ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
22 Jun 2022 - 4:20 pm
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.

एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे.

तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे.

शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत.

शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

24 Jun 2022 - 1:11 pm | वामन देशमुख

ठाकरे-शिंदेंचे जे होईल ते होईल, पण उठांना पक्षप्रमुख केल्यापासून ते आजपर्यंत शिवसेनेची होत असलेली अधोगती काही थांबत नाहीय.

---

माझ्या परिचयात असलेल्या शिवसैनिकांबद्धल मला खरंच हळहळ वाटते.

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2022 - 9:25 pm | श्रीगुरुजी

माझ्या परिचयात असलेल्या शिवसैनिकांबद्धल मला खरंच हळहळ वाटते.

स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल मला यत्किंचितही हळहळ वाटत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 11:23 pm | अमरेंद्र बाहुबली

स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल मला यत्किंचितही हळहळ वाटत नाही. मग तुम्हाला भाजप समर्थकांबद्दल हळहळ वाटत नसावी. :)

२००२ च्या गुजरात दंगलींमध्ये अहमदाबादमधील गुलबाग सोसायटीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांना ठार मारण्यात आले होते. त्या आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींविरोधात खूप आरोप झाले होते. प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात पोचले आणि न्यायालयाने या प्रकरणांची चौकशी करायला एस.आय.टी ची स्थापना केली. त्या एस.आय.टी ने नरेंद्र मोदींची दोन-तीन वेळा १०-१२ तास सलग चौकशी केली होती. चौकशी झाल्यावर एस.आय.टी ने नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिली होती. ही गोष्ट २०१३ मधील. त्यानंतर एहसान जाफरींची पत्नी झाकिया जाफरीने त्या क्लीन चीटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/sc-dismisses-plea-filed-by-zak...

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 6:46 pm | सुबोध खरे

सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाड सारख्या वातानुकूलित खोलीत बसणाऱ्या आराम खुर्चीतील विचारजंतांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

In a snub to petitioners like Teesta Setalvad, who had fought the case on the behalf of Ms. Jafri for decades, the court said the “protagonists of quest for justice sitting in a comfortable environment in their air-conditioned office may succeed in connecting failures of the State administration at different levels during such horrendous situation, little knowing or even referring to the ground realities and the continual effort put in by the duty holders in controlling the spontaneous evolving situation unfolding aftermath mass violence across the State”.

https://www.thehindu.com/news/national/other-states/supreme-court-dismis...

https://www.business-standard.com/article/current-affairs/larger-conspir...

प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर बेलाशक खोटे आरोप करणे आणि कोणताही पुरावा नसताना श्री मोदींवर आरोप करणे हे अश्लाघ्य आहे असे स्पष्ट मत तीन न्यायाधीशांच्या पीठाने मांडले आहे.

या हलकट फुरोगाम्यांवर खरं तर अब्रुनुकसानीचा खटला भरून त्यांना सर्वोच्च न्यायालयात नाकदुऱ्या काढायला लावल्या पाहिजेत.

एकदा निवडून आल्यावर या पक्षांनी, आमदारांनी काय करायचं, यावर मतदारांचे काहीच नियंत्रण नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपाला सोडून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करू शकली व आज शिंदे वगैरे आमदार दुसरीकडे जाऊन भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार अल्पमतात आणू पहात आहेत. यात मतदारांना काय वाटेल, याचा कोणीच विचार करत नाहीए. अशा वेळी आण्णा हजारे यांनी केलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणीची आठवण होते. भाजपने त्यांना कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी वापरून बाजूला केले असले, तरी त्यांनी केलेल्या मागणीनुसार काही बदल झाला असता तर या सगळ्या सत्तापिपासूंना वचक बसला असता.

