कोव्हीड आणि फसवणूक

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
8 Sep 2020 - 8:08 pm

कोव्हीड आणि फसवणूक

तीन दिवसापूर्वी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब करोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालो. या वेळी सामाजिक विलगीकरणामुळे माझी डोमिनार मोटार सायकल २१ दिवस बंद होती. ती सुरु करण्याच्या प्रयत्न केला असता त्याची बॅटरी उतरली असल्याचे लक्षात आले.

डोमिनार या ४०० सीसी ३४ हॉर्स पॉवर च्या मोटार सायकलला किक नाहीच. त्यामुळे बॅटरी नसेल तर ती चालू होतच नाही. यासाठी मी मुलुंड पूर्व ९० फूट रस्ता येथे असलेल्या बजाजच्या सर्व्हिस सेंटर मध्यें फोन केला त्यांनी आपला एक माणूस पाठवला आणि माझ्या मोटर सायकलमधली बॅटरी काढून चार्जिंग साठी नेली.

चार तासांनी मी त्यांना फोन केला तेंव्हा ते म्हणाले कि बॅटरी खराब झाली आहे त्यामुळे चार्ज पकडत नाही तेंव्हा तुम्हाला नवीन बॅटरी टाकावी लागेल. त्यासाठी अँमरॉन या कंपनीची ४ वर्षे पूर्ण वारंटी असलेली बॅटरी रुपये ४८०० ला आहे. मी त्यांना विचारले कि एवढी महाग बॅटरी तर कारची असते त्यावर तेथील प्रमुख मला म्हणाले कि ४ वर्षात बॅटरी गेली तर पूर्ण नवीन बॅटरी मिळेल. मी थोडा नाखूष आहे पाहून ते म्हणाले एक्साईडची बॅटरी २८०० रुपयाला मिळेल पण त्याची वारंटी १८ महिनेच आहे.

मी त्यांना विचारले कि माझ्या जुन्या बॅटरीचे किती रुपये परत मिळतील? त्यावर ते म्हणाले कि काहीतरी १००-१५० मिळतील.
मला थोडासा संशय आला म्हणून मी माझ्या भावाला फोन केला. तो म्हणाला जुन्या बॅटरीचे ३००-४०० तरी मिळायला पाहिजेत. तू एक काम करा माझ्या माहितीचा एक बॅटरीचा डीलर आहे श्री पाटील त्यांच्याशी बोल. त्यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले ती बॅटरी घेऊनिया आपण पाहू.
यावर मी बजाजच्या डिलरला म्हणालो कि माझ्या भावाच्या कारखान्यात मला बॅटरी चार्ज करून पाहायची आहे.
हे महाराज म्हणाले कि अहो असे इलेक्ट्रिशियन बरेच असतात. त्यावर मी कडक शब्दात म्हणालो माझा भाऊ इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे इलेक्ट्रिशियन नाही.

त्यावर ते साळसुदपणे ते म्हणाले कि तुम्ही बॅटरी कुठेही घेऊन जा. ती चार्ज पकडणार नाही.
मी त्यांना म्हणालो कि माझ्या भावाकडे स्लो चार्जर आहे त्याने चार्ज केली कि बॅटरी जास्त टिकते. त्यावर थोडा गुळमुळीतपणे ते म्हणाले तुम्ही बॅटरी घेऊन जा.

मी ती बॅटरी घेऊन भावाच्या माहितीतील त्या डीलर कडे घेऊन गेलो तर त्याच्याकडे तपासली असता ती बॅटरी पूर्ण पणे चार्ज झाली होती आणि लोड घेतल्यावर हि चार्ज दाखवत होती. मग मी त्या डिलरला म्हणालो कि तुमच्याच माणसाला माझ्या मोटार सायकल मध्ये बॅटरी फिट करून द्यायला सांगा. त्याने त्याच्या तंत्रज्ञाला माझ्या घरी पाठवले आणि बॅटरी फिट केली आणि स्टार्ट केली तर मोटार सायकल व्यवस्थितपणे चालू झाली. मी त्या तंत्रज्ञाला त्याने सांगितल्याप्रमाणे १०० रुपये दिले आणि पाठवून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत चालू केली तर पहिल्या फटक्यात मोटार सायकल व्यवस्थित चालू झाली. तरी मी दोन दिवस थांबलोपरंतु २ दिवसात बॅटरी व्यवस्थित पणे चालू आहे

दुसऱ्या दिवशी बजाज च्या डीलर कडून एका माणसाचा फोन आला. कि बॅटरी बसवायची आहे का? मी त्याला कडक शब्दात समज दिली कि तुम्ही मला थुका लावायला बघत होता. त्यावर त्या माणसाने बोलणे फिरवाफिरव करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी कडकपणे बोलतो आहे म्हटल्यावर त्याला लक्षात आले कि या माणसाला शेंडी लावणे जमणार नाही.

