काय पाठवू पोस्ट?

Primary tabs

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 Mar 2021 - 2:30 am

(WA ग्रुपस वर incompatible ठरलेला
हताश उत्साही)

काय पाठवू पोस्ट?
काय आठवू गोष्ट?

राजकारण, तुम्हाला सोसत नाही
कविता ...तुम्हाला पोचत नाही
स्पोर्टस् न्यूज, तुम्हाला सवडच नाही
सायंस न्यूज, तुम्हाला आवडत नाही

गाणी, तुम्हाला भावत नाही
इतिहास, तुम्हाला मावत नाही
आरोग्य dieting, पायी चुरडता
रेसीपी नवी,तुम्ही नाकं मुरडता

प्रवास व्लाॅग, तुम्ही थांबू या नेता
प्रेरणादायी कथा, तुम्ही जांभया देता
गार्डनींग, तुम्हा कंटाळा येतो
शेती,म्हणता का शाळा घेतो

स्टाॅकमार्केट. तुम्ही विकत नाही
ट्रेडींग, तुम्ही शिकत नाही
चावट इनोद,तुम्ही शिव-शिव करता
ट्विटर, म्हणे काय टिवटिव करता

म्हणून पाठवतो गणप्याचे भंपक जोक्स
दर्जा माझा नाही घसरला,
मला गमवायचे नाहीत काही लोक्स....

कला

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

5 Mar 2021 - 7:58 am | उपयोजक

शेवट आवडला :)

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:57 am | मुक्त विहारि

सध्या कुणाचा पापड, कशामुळे मोडेल? ते काही सांगता येत नाही...

गणेशा's picture

5 Mar 2021 - 9:00 am | गणेशा

हा हा हा..
भारी

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Mar 2021 - 10:08 am | ज्ञानोबाचे पैजार

सहमत आहे,
त्या सोमिच्या नादाला न लागलेले कधिही चांगलेच
पैजारबुवा,

Bhakti's picture

5 Mar 2021 - 11:56 am | Bhakti

काय देऊ रिप्लाय?
तुझा पोस्टीचा अत्याचार
अनेकदा सहन होत नाय...

पण कदर तुझी हाय
लक्षात नात्यांची जाणिव
शेवटी हाय काय नाय काय ..
.
.
म्हणून स्मायली जोडत पाठवत राही ्
(शीघ्र कवी भक्ती):)

कविता पोचली.छान!

राघव's picture

5 Mar 2021 - 1:41 pm | राघव

मस्त! :-)

अवांतरः
ते सोमि म्हणजे काय ते काही कळले नाही बुवा.. राघवा, तुझा PSPO न व्हावा म्हणजे मिळवली!

उपयोजक's picture

5 Mar 2021 - 2:48 pm | उपयोजक

सोमि = सोशल मिडीया

राघव's picture

8 Mar 2021 - 12:34 am | राघव

झालाच शेवटी! :-)

कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2021 - 6:12 pm | कर्नलतपस्वी

आवडली