एकदा निवडून आल्यावर या पक्षांनी, आमदारांनी काय करायचं, यावर मतदारांचे काहीच नियंत्रण नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपाला सोडून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करू शकली व आज शिंदे वगैरे आमदार दुसरीकडे जाऊन भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार अल्पमतात आणू पहात आहेत. यात मतदारांना काय वाटेल, याचा कोणीच विचार करत नाहीए. अशा वेळी आण्णा हजारे यांनी केलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार या मागणीची आठवण होते. भाजपने त्यांना कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी वापरून बाजूला केले असले, तरी त्यांनी केलेल्या मागणीनुसार काही बदल झाला असता तर या सगळ्या सत्तापिपासूंना वचक बसला असता.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jun 2022 - 6:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्या ४५ आमदारांना उद्धव ह्यांची भूमिका का मान्य नाही ह्यावर कोणी चर्चा का करत नाही?
त्या आमदारांमध्ये काही कॅबिनेट मंत्रीपण आहेत. अशावेळी काँग्रेस्/राष्ट्रवादीशी युती नको असा पवित्रा एवढे आमदार का घेतात? हे सगळे आमदार सत्तापिपासू?ह्या सगळ्यांना ई.डी.ने नोटिसा पाठवल्या होत्या का?स्वच्छ नजरेने पाहाल तर उद्धव ह्यांचे नेत्रुत्व पक्ष व सरकार चालवण्यात कमी पडले हे मान्य करावे लागते. संजय शिरसाट ह्या सेना आमदाराचा व्हिडियो पहा. किती प्रकल्प्/फायली रखडल्या आहेत ह्यावर ते बोलतात. दीपक केसरकर ह्यांचीही मुलाखत पहा. हे आमदार परवा रात्री पर्यण्त उद्धव ह्यांचे मन वळवू पाहत होते पण ते झाले नाही मग केसरकर गुवाहाटीला गेले.
लोकशाही मान्य करायची तर बहुसंख्य आमदार जी व्यथा मांडत आहेत , ती ऐकावी लागेल ना? नसेल तर पायउतार व्हावे लागेल.

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 6:50 pm | सुबोध खरे

स्वच्छ नजरेने पाहाल

माई

एकदा हिरवा चष्मा लावला कि सर्व भगव्या गोष्टी काळ्याच दिसतात हा चित्रकलेचा मूलभूत नियम आहे.

तुम्हाला माहिती नाही का?

मग जोवर चष्मा काढत नाही तोवर स्वच्छ कसं दिसेल?

केवळ १०६ लोकांना घरी बसवलं एव्हढ्याच तुणतुण्या वर खूष होणारे मिपाकर यापलीकडे जायलाच तयार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2022 - 6:49 pm | श्रीगुरुजी

ठाकरे सरकार पडले किंवा टिकले तरी शिवसेना नुकसानीतच राहणार, तर भाजप फायद्यात राहणार हे नक्की. पुढील निवडणुकीत शिवसेना अत्यंत दुर्बल स्थितीत असणार. स्वबळावर लढले तर १० सुद्धा आमदार निवडून येणार नाहीत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर युती केली तर जागावाटपात फार तर ८० जागा मिळतील. दरम्यानच्या काळात मुंबई ठाणेसहीत सर्व महापालिका हातातून गेल्या असतील.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर युती केली तर जागावाटपात फार तर ८० जागा मिळतील.

शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक लढली तर १० सुद्धा आमदार निवडून येणार नाहीत हे सत्य ठाकरें शिवाय सर्वांच ज्ञात आहे. त्यामुळे शिवसेने बरोबर युतीला कॉं व रावा तयार हौतील का हा प्रश्न आहे.

शिवसेना संपल्यातच जमा आहे !!

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 11:25 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक लढली तर १० सुद्धा आमदार निवडून येणार नाहीत ख्या ख्या ख्या. २०१४ मध्ये तथाकथीत मोदी लाटेतही सेनेने ६३ जागा स्वबळावर निवडूण आणल्या होत्या. ही धास्ती खाऊनच २०१९ ला अमीत शहा युती करा म्हणून मातोश्रीवर विनवन्या करायला आले होते. मिपावर भावनेच्या भरात लोक काहीही लिहीत असतात.

धनावडे's picture

25 Jun 2022 - 7:21 am | धनावडे

त्यावेळी चैरंगी लढत होती, यावेळी जर भाजप, शिवसेना आणि कॉग्रेस+ राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली तर मग सेना आणि भाजप च अवघड आहे. आणि ते तुम्हाला समजणे त्याहून अवघड आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 7:46 am | अमरेंद्र बाहुबली

भाजप नाही पण सेना आहे तेवढ्या जागा टिकवू शकते. अनेक मतदारसंघात सेनेला पर्याय नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 7:58 am | श्रीगुरुजी

चौरंगी लढत होतीच, पण महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे भाजपचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याने जेथे जेथे भाजपचे मतदार कमी होते तेथे तेथे भाजपने छुप्या पद्धतीने सेना आमदारांकडे मते वळवून सेना आमदार निवडून यायला मदत केली होती. अन्यथा सेनेला ६३ ऐवजी फार तर ३० जागा मिळाल्या असत्या. आपल्याला. बहुमताचा आकडा गाठता येईल का याविषयी २०१४ मध्ये भाजपला खातरी नव्हती. अशा परिस्थितीत निकालानंतर सेनेची मदत घेता येईल या हेतूने भाजपने आपल्याबरोबरीने सेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणले. त्यामुळेच मोदींनी प्रचारात सेनेवर टीका करणे टाळले होते.