एक म्हणजे मी गरज नसताना नवीन बॅटरी विकत घेतली असती
शिवाय माझी जुनी बॅटरी या माणसाने कुणाला,तरी सेकंड हॅन्ड म्हणून हजार पंधराशे ला विकली असती.

आता मी बजाज कंपनीला पत्र पाठवून त्या डीलर विरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवणार आहे.

तात्पर्य-- आपली मोटार, स्कुटर, कार बरेच दिवस बंद असेल तर सध्या काम कमी असल्यामुळे असे डीलर आपल्याला गंडवण्याची शक्यता आहे.

सर्वानी सावधान राहणे आवश्यक आहे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Sep 2020 - 8:23 pm | प्रचेतस

उपयुक्त माहिती.
पण हल्लीच्या बॅटऱ्या मेंटेनन्स फ्री असतात ना? त्याही चार्ज करायची जरूर असते का?

बाकी आपल्या कोविड संसर्गाच्या अनुभवाबद्दल वाचायला आवडेल. नेमकी काय खबरदारी घेतलीत, औषधे, पथ्ये वगैरे, विलगीकरण कसे पाळलेत. कारण संपूर्ण कुटुंबच बाधित झाल्यामुळे हे नक्कीच अवघड गेले असणार.

खटपट्या's picture

5 Oct 2020 - 9:31 am | खटपट्या

माझ्या मते गाडी चालु होते तेव्हा बॅटरी चार्ज होते. जर गाडी बरेच दिवस चालु नसेल तर बॅटरी ड्रेन होते. ती बाहेर काढुन चार्ज करणे आवश्यक असते.

सोत्रि's picture

8 Sep 2020 - 8:24 pm | सोत्रि

ह्यातल्या फसवणूकीचा आणि कोव्हीडचा संबंध लक्षात नाही आला?

- (कन्फुज झालेला) सोकाजी

चौकटराजा's picture

8 Sep 2020 - 9:12 pm | चौकटराजा

बॅटरीला कोविड झाला नसताना पॉझिटिव्ह टेस्ट आली दुसर्या लॅबला नेल्यावर एकदम निगेटिव्ह ! एका जागी २ लाख वाचतात दुसर्‍रीकडे ४८०० . ))))

संजय क्षीरसागर's picture

9 Sep 2020 - 2:09 pm | संजय क्षीरसागर

बॅटरीला कोविड झाला नसताना पॉझिटिव्ह टेस्ट आली दुसर्या लॅबला नेल्यावर एकदम निगेटिव्ह !

फॉल्ट कुणाचा ? बॅटरी, लॅब, करोना का मालक ?

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 12:03 am | सुबोध खरे

कोव्हिड मुले बऱ्याच लोकांची वाहने नुसती उभी असल्यामुळे बॅटरी उतरण्याची शक्यता आहे. आणि सध्या फारसे काम नसल्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे काही डांबरट लोक आपल्या अज्ञानाचा फायदा घेण्याची शक्यता आहे.

बॅटरी व्यवस्थित चार्ज झालेली असताना सुद्धा ती पूर्ण खराब झाली आहे आणि नवी घ्या हे सांगणे शुद्ध फसवणूक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2020 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यातल्या फसवणूकीचा आणि कोव्हीडचा संबंध लक्षात नाही आला?

दोन वेगवेगळे विषय होते, पण आता काढला धागा तर सांगून टाकावे, असे असावे.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 6:31 pm | सुबोध खरे

कोव्हीडमुळे फसवणूक झालेली नाही परंतु माझ्यासारखे काही लोक ज्यांची गाडी काही दिवस बंद पडली असेल.

काही लोकांची बिल्डिंग सील झाली आहे.

बरेच लोक घरून काम करत आहेत त्यामुळे गाडी चालू केली नसेल.

काही लोक लॉक डाऊन मुळे अडकले होते

त्यांना असा अनुभव येण्याची शक्यता आहे त्यांच्या साठी लिहिलें आहे.

