मामा भानझे डोंगर,ठाणे .पावसाळी भटकंती २०२२_०८_१८

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
21 Aug 2022 - 12:40 pm

सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्याचा वावर आहे.
बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ वावरतो. दुपारी जाऊ शकतो. ज्या मामाभानजे डोंगर भागात जाणार आहे तिथे दरगाह असल्याने माणसांचा दिवसा खूप वावर,येजा असते. तसा धोका नाही.

करोना प्रतिबंध कमी होऊन वावर हल्लीच सैल झाल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने इकडे १८ ओगस्टला गेलो होतो.

मी गेलेलो मार्ग दिला आहे पण इतर कार,विमान, साधनांचाही उपयोग करू शकता.
मुंबई एरपोर्टहून taxiने लोकमान्यनगर किंवा वागळे आगार दर्गा एंट्री ला जाऊ शकता.
स्वत:च्या वाहनाने लोकमान्यनगर कडेच जावे, तिथे पार्किंग आहे. परतताना चहाटपरीपासून खाली येताना डावीकडची वाट पकडल्यास पार्किंगला जाईल, उजवीकडची पकडल्यास हनुमाननगर वागळे एअरिआत जाल. ठाणे स्टेशनकडून बसने कोणतीही वाट चालेल.

मामाभानजे डोंगराची उंची लोकमान्य नगरपासून(ठाणे)तळापासून साधारण ३६० मिटर्स आहे. म्हणजे फार उंचावर नाही. वाट अडीच किमी दगडी पायऱ्यांची चांगली आहे. वागळे आगार- हनुमाननगर मार्गाची वाट पहिल्या वाटेला चहानाश्ता टपरीपाशी अर्ध्यावर मिळते. फरक म्हणजे पहिल्या वाटेने तीन झरे आहेत.

फोटो १
Thane West to Lokmanya Nagar,6.3 km, bus route 23

फोटो २
Lokmanya Nagar to Mama Bhanje hills walk.2.4 km

फोटो ३
Mama Bhanje hills to Wagale Depot walk.2.4 km

फोटो ४
Wagale Depot to Thane stn. West , 5.6 km,bus route no. 6

मामा भानजे ट्रेकचे विडिओ
विडिओ ४ https://youtu.be/pY3fDOxfoaA
विडिओ ३ https://youtu.be/lvPCCtcqyZg
विडिओ २ https://youtu.be/9o8qJ7gB8mI

फोटो स्लाईड शो.
विडिओ १ https://youtu.be/hvRjowP-eiI
___________________

प्रतिक्रिया

मस्त भटकंती, फोटोही छान आलेत.
तुम्ही मॅपसकट जायच्या यायच्या मार्गांचा व्यवस्थित तपशील देता ते फार आवडते.

धर्मराजमुटके's picture

21 Aug 2022 - 6:16 pm | धर्मराजमुटके

मी गेलेलो मार्ग दिला आहे पण इतर कार,विमान, साधनांचाही उपयोग करू शकता.

ही माहिती बहुधा खास जेम्स वांड साहेबांसाठी खास दिलेली दिसते. त्या धाग्यावरील चर्चेच्या अनुषंगाने. ते एक असोच.
लोकमान्य नगर ला ठाण्यापेक्षा मुलूंड वरुन चांगली बस सेवा आहे. एकदा अनुभव घ्यावा.

होय. त्यांनी चांगली आठवण करून दिली. पर्यटनाच्या जागेला पोहोचण्याचे निरनिराळे मार्ग द्यायला हवेत. खूप दुरून येणाऱ्यांना आयोजन करायला सोपे जाते. मी सार्वजनिक वाहनाने जातो पण स्वत:च्या वाहनाने येणाऱ्यांना पार्किंग ची माहिती हवी असते. ती दिली.

हे विडिओ यूट्यूबवरच्या माहितीतून सुचले.

खटपट्या's picture

10 Sep 2022 - 5:33 am | खटपट्या

बालपण आठवले,
माझे बालपण याच डोन्गरच्या पायथ्याशी असलेल्या वागळे इस्टेट मधे गेले. मामा भांजा डोन्गरावर अनेकदा जाउन आलो आहे,
तुम्ही जर शिवमंदीराला भेट दिली असती तरी खुप अल्हाददायक वाटले असते.
लहान असताना धाडस म्हणून पाच जणांनी, वागळे इस्टेट इथुन निघुन शिवमंदीर वरुन वर जाउन तो डोंगर पालथा घालुन पलिकडच्या तुळशी तलावापर्यंत गेलो, तिकडून पुढे कान्हेरी (?) गुंफा करुन आम्ही बोरिवलि नैशनल पर्कातुन बाहेर पडून बेस्ट बस ने परत घरी आलो.

त्यावेळी मामा भांजा दर्गा चे बांधकाम एवढे झाले नव्हते.

कंजूस's picture

10 Sep 2022 - 6:54 am | कंजूस

तुम्ही जर शिवमंदीराला भेट दिली असती तरी खुप अल्हाददायक वाटले असते.

कुठे आहे? शोधतो नकाशात.

अशी बांधकामे हळूहळूच वाढतात ....