शशक'२०२२ - विश्वास

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
23 May 2022 - 9:38 am

अनिरुद्ध
येस्स! आम्ही 2122 मध्ये सुखरूप पोचलोय! आता इस्रो मध्ये जाउन गेल्या 100 वर्षातली जर्नल्स भरभर चाळायला हवीत.

हुश्श! इथल्या सिस्टिम्स वापरताना चांगलीच तारांबळ उडाली! अरुंधती तर घाबरलीच होती... एवढी हुशार क्वांटम फिजिकिस्ट, पण लहानसहान गोष्टीनं भीते! माझ्यावरच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी ती या कालप्रवासाला तयार झाली... असो, आता अभ्यास!

अरे वा! कालप्रवासाच्या शोधाबद्दल अरूंधतीला नोबल प्राइज मिळालाय! पण यात माझं नाव कसं नाही?

अरुंधती
अनिरुद्धचा टाइम ट्रॅवलचा... सॉरी, कालप्रवासाचा! शोध सक्सेसफुल झालाय. आता मला एकच गोष्ट करायचीय... तो रात्री झोपला, की एकटीनं टाइम कॅप्सुल घेऊन 2022 मध्ये परत जायचं. मग पैसा, प्रसिद्धी आणि नोबल प्राइज... सगळं काही माझं. माझं एकटीचं!

प्रतिक्रिया

तर्कवादी's picture

23 May 2022 - 10:40 am | तर्कवादी

कथानक ठीक, लेखनशैली आवडली

सौंदाळा's picture

23 May 2022 - 11:03 am | सौंदाळा

+१

चौथा कोनाडा's picture

23 May 2022 - 11:47 am | चौथा कोनाडा

+१

आवडली

एमी's picture

23 May 2022 - 12:20 pm | एमी

+१

VRINDA MOGHE's picture

23 May 2022 - 1:18 pm | VRINDA MOGHE

+1

विजुभाऊ's picture

23 May 2022 - 5:49 pm | विजुभाऊ

-१
आवडली नाही कथा.
टाईम ट्रॅव्हल चं लॉजिक पटल नाही. तीने हे असे केले .समजा अनिरुद्ध ने त्या दिवसाच्या आदल्या दिवशी येवून अरुंधतीलाच नाहीसे केले तर?

पण काल प्रवास यंत्र अरुंधती घेऊन गेली ना २०२२ मध्ये.
आता अनिरुद्ध कसा परत जाणार? तो राहिला २१२२ मध्ये.

*मला सुचलेलं स्पष्टीकरण. कथा माझी नाही.

भागो's picture

23 May 2022 - 9:59 pm | भागो

+१
ok डोके

तुषार काळभोर's picture

24 May 2022 - 6:07 am | तुषार काळभोर

अच्छा, अरुंधती सध्या हे करते!

हॅहॅ. अरुंधती आणि अनिरुद्ध मुळे हसू आले. संजना कुठाय ?

Bhakti's picture

24 May 2022 - 1:15 pm | Bhakti

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 9:20 pm | चेतन सुभाष गुगळे

-१ (वजा एक)