तोत्तोचान –एका चिमुकलीचे भावविश्व

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
16 Dec 2020 - 6:39 pm

अक्षरशः कोरोना काळात या पुस्तकाने एक सुंदर अशी आत्मशांती दिलीये.लहान मुलांचे निरागस भावविश्व सर्वांनाच आवडते.त्यांच्या असंबंध बडबडीने आपला वेळ फुलपाखारांसारखा रंगेबेरंगी होतो.
अशा चिमुकल्यांना मात्र शाळा नावाचे दुसरे घर असेच मोकळे पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने रुजतील. त्यांचा स्वाभाविकता जपायचे कठीण काम असते ,ते त्यांच्या शिक्षकांचे...
त्तोत्तोचान या पुस्तकाच्या मुळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी(मराठी अनुवाद-चेतना सरदेशमुख गोसावी) .
या जपानच्या शाळेतून काढलेली मुलगी ते प्रसिद्ध दूरदर्शन कलाकार हा प्रवास ‘तोमोई’ या त्यांच्या दोन वर्षाच्या शाळेतील शिकवणुकीमुळे कसा होता हे मांडले आहे.जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काही वर्षे आधी ‘तोमोई’नावाची मुक्त शाळा कोबायाशी या हरहुन्नरी आणि संवेदनशील शिक्षकाने फुलविली असते.

“सगळे मुले स्वभावात: चांगली असतात,पण आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावाने बिघडू शकतात आणि हे होऊ नये ह्या चांगुलपणा ची रुजवात करून ती वाढीला लावण्याच म्हणजे मुले मोठी होताना त्यांची वैयक्तीकता टिकून रहावी.”
यासाठी निसर्गाशी सांगड घालत निर्माण केलेली ‘तोमोई’ ही शाळा!

तोत्तोला सतत नवनवीन जाणून घेण्याची इच्छा असते.त्यामुळे ती सतत उद्योगी असते.या उद्योगांना कंटाळून पारंपारिक शाळा तिला काढून टाकते(जे तिला मोठे झाल्यावर कळते).तोत्तोचे आईवडील दोघेही पुढे काय या विचारात असताना ,’तोमोई’ या आगळ्या शाळेत तोत्तोला घालतात.नवीन शाळेचे वर्ग चक्क आगगाडीच्या बंद डब्यात भरत असतात.तेथे कोणतेही वेळाप्रतक नसत ,मुलांच्या आवडीप्रमाणे विषय शिकवले जात.मुलांनी डब्यात काय आणावे यासाठीचा नियमही मजेशीर “समुद्रातील काहीतरी,डोंगरावरचे काहीतरी”,म्हणजे समतोल आहाराचे महत्व समजावले जात.संगीत कवायत ,गरम झर्याची सहल,पहिले नाटक,शेतीचे शिक्षण ,रानातला स्वयंपाक ,इंग्रजी बोलणारा मुलगा ,ग्रंथालयाचा डब्बा ,क्रीडादिन ,धीटपनाची परीक्षा हे भाग वाचताना ,तोमोई मधील अवघे ५०विद्यार्थी किती भरभरून शिकली असतील हे दिसते.

तोत्तो हि धडपडणारी मुलगी प्रत्येक गोष्टीचा शोध लावताना ती पडतेच,आणि पुन्हा असे करणार नाही म्हणत पुन्हा एकदा धडपडते हे ‘उडी मारण्यापूर्वी पहा” वाचतांना खूप हसू येते.
रिबीन ,वेण्या,तू खरोखरीच चांगली मुलगी आहेस,जखमी जवानांशी भेट,नवरी,आरोग्य साल ,मला हेच हवय,यासुकीचान देवाघरी गेला,रॉकी नाहीसा होतो हे भाग वाचाताना तोत्तो जेवढी गोंधळी तेवढीच शांत गोष्टी समजावून घेणारी शांत मुलगी आहे हे लक्षात येते.

दृष्ट लागावी अशी तोमोई आणि तोत्तोचान यांच्या सहवासाला युद्धाचे संकट गिळून घेते आणि शाळा जाळून बेचिराख होते.
“पुढची शाळा कुढल्या प्रकारे बांधू या रे “ कोबायाशी यांचे हे वाक्य शिक्षणाबद्दलाचे अतोनात प्रेम व इच्छाशक्ती दर्शवते.
तोत्तोचान मात्र कोबायाशी यांना दिलेले तोमोईसाठी शिक्षिका होण्याचे वचन पूर्ण न करू शकल्याने त्यांच्याविषयी पुस्तक लिहून एक श्रद्धा देण्याचे ठरवते.या पुस्तकाची दखल जागतिक होऊन त्यांची युनिसेफचा सद्भावना दूत अशी निवड करण्यात येते.

