Injury ते SR

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 9:49 pm

सदर लेख हा माझा लाईफ पार्टनर श्रीनिवास याने लिहिला आहे. मी फक्त शब्दांकन करण्यास हातभार लावला.

२०१३-१४ ची गोष्ट आहे. सह्याद्री मधल्या अनवट वाटा ढूंढाळताना छोटासा अपघात होऊन गुडघा दुखावला गेला होता. नेहमीप्रमाणेच त्याच्याकडे दुर्लक्ष करून ट्रेकिंग चालूच होत. पण २०१५-१६ साली पुन्हा गुडघ्याच्या पाठीमागच्या भागात दुखायला लागलं. शेवटी झक मारीत डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर नि तपासून MRI करायला सांगितल. weakness in posterior horn medical meniscus असा रिपोर्ट आला. म्हणजेच गुडघ्याच्या पाठीमागचा भाग सुजतो, लॉक होतो, वेदना होतात. रिपोर्ट वाचून डॉक्टर नि लगेचच मला ट्रेकिंग बंद करायचा सल्ला दिला. ट्रेकिंग करताना मोठे मोठे दोर, पाण्याच्या बाटल्या आणि इतर बरच सामान घेऊन आम्ही जायचो. त्यामुळे गुढघ्याला जास्त त्रास होऊ शकतो म्हणून ट्रेकिंग बंद करायला सांगितलं. त्याचबरोबर रनिंग, क्लाइंबिंग, फुटबॉल असे पायावर जोर येणारे खेळ बंद करायला सांगितले. त्याऐवजी रिक्रिएशनल स्पोर्ट्स अर्थात स्विमिंग, सायकलिंगला प्राधान्य द्यायला सांगितले. जीवावर उदार होऊन ट्रेकिंग सोडून दिल आणि सायकलिंग कडे वळलो. शाळा, कॉलेज नंतर एवढे वर्षांनी सायकल हातात घेतली. आता हा नवीन उद्योग करायचा तर त्याची माहिती असायला हवी. मग इंटरनेट मदतीला आलं. तसच इकडे तिकडे करून माहिती गोळा करायला सुरवात केली. सुरवातीला एक सायकल घेऊन हळू हळू सुरवात केली. या सगळ्यात मध्ये १/२ वर्ष गेली. गुडघेदुखी पूर्ण थांबली. मी देखील सायकलिंग करायला सरावलो. आता हा नवा खेळ आवडू लागला होता. त्यातील साहसे खुणावत होती. नवीन नवीन रस्ते सायकलवरून पार करत होतो. अगदी थोड्याच दिवसात सायकलिंग आवडू लागल. सायकलिंग करणारे नवीन नवीन मित्र मिळत गेले. दरम्यान मुंबई सोडून गावाकडे राहायला आलो. मग काय हाताशी भरपूर वेळ, चांगले रस्ते, कमीत कमी गर्दी आणि जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ असे असल्यावर काय मग सायकल जोरातच पळायला लागली. सकाळी कॉलेजला जाऊन यायचं संध्याकाळी सायकल घेऊन फिरायचं असं रुटीन सुरु झालं.

मध्यंतरी मित्राबरोबर चिपळूण - गोवा राईड करून आलो. एक सुंदर अनुभव गाठीशी आला. दरम्यान माझं बघून बघून माझी सहचारिणी, धनश्री देखील उत्सुकता दाखवायला लागली. हळू हळू तिला देखील आवड निर्माण झाली. तिलाही नवीन सायकल घेऊन दिली. बायकोबरोबर १/२ जवळपासच्या गावांना जाऊन आलो. तिलाही जमायला लागलं. मुलगाही होताच बरोबर त्यामुळे रोजचा राऊंड व्हायला लागला. कधी एकटा कधी सहकुटुंब असे सायकलवरून छोट्या मोठ्या राईड करू लागलो.
त्यातच सायकल सायकल ग्रुप मध्ये माझा प्रवेश झाला. इथे तर एक से बढकर एकेक अवलिया होते… SR काय Deccan Clifhanger काय! हे सायकल वाले मित्र अगदी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास, मार्गदर्शन करण्यात एक्स्पर्ट आहेत आणि बजेट वाढवण्यात सुद्धा… माझ्या सायकलिंगच्या ज्ञानात चांगलीच भर पडली. एकदा तरी २०० किमी BRM करायची हे अधोरेखित झालं.

