दिवाळी अंक २०२१ : छाप तिलक सब छिनी रे!

श्रेयाभि's picture
श्रेयाभि in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

छाप तिलक सब छिनी रे!

इन पलकों को मुंद लू कुछ बैचेनसी करती है।
इक कसक है इनमें, तपिश है कशिश है,
इक आरजूॅं है दिल में, बंद करू तो भी तुम्हारा ही एहसास हो
आँख खोलू तो सामने तुम्हारी ही तस्वीर हो।
(श्रेया सरनाईक)

सारे जग अंधारून येते, तेव्हा पापण्याच्या काठावर स्वप्ने मुक्कामाला येतात. मिटलेल्या डोळ्यांनी एक वेगळीच चमक येते. मनाच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर एक मोरपिस फुटावे, तसे होत जाते. त्याच्या नुसत्या चाहुलीनेही तिला अख्ख्या जगाचा विसर पडत जातो. कृष्णविवरात अख्खे ब्रह्मांड ओढले जावे तसे काही होते. सर्व आखीव-रेखीव असे जगणे काही काळासाठी विसकळीत होते. मनाला वेड लावणारा हा एक कालखंड आहे.

बऱ्याच गोष्टी वर्तमानाचे भान विसरवतात. सुफिझम एक असाच वेड लावणारा करिश्मा आहे. जणू जादूची पुडीच आहे. सुफी गीते, संगीत कमालीचे मोहून टाकतात. आमीर खुसरो एक थोर सुफी गीतकार आहेत. 'छाप तिलक सब छिनी रे..' ही त्यांची रचना जगातल्या सर्वोत्तम रचनांपैकी एक समजली जाते.

छाप तिलक सब छिनी रे मोसे नैना मिलाईके।
अपनी छब बनाईके, जो मे पी के पास गई
जब छब देखी पीहू की, सो मै अपनी भूल गई।

तिला स्वतःच्या दिसण्याचा जरा दिमाखच आहे. दिसायला गोरी आणि बऱ्यापैकी देखणी. पुन्हा तो आज दिसणार का? त्याचे दर्शन घडणार का? याच कश्मकशमध्ये तिचा वेळ जात आहे. आज तो भेटणार, मग मेकप तर हवाच.

म्हणून छान वेळ काढून तयारी केली. खास साज चढवला. मुद्दाम त्याच्या आवडीच्या रंगाचे कपडेही घातले. स्वतःच्या दिसण्याचा, वावरण्याचा, स्वतःच्या विभ्रमांचा तिला प्रचंड अभिमान आहे.

अगदी एखादी विश्वसुंदरी अवतरली असे त्याला नक्कीच वाटेल, या दिमाखात आज मी त्याच्या समोर जाणार.

पण अरे देवा.... परमेश्वरा हे भलतेच काय घडले? त्याच्या समोर नुसता जायचा अवकाश की त्याची एक छबी पाहून ती चक्क स्वतःलाच विसरली. हे मना, तू त्याच्या दर्शनाशिवाय कसे काय काढले? ही क्षणाक्षणाला वाटणारी उत्कंठा तू जिवा कशी रे सहन केलीस? त्याचे नाव ओठांवर येऊ द्यायचे नाही हे बजावले तर खरे, पण अखंडपणे आतल्या आत नाव घेत त्याच्या दर्शनाशिवाय हे जिवा, तुला चैन तरी कसे पडले? आणि मनाची ही व्याकूळ अवस्था त्याला कधी कळलीच नाही, तर? की कळूनही तो दुर्लक्ष करतोय?

मागी है चाहत, पर बस इतना सबब दे दो
कभी आमना-सामना हुआ तो तगाफुल ना करोगे।
(श्रेया सरनाईक)

त्याला पाहिले की असेच भान हरपते. मुळांना पाणी घालावे नि अख्खे झाड फुलारून यावे, तसा जीव फुलून येतो.
त्याला तिची फजिती पाहायला नेहमीच आवडते. मागच्या वेळी तसेच घडले. तो अचानकच सामोरी आला. तिने वेळेवर करावे तरी काय?

मी न केली सखी अजून वेणी-फणी
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे, कुठून काजळ भरू?
(कविश्रेष्ठ सुरेश भट)

एकतर त्याचा रंग सावळा. त्याला खरे तर तिच्या गोर्‍या रंगापुढे सावळ्या रंगाचे कुठेतरी वैषम्य वाटत राहते. आपणही थोडासा मेकप करून तिच्यासमोर जावे का? हा प्रश्न त्याला नेहमीच पडतो. पण मग तो फार विचार करत नाही, आश्वस्त असतो. कारण त्याला ठाऊक आहे. ही वेडी त्याच्या सावळ्या रंगावरच लुब्ध आहे. तिलाही सावळबाधाच झाली आहे.

