दिवाळी अंक २०२१ : नान खटाई (without oven)

पियुशा's picture
पियुशा in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

खुसखुशीत नानखटाई / नानकटाई ( without oven)

आज हमारे पास चकली है, शेव है, चिवड़ा है, करंजी है..
तुम्हारे पास क्या है हयाई?
हमारे पास नान खटाई है भाऊ!

लै ड्रामा झाला ना, आता डायरेक्ट रेसिपी बघू :)

मी इथे प्रमाण measuring cupनुसार देतेय. पण जर तुमच्याकडे नसतील तरी फिकर नॉट! घरची कुठलीही एक वाटी किंवा बाउल सेट करा आणि त्यानुसार प्रमाण घ्या.

एक मोठी परात घ्या. त्यात अर्धा कप तूप घाला. मी साजूक वापरलं आहे. तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता, फक्त ते वितळलेलं नको.
1

आता हे तूप हातानेच छान फेटून घ्यायचं आहे. अगदी हलकं आणि मलाईसारखं व्हायला हवं. याला किमान ७-८ मिनिटं लागतील.
फेटून झाल्यावर ते असं दिसेल -
2

रंग आणि texture असं झालं की बास्स...
मग त्यात घालायची पाव कप पिठीसाखर. परत एकदा 'चक्की पिसिंग पिसिंग'च्या तालावर फेटून घ्यायचं.
3

आता यामध्ये add कारायचा एक कप मैदा, २ टेबल स्पून बेसन, एक टेबल स्पून रवा आणि अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर!
4

आता हे सर्व साहित्य मळून घ्यायचं. नान खटाईचं पीठ तयार आहे.

5

आता एका जाड बुडाच्या कढईत एक स्टँड ठेवायचा.
कढ़ई झाकण ठेवून १० मिनिटांसाठी medium फ्लेमवर प्रीहीट (pre-heat) करून घ्यायची.

6

आता बेकिंगसाठी एका सपाट ताटाला /परातीला aluminium फॉइल पेपर लावून घेतलाय, बटर पेपर असल्यास तो लावा.
दोन्ही नसल्यास तुपाचा हात लावून घ्या परातीला. आता त्या परातीत नान खटाई ठेवून घ्यायच्या.
मळलेल्या पिठाचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन तो हातावर गोल करून मग त्याला थोडा चपटा आकार द्यायचा.
अशा थोड्या अंतरावर ठेवा खूप चिकटून ठेवू नका, कारण त्यांचा आकार बेकिंगच्या वेळी फुलतो.

7

यावर तुम्हाला आवडतील ते ड्राय फ्रूट्स लावा.

आता ही परात कढईमध्ये बेक होण्यासाठी ठेवा.
8

झाली का नान खटाई? झाली का नान खटाई ? म्हणून सारखं सारखं झाकण उघडून पाहू नका. डायरेक्ट १५ मिनिटांनी एकदा चेक करा एक मंद सुगंध यायला लागतो आणि कडा थोड्या गडद दिसायला लागतात.
slow फ्लेमवर २०ते २५ मिनिटं बेक होऊ द्या.
२०ते २५ मिनिटांनी गॅस बंद करा.
9

10

आणि परात बाहेर काढून घ्या. लगेच नान खटाई उचलायला जाऊ नका (हावरट कुठले असा आवाज येतो म्हणे ताटातून.) गरम गरम नान खटाई नाजूक आणि मऊ असते, ती पूर्ण गार होऊ द्यायची. मगच खायची आणि उरली तर एअर टाइट डब्यात / कंटेनरमध्ये भरून ठेवायची.

सोप्पी आहे की नाही? फ़ोटो बघून दिल गार्डन गार्डन झाला की नै?
10

प्रतिक्रिया

राघव's picture

2 Nov 2021 - 6:32 pm | राघव

मस्त दिसतीये! ही रेसिपी घरी करणे गरजेचे आहे!! :-)

आणि हो, खूप छान अन् नेटके फोटू! सोबत खुसखुशीत लेखन! नानकटाई खुसखुशीत होणारच!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 11:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

दिवाळीच्या सुट्टीत घरी बनवून पाहिली पाहिजे

पैजारबुवा,

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:02 am | पाषाणभेद

तोंपासू

प्रचेतस's picture

3 Nov 2021 - 6:27 am | प्रचेतस

सकाळी सकाळी असे फोटो पाहणे म्हणजे अत्याचार आहे..

nutanm's picture

3 Nov 2021 - 8:21 am | nutanm

थोडेसे 1/2 थेंब (vanila essence )व्हॅनिला इसेन्स घातल्यावर चवीच्या जोडीला vanila च्या वासाने आणखीच अप्रतिम लागते.

