हिरव्या हरभऱ्याची आमटी

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
26 Mar 2021 - 5:45 pm

हिरव्या हरभऱ्याची आमटी म्हणजेच सोलाण्याची आमटी हो! असे हरभाऱ्याचे घाटे भरभरून शेतात आले की कोवळे उपटून आणून मस्त आमटी असा दर आठवडी बेत झालाय होता बघा.बर गंमत अशी की सोललेल्या घाट्यापासून नुसते खाता येतात,चटपटीत तिखट (आमच्या ह्यांना असे आवडते ते पण कधीतरी;()करता येतात.मला बाई आमटीच आवडते मस्त हिरवी आणि त्याच्यावर लाल तर्री..

तर फावल्या वेळेत बातम्या बघत बघत दोन वाट्या हिरवे कोवळे लुसलुशीत हरभरे सोलायचे.

-मसाला:
साहित्य :एक कांदा,एक टमाटे,५-६ मिरच्या,७-८ लसूण पाकळ्या,खोबरे गरजेनुसार,जिरे,कोथिंबीर.
कृती:पापड भाजायच्या जाळीवर कांदा आणि टमाटे दोन भागात चिरून दहा मिनिटे भाजून घ्यायचे... मिक्सर मधून वाटण काढतांना त्यात तेलात परतून घेतलेले खोबरे,लसूण,मिरची,जिरे आणि कोथिंबीर टाकून मग हा कच्चा मसाला बनवायचा.
-मुख्य नायक हिरवे हरभरे यांना लोखंडी कढईत ओतायचं मस्त खरपूस भाजून घ्यायचं.(लक्ष द्या जाळू नका)
आणि ओबड धोबड वाटून घ्यायचं.

-आमटी कृती
आता कुकर घ्यायचा ,हो कढई मध्ये हरभरा जरी कोवळा असला तरी नीट शिजत नाही (तो जरा पचायला जड असतो)
२ चमचे तेल घ्यायचे ,मोहरी ,हळद,कडीपत्ता,हिंग फोडणी तडतडली कि तयार कच्चा मसाला वाटण टाकायचे.तेल सुटू पर्यंत परतून घ्यायचे. आता मुख्य नायक हरभरेबुवा यांना यात ओतायच..परतून घ्यायचे आई ,मावशी,सासू ह्यांनी त्यांनी दिलेले घरगुती दोन चमचे मसाले घालायचे...असे मसाले नाही ..काही गोष्ट नाही..एव्हरेस्टचा भाजी मसाला वापरा.

-सरप्राईज इलेमेंट
कैरीताई ..हो आता कैरीबाई सहज मिळतेय .तेव्हा छोटी वाटी साल वगैरे काढलेली मध्यम आकारात चिरलेली कैरी टाकायची ..मस्त चव आणि इसेन्स येतो आमटीला(सध्या अशा पद्धतीने कैरी इतर आमटीतही वापरू शकता)थोडेच पाणी घालून दोन-तीईन शिट्या होऊ द्यायच्या.
-गरम भाकरी आणि कांद्याच्या फोडी बरोबर आणि आमटीवर लिंबू पिळून ही वरपायची आमटी...अहाहा.
-भक्ती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 6:29 pm | मुक्त विहारि

कशी बोलावतांय?

सध्या हरभरे वाळले आहेत ,पुढच्या वर्षी पुन्हा लावले तर नक्की बोलवेन.

गणेशा's picture

26 Mar 2021 - 6:37 pm | गणेशा

फोटो दे कि भक्ती...

गणेशाचा या वेळी जेन्युईन गणेशा झालाय =))

Bhakti's picture

26 Mar 2021 - 10:06 pm | Bhakti

वाह! गणपा तुम्हाला पाहून आनंद वाटला!

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 10:07 pm | मुक्त विहारि

मस्तच ....

ह्यापुढे, तुझी आठवण आली की, पाककृती टाकत जाईन ....

जातीचा खव्वय्या आहेस हो, इतर वेळी कुठे का असेनास, पाककृती दिसली की, येतोस बरोबर ....

गणेशा's picture

26 Mar 2021 - 10:44 pm | गणेशा

किती दिवसांनी?
काय चालू आहे :-)

येऊद्या पाककृती तुमच्या

Bhakti's picture

26 Mar 2021 - 10:03 pm | Bhakti

solaani

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 10:09 pm | मुक्त विहारि

हजेरी लावली आहे...

सौ सोनार की, एक लोहार की...

पाककृतीवर, गणपाने प्रतिसाद दिला, म्हणजे 1000 प्रतिसाद मिळाले ....

प्रचेतस's picture

27 Mar 2021 - 8:59 am | प्रचेतस

खल्लास आहे.

Bhakti's picture

27 Mar 2021 - 10:09 am | Bhakti

:-) एकदम खल्लास!!

श्रीरंग_जोशी's picture

27 Mar 2021 - 7:29 am | श्रीरंग_जोशी

पाककृती आवडली.

या आमटीमुळे ताज्या तुरीच्या दाण्यांच्या आमटीची आठवण झाली :-).

Bhakti's picture

27 Mar 2021 - 10:08 am | Bhakti

हो मी करणार आहे एकदा ताज्या तुरीच्या दाण्यांच्या आमटी