स्मरणरंजन आणि कल्पनाविस्तार (१)

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
19 May 2021 - 6:35 pm
गाभा: 

चालू घडामोडींवर काथ्याकूट करून कंटाळला आहात काय ? चला तर मग थोडे स्मरणरंजन करू.
…..
...
...
....
....
ओळखा किंवा कल्पनेने लिहा !

खाली एका घटनेसंदर्भातील चित्र आहे. ही घटना 2001 ते 2005 या कालखंडातील आहे. सदर घटनेसंदर्भात वृत्तपत्रात काही मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्यासोबत हे चित्रही छापलेले होते.

ok

तुम्हाला दोन पर्याय आहेत :
१. ही घटना अचूक ओळखा व तिच्याबद्दल थोडक्यात लिहा. किंवा,
२. ओळखता येत नसेल तर अंदाजाने किंवा कल्पनेने या चित्राला व त्या कालखंडाला अनुरूप अशी घटना तयार करा.
…..

संबंधित घटना अचूक ओळखल्यास कौतुक आहेच, पण ते न जमल्यास प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल !
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण 24 तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

माझे उत्तर २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही.

धन्यवाद !

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

19 May 2021 - 7:16 pm | आनन्दा

BPCL ची निर्गुंतवणूक?

कुमार१'s picture

19 May 2021 - 7:18 pm | कुमार१

माझे उत्तर २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही.

तुम्ही लिहा एखादा परिच्छेद !

आनन्दा's picture

19 May 2021 - 7:23 pm | आनन्दा

हम्म
हा माझा अंदाज आहे.
2000 च्या आसपास सरकारने जेव्हा भारत पेट्रोलियम ची निर्गुंतवणूक केली तेव्हा त्याच्या लिस्टिंग ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल एखाद्याने हे चित्र काढलेले असू शकते असा माझा अंदाज आहे.

प्रचेतस's picture

19 May 2021 - 7:53 pm | प्रचेतस

उपरोक्त काळात भारत पेट्रोलियमने व्हिएतनामच्या कंपनीला दोन लाख टन नाफ्ता पुरवण्याचा करार केला होता, शिवाय स्पीड पेट्रोल सुद्धा इन्ट्रोड्युस केले होते. ह्या दोन घटनांपैकी एकावर हे चित्र असावे असे वाटते.

अमर विश्वास's picture

19 May 2021 - 10:25 pm | अमर विश्वास

माझ्या मते Speed 93 पेट्रोल लाँच ?

कुमार१'s picture

20 May 2021 - 7:48 am | कुमार१

सूचना

तुम्हाला जे काय वाटतं ते प्रश्नचिन्ह न वापरता बिनधास्त लिहा !
दिलेली माहिती मर्यादित आहे. प्रत्येकाचे कल्पनाचित्र वाचण्यात मजा येणार आहे.
घटना ओळखणं हा भाग दुय्यम आहे.

माहितगार's picture

20 May 2021 - 8:49 am | माहितगार

पुष्पक विमानाच्या अपडेटेड व्हर्शन मध्ये बसून साक्षात इंद्र गुजराथेतील इंद्राला आशिर्वाद देऊन परतताना कच्छच्या वाळवंटातील भारत पेट्रोलीयमचे पेट्रोल भरून घेऊन परतीच्या उड्डाणाला निघाल्याचेच चित्र आहे ते!

गॉडजिला's picture

20 May 2021 - 8:53 am | गॉडजिला

इट गीव्ह्ज यु विइंग्स... घटना ओळखता येत नाही

जिथं तुम्ही रुपये 500 अथवा अधिक रुपायांच पेट्रोल भरलं तर परदेश वारी जिंकायची संधी मिळते... काळ साधारण 2004 ऑगस्ट/सप्टेंबर महिना

इरसाल's picture

20 May 2021 - 9:27 am | इरसाल

कार आणी विमान आणी त्यांना फुटलेले पंख असही असु शकेल.
मेबी मारुती आणी एअर इंडियाचा काही संबंध आहे का ( भारत पेट्रोलियम) ?

