विक्रम संपथ या लेखकाचे सावरकरांवरील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले त्याचे नाव होते "सावरकर एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट "
त्याचा दुसरा भाग पण आहे "सावरकर या कॉंटेस्टेड लेगसी"
अतिशष्य स्पष्ट शब्दात आपले विचार मांडणारे व्यक्ते हि ते आहेत
द प्रिंट च्या शेखर गुप्ता यांनी त्यांची घेतलेली हि मुलख्खात नक्की पहा
https://www.youtube.com/watch?v=mem1aZu13Wg&t=1353s
हि मुलखात पाहिल्यावर मला दोन गोष्टी वाटल्या १) शेखर गुप्ता ना एक तर पश्चताप तरी झाला असावा कि त्यांनी संपथ यानं बोलवले किंवा २) त्यांच्या आतापर्यंतचं विचारसरणी कुठे तरी थोडी हलवली गेली असावी आणि सामान्य न्यानात भर पडली असेल
शेखर गुप्तांनी अनेक गुगली टाकले पण संपत यांनी चोख फलंदाजी केली
मजा आली
प्रतिक्रिया
23 Jul 2021 - 8:23 am | मनो
अगदी हेच लिहायला खरडफळ्यावर जात होतो. अप्रतिम मुलाखत आहे, जरूर पहा.
23 Jul 2021 - 10:48 am | प्रदीप
ह्या मुलाखतीची माहिती देता देता, वायरने नेहमीचा बातमी/ मथळे डिस्टॉर्ट करण्याचा आपला प्रघात सोडला नाही. त्यांनी बातमीच्या मथळ्यांत संपथच्या तोंडी असे वक्तव्य टाकले की, 'सावरकर आज असते, तर त्यांना भाजपमध्ये अजिबात स्थान मिळाले नसते'. ह्यावर तात्काळ संपथने त्याच्या ट्वीटमधे खुलासा केला, की त्याने 'आजच्या सर्वच राजकारणांत-- म्हणजे त्यांत सर्वच पक्ष आले-- सावरकरांना स्थान नसते' असे आपण म्हटले होते. व मग त्याने, 'वायर'ने आपला मथळा योग्य तर्हेने बदलावा ही मागणी केली. ती वायरने नंतर पूर्ण केली, असे दिसते.
23 Jul 2021 - 2:25 pm | शा वि कु
शेखर गुप्ता यापूर्वी सावरकरांच्या विरोधात काय बोलले कि आज त्यांची विचारसरणी बदलली आहे असे तुम्हाला वाटते ?
24 Jul 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा
मुलाखत पहायला उद्युक्त करणारा धागा.
⚡
लवकरच पाहिन मुलाखत.
24 Jul 2021 - 5:39 pm | गॉडजिला
खरं आहे... फलंदाज अनुभवी निघाला
25 Jul 2021 - 8:11 am | मनो
दुसरा 'सामना' बरखा दत्त यांच्याबरोबर काल झाला. अवघड पीचवरही संपत यांनी बाऊन्सर, नोबॉल काही सोडले नाहीत. इथे जरूर पहा
https://youtu.be/Mtp-tP1q1pY
26 Jul 2021 - 5:19 am | चौकस२१२
https://www.youtube.com/watch?v=fsCVYhehdQk
याठिकाणी जुंपली आहे टिपू सुलतान वरून , संपत फारसे बोलले नाहीत पण पुढे ते टिपू सुलतान वर हि लिहणार आहेत
26 Jul 2021 - 5:33 am | चौकस२१२
आता कुमार केतकर . कुबेर , डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या बरोबर एक एक सामना झाला तर पाह्यला आवडेल ...!
26 Jul 2021 - 8:34 am | प्रदीप
पाहिल्या. दोन्हीत संपथ अतिशय संयत बोलत आहेत, शांतपणे मुद्दे खोडत आहेत असे दिसले.
मात्र दोन मुलाखतकारांच्या वर्तनांत फरक जाणवला. खरे तर दोघेही एकाच पंथातले. पण गुप्ता बरेच चलाख आहेत. आपण नि:ष्पक्ष आहोत, असे दाखवण्यापुरते का होईना, ते समोरच्या बाजूस ऐकून घेतात, मान डोलावतात. बरखाला अजिबात राहवत नव्हते. तिने तिची विचारसरणी झाकायचा अजिबात प्रयत्न केला नाही.
26 Jul 2021 - 9:33 am | चौकस२१२
हो बरोअबर दोघेही हुशार आहेत पण संपत यांचे मुद्देच इतके स्पष्ट आहेत कि बरखा ची तर "दुष्मन कि जो वाट लावली .." झाले
खास करून बरखा चे सी ए ए ची तुलना वैग्रे मुद्दे इतके हास्यस्पद ...
26 Jul 2021 - 9:36 am | चौकस२१२
अभ्यासाचा एक मुद्दा असा दिसला कि संघ जिवंत राहिला आणि वाढला पण हिंदुमहासभा नामशेषश झाली याची करणे ?
खरे तर सावरकर काही कर्मठ संघी लोकांनपेक्षा जास्त विन्य्यानवादी आणि सर्वसमावेशक होते ...