दिवाळी अंक २०२१ : सिगरेट

Primary tabs

गर्दीतला दर्दी's picture
गर्दीतला दर्दी in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय
ज्यातलं धगधगतं तारुण्य, कधीच विझलंय
जेव्हा होतं ज्वलंत, तेव्हा कशाचीही फिकीर नव्हती
मजेत धूर उडवत जगण्याची, सवय बनली होती

मनातल्या विस्तवाला, मी कधीच शांत केलंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय

जी ओढण्यात, बराच वेळ खर्च केलाय,
दुभंगलेलं मन, मोजक्या जाणिवांचा खेळ सुरू झालाय
संवेदनांनाही माझ्या, मी मूकबधिर ठरवलंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय

कैद या व्यसनाची, सवय म्हणून जपली
आयुष्य दुभंगलं, माझ्या मनात ती खपली
तिची वाट बघणं, हे आता रोजचंच चाललंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय

भीक आणि प्रीत, हे शब्द झालेत एकरूप
त्या मुक्या क्षणांना, मूक दिलं गेलं स्वरूप
मी एकटा, मी एकटा, हे रोजचंच रडगाणं झालंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय

उद्ध्वस्त झाल्यावर, पुन्हा उगवायची तयारी करतोय
तोल गेला आहे तरी, सावरायची तयारी करतोय
जगणं शापित अश्रू होतंय, आता भोगायची तयारी करतोय
फेकून जुन्या सिगरेटीस नवी पेटवायची तयारी करतोय....

पराग पाटील (गर्दीतला दर्दी...)

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 10:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

भावना पोचल्या आणि खोलवर टोचल्या

पैजारबुवा,

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:10 am | पाषाणभेद

भावनात्मक काव्य.

किरण कुमार's picture

3 Nov 2021 - 12:16 pm | किरण कुमार

छान

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2021 - 2:14 am | प्राची अश्विनी

कविता आवडली.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

छान कविता !
शेवटी आपणच आपल्याला गर्तेतून बाहेर काढायचे ही भावना मनात सकारात्मकता निर्माण करते
कविता आवडलेली आहे.

जेम्स वांड's picture

10 Nov 2021 - 7:10 pm | जेम्स वांड

काय धूर काढलाय दादा !!!

मानलं पाटील तुम्हाला, मानाचा मुजरा आमच्यावतीने आपणांस.

कसमसे सगळी नकारात्मक विचारांची राळ सिगरेटनेच पेटवून परत कोरी पाटी करून नवा गडी नवं राज्य सुरू करण्याची और नशा असेल.

च्यायला तुम्ही परत सोडलेली गुंडांग गरम ओठाशी आणायला टेम्प्ट केले ते अलगच

गुल्लू दादा's picture

16 Nov 2021 - 1:54 am | गुल्लू दादा

आवडली. धन्यवाद.