कारखानिसांची वारी
मला हा सिनेमा आवडला याचे कारण या सिनेमात एक वाक्य आहे. हे वाक्य ऐकून ४८ वर्षापुर्वी मला मिळालेला सल्ला आठवला. सल्ला न मागता मिळालेला नव्हता त्यामुळे न ऐकण्याचे कारण नव्हते. मी तो अमलात आणला आणि सुखी झालो.
त्या काळी कुटुंब नियोजनावर खूप चर्चा होत असे. फॅमिली प्लॅनींग बद्दल कुतूहल होते. कॉपर टी बद्दल ,मी कटिंग ला गेलेल्या सलून मधे चाललेली चर्चा ऐकणे अशक्य झाल्याने ती थांबवण्याची विनंती करावी लागली.
'' त्या '' साधनाबद्दल समजून घेणे सभ्येतेला सोडणे समजले जात होते. अशा परिस्थितीत माझे लग्न ठरले. आणि फ्यामिली प्लॅनींग ची जाहिरात बघून आता आपली वेळ आली असे वाटले. [" काही पुस्तके" वाचून झाली होती. बेळगाव मधून प्रसिद्ध होणारे यलो लिटरेचल डोळ्याखालून गेले होते. परंतु हे सारे फ्यामिली प्लॅनींग समजण्यास उपयोगी नाही हे समजत होते. ]
आणि मी आमच्या फ्यामिली डॉक्टकडे गेलो. त्यांना सांगितले मला तुमच्याशी बोलावयाचे आहे. माझा चेहरा पाहून ते म्हणाले दवाखाना बंद होण्याच्या वेळेला ये. मी गेलो आणि दहा एक मिनिटात सगळे पेशंट गेलेले पाहिले . पण या दहा मिनिटात डॉक्टरांशी कसे बोलायचे याचे टेन्शन अनुभवले. आधार एका वाक्याचा होता '' डॉक्टरपासून काही लपवून ठेऊ नये. " केबिन मधे गेल्यावर आमच्या फ्यामिलीबद्दल त्यांनी थोडी चौकशी केली आणि डोळ्यांनी मी आता बोलावे असे सुचवले. नाटकात पहिल्यांदा काम करणारा ,नर्व्हस असणारा नट कधी एकदा डायलॉग म्हणून टाकतो आणि यातून सुटतो या विचारात असतो. मी त्याच विचाराने पटकन सांगितले " माझे लग्न तीन महिन्यांनी आहे आणि मला फ्यामिली प्लॅनींगची माहिती हवी आहे
. "डॉक्टरांनी कौतुकाने माझ्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले योग्य वेळी आलास. ते म्हणाले नीट समजून घे. फ्यामिली प्लॅनींग याचा संबंध फक्त मुले होण्याशी संबंधित नाही. आपल्याला कशा प्रकारचे जीवन जगावयाचे आहे त्याबद्दल आहे. मुले कधी जल्माला घालावयाची, किती मुले असली पाहिजेत हा त्याचा एक भाग आहे. आणि सर्वात महत्वाचे सध्या चाललेली चर्चा मुले न होण्याबद्दल आहे. त्या करिता वापराव्या लागणाऱ्या साधनाबद्दल आहे. परंतु मूल होण्याबद्दल हमखास उपाय नाही हे लक्षात घेऊन निर्णय घेणे योग्य ठरेल.
सिनेमा बद्दल आणखी काही लिहिण्याचे मला ज्ञान नाही. माझे सिनेमा आणि गाणे यांचे वर्गिकरण फार सोपे आहे. मला सिनेमा आवडतो किंव्हा आवडत नाही. हा सिनेमा मला आवडला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
छान. या नावाचा चित्रपट आधी
होय या नव्या सिनेमाबद्दल
छान किस्सा लिहिलेला आहे.