कुमार१'s picture

20 May 2021 - 9:27 am | कुमार१

आता खरी धमाल येत आहे.
कल्पनाविलास तो हाच......

या धाग्याचे आयुष्य मर्यादित आहे.
तेव्हा येऊद्यात अजून ...
धन्यवाद

गोंधळी's picture

20 May 2021 - 10:27 am | गोंधळी

विमानचालन ईंधन...

लई भारी's picture

20 May 2021 - 11:14 am | लई भारी

काहीतरी डोक्याला खाद्य दिल्याबद्दल धन्यवाद :-)

मराठी व्यंगचित्र किंवा बातमीला पूरक चित्र दिसतेय म्हणजे जाहिरात नसावी. त्यावेळची एखादी घटना असेल. बहुधा त्या दशकात निर्गुंतवणुकीचा प्रयत्न झाला होता पण निर्णय झाला नाही कारण अलीकडेच खाजगीकरणाची बातमी आली. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी बातमी असेल कदाचित.

उत्सुकता आहे, बघूया!

कुमार१'s picture

20 May 2021 - 4:36 pm | कुमार१

फक्त दोन तास राहिले....

सुरिया's picture

20 May 2021 - 5:08 pm | सुरिया

१९२८ ला सुरू झालेल्या एका सेवेची म्हणजेच विमानाची इंधने भरणे ह्याची ७५ वर्षे भारत पेट्रोलियम ने पूर्ण केली. भारतीय विमानसेवा चां कालावधी ह्याइतकाच जवळपास आहे. त्यानिमित्त २००३ मध्ये सुवर्ण महोत्सवी भारत पेट्रो लियम उडान ह्यासंबधित चित्र असावे ते.

कुमार१'s picture

20 May 2021 - 6:33 pm | कुमार१

सर्वप्रथम मी इथे सहभागी झालेल्या वरील सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्वांनी छान तर्क लढवून उत्तरे दिली आहेत. दिलेली माहिती तशी मर्यादित होती. त्यामुळे संबंधित घटना ओळखले जाणे तसे अवघड होते.

आता मी थेट उत्तर देण्याऐवजी माहितीची थोडी भर घालतो. मला खात्री आहे की त्यानंतर क्षणार्धात तुमच्यापैकी कोणीतरी प्रत्यक्ष घटना ओळखेल !

वृत्तपत्रातील सदर मजकूर मार्च 2004 मधील आहे. चित्रात दाखवलेली कार ही फेरारी आहे. ती एका अतिप्रसिद्ध व्यक्तीला परदेशातून भेट मिळाली होती. ती भारतात आणताना वादंग झाले होते...

आलं का लक्षात ? 😀

आणि आता सांगा बरं भारत पेट्रोलियमचा संबंध काय असावा…….

सचिन तेंडुलकरच्या फेरारीला ९७ ऑक्तेन इंधन भारत पेट्रोलियम मुंबई रिफायनरी ने उपलब्ध करून दिले होते. स्पेशल केस म्हणून.

कुमार१'s picture

20 May 2021 - 6:50 pm | कुमार१

सुरिया, छान !

सदर फेरारीसाठी भारत पेट्रोलियमने खास वेगळे पेट्रोल तयार केले होते. वर ते पेट्रोल सचिनला फुकट देणार अशी घोषणा केली होती !
या बातमीवर टीकाटिपणी करणारे ते वाचकांचे पत्र होते.

सुरिया's picture

20 May 2021 - 7:41 pm | सुरिया

फेरारीमुळे लक्षात आले अन्यथा कळाले नसते.
त्या फेरारीला ग्राउंड क्लीअरन्स कमी असलेने आरटीओ पण परमिशन देत नव्हते असे ऐकलेले. इंपोर्ट ड्युटी माफ करणेबाबतही वादंग झालेला. सचिन तेंव्हा फियाटची जाहिरात करायचा. बहुतेक पालिओ. सचिनच रेसर कार वेड म्हणून फियाटने त्यांची फेरारी सचिनला दिलेली.

