दिवाळी अंक २०२२ - दोन दिलाचं एक पान

Primary tabs

अशोक चौधरी's picture
अशोक चौधरी in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 11:00 pm

दोन दिलाचं एक पान

काळेभोर रेशमी बाल
खळीचे तुझे गोरे गाल
दिल कलिजा होतो खलास
पाहून तुझी गव्हाळ काया

बोल तुझे मंजूळ गाणी
तू नसतानाही येतात कानी
भेटावे तू गं येते मनी
व्हावे तू गं माझीच राणी

भेटल्यावर बोलत नाही
अशी माझी अबोल वाणी
अंगकाठी तुझी अशी शेलाटी
गालावरती तुझ्या शोभते कल्प केसांची ती वेलांटी

तारुण्याचं तू हिरवं झाड
हातात चुडे हिरवेगार
दंतपंक्ती तव बलाकमाला
खुदकन हसली दिलात बसली

तूच मदिरा तूच सुगंधी पानवारा
तूच कोसळणाऱ्या शुभ्र धारा
कधी भेटशील या फकिरा
तिष्ठत उभा मी तुझ्याच दारा

एक होऊ, छान राहू
होऊन दोन दिलाचं एक पान
होऊ लैला-मजनूचं एक गाणं
धडधडणार्‍या प्रेमाचं एकच काळीज छान

श्री चौधरी अशोक जी.
कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरे तर्फे
नारायणगाव ता जुन्नर पुणे

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

5 Nov 2022 - 6:43 pm | कर्नलतपस्वी

तूच मदिरा तूच सुगंधी पानवारा
मस्त
कधी भेटशील या फकिरा
तिष्ठत उभा मी तुझ्याच दारा

आपली मनोकामना लवकरच पुर्ण होओ ह्याच दीपावलीच्या शुभेच्छा.

रंगीला रतन's picture

10 Nov 2022 - 3:05 pm | रंगीला रतन

मस्तच!!!