अमरनाथ यात्रा सम्पन झाली.

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
21 Aug 2022 - 10:35 pm

https://www.misalpav.com/node/50542/backlinks
https://www.misalpav.com/node/50577/backlinks
https://www.misalpav.com/node/50580/backlinks

mipa

mipa

mipa

mipa

mipa

संगम ते अमरनाथ तीन किलोमीटर अंतर पण लांबूनच उंचावरील पवित्र गुफा दिसत होती. साधारण एखाद किलोमीटर हिमखंडातून गेल्यावर अमरावतीचा कलकलाट ऐकू येवू लागला. ती सुद्धा भावीकां प्रमाणे देवाधिदेव महादेवाचे दर्शन घेऊन उड्या मारत जात होती. जणू महादेवाच्या जटेतील गंगाच. हिला अमरगंगा सुद्धा संबोधतात. टप्प्या टप्प्यावर छोटे छोटे धबधबे,भाविक स्नान करताना शिवस्तुती, रूद्र,व भोलेबाबा का जयकारा करताना दिसत होते.

कैलासराणा शिव चंद्रमौळी |
फणींद्र माथा मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू भवदु:खहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी || १||
" ,

लहानपणी आईच्या तोंडून ऐकलेले व अजूनही लक्षात असलेले स्तोत्र म्हणत आम्हीपण अशाच एका धबधब्यावर आंघोळ केली व गुफे मधे दर्शनास दाखल झालो.गुफेमधे मोठे पांढरे शुभ्र शिवलिंग व त्याच्या शेजारीच सात आठ फुटाचा चांदीचा त्रिशूल रोवलेला होता त्यावरून शिवलिंगाची उंची लक्षात येत होती.थंडगार गुफेमधे अनवाणी पायाने परिणामी घोट्या पर्यंतचे पाय बधिर झाले.त्यावेळेस भाविक थेट बाबा बर्फानीच्या जवळ जाऊ शकत होते. जवळच माता पार्वती,गणेश यांचे हिमस्वरूप म्हणून पुजारी दाखवत होते.भक्त आणी इष्टदेवा मधे कुठलीही मध्यस्थी,रांग, सुरक्षारक्षक,स्टिलचे रेलींग, अभिषेक,धुप,उदबत्ती, बेल,हार फूले सारखे काहीच नव्हते. नावच भोला शंकर "दोन हस्त आणी एक मस्तक",यापेक्षा काही नकोच म्हणून तर बाबा भक्तास अशिर्वाद देत युगात युगे इथे रहात आहेत.

सर लाॅरेन्स यांच्या The Vally of Kashmir या पुस्तकात गुफेचे वर्णन असे केले आहे,
"In connexion with glaciation the sacred cave of Amar Nath is described, This cave, which is situated at an elevation of some 16,000 feet, is a large hemispherical hollow in the side of a cliff of white mesozoic dolomite. At the back of the cave there issue from the rock several frozen springs, the ice from which juts forth in spirals which subsequently reunite and form a solid dome-shaped mass of ice at the foot of the back wall of the cave: the size of this mass of ice, which is esteemed sacred by the Hindús, varies according to the season."

मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर त्या आवाढव्य गुहेचे निरीक्षण सुरू केले. पाढंरे पती पत्नी पक्षी कुठे दिसले नाही पण तीनशे चौरस मीटर पेक्षा मोठी भव्य दिव्य नैसर्गिक गुफा कुठल्याच आधारा शीवाय बघून मात्र अपसुकच तोंडात बोट गेले. आजकाल गुफेमधे मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. गुफेत फक्त पुजार्‍याला जाण्याची परवानगी आहे. हिमलिंगाचे फोटो काढू शकत नाही.