लई भारी's picture

20 May 2021 - 7:08 pm | लई भारी

भारत पेट्रोलियम बद्दलची बातमी त्या गदारोळात बघितलीच नव्हती!

कुमार१'s picture

20 May 2021 - 7:48 pm | कुमार१


97 Octane


>>
हे काय विमानाचे इंधन असते काय ?

फक्त विमानाचे असे नाही पण उच्च दर्जाची इंजिने जिथे वापरली जातात तिथे जास्त ऑक्टेन रेटिंगचे पेट्रोल वापरले जाते.
भारत पेट्रोलियम म्हणते
Your high-end cars be it sports or luxury, both have high compression engines that normal octane petrol cannot support. Normal octane petrol ignites sooner that the piston could be fully compressed. It leads to knocking and loss of power, reducing responsiveness of your car. Speed 97, with its higher octane rating delays the ignition of fuel-air mixture, giving you a smooth driving experience, which your high-end car is capable of delivering to you.
ऑक्टेन नंबर इंधनाच्या ज्वलनाचा दर्जा दर्शवतो. आपले रेग्युलर पेट्रोल ८७ ऑक्टेन असते. ९९ ऑक्टेनपर्यंत सध्या मिळते. स्पीड वगैरे मध्ये काही अधिक अ‍ॅडिटिव्ह्ज मिसळलेले असतात जे कार्बनचे प्रमाण घटवून ज्वलनास मदत करतात.

कुमार१'s picture

20 May 2021 - 8:47 pm | कुमार१

धन्यवाद !

वामन देशमुख's picture

20 May 2021 - 8:02 pm | वामन देशमुख

मी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण प्रतिक्रियाज् वाचत होतो. स्मरणरंजन आणि कल्पनाविस्तार ही कल्पना आवडली.

अजून असे काही नमुने असले तर येऊ द्या.

चामुंडराय's picture

20 May 2021 - 8:15 pm | चामुंडराय

ओहह... ही सचिनची फरार झालेली फेरारी आहे होय !!

इतकं भारी उत्तर होतं तर.. :)

गॉडजिला's picture

20 May 2021 - 10:24 pm | गॉडजिला

नॉट अ सिंगल हिंट इन अ पिक द्याट इटीज रिलेटेड टू सचिन

सुखीमाणूस's picture

20 May 2021 - 11:11 pm | सुखीमाणूस

धन्यवाद स्मरणरन्जनाबद्दल.
सध्याच्या काळात गरज आहे अश्या बदलाची..

सचिनच्या फेरारी वर एक शिनूमा बेतला होता ना?
राजकीय पुढाऱ्याच्या दिवट्याला लग्नात वरातीसाठी फेरारी पाहिजे असते तेव्हा सचिनची फेरारी पळवून आणतात असे काहीसे कथानक होते. कोणाला आठवतोय का?

तुषार काळभोर's picture

21 May 2021 - 12:09 pm | तुषार काळभोर

त्यात उर्मिला धनगरच्या आवाजात गाणं होतं ज्यावर विद्याताई बालन थिरकल्या होत्या.

कुमार१'s picture

21 May 2021 - 8:03 am | कुमार१

उकल झाल्यानंतर धाग्यावर आलेल्या सर्वांचेही आभार !

गॉजि,
वर म्हटल्याप्रमाणे माहिती मुद्दामूनच मर्यादित दिली. त्यामुळेच तुमची “पाचशे रुपयात परदेशवारी” ही कल्पनेची सुंदर भरारी आम्हा सर्वांना वाचता आली !
:))
किंबहुना ही ओळखण्याची स्पर्धा नव्हतीच. सर्वांनीच केलेल्या कल्पनारंजनामुळे खरी मजा आली. जर सुरुवातीसच मी फेरारी मधला ‘फ’ जरी उच्चारला असता, तर धाग्याचा पाच मिनिटात निकाल लागला असता. मग आपण सर्व रंजनाला मुकलो असतो.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.