खरे तर आतून तिला बरे वाटते की हा एवढा सावळा आहे, ते बरेच आहे. फार अधिक जणींचे लक्ष त्याच्याकडे जात नाही. गोऱ्या चांदव्याला पाहून उनाड उल्का भाळतातच.

तो सावळा असल्याचा आणखीन एक फायदा म्हणजे त्याची छबी अशी तन-मनात, डोळ्यांच्या पापण्यात कैद केली की, काजळ भरण्याचा उगा वेगळा सोस राहत नाही.

अच्छा लगता है तेरा सांवलासा रंग
नैनोमे कहाँ आजकल काजल भरती हूँ।
(श्रेया सरनाईक)

तिला राधेचे वर्णन आठवले.
ती वेडी अशाच एका सावळ्यावर जीव जडवून बसली. त्या श्याममुरारीने वेणू वाजवायला सुरुवात केली की कसला साज नि कसला शृंगार? गोपिकांना भान राहत नसे. घोडदळाने, पायदळाने लगबगीने परिणामांचा विचार न करता युद्धभूमीकडे जावे, तशा त्या गोपिका त्याच्या मोहात पडतात. खरे तर त्यांना मनातून इच्छा होती की, छान पोषाख करावा, शृंगार करावा, फुले माळावी,, पण जायला उशीर होणार ना मग? तेवढेच त्या श्याममुरारीचे दर्शन कमी होणार! त्या गोपींची अवस्था तरी काय वर्णावी ?

निघताना ओष्ठराग विसरली,
न केला टाळम-टिक्का
ना विंचरले जालवलय फणीने
ना काजळ ना बुक्का!

खरे तर त्याच्या दर्शनाची ओढ आता लागली आहे. डोळे भरून त्याला पाहून घ्यावे तर डोळ्यात आनंदाने पाणी येते. कारण असे अचानक त्याला बघायला मिळणे इतके सहजसाध्या थोडेच असते? डोळे पाण्याने भरून आले की, त्याची छबी धूसर होऊ लागते. पाणी निपटण्यासाठी डोळे क्षणभर मिटावेत तर दर्शन अप्राप्य होते. एकूण सगळा घोळच. ती मनातून म्हणतेय, "हा पाठशिवणीचा खेळ संपव रे आता. तू सतत मला माझ्या समोर हवास."

श्याम सवेरे साथ हो मेरे
गोरी के संग जैसे गागरियाँ

पण एवढे भाग्य लाभणार आहे का?
ती स्वतःच्याच मनाला समजावून सांगत आहे - त्याने क्षणभर दुरून का होईना प्रेमामृत काय पाजले, माझा असा स्वतःवर ताबाच राहिला नाही. मी त्याच्या सावळ्या रंगात इतके कसे काय मोहून गेले? सतत त्याचाच विचार करण्याने माझाही रंग सावळा झाला तर? त्याच्याशी एकरूप होण्यासाठी नुसती दृष्टादृष्टच पुरे आहे. त्याच्या नजरेत नजर काय मिळवली, माझे स्वतःचे अस्तित्वच मिटून गेले आहे. हे प्रियकरा, तू नजरेनेच हे प्रेमामृत आज पाजले आणि मी मदहोश झाले. हिरव्या बांगड्या घातलेला माझा गोरा हात तू निमिषभर तुझ्या सावळ्या हाती धरलास नि मी माझे राहिलेच कोठे?

याच अवस्थेत दीर्घ काळ लोटावा.
सतत तुझाच विचार करत रहावा. हळूहळू नकळत मी तुझ्याच रंगाची होईन. आपला रंग नकळत एक होऊन जाईल. तू नुसत्या नजरेनेच मला सुहागन केले आहेत. आता अन्य कशाची रे अपेक्षा? आपण अंतरंगातून एकच आहोत, हे लक्षात आहे ना?

छाप तिलक सब छिनी रे, मोसे नैना मिलाईके
प्रेमभटी का मदवा पिलाईके
मतवारी कर लीन्ही रे, मोसे नैना मिलाईके
गोरी गोरी बईयाॅं, हरी हरी चुडियाॅं
बईयाॅं पकड धर लीन्हीरे मोसे नैना मिलाईके

बल बल जाऊ मै तोरे रंग रजवा
अपनीसी पकड धर लीन्ही रे, मोसे नैना मिलाईके

खुसरो निजाम के बल-बल जाए
मोहे सुहागन कीन्ही रे, मोसे नैना मिलाईके
छाप तिलक सब छीनी रे, मोसे नैना मिलाईके
(अमीर खुसरो)