सर्वप्रथम तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब करोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

तात्पर्य-- आपली मोटार, स्कुटर, कार बरेच दिवस बंद असेल तर सध्या काम कमी असल्यामुळे असे डीलर आपल्याला गंडवण्याची शक्यता आहे.

माझा अनुभव थोडा वेगळा आहे. चार महिन्यात कारचा वापर न केल्याने माझ्या गाडीची बॅटरी खराब झाली. वॉरंटी कालावधीत असल्याने रिप्लेसमेंट साठी क्लेम फॉर्म भरून डीलरकडे जमा केली आहे. लॉक डाऊन मुळे गेल्या काही महिन्यांत माल येत नसल्याने रिप्लेसमेंट मिळण्यास किमान पंधरा दिवस लागतील असे तेव्हा सांगण्यात आले. काल ह्या गोष्टीला पंधरा दिवस झाले म्हणून डीलरला कॉल केला तर त्याने माझ्या आधीही रिप्लेसमेंट साठी जमा केलेल्या लोकांच्या बॅटरीज अजून आल्या नसून तुमची बॅटरी मिळायला अजून आठवडाभर तरी लागेल म्हणून सांगितले. खरे खोटे देव जाणे!

अगदी तंतोतंत अनुभव. शब्द न शब्द जुळणारा. (कोविड वगळता...)

फक्त बैटरी कारची. आणि हा अनुभव एकाहून अधिक वेळा आलाय. चार्जिंगला घेऊन जाणे = खराब आहे आणि नवीन घ्यावी लागेल.

हे एक प्रस्थापित जाळं असावं.

Rajesh188's picture

8 Sep 2020 - 10:55 pm | Rajesh188

ड्रायव्हिंग स्कूल ची फी covid च्या अगोदर 6000 होती swift साठी ती आता 8000 झाली आहे.
खूप दिवस गाडी बंद असेल तर बॅटरी ची समस्या येतेच.
Gear वाल्या गाड्या ढकलून स्टार्ट करता येतात पण ऑटोमॅटिक मध्ये ही आयडिया लागू पडत नाही.

संजय क्षीरसागर's picture

9 Sep 2020 - 12:03 am | संजय क्षीरसागर

गाडी दीर्घ काळ बंद रहाणार असेल तर बॅटरी केबल काढून ठेवा; बॅटरी एकदम टॅक कंडीशनमधे रहाते.

चौकस२१२'s picture

9 Sep 2020 - 3:53 am | चौकस२१२

हो अगदी बरोबर किंवा असे हि करता येते कि
गाडी थोडावेळ २-३ दिवसांनी नुसती चालू करायची ( अर्थात पेट्रोल पुरेसे असेल तर )
डॉ खरे आपल्याला आजारातून मुक्त झाल्याबद्दल शुभेच्छा

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2020 - 1:34 am | प्रसाद गोडबोले

मला नुकताच ह्याच्या एकदम विरुध्द अनुभव आला !

माझ्या लॅपटॉप्ची बटरी गेले कित्येक महिने चार्जच होत नव्हती , पण चार्जर लाऊन काम चालुन जायचे , पण शेवटी ब्यॅटरीने अगदीच राम म्हणले. एकदम विश्वासातील मित्राला फोन करुन विचारले तर म्हणला की २ शक्यता आहेत - ९९% बॅटरी गेलीये किंव्वा १% चार्जर गेलाय , प्रत्यक्श पहिल्यशिवाय सांगता येणार नाही!

लॅपटॉप शिवाय जगणे नामुम्किन असल्याने इछा नसताना झक मारत घराबाहेर पडावे लागले ! ( चक्क चक्क आक्स्सेस्स नेहमीप्रमाणेच पहिल्या स्टारटर ला सुरु झाली !! )

डेल च्या सर्व्हिस सेंटर ला गेलो , पोहचायला बराच ऊशीर झालेला , - तिथला सर्व्हिस एजन्ट म्हणाला - सर आमचाही विचार करा आम्हालाही घरी जायचंय , प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करतोय प्रत्येकाला प्रायॉरिटीवर काम करुन पाहिजेल, असं कसं जमणार ?
त्याला विनंती केल्यावर त्याने हातातले काम करत करत माझा लॅपटोप उघडला म्हणाला की बॅटरी अगदीच ०.००% हेल्थ दाखवत आहे ती बदलावी लागेल , सध्या कोव्हिड असल्याने आपल्या मॉडेल ची बॅटरी जी नेहमी ४००० ला मिळते ती चायना वरुन मालच येत नसल्याने ६००० ला विकत घेऊन बसवावी लागेल. शिवाय चार्जिंग पोर्ट ही खराब झालाय त्याचे १२०० होतील. म्हणलं कर बाबा , त्या लॅपटॉपवर पोट चालतंय आमचं , काय होईल तो खर्च होईल .

