कोळंबी-शेवगा-कैरीची आमटि (१८ छायाचित्रांसह)

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
25 Nov 2008 - 1:16 am

मंडळी,

'कोळंबी-शेवगा-कैरीची आमटि' हि दोन पुर्वप्रकाशित पा.कृं.ची ( ललिता - 'कोलंबीची आमटी' आणि लवंगी - 'कांदा-कोलंबी-कैरीच कालवण') सरमिसळ करुन उदयास आलेली एक नव पा.कृ. आहे. ह्या पा.कृ. चे श्रेय मुळ पा.कृं.च्या लेखिकांना समर्पित आहे.

१. साहित्यः

* १/२ किलो मस्त ताजी कोळंबी (साधारणपणे २ वाट्या)

* ५-६ मिरे
* १ चमचा धने
* ४-५ सुक्या लाल मिरच्या

* १ वाटि ताजे खोवलेले नारळ

* २ चमचे आलं-लसुण-मिरचीच वाटण
* १ मध्यम कांदा उभा चिरुन
* १-२ शेवग्याच्या शेंगा (३-४" तुकडे करुन)
* १ कैरी उभ्या फोडी करुन
* १ वाटि नारळाचे दुध

* फोडणीसाठी हिंग आणि मोहरी

२. मसाल्याची कृती:

* थोड्या तेलामधे मिरे, सुक्या मिरच्या आणि धने परतुन घ्या

* परतलेले मिरे, धने आणि मिरच्या हे खोबर्‍याबरोबर वाटुन घ्या

३. आमटिची कृती:

* एका भांड्यात (कढई सारख्या) तेल गरम करुन त्यात हिंग-मोहरीची फोडणी करुन घ्या

* मोहरी तडतडली कि त्यात आलं-लसुण-मिरचीच वाटण परतुन घ्या (वाटण सुट्टं होईपर्यंत)

* आता कोळंबी टाकुन हलका सोनेरी रंग येउ पर्यंत परता

* कांदा टाकुन थोडा होईपर्यंत परतुन घ्या

* शेवग्याच्या शेंगांचे आणि कैरीचे तु़कडे घालुन २-३ मिनीटे परतुन घ्या

* आता वाटलेला मसाला घाला

* मसाला नीट हलवुन थोडा परता

* नारळाचे दुध घालुन नीट हलवुन घ्या

* आता आमटि पातळ-घट्ट हवी असेल त्या प्रमाणात पाणि घालुन १० मिनीटे होउ द्या

* आमटि तयार आहे!

गरमा गरम भाता बरोबर ह्या आंबट-तिखट आमटिचा स्वाद घ्या!!!

आपले चवदार अनुभव जरुर कळवा! :D

प्रतिक्रिया

प्राजु's picture

25 Nov 2008 - 1:33 am | प्राजु

तुम्ही राव... सगळ्यांना जळवायचे ठरवले आहे काय??
आधी सुके मटण.. आणि आता ही आमटी. मिपावरील सुगरणी निदान पदार्थ तयार झाल्यावरचे फोटो तरी देतात. तुम्ही तयार होतानाचे फोटो देऊन किती त्रास देता!
जबरदस्त फोटो.
तुम्ही हळूहळू सुगरणा होत आहात तर! याचे श्रेय आमच्या सुगरणींना द्यायला वुसरू नका बरं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पांथस्थ's picture

25 Nov 2008 - 1:59 pm | पांथस्थ

तुम्ही राव... सगळ्यांना जळवायचे ठरवले आहे काय??

न्हायबा. जळजळ हा वैयक्तिक प्रश्न आहे. हा पण आपण तात्यांकडे 'जळजळ रिलीफ फंडा' साठि मदत देण्यास तयार आहे. मिपा कडे राहु देत 'इनो' चा स्टॉक कधी कधी पाहुण्यांनाहि लागतोच कि. घरात असलेला बरा!!!! :)

तुम्ही तयार होतानाचे फोटो देऊन किती त्रास देता!

हि आपली जुनी खोड! अजिबात इलाज नाहि.

तुम्ही हळूहळू सुगरणा होत आहात तर! याचे श्रेय आमच्या सुगरणींना द्यायला वुसरू नका बरं!

अहो आमचा सुगरणा होउन बराच काळ लोटला. अपना हाथ जगन्नाथ. पण त्यामुळे सगळ काहि आपणंच बनवाव अस वाटतं. हे भलतच होउन बसलं आहे. करता काय? :SS

आणि श्रेयनामावलीत सुगरणीच आहेत की :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

अभिरत भिरभि-या's picture

25 Nov 2008 - 1:33 am | अभिरत भिरभि-या

भूक लागली ..