वरवर प्रियकर प्रेयसीचे थट्टामस्करीचे वाटणारे हे सुफीगीत खरेच खूप सुंदर आहे.सुफी संप्रदाय हा आध्यात्मिक आहे. परमेश्वरप्राप्ती हेच अंतिम ध्येय आहे. कवीला अपेक्षित अर्थ म्हणजे परमेश्वराला शरण जाणे आहे.
.
हे परमेश्वरा, मी सतत एक वरवरचा मुलामा होऊन जगात वावरतो. माझे वागणे-बोलणे-राहणे आखीव-रेखीव आहे. सतत इतरांवर छाप पाडण्यासाठी मी तयारच असतो. माझ्यातला मी मला विसरू देत नाही. मी, माझे, मला, माझ्याकडे, मजजवळ हे माझे शब्दकोशातले आवडते शब्द आहेत.
माझा अहंकार सतत माझ्या प्रगतीच्या आड येतो. मी तुझ्या विचारात सतत मग्न हवे .मी फक्त माझ्यातच गुंग आहे.

पण काहीही ध्यानी मनी नसताना अचानक त्या परमेश्वराचे दर्शन मला आज झाले. त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आणि काय आश्चर्य? सगळी भौतिक पुटे गळून पडली. माझे नावसुद्धा मी विसरलो. मी अंतर्बाह्य बदललो. 'अहं ब्रह्मास्मि' हे परमसत्य मला समजले.
परमेश्वर प्रियकर आणि मी प्रेयसी झालो. निजाम प्रत्यक्ष परमेश्वराला म्हटले आहे. हे परमेश्वरा, तुझ्यावर जीव ओवाळून टाकावा इतका तू माझा व्हावास. सहज एकरूप होता यावे.

अद्वैत म्हणजे तरी असे वेगळे काय असते?
देवा सरू दे माझे मीपण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
ही भावना उमलावी. मी-तूपणाची बोळवण व्हावी.

परमेश्वराला जिवलग किंवा जिवलगाला परमेश्वर मानण्यात एक वेगळाच आनंद आहे, नाही का?
तुम्ही कधी परमेश्वराला प्रियकराच्या रूपात पाहिले आहे का?
नक्की पाहा, तो तुमचा अव्हेर करणार नाही.

या एकरूपतेतच जीवनाचे खरे सौंदर्य आहे.

श्रेया अभिजित सरनाईक

प्रतिक्रिया

राघव's picture

2 Nov 2021 - 6:37 pm | राघव

वाह! खूप छान आणि मनापासून लिहिलेत. आवडले.

श्रीगुरुजी's picture

3 Nov 2021 - 5:38 pm | श्रीगुरुजी

छान लिहिलंय!

MipaPremiYogesh's picture

4 Nov 2021 - 10:36 pm | MipaPremiYogesh

मस्त लिहिले आहे

नीलकंठ देशमुख's picture

4 Nov 2021 - 10:45 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलंय. हळूवारपणे..
अबेदा परवीन यांनी गायलेलं' छाप तिलक 'वेड्या सारखं ऐकत असे. एके काळी...तेआठवलं आता परत ऐकावे वाटतेय

सोत्रि's picture

5 Nov 2021 - 4:52 am | सोत्रि

अद्वैत म्हणजे तरी असे वेगळे काय असते?
देवा सरू दे माझे मीपण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
ही भावना उमलावी. मी-तूपणाची बोळवण व्हावी.

_/\_

- (सूफी संगीताचा फॅन) सोकाजी

गुल्लू दादा's picture

17 Nov 2021 - 8:25 am | गुल्लू दादा

आवडले. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

18 Nov 2021 - 9:25 am | तुषार काळभोर

मी-तूपण गेले वाया, पाहता पंढरीचा राया,
अवघा रंग येक जाहला..
हे माऊलींचं अद्वैत आपण आणि भगवंताच्या एक असण्याचंच प्रकटीकरण आहे. आपल्या सर्व संतांनी भगवंताला आई-बाप-भाऊ-सखा मानलंय.
शेकडो वर्षे शेकडो किलोमीटर पायी वारी करणं, हे तेच अद्वैत अनुभवणं आहे.

मूळ गीत सुरेख आहेच. तुम्ही लिहिलेलं किती मनःपूर्वक लिहिलंय ते शब्दाशब्दातून जाणवतंय. मध्ये मध्ये असलेल्या तुमच्या काव्यपंक्तीदेखील सुरेख!

विजुभाऊ's picture

18 Nov 2021 - 11:25 am | विजुभाऊ

खूप सुंदर लिहीलय.
पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2021 - 12:26 pm | चौथा कोनाडा

छान

मी न केली सखी अजून वेणी-फणी
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे, कुठून काजळ भरू?

हे आवडतं गाणं आहे