आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले.

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
5 Jan 2021 - 5:57 pm

आज काय घडले...
मार्गशीर्ष व. ५
छत्रसाल बुंदेले यांचे निधन !
शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले.
याच्या वयाच्या चौदाव्या वर्षीच आईबाप निवर्तन होवून राज्याची वाताहात झाली होती. तेव्हां यांने 'नशीब' काढण्यासार्टी मोगल दरबारकडे धाव घेतली. मीर्झा जयसिंग याच्या पदरी तो राहू लागला. जयसिंगाबरोबर त्याने अनेक लढायांत पराक्रम करून दाखविला. परंतु पुढे मोंगल दरबारांतील बेइमानीपणा पाहून मोगलांच्या सेवेतून तो मुक्त झाला. याच वेळी श्रीशिवाजीमहाराज यांची आगऱ्याहून सुटका झाल्यामुळे त्यांचे नांव भारतांत दुमदुमून राहिले. तेव्हां छत्रसाल दक्षिणेत आला व शिकारीच्या निमित्ताने शिवरायांची याने भेट घेतली. यांची तेजस्विता पाहून आपले गमावलेले उत्तरेतील 'स्वराज्य' काबीज करण्यास श्रीशिवाजी राजांनी याला प्रवृत्त केले. याच प्रसंगी शिवाजी राजांनी यास एक तरवार भेट केली; आणि तिच्या जोरावर छत्रसालाने लढायांवर लढाया मारण्यास सुरुवात केली. तहवर खाँ, अनवर खां, सदरुद्दीन आदि शूर सरदारांचा पाडाव केला आणि यमुना व चंचळा या नद्यांच्या दक्षिण प्रांताचा म्हणजे सर्व बुंदेलखंडाचा हा मालक झाला.
सन १७३२ सध्ये अहमदशहा बंगश याने छत्रसालावर स्वारी केली. या वेळी छत्रसालांचे वय एक्याऐशी होते. स्वतःचे अंगी शक्ति न राहिल्याने या वृद्ध राजाने स्वातंत्र्य-रक्षणासाठी दक्षिणेतील बाजीराव पेशव्यांचे साह्य मागितले आणि छत्रसालाने त्याला पत्र लिहिलें।
-जो गति ग्राह गजेंद्रकी सो गति जानहुं आज ।
बाजी जात बुन्देल की राखो घाजी लाज -॥"
आणि या विनंतीप्रमाणे बाजीरावाने बंगशचा संपूर्ण पराभव केला. तेव्हां कृतज्ञता म्हणून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा याने बाजीरावास दिला. असे सांगतात की, त्या वेळी प्रसिद्ध असलेला भूषण कवि याच्या दरबारी गेला होता. त्या वेळी याने त्याच्या पालखीला खांदा देऊन त्याचा सत्कार केला.
१४ डिसेंबर १७३३
छत्रसाल बुंदेला

इतिहास