आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडी

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
27 Aug 2021 - 8:57 am
गाभा: 

आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.

प्रतिक्रिया

अर्जेंटिना
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अर्जेंटिनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सॅंटियागो कॅफिरो यांनी संयुक्तपणे ब्यूनस आयर्स येथे संयुक्त आयोगाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंनी संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ, फार्मा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, योग, हवामान बदल आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.
संयुक्त निवेदनात म्हटले आहे की दोन्ही देश त्यांच्या मध्यवर्ती बँकांना स्थानिक चलनांमध्ये पेमेंट यंत्रणा विकसित केली जाईल व डॉलर आणि युरो सारख्या तृतीय-पक्षीय चलनांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

दक्षिण अमेरिकन राष्ट्र अर्जेंटिनाने तेजस खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
याआधी ऑस्ट्रेलिया, इजिप्त, यूएसए, इंडोनेशिया आणि फिलीपिन्ससह इतर अनेक देशांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने बनवलेले फायटर खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.

विस्तारित ब्रिक्स गटात अर्जेंटिनाच्या समावेशासाठी भारताने आपला पाठिंबा व्यक्त केला असल्याची माहितीही दिली.

ब्राझील
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री कार्लोस फ्रांका यांच्यासमवेत भारत-ब्राझील संयुक्त बैठक घेतली.
दोन्ही मंत्र्यांनी BRICS, IBSA, UN, G20 आणि युक्रेन संघर्षावर विचारांची देवाणघेवाण करताना प्रसारण आणि कर आकारणी क्षेत्रातील करारांवर स्वाक्षरी केली आहे.
संयुक्त आयोगाच्या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, पेट्रोलियम, जैवइंधन, खाद्यतेल आणि खनिजे, आरोग्य, फार्मा, पारंपारिक औषध, S&T, कृषी आणि पशुधन, अंतराळ, संरक्षण, दहशतवादविरोधी आणि इतर विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. भारत पेट्रोलियम गुंतवणुकीत अतिरिक्त सुमारे दीड अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे.

पॅराग्वे
पॅराग्वे येथे असुनसियन येथे नवा भारतीय दूतावास उघडला गेला आहे.

निनाद's picture

8 Aug 2023 - 9:59 am | निनाद

निजर या देशाला १९६० मध्ये फ्रान्सपासून देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या नंतर निजरमध्ये अनेक बंड होत हे पाचवे लष्करी बंड झाले आहे. देशाच्या अध्यक्षीय सुरक्षा रक्षकाने अध्यक्ष मोहम्मद बझौम यांना ताब्यात घेतले. आणि अध्यक्षीय गार्ड कमांडर जनरल अब्दौरहमने त्चियानी यांनी स्वत: ला नवीन लष्करी नेता म्हणून घोषित केले. २०२१ मध्ये गिनी , माली आणि सुदान सारख्या जवळपासच्या देशांमध्ये आणि बुर्किना फासो मध्ये उठाव झाले आहेत.

या देशावर फ्रान्स (आणि अमेरिकेचा) चा मोठा प्रभाव आहे किंबहुना छुपी सत्ता आहे. यासाठी पश्चिम आफ्रिकन राज्यांचे आर्थिक समुदाय (ECOWAS) नावाचा एक गट काम करत असतो. ECOWAS ने निजरच्या सत्तापालट नेत्यांना बाझोमकडे सत्ता परत सोपवण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय निर्बंध किंवा बळाचा वापर करण्यासाठी तयार रहावे लागेल अशी धमकी दिली आहे. रशियाच्या वॅगनर ग्रुप ने घडवला असा एक समज आहे. कारण समर्थकांनी यावेळी चक्क रशियन झेंडे फडकावले आहेत.

पण फ्रान्स आणि अमेरिकेला यात इतका रस का आहे?
सोपे कारण निजर या भागात चांगल्या प्रतिचे युरेनियम मिळते. फ्रांस युरेनियम पासून वीज बनवण्यात function at() { [native code] }इशय प्रगत तंत्र्ज्ञान बाळगतो.
अमेरिकेची सुमारे ३०% वीज आणि फ्रांस ची सुमारे ७०% वीज अण्विक आहे. अर्थातचा त्यांना युरेनियम च्या साठ्यांवर सत्ता हवी आहे. अमेरिकेने युक्रेन युद्धात रशियन तेलावर निर्बंध घातले पण रशियन युरेनियम निर्यातीवर नाही!
यामुळे फ्रान्स हे युरेनियमचे साठे हातातून जाऊ देणार नाही आणि कदाचित हवाई हल्ले करून परत सत्ता हस्तगत करेल अशा अटकळी बांधल्या जात आहेत.

(मराठीमध्ये निजर या देशाचे नाव नायजर असे घेतले जाते. पण मी ऐकल्यानुसार याचा उल्लेख निजर असाच आहे.)