतो. सगळे छान आहे म्हणून म्हणतात. मग अशा गोष्टी झाकल्या जातात.

प्रचेतस's picture

19 Nov 2022 - 6:11 am | प्रचेतस

लेख एकदम मस्त झालाय काका. भीमेचं पात्र शिवकाळात लहान असावं त्यामुळे ते पार करणे तुलनेने सोपं असावं. उजनी धरणानंतर फुगवटा मागच्या बाजूने वाढल्याने सध्या भीमेचं पात्र पेडगावला मोठं दिसतं.

शशिकांत ओक's picture

20 Nov 2022 - 4:12 pm | शशिकांत ओक

आपल्या सारख्या शोधक वृत्तीच्या विचारकाची दाद आवडली.

गोरगावलेकर's picture

21 Nov 2022 - 12:15 pm | गोरगावलेकर

आपल्या लेखामुळे त्याकाळी महारांजानी लढाईआधी केलेले विचार काय असतील आणि प्रत्यक्षात झालेली लढाई दोन्ही गोष्टी समजून घेण्यास अतिशय सोप्या गेल्या.

या आशयाच्या आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.