परंतु ६३ जागा आपल्याच कर्तृत्वाने जिंकल्या या भ्रमात सर्व सेना नेते अजूनही आहेत आणि मूर्ख सेना समर्थक त्याच भ्रमात आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 9:31 am | अमरेंद्र बाहुबली

खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला दीद दियावी लागेल.
जेथे जेथे भाजपचे मतदार कमी होते तेथे तेथे भाजपने छुप्या पद्धतीने सेना आमदारांकडे मते वळवून सेना आमदार निवडून यायला मदत केली होती. कैच्याकै.
हा दावा सेनापण करू शकते. जेथे जेथे सेनेचे मतदार कमी होते तेथे तेथे सेनेने छुप्या पद्धतीने भाजप आमदारांकडे मते वळवून भाजप आमदार निवडून यायला मदत केली होती.

अन्यथा सेनेला ६३ ऐवजी फार तर ३० जागा मिळाल्या असत्या. आपल्याला ख्या ख्या ख्या. भाजपला १२२ एवजी २२ मिळाल्या असत्या. कैच्याकै लाॅजीक.

परंतु ६३ जागा आपल्याच कर्तृत्वाने जिंकल्या या भ्रमात सर्व सेना नेते अजूनही आहेत आणि मूर्ख सेना समर्थक त्याच भ्रमात आहेत.

सहमत. सेनेची स्थापना ही भाजपमुळेच झाली होती, बाळासाहेबांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट भाजपच लिहून द्यायची, १९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं, सेनेने ३५ वर्ष महापालिका भाजपमुळेच जिंकली, १९९३ ला मुंबई भाजपनेच वाचवली. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो भाजपमुळेच, न्यूटन ला गिरॅवीटीचा शोध भाजपमुळे लागला, पुतीन रशीयात राज्य करतोय भाजपमुळे, ट्रम्प सरकार पाडलं ते भाजपने….. हे मुर्ख सेना समर्थक ह्या गोष्टी कधीच मान्य करनार नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 9:32 am | अमरेंद्र बाहुबली

खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला दीद दियावी लागेल.
जेथे जेथे भाजपचे मतदार कमी होते तेथे तेथे भाजपने छुप्या पद्धतीने सेना आमदारांकडे मते वळवून सेना आमदार निवडून यायला मदत केली होती. कैच्याकै.
हा दावा सेनापण करू शकते. जेथे जेथे सेनेचे मतदार कमी होते तेथे तेथे सेनेने छुप्या पद्धतीने भाजप आमदारांकडे मते वळवून भाजप आमदार निवडून यायला मदत केली होती.

अन्यथा सेनेला ६३ ऐवजी फार तर ३० जागा मिळाल्या असत्या. आपल्याला ख्या ख्या ख्या. भाजपला १२२ एवजी २२ मिळाल्या असत्या. कैच्याकै लाॅजीक.

परंतु ६३ जागा आपल्याच कर्तृत्वाने जिंकल्या या भ्रमात सर्व सेना नेते अजूनही आहेत आणि मूर्ख सेना समर्थक त्याच भ्रमात आहेत.

सहमत. सेनेची स्थापना ही भाजपमुळेच झाली होती, बाळासाहेबांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट भाजपच लिहून द्यायची, १९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं, सेनेने ३५ वर्ष महापालिका भाजपमुळेच जिंकली, १९९३ ला मुंबई भाजपनेच वाचवली. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो भाजपमुळेच, न्यूटन ला गिरॅवीटीचा शोध भाजपमुळे लागला, पुतीन रशीयात राज्य करतोय भाजपमुळे, ट्रम्प सरकार पाडलं ते भाजपने….. हे मुर्ख सेना समर्थक ह्या गोष्टी कधीच मान्य करनार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 9:41 am | श्रीगुरुजी

http://www.misalpav.com/comment/1144854#comment-1144854

या प्रतिसादातील शेवटचे वाक्य तात्काळ सिद्ध होणार याची खातरी होती.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 10:38 am | श्रीगुरुजी