चार्जिंग पोर्ट बदलल्यवर त्यानेच सहज कुतुहल म्हणुन लपटॉप स्टार्ट केला , अन म्हणाला - होतेय की बॅटरी चार्ज !! बरेच दिवस चार्ज नसल्यने ०% टक्के दाखवत होती , ७६% हेल्थ आहे , अजुन किमान २-३ वर्ष तरी नक्की चालेल!!! त्याने माझ्या डोळ्या देखत पॅक पीस मधुन फोडून काढलेली नवी कोरी बॅटरी परत ठेऊन टाकली, ( बॅटरी शॉर्टेज खरेच खरे असावे असे वाटुन गेले मला) . पोर्ट चे १२०० + बिल झाले , ३०० रुपये सर्व्हिस फी लागेल म्हणाला , अगदी आनंदाने दिले !

आता चार्जिंग पोर्ट ची खरी किंमत किती असते मला माहीत नाही पण झाकली मुठ सव्वालाखाची ठेवुन ६हजार ची बॅटरी माझ्या गळ्यात बांधणे त्याला सहज म्हणजे अगदी सहज शक्य होते. पण त्याने तसे केले नाही हे पाहुन मला आश्चर्याचा धक्का बसला !

आसपास इतक्या नकारार्थी आणि डिप्रेसिंग घटना घडत असलेल्या पाहताना ,एका माणसाने तरी संपुर्ण इन्टेग्रिटीने काम केल्याचे पाहुन आशावाद सुखावुन गेला !

चौकटराजा's picture

10 Sep 2020 - 9:13 am | चौकटराजा

असा अनुभव केवळ त्याच्यावर असलेल्या संस्कारमुळे .यासाठी तर माझ्यासारखा नास्तिक म्हणतो " देव आहे का जगात ...? १०० टक्के नाही. देवाची लीला आहे का जगात १००१ टक्के आहे ! तुम्हाला अधिक ज्ञान असते तर १२०० अधिक ३०० ही द्यावे लागले नसते पण सर्वज्ञ कोणीच नसतात त्यामुळे इतरांचे संसार चालतात ही देखील देवाचीच लीला. मी अक्वा गार्ड वाला काय काम करतो हे नीट पाहून घेतले आता वर्षाला १८०० ऐवजी ५०० च पडतात .कारण त्याचे काम मीच घरी करतो . नो मार्जिन , नो फसवणूक , नो जी एस टी !!

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2020 - 5:35 pm | चौथा कोनाडा

तुमची पिढी भारी आहे, जिज्ञासा बाळगून माहिती करून घेऊन अश्या गोष्टी स्वतः करतात हे खरंच मानण्या जोगं आहे !
नविन पिढीत वर्कर पेक्षा मॅनेजर घडवले जातात त्यामुळं त्यांना रेडिमेडची सवय आहे !

Gk's picture

9 Sep 2020 - 6:16 am | Gk

बरे झाल्याबद्दल व फसवणूक टाळल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा

गाडी ला कंपनीने किक का दिलेली नाही?
बऱ्यापैकी गाड्या बटणस्टार्ट असल्या तरी किक असलेल्या असतात.

बबन ताम्बे's picture

9 Sep 2020 - 8:26 am | बबन ताम्बे

असाच सुखद अनुभव परवा ऍक्वागार्ड मेकॅनिकचा आला.
कस्टमर केअर ला फोन केला की ऍक्वागार्ड चालू होतं नाही. मेकॅनिकने सांगितले मदरबोर्ड गेला असेल तर नवीन बसवायला लागेल. त्याचे 1200 रुपये होतील. म्हटलं ठीक आहे, या तुम्ही. त्याने चेक केले आणि म्हणाला मदरबोर्ड ठीक आहे.काही ठिकाणी वायर्सना सोल्डरिंग करायला लागेल. माझ्याकडे सोल्डरिंग गन आणि सोल्डर नाही आत्ता. मुलाने लगेच मित्राकडून सोल्डरिंग गन आणि सोल्डर त्याला आणून दिला. काम केल्यावर जाताना म्हणाला तुम्हाला काय द्यायची ती फी द्या. त्याला 200 रुपये दिले ते त्याने आंनदाने घेतले.