सुक्या's picture

25 Nov 2008 - 3:05 am | सुक्या

अशी फोटोसह पा.कृं. देउन, तोंडाला पाणी आणुन, जळजळ वाढवुन लोकांचा छळ का करतोय बाबा? आता ही पा.कृ. पन करुन खावी लागणार. :)] (आताच बायकोला बघायला सांगितलं) .

काल सांबार एकदम टकाटक झाले होते. त्यात बायकोने बनवल्यामुळे अजुनच झकास. दोन वाट्या सांबार भुरकल्यावर जळजळ बंद झाली.
ही आमटी पन बनवतो अन् खाउन सांगतो.

(सांबारभुरक्या) सुक्या बोंबील
वजन वाढणार आता :S

पांथस्थ's picture

25 Nov 2008 - 2:00 pm | पांथस्थ

लगे रहो सुक्या भाई!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

वल्लरी's picture

25 Nov 2008 - 10:14 am | वल्लरी

अहो खरंच तुम्ही अगदी सगळ्यांची जळजळ करता राव !!!!!
सर्व फोटो जबरदस्त ,,,,,अफला ,,,,

जैनाचं कार्ट's picture

25 Nov 2008 - 10:25 am | जैनाचं कार्ट (not verified)

:''( :''( :''(

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

वेताळ's picture

25 Nov 2008 - 10:32 am | वेताळ

मस्तच.......खुप आवडले तुझे सादरीकरण.फोटो बघितल्या नंतर काय हालात खराब होते तुम्हाला नाय बा कलनार.झक्कास...उद्या करायला हवी.
वेताळ

अनंत छंदी's picture

25 Nov 2008 - 11:53 am | अनंत छंदी

अहो पांथस्थ,
अशी उपासमार नका करु बुवा! आता पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले आणि आमटी करायची ठरवली तर या सिझनमध्ये कैर्‍या कुठून आणायच्या? असं करू नका अनेकांना तळमळत ठेवल्याला आता जबाबदार कोण? तुम्हीच! :))

पांथस्थ's picture

25 Nov 2008 - 1:50 pm | पांथस्थ

हि पा.कृ. मी काल रात्रीच केली आहे. मला बुवा मिळाल्या कैर्‍या. हे झाल बेंगळुरु मधलं. तुम्ही कुठे? तिथ कैर्‍या नाहि मिळत. हे काय ब्वॉ? (पोष्टाने पाठवु का??? =)) )

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

सुनील's picture

25 Nov 2008 - 1:53 pm | सुनील

पाकृ द्यावी तर अशी - सचित्र!

फारच छान रे, पांथस्था!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मृण्मयी's picture

10 Dec 2008 - 7:02 am | मृण्मयी

वा! आमटी झकास दिस्तेय!
नवर्‍याला हे फोटो दाखवण्याचा गाढवपणा केलाय. आता करून खाऊ घालणं क्रमप्राप्त आहे! :)

धनंजय's picture

11 Dec 2008 - 1:16 am | धनंजय

चित्रांसोबत दिलीत हे छान! (नाहीतर "हलके सोनेरी/"थोडे" परता वगैरे कृतींनी प्रारंभिक लोकांना कोडे पडते.)

बल्लवाचार्यांसाठी प्रश्न : मला कोलंबी फार शिजवलेली आवडत नाहीत - घट्ट आणि कडक होत जातात. असे केले तर चालेल का? - हलकी-सोनेरी तळलेली कोलंबी बाजूला काढायची. कांदा, शेंगा, कैरी परतून घेऊन, वाटण घालून, मग पुन्हा कोलंबी भांड्यात टाकायची, (मग नारळाचे दूध घालायचे, शेवटचे गरम करायचे). असे केले तर चालेल का?

पांथस्थ राव

लई भारी.... पार्सल पाठवून द्या...
काय तोंडाला पाणी सुटलेय.... वा वा...
दिल खुश झाला....

बंगळुरात काही आपल्यासारखी चव नाही मिळत, पण १-२ महिन्यांत पुण्याला जाणार आहे. तेव्हा हा बेत चाखूनच परत बंगळुरात येईन...
तशीही हॉटेलांची भरपूर मोठी यादी आहे आपल्याकडे आता. धनाजी संताजींनी तयार केलेली .... तिचा समाचार घ्यायचाच आहे अजुन...

अर्थात ही रेसिपी घरीच चाखण्यासारखी आहे म्हणा.... हॉटेलात असला फक्कड आणि स्पेशल मेनू काही भेटायचा नाही...

(सी-फूड प्रेमी) सागर

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 5:52 pm | विसोबा खेचर

आहाहा! डोळे निवले..!

तृप्त झालो..

तात्या.

खादाड's picture

11 Dec 2008 - 6:53 pm | खादाड

च्या मारी आम्च्या नागपुरला कोलम्बि येवढी छान नाहि मिळत पण तरीहि पुढ्च्या बुधवारी करुन पाहिन ! फोटो व्वाव्वा! :P