दोन वाजून गेले होते,पोटात कावळ्यांनी ओरडायला सुरवात केली होती.तीन किलोमीटर पायी चालल्यानंतरच जेवायला मिळणार होते. संगमावर,लंगर शिवाय कुठलाच पर्याय नव्हता. मस्तपैकी जेवण केले. पुडी,कचोडी, हलवा वर चहा सु.थोडावेळ आराम केला व परतीच्या मार्गाला लागलो. चार नंतर सर्वच यात्री परत निघणार,खच्चरवाले आणी खच्चर घरच्या ओढीने घाई म्हणून जरा लवकरच निघालो. रस्ता माहीत होता. सगळा उतार,गुडघ्याच्या वाट्या संभाळ्त आम्हीपण दुडकी चाल पकडली. इथे लवकरच अंधारून येते, हिमखंडावरून थंडगार वारे आणखीनच " मौसम खराब करतात".वाटेत थांबायची सोय नाही. एका मागोमाग एक एक भाविक क्राॅस करत आमची गाडी उताराला लागली. संध्याकाळी "सातच्या आत घरात", पुन्हा एकदा बालटाल बेस कॅम्प मधे जेवायला लाइनीत उभे राहीलो.

थोडे अवांतर, कशमीर खोर्‍यातील स्वर्गीय सौंदर्य पाहून बादशहा जहांगीरच्या तोंडातून अनायास फारसी भाषेतील उद्गार बाहेर पडले "गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त; हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त", जमीनीवर कुठे स्वर्ग आहे?तर तो इथेच आहे!

खरोखरच कशमीर खोर्‍यातील सौंदर्य नवरसांनी परिपूर्ण आहे. मोगलानी शालीमार्,निशात्,हर्वन्, चार चिनार,चश्माशाही अशा आनेक सुन्दर बागा निर्माण केल्या. दल्,वूलर तलाव त्यातील तरन्ग्णार्या बागा, शिकारे , गरम पाण्याचे झरे ,पाढंरी शुभ्र हिमशिखरे (Silver crest of Himalayas) डोळ्यांना सुखावतात तर खोल खोल दरीत डोकावताना निसर्ग आपले रौद्र रूप दाखवतो.हिमखंडातून जन्म घेणाऱी छोटी धार पुढे "नद", बनते तेव्हा तीचे रूप पाहून उरात धडकी भरते.

सर लाॅरेन्स यांच्या The Vally of Kashmir या पुस्तकात काश्मीर खोर्याचा सर्वान्गीण आढावा घेतला आहे.

The mountains which surround Kashmir are never monotonous. Infinitely varied in form and colour, they are such as an artist might picture in his dreams. Looking to the north one sees a veritable sea of mountains, broken into white crested waves, hastening in wild confusion to the great promontory of Nanga Parbat (26,620 feet). To the east stands Haramukh (16,903 feet), the grim mountain which guards the valley of the Sind. On it the legend says the snow only ceases to fall for one week in July, and men believe that the gleam from the vein of green emerald in the summit of the mountain renders all poisonous snakes harmless.

अशीच एक नदी चिनाब,चिनाब खोर्‍यातील मोठ्ठ्या लाकडी ओंडक्यांना दर्भाच्या काडी प्रमाणे वाहून नेते. तेव्हा पुष्पा चीत्रपटाची अठवण या पिढीतील तरूणाई ला नक्कीच येईल. चाळीस वर्षाचा दिर्घ कालावधी उलटून गेल्यामुळे जास्त विवरण लक्षात नाही. घेतलेली छायाचित्रे काळाच्या ओघात नष्ट झाली. त्यावेळेस क्लिक ३ हाच कॅमेरा उपलब्ध होता. त्यात रोल टाकून छायाचित्र काढली होती. एका रोल मधे बारा छायाचित्र काढता यायची. यात्रा संपली परत युनिट मधे आलो दोन महिन्यानंतर सुट्टीवर गेलो तेंव्हा पुण्यात त्याच्यावर पुढील सोपस्कार झाले.श्वेत श्याम छायाचित्रे बरेच दिवस सांभाळली पण अस्पष्ट होत नष्ट झाली.