तसेच रोझ इसेन्स, गुलाब पाकळ्या, ओले/ सुके खोबरे भरपूर , मऊ फळांच बारीक तुकडे उदा. स्ट्राॅबेरीॅ व स्ट्राॅबेरी इसेन्स, आंबा फक्त बारीक तुकडे अर्थात हंगामातच इ०घालू शकता किंवा आंबा रस/पल्प . बाजारात मिळतो बारमाही घालू शकतो
आंब्याला इसेन्सची गरज नााहीच व थोडासाच पुरेल असे मला वाटते.काारण आंबा हा मुळातच सुमधुर वासाचे फळ. खूप घमघमाट असतो.

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 10:40 am | सौंदाळा

खूप दिवसात खाल्लीच नाही.
आता सुट्टीत नक्की हादडेन.
मस्त पाकृ

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 12:15 pm | मुक्त विहारि

नानकटाई हा उकडीच्या मोदका सारखाच एक ब्लेम गेम आहे...

मी चुकूनही ह्या फंदात पडणार नाही

खरं तर, बायकोने तशी तंबीच दिली आहे

हा प्रकार कधी जळतो तर कधी कच्चा राहतो कधी अर्धवटच तयार होतो

त्यापेक्षा सरळ विकत आणलेले परवडते

पदार्थ बिघडल्याचे दूःख नाही पण तूप वाया गेल्याचे परम दूःख, बायको कधीच विसरू शकलेली नाही...

बाबा महाराज डोंबोलीकर यांच्या आगामी, "संसार टिकवायचा असेल तर, काय करू नये?" ह्या खंड 3, अध्याय 13, प्रकरण 1760, ह्यातील त्यांचे अनुभव ...

गरजूंनी आधीच नोंदणी करावी... नोंदणी फुकट आहे

खंड कधी मिळतील यांची शास्वती नाही
---------

मदनबाण's picture

3 Nov 2021 - 7:43 pm | मदनबाण

आहाहा... :)
जिल्बुशा एक प्रश्न पडलाय... अल्युमिनिअम फॉइलचा वापर खाद्य पदार्थांसाठी घातक तर ठरत नाही ना ?

मदनबाण.....

@ मदनबान , कुठल्याही गोष्टीचा अती वापर हा घातक ठरू शकतो, इथे आपण क्वचित कधीतरी वापरू शकतो . त्याने मला तरी वाटत काही दुष्परिणाम होणार नाही जरी काही शंका असेल तर aluminium foil skip करून बटर पेपर हा ऑप्शन दिलेलाच आहे

Bhakti's picture

3 Nov 2021 - 8:50 pm | Bhakti

यम्मी :)

जुइ's picture

7 Nov 2021 - 7:31 am | जुइ

नान खटाई अगदी छान दिसत आहे! फोटो सुंदर दिसत आहे. एकदा करून बघते.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2021 - 7:43 am | मुक्त विहारि

प्रयोग यशस्वी झाला की फोटो नक्की टाका ...

बायकोने ह्या पदार्थाचा धसका घेतला आहे ...

मी नानकटाई करू नये, ह्यासाठी ती नवस देखील बोलेल ...

तुषार काळभोर's picture

7 Nov 2021 - 9:55 pm | तुषार काळभोर

जितक्या सोप्या पद्धतीने सांगितला आहे, तितका सोपा असेल वाटत नाही. हा हमखास बिघडणारा प्रकार आहे. जमून येणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

8 Nov 2021 - 10:14 pm | सौ मृदुला धनंजय...

खुपच छान दिसते .मी नक्की करून बघणार.

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2021 - 6:37 am | सुधीर कांदळकर

बिस्किटांच्या दुकानांत मिळत नाही. तत्सम दिसणार्‍या बिस्किटांना कुकीज म्हणतात आणि चव वेगळी असते. चि. छोटा असतांना घरी होई.

लेख आणि प्रकाशचित्र पाहून जीभ चाळवली. आता करून बघणार.

पाकृ लेखाबद्दल धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

17 Nov 2021 - 8:20 am | गुल्लू दादा

फोटो खूप छान आलेत. धन्यवाद.