तशी अनेक वाक्य ,सरळ सोप्पे लिखाण मन वेधत राहते ,पण काही उत्तमच..
-मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाडू डे .त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नाहूनही विशाल आहेत.ती पायदळी तुडवू नका.
-एखादा जर त्याच्या मुळापासून तुटला असेल म्हणजेच अधांतरी आयुष्य जगात असेल तर त्याला ‘तो खिडकीशी उभा आहे .असे म्हणा
-जोर लगाके हैय्य्या कामगार एका सुरात गात होते आणि त्याच तालावर सूर्यही हळूहळू वर येत होता.
-डोळे असतात पण सौंदर्यदृष्टी नसते,कान असतात पण सन्गीत ऐकलेलं नसत,मन असत पण सत्याच भान नसत,हृदय असत पण जगातली दु:ख तिथवर पोचत नाहीत.या गोष्टींची भीती वाटली पाहिजे ;कारण त्या माणसाला माणूसपणापासून दूर नेतात.
---भक्ती

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Dec 2020 - 6:50 pm | आनन्दा

ते पुस्तक सुंदरच आहे.

शा वि कु's picture

16 Dec 2020 - 8:01 pm | शा वि कु

खूप आवडते ते पुस्तक.

कुमार१'s picture

16 Dec 2020 - 8:42 pm | कुमार१

छान परिचय

बहुदा पुढारी किंवा लोकमत निट आठवत नाही पण या पुस्तकाचं भाषांतर वर्तमान पत्रात छापुन यायचं मी लहान होतो त्या वेळी. नंतर कधीतरी निम्म्यावर येऊन बंद पडलं. मला राहुन राहुन आठवण व्हायची कि तोत्तो नावाच्या पोरीचं पुढे काय झालं असेल? पुस्तक विकत घेणं हे त्या वेळी मनात सुद्धा येऊ शकायचं नाही. मिळेल त्या वाचनालयात शोध घेत राहिलो आणि पुढचं काय झालं असेल ते मनात अंदाज बांधत राहीलो. पुढे मी मोठा होत असताना मनातली तोत्तोचान हळूहळू पुसट होत गेली. आज तुमच्या या ओळख लेखानं सरकन एक काळ डोळ्यात चमकुन गेला.

Bhakti's picture

17 Dec 2020 - 3:33 pm | Bhakti

:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Dec 2020 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

याचा मराठी अनुवादही झालेला माहित नव्हता.
पैजारबुवा,

विजुभाऊ's picture

17 Dec 2020 - 12:56 pm | विजुभाऊ

हे पुस्तक १५० पेक्षा जास्त भाषांत अनुवादित झालय.
या पुस्तकाबद्दल या पूर्वी मिपावर लिहिलेले या इथे.
http://misalpav.com/node/13334

वाह!
मस्तच वाटलं वाचून :)

माझे सर्वात आवडते पुस्तक आहे हे

हो ना! मस्त पुस्तक आहे ते! सर्वांचे धन्यवाद!
लहानपणी अशा पठडीचे 'वनवास ' वाचले होते.आता आठवत नाही! पुन्हा वाचेन म्हणते..'माँटुकले दिवस' या पुस्तकाचे मुखपृष्ठदेखील तोत्तोचान सारखेच आहे.पहाते मिळते का..

पॉइंट ब्लँक's picture

17 Dec 2020 - 9:54 pm | पॉइंट ब्लँक

खुप संदर पुस्तक परिचय

डोळे असतात पण सौंदर्यदृष्टी नसते,कान असतात पण सन्गीत ऐकलेलं नसत,मन असत पण सत्याच भान नसत,हृदय असत पण जगातली दु:ख तिथवर पोचत नाहीत.या गोष्टींची भीती वाटली पाहिजे ;कारण त्या माणसाला माणूसपणापासून दूर नेतात.

हे खुपंच भावलं :)

दुर्गविहारी's picture

17 Dec 2020 - 11:58 pm | दुर्गविहारी

खूप छान लिहिले आहे.

सिरुसेरि's picture

18 Dec 2020 - 9:29 pm | सिरुसेरि

खुप छान पुस्तक ओळख . अशीच काही लक्षात राहिलेली मुलांची अनुवादीत पुस्तके म्हणजे "देनीसच्या गोष्टी " , " दोन भाउ ( चुक आणी गेक ) " , "इवान" , "पाडस" .

शा वि कु's picture

19 Dec 2020 - 6:46 pm | शा वि कु

खूप छान आहे ! त्यातले फोटो/चित्र मस्त होते. मॅक्सिम गोर्की चे "माझे बालपण" पण असेच सुंदर रशियन पुस्तक.
(पाडस तर नादच नको. अनुवाद खूप सुंदर आहे.)

Bhakti's picture

19 Dec 2020 - 12:43 pm | Bhakti

@सिरूसेरी तुम्ही सुचवलेली नक्की ही पुस्तके वाचेल.:)

विजुभाऊ's picture

20 Dec 2020 - 11:52 am | विजुभाऊ

"वाचेन" ..... वाचेल नाही हो
मराठी व्याकरणात
मी वाचेन ..... तो/ती वाचेल असे लिहीतात.
मी येईन....... / तो/ती येतील
मी जाईन .... तो/ती जाईल

अरे बापरे इतकी वर्षे मी किती चुकीचे बोलत होते.
मी वाचेल,मी येईल,मी जाईल..

रंगीला रतन's picture

20 Dec 2020 - 10:57 am | रंगीला रतन

संदर पुस्तक परिचय.
पुलेशु.