दिवाळी अंक २०२१ : माहेरची वाट

Primary tabs

Ramkrushn P Patil's picture
Ramkrushn P Patil in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

माहेरची वाट

माझ्या माहेरची वाट
डोंगरपायथ्याची
वाटेल कशी भीती
ओळख बालपणाची

वाटेला लागुनी
झाडझुडपांची छाया
देई उन्हात गारवा
वाटे मायसारखी माया

माय माहेरची वाट
बाई चालते झपझप
मायबाप येता याद
डोळे पाणी आपोआप

बहीण भाऊचं प्रेम
पाहून दाटला ऊर
भर उन्हात भाऊ उभा
देखे वाट गाववेशीवर

फफुटा तापला
तापल्या पायवाटा
सखी सोबती माहेरवाट
न मोडला मज काटा

रामकृष्ण पांडुरंग पाटील
मु.पो.विखरण,ता.जि.नंदुरबार
मो.क्र.9408885775

Ramkrushn P. Patil

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 10:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

काय झकास चित्र उभे केले डोळ्यापुढे,

आता खंड पडू देऊ नका लिहित रहा

पैजारबुवा,

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:12 am | पाषाणभेद

बहिणाबाईंची आठवण झाली.
छान काव्य.

किरण कुमार's picture

3 Nov 2021 - 12:14 pm | किरण कुमार

माय माहेरची वाट
बाई चालते झपझप
मायबाप येता याद
डोळे पाणी आपोआप... छान

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 12:57 pm | मुक्त विहारि

सखी सोबती माहेरवाट
न मोडला मज काटा

हे जास्त आवडले

समर्थ रामदास आणि वेणूची कथा आठवली

श्रीगणेशा's picture

8 Nov 2021 - 12:43 am | श्रीगणेशा

कविता आवडली! सहज, सोपी!!

तुषार काळभोर's picture

8 Nov 2021 - 7:47 am | तुषार काळभोर

अतिशय सरळ सोप्या शब्दात व्यक्त केलं आहे.

लिहिते राहा, तुमच्याकडून अजून वाचायला आवडेल.

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 8:45 am | प्राची अश्विनी

सुरेख.

गुल्लू दादा's picture

16 Nov 2021 - 1:56 am | गुल्लू दादा

आवडली. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2021 - 1:45 pm | चौथा कोनाडा

खुअप छान !