१९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं,

ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा स्थापनेनंतर पहिल्या २३ वर्षात अनेकदा प्रयत्न करूनही जेमतेम १ आमदार निवडून आणू शकलेल्या सेनेच्या आमदारांची संख्या युती केल्यानंतर १९९० पासून वाढली नसती. अर्थात गाडीच्या दांड्यावर बसलेल्या माशीला वाटत असतं की आपल्यामुळेच गाडी चालतीये. तसंच भ्रमात असणाऱ्या सेना समर्थकांचं आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 12:53 pm | अमरेंद्र बाहुबली

बरोबर. भाजपमुळे भाजपचं सरकार आलं नसलं तरी सेनेचं सरकार मात्र भाजपमुळेच आलं.:) व्वा.

डँबिस००७'s picture

24 Jun 2022 - 9:22 pm | डँबिस००७

ह्या सर्व गदारोळात भाजपने सत्ताममोहात न पडता, मध्यावधी निवडणुका जिंकुनच सत्तेत येण हे जास्त सोप्प, नैतीक व यशाची हमी देणार असेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 11:27 pm | अमरेंद्र बाहुबली

पवार/ठाकरें समोर महाराष्ट्रात भाजप निवडणूका जिंकेल, बहुमत मिळवेल म्हणणे म्हणजे फारच काहीतरी गप्पा झाल्या.

४ दिवसांपुर्वी रिंगण सोहळा झाला. राजकिय महाभारताचे मिडिया सेंकदा सेकंदाचे वार्तांकन करताना मिडिया वारीचे वार्ता़ंकनास कमी पडतोय ! :(

प्रतिसाद देण्या आधी २ भजने ऐकली... त्या शिवाय प्रतिसाद तरी कसा ध्यावा ? असा विचार आला होता. ती २ भजन इथे देऊन जातो.

जाता जाता :- केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा परत देण्याची वेळ जवळ आली काय ? :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithala Konta Zenda | Dnyaneshwar Meshram |

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 11:28 pm | अमरेंद्र बाहुबली

केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा परत देण्याची वेळ जवळ आली काय ? :) नाही. पवार/ठाकरे वगैरे पुरोगामी महाराष्ट्राला वाचवायला समर्थ आहेत. :)

रात्रीचे चांदणे's picture

25 Jun 2022 - 9:43 am | रात्रीचे चांदणे

ठाकरे तर गेल्या ८ वर्षा पासून सत्तेत आहेत, त्याच्या आदी पवारांचा पक्ष १५ वर्ष सत्तेत होता एवढ्या वर्षात महाराष्ट्राला वाचवू नाही का शकले?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Jun 2022 - 5:34 am | हणमंतअण्णा शंकर...

मविआ बरोबर सरकार स्थापन करण्याला बहुतेक शिवसैनिक (किंवा शिवसेनेचा कट्टर मतदार) राजी नसावेत तरीही सध्याच्या बंडाला बहुतेक शिवसैनिक मान्यता देत नाहीत.
शिरसाठांच्या अधिकृत फेसबुक विडिओ वरच्या कॉमेंट्सचा जरा संख्याशास्त्रीय आढावा घेतला तर मला साधारणत: ७० टक्के कॉमेंट्स या बंडखोरांना गद्दारम्हणून हिणवणार्‍या आहेत. हे सगळे साधे शिवसैनिक आणि मतदारांचे प्रतिनिधी मानले तर शिवसैनिकांमध्ये बंडखोरांविषयी फारशी आस्था नाही हे मला तरी पटले. शिवसैनिकांना मविआही नको आहे आणि हे बंडखोरही नको आहेत शिवाय संजय राऊतांनी उगाच इतर पक्षांचा कैवार घेऊ नये असे एकत्र काहीतरी वाटते. म्हणजे मध्यावधी निवडणुका लागल्या तर बरेचसे आमदार पडण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आजारपणातून लवकर सावरले आणि पूर्वपदावर आले तर शिवसेना परत बळकट होईल. जर आदित्यबाळ वगैरे सेना चालवणार असेल तर शिवसेनेचे अवघड आहे. शिवसेनेने दुसरी तिसरी नेत्यांची फळी स्ट्राँग करायला हवे आहे. बाकी कायदेशीर खटपटींनी कुणीही सरकार केलं तरी ते सरकार महाराष्ट्राचं भलं कितपत करेल याची शंका आहे. काही दिवस राष्ट्रपती लागवट पुन्हा लागण्याची शक्यता वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 7:50 am | अमरेंद्र बाहुबली

मविआ बरोबर सरकार स्थापन करण्याला बहुतेक शिवसैनिक (किंवा शिवसेनेचा कट्टर मतदार) राजी नसावेत भाजप बरोबर जाऊ नका म्हणून त्या वेळी शिवसैनिकांनी ट्विटर मोहीम चालवली होती.