कारची ब्याट्री मात्र बदलायलाच लागली. तिथे काही प्रामाणिक व्यक्ती भेटली नाही. ☺

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2020 - 6:38 pm | चौथा कोनाडा

ऍक्वागार्ड अनुभवाबद्दल अभिनंदन !
येतात कधी कधी चांगले अनुभव !

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 9:30 am | सुबोध खरे

माझा अजूनही माणसांच्या चांगुलपणा वर विश्वास आहे आणि ९९ % माणसे आपल्याला फसवत आहेत असे मला वाटत नाही.

परंतु तरीही आपण जागरूक राहणे आवश्यक आहे असेच वाटते.

सध्या लोकांची परिस्थिती फार वाईट झालेली आहे आणि गरिबी काही वेळेस लोकांना गैरव्यवहार करायला भाग पाडते

सोत्रि's picture

9 Sep 2020 - 1:35 pm | सोत्रि

सध्या लोकांची परिस्थिती फार वाईट झालेली आहे आणि गरिबी काही वेळेस लोकांना गैरव्यवहार करायला भाग पाडते

डॉक, करोनावर कोणतीही लस किंवा उपचार आला नसताना लाखोंच्या बीलाच्या गौडबंगालामागे (पक्षी:फसवणूकीच्या गैरव्यवहारामागे) गरीब नक्कीच नाहीयेत.
कोणाची परिस्थीती वाईट आणि कोणामुळे ही झाकली मूठ आहे.

धाग्याचं नाव वाचून ह्या फसवणूकीवर काही असेल असं वाटलं होतं.

असो, कोविडसंसर्गातून बाहेर आलात त्याबद्दल शुभेच्छा!

- (माणसांच्या चांगुलपणा वर विश्वास असलेला) सोकाजी

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 6:29 pm | सुबोध खरे

कोणाची परिस्थीती वाईट आणि कोणामुळे ही झाकली मूठ आहे.

कोव्हीडमुळे फसवणूक झालेली नाही परंतु माझ्यासारखे काही लोक ज्यांची गाडी काही दिवस बंद पडली असेल त्यांना असा औभाव येण्याची शक्यता आहे त्यांच्या साठी लिहिलें आहे.

बाकी काही लोकांची लाखोंची बिले कशी येतात त्यात काय फसवणूक होते हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे आणि त्याचा मला अनुभव नाही.

कुमार१'s picture

9 Sep 2020 - 9:30 am | कुमार१

बरे झाल्याबद्दल व फसवणूक टाळल्याबद्दल अभिनंदन ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2020 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण बरे झाल्याबद्दल अभिनंद्न....!

-दिलीप बिरुटे

Rajesh188's picture

9 Sep 2020 - 10:28 am | Rajesh188

Covid19 मधून बाहेर पडल्या बद्द्ल अभिनंदन.
तुमचा covid19 चा अनुभव इथे शेअर करावा बाकी लोकांना तो मार्गदर्शक ठरेल.
बाकी काही दिवस गाडी बंद असेल तर तिची बॅटरी उतरते हे माहीत असून सुद्धा काही दिवसाआड गाडी स्टार्ट करणे गाडी मालकाचे कर्तव्य च आहे.
पहिली चूक तर आपलीच आहे.
बाकी फसवणुकीचा प्रकार तर नेहमीच होत असतो आपण सावध असणे महत्वाचे.

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 10:32 am | सुबोध खरे

पहिली चूक तर आपलीच आहे.

बरोबर

मला कोविड झाल्यामुळे मला २१ दिवस घरातच डांबून बसावे लागले हि चूक माझीच आहे.

परन्तु बॅटरी २१ दिवसात उतरण्याचा अनुभव मला पहिल्यांदा आला आहे.

या अगोदर नौदलात असतानाअनेक वेळेस एक दीड महिना समुद्रावर गेल्यावरसुद्धा बॅटरी पूर्ण उतरल्याचा अनुभव आलेला नव्हता.

