शशक'२०२२- सूचित

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2022 - 7:51 am

वडाच्या झाडाखाली एका टपरीवर,
तू छान सिगरेट ओढत असतेस
खोकत खोकत का होईना,
धुराचे लोळ हवेत सोडत असतेस

तुझा तो बॉयफ्रेंड,
तुझी पर्स पकडून उभा असतो
तुझ्यासाठी आता तो,
दुसरी शिलगावून देणार असतो

त्या काळोखातून बाहेर,
कोणीतरी येताना तुला दिसतो
त्या आकृतीकडे बघून,
तुला मोठा धक्का बसतो!!

“मग पुढे काय होतं?”
“मला काय माहित?”
“म्हणजे? तू ही कविता केली नाहीस?”
“नाही ना, तुमच्या ऑफिसच्या बॅगमध्ये हा कवितेचा कागद सापडलाय” असं म्हणत आमच्या हिने गॅस पेटवला.
“पण मग अशी कविता कोणी केली? आणि कशाला? स्ट्रेंज…”

तेवढ्यात मला मोबाईलवर कॉल येतो, मी कॉल घेतो.
“हॅलो पप्पा, आपली चिनू ताई परत सिगरेट ओढतेय”

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

9 May 2022 - 12:33 pm | श्वेता व्यास

+१

नीट समजली नाही. पण कन्सेप्ट उत्तम.

चांदणे संदीप's picture

10 May 2022 - 9:39 am | चांदणे संदीप

+१

सं - दी - प

प्रचेतस's picture

10 May 2022 - 2:35 pm | प्रचेतस

+१

संजय पाटिल's picture

10 May 2022 - 4:36 pm | संजय पाटिल

+१

मोहन's picture

11 May 2022 - 10:58 am | मोहन

+१

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:29 am | तुषार काळभोर

कविता लिहिली कोणी?
'हिने', बापाने, बारक्याने, चिनूने की बॉयफ्रेण्डने?

प्राची अश्विनी's picture

16 May 2022 - 5:34 am | प्राची अश्विनी

+1