मार्च २०१८ ला TriGoa Foundation ची २०० किमी BRM (तांबडी सुर्ला) जाहीर झाली. यावेळी आपण एकतरी BRM करायचीच या ध्यासाने नाव नोंदवलं. जोरदार तयारी करायला सुरवात केली. त्यासाठी नवीन सायकल सुद्धा घेतली. रोज संध्याकाळी कमीत कमीत ५०किमी चा राउंड मारायचा. सुट्टीच्या दिवशी १०० किमी. असे सगळे मिळून १५/२० राउंड झाले आणि गुडघा दुखायला लागला. १/२ दिवस विश्रांती घेतली. बरं वाटलं. परत सुरवात केली तर परत त्रास सुरु. BRM जवळ येत चाललेली. स्पर्धे दरम्यान काही त्रास नको म्हणून वेळीच डॉक्टरला दाखवायला पुण्याला गेलो. याही वेळी डॉक्टर नि MRI काढायला सांगितला. रिपोर्ट आल्यावर जुने दुखणे परत उफाळून आल्याचे दिसले. Posterior horn medical meniscus ला tear दिसत होता. (गुढघ्याच्या मागच्या बाजूला आतमध्ये छोट्याश्या एक लेअरला tear होत )ऑपरेशन करावं लागेल. प्रचंड वाईट वाटलं. BRM ला तर जात येणार नव्हतंच पण कदाचित आता सायकलिंग पण बंद होतंय कि काय अशी भीती वाटली. आणखी एका डॉक्टरचा सल्ला घेतला. त्यांनीही जवळपास सारखंच निदान केलं. शेवटी पायावर ताण देऊन आयुष्यभरच दुखणं मागे लावून घेण्यापेक्षा आता स्पर्धा सोडून देऊ मग बघू काय ते असा विचार केला. शेवटी मे महिन्यात डेरवण हॉस्पिटलला Arthroscopy झाली. सुदैवाने tear नव्हता त्यात. MRI रिपोर्ट tear आहे म्हणत होता, Arthroscopy नाही म्हणत होती. मी माझ्या बाजूच काय आहे ते बरोबर अशी समजून घातली. डॉक्टर नि Physiotherapy सांगितली आणि पायावर ताण न देता सायकलिंग करायला परवानगी दिली. म्हणजेच BRM माझ्यासाठी नाही. फक्त आनंदासाठी इकडे तिकडे जायला सायकल वापरू शकता.
मे महिन्यात ऑपरेशन झाल्यावर पावसाळा असाच गेला. सायकल शिवाय चैन पडत नव्हतं. Physiotherapist दिलेले सगळे exercise चालूच होते. पायावर ताण तर द्यायचा नव्हता, मग यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक बाईक LightSpeed Rush घेतली. जेव्हा चढ येतील रस्त्याला तेव्हा पायावर ताण येऊ नये म्हणून बॅटरीचा support घ्यायचा. हा प्रकार आवडला होता. सायकलिंग बंद नाही झालं आणि तरीही लांब लांबचे प्रवास करता येत होते.

याच सायकल वर मी मयुरेश पालकर सोबत स्टॅचू ऑफ युनिटी ते मुंबई असा प्रवास सायकलवरून केला. हा एक अत्यंत सुंदर अनुभव होता. त्यामुळे आपण सायकलिंग नक्कीच करू शकतो या आत्मविश्वासास बळ मिळालं.

त्यानंतर चिपळूणला आसपास राइड्स सुरु होत्या मग आला Covid 19 मी, तेजानंद आणि स्वप्नील मिळून आसपासचे अनेक परिसर पालथे घातले. July मधे चिपळूण सायकलिंग क्लबची (Chiplun Cycling Club) स्थापना होऊन मेंबर्स वाढायला लागले. Cycling चालू होतंच आणि BRM चं भूत गुटगुटीत होऊन पुन्हा मानगूटीवर बसलं.