शाम भागवत's picture

9 Sep 2020 - 11:55 am | शाम भागवत

कोविडमधून तुम्ही सर्वजण बरे झाल्याबद्दल अभिनंदन.
माझा मुलगा दर शनिवारी दोन्ही कार्स १० मिनिटे सुरू करतो. गेले ५-६ महिने न चुकता हा प्रकार चालू आहे.
हँडब्रेक लावून ठेवलेले असल्यास ते जाम होण्याची शक्यता असते. यास्तव हँडब्रेक लावत नाही. गाडी गिअरमधे ठेवतो व चाकाखाली दगड लावतो.

महिन्यातून एकदा १०० मिटर्सवर असलेल्या दुकानातून नॅट्रोजन गॅस टायरमधे भरून घेतो. नॅट्रोजन गॅस भरलेला असेल तर महिन्याभरात १ ते १.५ पौंड कमी होतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. टायर्सही जास्त टिकतात.

कोविडमधून सुटलात, बरे वाटले.
दोन तीन नातेवाईक सध्या सौम्य कोरोनातून जात आहेत. पण त्यांना घरीच ठेवले आहे. बी कॉम्प्लेक्स, प्रोटिनेक्स आणि खोकल्याचं औषध. इतर आणखी दोघे वयस्कर यातून बरेही झाले.
गरम मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, हात-तोंड साबणाने धुणे हे आम्ही करत असतो.
--------------
बाकी वाहनांची निगा यावर लेख आले पाहिजेत. मी पन्नास वर्षांपुर्वी हौस म्हणून ओटमोबिल एंजिनिअरिंगची ( डिप्लोमा) माझ्या कॉलेज सहकाऱ्याची पुस्तके वाचली होती. पण मला प्रक्टिकल अनुभव येण्याचा योग आला नाही. कारण टुव्हिलर, फोर विलर स्वत:चे वाहन असावे असं कधी वाटलं नाही. ड्राइविंगचीही आवड नव्हतीच. पब्लिक ट्रानस्सपोर्टवरच माझी भिस्त राहिली आणि त्या वाहनांनी दगा दिला नाही.

तरीही मी म्हणतो की वाहन मेंटेनन्सवर खूप सविस्तर लेख येणे आवश्यक आहे. ( माझ्या स्कुटरच्या कवरात शेजाऱ्यांचा बोका बसून रंग खरडतो वगैरे ललित नव्हे.)

तरुण मिपाकरांना आवाहन - यात लक्ष घालावे. अगदी प्रत्येकाने सुटीत हात काळे करावेच असं नाही पण आपल्या वाहनाची तांत्रिक ओळख झाल्याने काळजी घेता येईल, काम योग्य प्रकारे करवून घेता येईल.

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 12:29 pm | सुबोध खरे

कंजूस साहेब

एके काळी कार्ब्युरेटर साफ करण्यापासून मोटर सायकलचे इंजिन खाली उतरवण्यापर्यंत धंदे केले आहेत.

पण आता हात काळे करून ३००-४०० रुपये वाचवावेत याचा कंटाळा येतो.

(त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मी दवाखान्यात जास्त रुग्ण पाहून मिळवू शकतो)

शिवाय कुणाचे तरी पोट त्यावर चालते हे लक्षात घेऊन मी आजकाल त्यात पडत नाही.

अर्थात बॅटरी उतरली आहे कि नाही हे तपासण्या साठी लागणारी उपकरणे माझ्याकडे नाहीत. त्यामुळे ते काम शक्य नाही.

होय,पटलं, खरे साहेब. तारतम्य आहेच.

वर सांगितला आहेच, त्यामुळे धाग्याचा मेन उद्देश संपला आहे.

करोनाच्या दिव्यातून सहकुटुंब सलामत बाहेर पडलात त्याबद्दल अभिनंदन !

आता करोना > लक्षणं > टेस्ट केंव्हा केली > नक्की काय उपाय केले > झाल्यावर आणि न होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यावर लिहिलेत तर तुमच्या स्वानुभवाचा सर्वांना उपयोग होईल.

संजय क्षीरसागर's picture

9 Sep 2020 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

बिलाची पण माहिती सांगा !

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 6:34 pm | सुबोध खरे

मी घरीच उपचार केले. रुग्णालयात भरती झालो नाही.

त्यामुळे प्रत्यक्ष औषधांचा झाला तेवढाच खर्च.

जे फुप्फुस रोग तज्ज्ञ माझ्यावर उपचारांची देखरेख करत होते त्यांनी माझ्या कडून पैसे घेतले नाहीत.

मराठी_माणूस's picture

9 Sep 2020 - 7:36 pm | मराठी_माणूस

मी घरीच उपचार केले. रुग्णालयात भरती झालो नाही.