तरीही सध्याच्या बंडाला बहुतेक शिवसैनिक मान्यता देत नाहीत.

भाजप नको ही आजही प्रत्येक शिवसैनिकाची ईच्छाय.

सुबोध खरे's picture

25 Jun 2022 - 9:30 am | सुबोध खरे

भुजबळ बुवा

तुमच्या इच्छा तुम्ही शिवसैनिकांवर कशाला लादताय?

किती टक्के शिवसैनिक टिपू सुलतान जयंती किंवा का स्पर्धेबद्दल आनंदी आहेत हे एकदा जमिनीला कान लावून पहा.

काहीही करून भाजप ला विरोध या एकमेव अजेंड्यातून आपले प्रतिसाद येतात हे स्पष्ट आहे पण त्यामुले तुम्ही वस्तुस्थितीच्या कित्येक मेल लांब आहात हे लक्षात घ्या

बाळासाहेबांची अनेक भाषणे मशिदीवरच्या भोंग्यां बद्दल शिवसैनिकांनी अनेक वेळेस ऐकली आहेत. त्याला कोण विरोध करतो आहे.

मुस्लिम लांगुलचालन कोणालाही पसंत नाही पण केवळ श्री उद्धव ठाकरेंबद्दल निष्ठा म्हणून ते गप्प आहेत.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 9:53 am | श्रीगुरुजी

सूडबुद्धीने बेभान झालेल्या या नालायक सरकारला अजून एक चपराक

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/mumbai/pol...

जहाजावरील अंमली पदार्थ प्रकलणातील उरलेल्या १४ संशयितांविरूद्ध पुरेसे पुरावे. समीर वानखेडेंची कारवाई योग्य.

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/mumbai/suf...

शाम भागवत's picture

25 Jun 2022 - 10:57 am | शाम भागवत

शिंदे + राज ही जोडी उठांना फारच भारी ठरेल. जमीनीवर काम करणारे शिवसेनेचे नेते + राज यांचे वक्तृत्व धमाल तर उडवून देईल.
मुख्य म्हणजे पवार साहेबांची वापरून फेकून देण्याची पध्दत राज साहेबांनी ओळखली असल्याने ते आता कधीच राष्ट्रवादी कडे जाणार नाहीत.
राज ठाकरे लवकर बरे होउन राजकारणात परत येणे हा एकमेव उतारा सध्याच्या स्थितीवर आहे असे वाटते

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 2:18 pm | श्रीगुरुजी

पूर्ण असहमत. राठा अत्यंत बेभरशाचे आहेत कधीही १८० अंशात वळण घेऊन कोणाबरोबरही जाऊ शकतात. त्यामुळेच सर्व मतदारांचा विश्वास त्यांनी गमाविला आहे. कधीतरी धुमकेतू सारखे उगवून भोंगे, हनुमान चालिसा असले मतांच्या दृष्टीने अजिबात परीणामकारक विषय घेणे व नंतर दोनचार दिवसात लुप्त होणे यातून काहीही साध्य होत नाही. लोक केवळ मनोरंजनासाठी त्यांच्या सभेला येतात हे अनेकदा सिद्ध झालंय. मधसे हा पक्ष २०१४ मध्येच कायमस्वरूपी संपलेला आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 2:19 pm | श्रीगुरुजी

अजिबात परीणामकारक नसलेले असे वाचावे.

शाम भागवत's picture

25 Jun 2022 - 4:04 pm | शाम भागवत

:)
गणेशा यांना जे उत्तर दिले त्याच विचारावर मी राज यांची उन्नती व उठा यांची अधोगती वर्तवली आहे.
याचेही उत्तर काळच देईल.
:)

डँबिस००७'s picture

25 Jun 2022 - 11:26 am | डँबिस००७

रा ठा चीं तब्येत बरी नाही का ?

शाम भागवत's picture

25 Jun 2022 - 11:43 am | शाम भागवत

ऑपरेशन ठरलंय.

शाम भागवत's picture

25 Jun 2022 - 4:06 pm | शाम भागवत

सॉरी
शस्त्रक्रिया झाली व आजच ते घरी परत आले.