October end ला सायकल सायकल ग्रुप वरचा मित्र श्रीहास घरी येऊन गेला. त्याच्याकडून काही महत्वपूर्ण टिप्स घेतल्या. तो केव्हापासुन माझ्या या स्वप्नाला खतपाणी घालत होता. तो स्वतः SR असल्याने त्याला यापाठची कळकळ कळत होती. मी घेत असलेली मेहनत पण दिसत होती. "करून टाक रे तू. २०० काय ३००, ४००, ६०० सुद्धा होतील सहज. एक BRM काय SR होशील तू." तो येताना स्वतःची रोड बाईक FELT VR50 घेऊन आला होता. जाताना माझ्यासाठी ती ठेवून गेला. अगदी या बोलीवर कि तुझी SR झाली कि परत कर मला. (आता त्याच्या Cycle ला मी कूळ लावून घेतलं आहे)
Daily ride ला मुंढ्यातल्या टपरीवर Chiplun Cycling Club च्या मीटिंग ठरायच्या आणि त्यातच परत एकदा BRM ची चर्चा रंगात आली.यावेळी माझ्याबरोबर बरेचसे मेंबर्स उत्सुक होते. तेजानंद, स्वप्नील तर होतेच शिवाय चिपळूणचेच रहिवासी असलेले प्रसाद आणि विक्रांत हे आलेकर बंधू, मुकुल सोमण होते. पण आपापली कामे सांभाळत एकत्र BRM जमणं शक्य दिसत नव्हतं. मग मी, तेजानंद, स्वप्नील आणि ओमकार आम्ही Konkan Randonneur च्या Sawantwadi – Kharepatan – Sawantwadi या २०० किमी BRM (29th Nov, 2020) साठी नोंदणी केली. धनश्री पण उत्साहात होती. पण २०० किमी जास्त वाटत होते तिला. तिला सपोर्ट करण्यासाठी मग आम्ही हि स्पर्धा टँडम सायकलवर करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे हि स्पर्धा पार पडली. माझं "एकदातरी २००किमी BRM करायची"हे स्वप्न पूर्ण झालं. (Stipulated time: 13.30 hrs and my timing was 11.30 hrs) पायाला कोणतीही दुखापत झाली नाही. आत्मविश्वास चांगलाच वाढला.

ये दिल मांगे मोअर
३-४ दिवस गेले नि लगेच ३००किमी ची चर्चा सुरु झाली. हि BRM सावंतवाडी - राजापूर - सावंतवाडी (12th Dec, 2020) अशी होती. यावेळी मी, स्वप्नील आणि ओंकार तिघे होतो. हि स्पर्धा देखील यशस्वीरीत्या पूर्ण केली. (Stipulated time: 20 hrs and my timing was 18.12 hrs) लगेच पुढे ४०० किमी स्पर्धा खुणावत होतीच (26th Dec, 2020) सावंतवाडी - आंबोली – आजरा - कोल्हापूर - सांगली - आणि same route to सावंतवाडी असा मार्ग होता. हा टप्पा देखील उत्साहात पार पडला. (stipulated time: 27 hrs and my timing was 26.30 hrs)

SR साठी फक्त ६००किमी ची BRM बाकी होती. Konkan Randonneur ची ६००किमी BRM उशिरा असल्याने आणि कॉलेज सुरु झाल्याने एवढ्या उशिरा जमणार नाही म्हणून मग Pune Randonneurs च्या पुणे – संकेश्वर - पुणे या स्पर्धेसाठी नाव नोंदवलं. यावेळी बरोबर स्वप्नील नव्हता पण अमर आणि प्रसाद हे आलेकर बंधू होते आणि सायकल सायकल ग्रुप वरील आनन्द मोने होते. पुणे युनिव्हर्सिटी पासून सुरु झालेली स्पर्धा संकेश्वरहुन जाऊन परत पुण्याला औंधला संपली (stipulated time: 40 hrs and my timing was 38 hrs). स्वागताला धनश्री आणि आमचा मित्र गजानन होतेच. बाबा फोनची वाट बघत होते. मी पोचल्यावर टाळ्या वाजवून स्वागत झालं. हातात 600 kms आणि Super Randonneur चे banner घेऊन फोटोज काढून झाले. श्रीहासचा विडिओ कॉल झाला लगेच. अनेकांचे अभिनंदनाचे फोन आले. अजूनही येत असतात.

अशा तऱ्हेने Super Randonneur series जवळपास दीड महिन्यात पूर्ण झाली. त्या क्षणीच्या भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, त्या अनुभवायलाच हव्यात!
योग्य व्यायाम, योग्य खाणं पिणं, योग्य मार्गदर्शन, इच्छाशक्ति आणि सातत्य असेल तर ध्येय नक्कीच गाठता येतं!