हे आपण स्वतः ठरवु शकतो का ? सरकारी नोंदीची आवश्यकता नसते का ?

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 7:44 pm | सुबोध खरे

होय. आपल्याला त्रास नसेल तर.

मुळात मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आजाराची गुंतागुंत केंव्हा होऊ शकते याची संपूर्ण कल्पना होतीच.

महापालिकेचे कर्मचारी माझ्याशी सतत संपर्कात असत. खरं तर रोज तीन वेळेस फोन करून तीच तीच उत्तरे देणे हा उच्छाद झाला होता.

आज परत फोन आला होता आपली तब्येत कशी आहे? मी छापील उत्तरे दिली.

त्यानंतर त्या बाईंनी तुम्ही अगोदर प्लाझ्मा दिला आहे का हे विचारले आणि आता रुग्णांना प्लाझ्मा द्यायची तयारी आहे का हे विचारले?
मी हो म्हणून उत्तर दिले आहे.

साधारण २० दिवस पूर्ण झाले कि जे जे रुग्णालयातून फोन येतो अशी माहिती मिळाली.

अजून तरी प्लाझ्मा चा उपयोग होतो असे सिद्ध झालेले नाही पण चुकून माकून जरी एखाद्याचा जीव वाचला तरी उत्तम या विचाराने मी अनुमती दिली आहे.

कपिलमुनी's picture

9 Sep 2020 - 2:03 pm | कपिलमुनी

डॉक्टर, तुम्ही कोरोना मधून बरे झालात याचा आनंद आहे उत्तम आरोग्ययासाठी सदिच्छा

मराठी_माणूस's picture

9 Sep 2020 - 3:03 pm | मराठी_माणूस

बरे झाल्याबद्दल अभिनंदन.
संसर्ग कसा काय झाला ?

(अवांतरः आइसीआइसीआय बँकेच्या अलीकडे असलेले सर्व्हीस सेंटर का ?)

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 6:25 pm | सुबोध खरे

होय

तसं पाहिलं तर अत्यावश्यक वस्तू ,भाजीपाला, औषधे, किराणा माल यांची वाहतूक अगदी सुरुवातीला बंद पडल्यासारखी वाटली पण सुरळीत चालू आहे. आताच्या डाळी,कडधान्ये,बटाटे वगैरे हे हिवाळी पीक २०१९ नोव्हेंबर ते २०२० फेब्रुवारी या करोनापूर्व काळात व्यवस्थितपणे हाती लागले होते आणि भाव स्थिरच होते पण आता पाहा दीडपट दुप्पट केले आहेत. नवीन हिवाळी पीकही या आगस्टच्या पावसाने निश्चित झाले आहे तरीही लुटमार चालू आहे. यासाठी कोणते ग्राहक न्यायालय गाठणार?

चौकटराजा's picture

10 Sep 2020 - 9:28 am | चौकटराजा

या लूटमारीला काही कारणे आहेत. एक तर नाशवन्त वस्तू नसेल व तान्त्रिक प्रगतीचा सम्बन्ध नसेल तर कोणत्याही मालाचे भाव एकदा वाढले की ते उतरत नाहीत. जसे मो महिन्यात मेथी ,कोथिंबीर महाग झाली तरी ती पावसाळा उतरू लागताच पुन्हा स्वस्त होते. पण एकदा महागलेले तेल व तान्दूळ पुन्हा स्वस्त होत नाहीत. प्रचन्ड प्रमाणात मागणीपेक्षा उत्पादन झाले तरच मालाचे भाव कमी होऊ शकतात. आताची लूटमार ही मालाचा व सेवांचा कमी पुरवठा आहे याचा परिणाम आहे . त्यात ज्यांचा व्यवसाय रोज चालतोच असे नाही नाही ते चढ्या भावानेच पैसे घेत असतात. हे कायमच असते. उदा . डेन्टिस्ट . भटजी ,प्लम्बर्,सुतार ,स्पेशालिस्ट सर्जन ई.

माझे मिस्टर जिथे काम करतात तिथे तीनचार कोरोना पेशंट सापडल्याने, आज कंपनीतर्फे सर्वांचीच कोरोना टेस्ट करणार आहेत. दोनतीन दिवसात रिपोर्ट मिळेल तोपर्यंत टेन्शन आहे. नेमका आज हा लेख वाचण्यात आला. तुम्ही कोरोनातून कसे बरे झालात, काय केले याबद्दलही एखादा लेख लिहून माहिती द्या.सर्वांनाच उपयुक्त ठरेल.