भगवंताने दिलेल्या हार्ड डिस्क मधे जेवढे सापडले, अतंरजालावर बघितल्यावर काही स्मृती जाग्या झाल्या त्या प्रमाणे जमले तसे मांडले.

यात्रा "ONCE UPON A TIME"ची आहे.

११-८-२०२२

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Aug 2022 - 7:04 am | प्रचेतस

खूपच सुरेख. ही भटकंती अतिशय आवडली.

हेच म्हणतो, मस्त झाली अमरनाथ यात्रा

Trump's picture

22 Aug 2022 - 11:18 am | Trump

धन्यवाद.

भगवंताने दिलेल्या हार्ड डिस्क मधे जेवढे सापडले, अतंरजालावर बघितल्यावर काही स्मृती जाग्या झाल्या त्या प्रमाणे जमले तसे मांडले.

तुम्ही डकवलेले फोटो कोणत्या साली घेतले आहेत? कृपया ते पण लिहा.
जर ते जुने फोटो असतील तर जुन्या काळात अमरनाथ कसे होते त्याची कल्पना येईल.

कर्नलतपस्वी's picture

22 Aug 2022 - 11:33 am | कर्नलतपस्वी

@प्रचेतस सर,सौंदाळा ट्रम्प प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

@ट्रम्प,
मी १९८० साली यात्रा केली तेव्हाचे फोटो नाहीत. जे फोटो डकवला आहेत ते याच वर्षांत गेलेल्या यात्रेकरूने पाठवले आहे. काही अंतरजालावरून घेतले आहेत.

तुलनात्मक दृष्ट्या यात्रा सुकर झाली असली तरी कठीण आहे कारण तीव्र चढउतार, नैसर्गिक अपत्ये व प्राणवायूची कमतरता. दुसरे असे की दररोजच्या जीवनात इतके कठीण परिश्रमाची सवय नसल्यास अधिक कठीण वाटते.

कर्नलतपस्वी's picture

22 Aug 2022 - 1:32 pm | कर्नलतपस्वी

नैसर्गिक अपत्ये - नैसर्गिक आपत्ती

डकवला-डकवले

मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे नैसर्गिक आपत्ती ढगफुटी,रस्ते अवरूद्ध होणे, वाढल्या आहेत असे वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Aug 2022 - 12:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला आवडली,
पैजारबुवा,

यश राज's picture

22 Aug 2022 - 2:01 pm | यश राज

सुंदर लेखमाला आवडली.

श्वेता व्यास's picture

22 Aug 2022 - 2:11 pm | श्वेता व्यास

छान भटकंती :)

शाम भागवत's picture

22 Aug 2022 - 3:11 pm | शाम भागवत

छानच मालिका.
_/\_

कर्नलतपस्वी's picture

23 Aug 2022 - 6:46 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचकांचे मनापासून आभार.

ही भटकंती लिहिण्यामागे मुख्य उद्देश,
यात्रा कठीण असून उच्चस्तरीय शारीरिक व मानसिक क्षमता हवी.

याचवर्षी काही चाळीशी पन्नाशीचे यात्रेकरू मोठ्या उत्साहात गेले पण यात्रा पुर्ण करू शकले नाही. एक यात्रेकरूची तर मृत्यू झाल्याचे कळाले तर एक बेड रिडन. जवळचे नातेवाईक मित्र यात्रा करणार असतील तर त्यांना सर्व कल्पना द्यावी.

हवाई मार्ग सर्वाधिक व्यस्त असल्याने अगावू तिकीट मिळाले तरी खराब वातावरणामुळे यात्रा होईलच याची शाश्वती नसते.

मदनबाण's picture

28 Aug 2022 - 6:48 pm | मदनबाण

सर्व भाग सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

गोरगावलेकर's picture

2 Sep 2022 - 12:32 pm | गोरगावलेकर

या आधीचा व हा असे दोन्ही भाग सलग वाचून काढले . मस्त भटकंती.