आठवणी १ - प्रस्तावना

मनस्विता's picture
मनस्विता in जनातलं, मनातलं
28 Sep 2020 - 10:34 pm

पूर्वी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी मला आठवणीत रमणे जमायचेच नाही. असं वाटायचं की गेला तो काळ, आता काय रमायचं आहे त्यात! पण दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. वेगात धावणाऱ्या आयुष्याला जाणीवपूर्वक एक ब्रेक लावला. आणि ह्या लॉकडाऊनने तर आयुष्य अजूनच संथ झालं. घरातले सगळेच त्यामानाने निवांत असल्याने, बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशातच मिसळपावने गणेश लेख मालेअंतर्गत 'आठवणी' हा विषय दिला आणि मी आठवणींमध्ये कधी रमले ते कळलंच नाही.

माझ्या बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्हाला वेगवेगळ्या गावांत राहायला मिळाले. त्यामुळे लिहायला सुरु केलं तेव्हा आमचा तो प्रवास टिपावा असा विचार केला. तसा लेख लिहायला घेतला आणि लेखाची लांबी खूपच वाढायला लागली असे वाटले. त्यामुळे लेख एकापेक्षा जास्त भागांमध्ये विभागायचा ठरवलं. त्यातलाच एक भाग मिपाववरील गणेश लेख मालेअंतर्गत प्रकाशित झाला. इतर काही भागांचे लेखन आधीच झाले असल्याने तेदेखील प्रकाशित करायचे ठरवले.

माझं आयुष्य काही जगावेगळं नव्हतं. त्यामुळे आठवणी पण तश्या साध्या सरळच आहेत. अश्या ह्या साध्यासुध्या आठवणींचे लेखन आपण रसिक वाचक स्वीकाराल अशी आशा करते.

Photo1

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मनस्विता's picture

28 Sep 2020 - 10:43 pm | मनस्विता

लेखन इथे प्रकाशित करू की नाही असे वाटत होते, पण धीर एकवटून प्रकाशित करत आहे.

फोटो द्यायचा प्रयत्न केला,पण जमले नाही. :(

गामा पैलवान's picture

29 Sep 2020 - 2:39 am | गामा पैलवान

मनस्विता,

इथे अनुभव प्रसिद्ध करायचा अत्यंत योग्य निर्णय घेतलात. त्याबद्दल धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

मनस्विता's picture

4 Oct 2020 - 12:04 pm | मनस्विता

असाच लोभ असू दे.

महासंग्राम's picture

29 Sep 2020 - 10:48 am | महासंग्राम

गुगल फोटोंचा ऍक्सेस प्रायव्हेट असावा बहुदा तो पब्लिक केला कि फोटो दिसतील

पुढच्या वेळी प्रयत्न करते.