या injury ते SR च्या सगळ्या प्रवासात मला धनश्री, ईशान, बाबा, माझ्या सासरची मंडळी आणि श्रीहास यांचा पाठिंबा लाभला. तसेच सायकल सायकल ग्रुप आणि चिपळूण सायकलिंग क्लब यांच्याकडून सातत्याने मिळालेल्या शुभेच्छामुळे मी आज SR होऊ शकलो.

‘बीआरएम’च्या इतिहासाविषयीच माहिती घेताना त्यामागचं तत्त्वज्ञान जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. Brevets de Randonneurs Mondiaux या मूळ फ्रेंच वाक्याचा इंग्रजी अर्थ ‘वर्ल्डवाईड हायकर्स पेटेन्टस्’ असा होतो म्हणजेच ‘जगभर कुठेही दूरवर रपेटीला जाणारा’. खरं तर या वाक्यातूनच बऱ्याच गोष्टी समजायला सोप्या होतात.‘बीआरएम’ हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे. रँडोनीअरिंग म्हणजेच स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग. पण ते करत असताना इतरांना मदत करणं आणि सहभागी सायकलस्वारासोबत स्पर्धा न करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. स्वत:सोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणं हा ‘बीआरएम’चा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा नव्हे. ठरवून दिलेलं अंतर ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणं ही एकमेव गोष्ट इथे लागू होते. कमीत कमी वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलस्वाराचं नावंही अंतिम यादीत पहिल्या क्रमांकावर न येता अक्षरक्रमाने येतं. ‘बीआरएम’चे २००, ३००, ४०० किंवा ६०० किलोमीटरचं अंतर हे डोंगराएवढं असतं. परंतु, वाटेत जर कुणाचा टायर पंक्चर झाला असेल तर त्याला मदत करणं, कोणी चहा किंवा खाण्यासाठी थांबलं असेल तर त्यांच्यासोबत त्याचाही आस्वाद घेणं आणि मग आपल्या वेगानुसार पुढे निघून जाणं, ही ‘बीआरएम’ची खरी मजा आहे. ‘बीआरएम’मध्ये प्रत्येक अंतरासाठी वेळ ठरवून दिलेली आहे. 200 kms = 13.30 hrs, 300 kms = 20 hrs, 400 kms = 27 hrs and 600 kms = 40 hrs.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

16 Jan 2021 - 10:09 pm | भ ट क्या खे ड वा ला

भन्नाट.....
ध्यास सातत्य झपाटलेपण वेड यांचा संगम
मस्त वर्णन .

डॉ श्रीहास's picture

16 Jan 2021 - 10:12 pm | डॉ श्रीहास

Proud of you brother .... स्वप्न बघणं आणि पूर्ण करणद, जीद्द लागते रे _/\_

सलाम.. इतर सर्वांसोबत डॉ. श्रीहासची साथ असल्यावर खूपच बळ मिळणार हे निश्चित..

निनाद आचार्य's picture

17 Jan 2021 - 10:31 am | निनाद आचार्य

तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. प्रेरणादायी लेख!

सौंदाळा's picture

17 Jan 2021 - 5:27 pm | सौंदाळा

जिद्द आणि चिकाटीला नमस्कार
तुमचे पूर्वीचे लेख पण वाचले आहेत.
दरम्यान मुंबई सोडून गावाकडे राहायला आलो
शक्य झाल्यास यावर लिहिलेत तर वाचायला आवडेल

मुक्त विहारि's picture

17 Jan 2021 - 6:10 pm | मुक्त विहारि

सलाम

बेकार तरुण's picture

18 Jan 2021 - 2:20 pm | बेकार तरुण

मस्तच... खूपच प्रेरणादायक लेख
हार्दिक अभिनंदन अन पुढील अनेक राईड्स साठी खूप खूप शुभेच्छा...

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2021 - 5:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

हार्दिक अभिनंदन,
आणि शुभेच्छा
पैजारबुवा,

SR साठी अभिनंदन. दिड महिन्यात SR झालास. मस्त.
लिहिलं पण छान.

भारतीय रस्ते, सायकल चालवण्यासाठी अतिशय अयोग्य आहेत, हा एक भाग

आणि

अक्कलशून्य, इतर वाहनचालक, हा दुसरा भाग.

सुरक्षितता, हा अतिशय दुर्लक्षित केलेला मुद्दा आहे.