शा वि कु's picture

9 Sep 2020 - 4:20 pm | शा वि कु

आजारातून बरे झाल्याबद्दल अभिनंदन.

डॉक, तुमचा आणि इतरांचे अनुभव वाचले, रोचक आहेत. मी माझी १६० एकशृंगिणी घेताना तिला आधी किक आहे की नाही ते पाहुन घेतले होते. तुम्ही माझी बाईक चालवुन पाहिल्याचे स्मरते ! :)

वाचनिय लेख :- बाई'को' विकल्यावर

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #TwoBinsLifeWins [ मेरा बाबा देश चलाता है ]

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 6:36 pm | सुबोध खरे

१६० सी सी ची युनिकॉर्न फारच छान गाडी आहे.

आपण मेतकूट कट्ट्याला आणली होती तेंव्हा चालवून पहिली होती.

आता तर २०० सी सी ची आली आहे

सस्नेह's picture

9 Sep 2020 - 5:40 pm | सस्नेह

विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन !
सविस्तर लेखाच्या प्रतीक्षेत.
बॅटरी नाही पण राउटरबाबतीत असाच अनुभव आला आहे.
गेल्या आठवड्यात BSNL चा राउटर बंद पडला एक वर्ष वॉरंटी होती ती संपल्यावर पाचच दिवसांनी बंद पडला. BSNL FTTH खाजगी कंपनीस चालवण्याह दिले आहे. त्यांचा मेकॅनिक आला आणि तपासला सुरू होईना तर त्यांच्या ऑफिसला घेऊन गेला दुसऱ्या दिवशी सांगितले कि तो खराब झाला आहे व नवीन घ्यावा लागेल नवीन राउटर रू. ४०००/- ऐवजी फक्त पंचवीस शे रुपयात देतो असे म्हणाले त्यावर मी म्हटले की वॉरंटी संपून चारच दिवस झाले आहेत तर त्याचे लाइफ काय एकच वर्ष आहे का ? असे असेल तर नवीन राउटरसुद्धा एक वर्षांनी बदलावा लागेल की काय. त्यावर त्यांनी शक्य आहे म्हणून सांगितले. मग मी म्हटले तुम्ही मला specifications द्या. मी मार्केटमधून चांगल्या btand चा घेईन.
दुसरे दिवशी त्याने पहिलाच राउटर दुरुस्त (?) करून आणला आणि लावला. तो अजून छान चालतो आहे.

डॉ. आपण आणि कुटूंबीय कोविड संसर्गातून सुखरूप बाहेर पडलात हे अभिनंदनीय आहे. बाकी संबंधीत लेखन आपल्याकडून केव्हातरी सावकाशीने होईलही. खासकरून आपण आणि आपल्या कुटूंबीया पर्यंत संसर्ग कोणत्या मार्गाने झाला ह्याचा काही अंदाज आला का? कि केवळ कम्युनिती स्प्रेड म्हणून सोडावे लागले?

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 8:12 pm | सुबोध खरे

हि साथ आली तेंव्हापासून मी आणि माझी पत्नी दोन्ही वेळेस दवाखान्यात जात होतो.

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इतक्या बेजबाबदारपणे वागत आले आहेत किंवा वागत होते कि कधीतरी आपल्याला हा आजार होणार हि खूण गाठ बांधलेली होतीच.

बायको गरोदर असताना सुद्धा दवाखान्यात मास्क न घालणे, मास्क नाकाच्या खाली ठेवणे, वाल्व्ह असलेला मास्क घालणे बोलताना मास्क काढून बोलायला सुरुवात करणे असे करणारे अक्षरशः शेकड्यात रुग्ण पाहिले आहेत आणि आजही इतकी रुग्ण संख्या वाढत असतानाहि असेच वागत आहेत.

मास्क नीट घाला हे सांगण्याचा आता अक्षरशः कंटाळा आला आहे.

दोन खुर्च्यात ५ फुटाचे अंतर ठेवले तरी खुर्ची सरकवून जवळ येऊन बसणे. फोन आला तर मास्क काढून मोठ्या आवाजात गप्पा मारत राहणे.

बाजूला गरोदर स्त्री आहे तिला कोव्हीड झाला तर काय याचा विचार न करता मास्क काढून गप्पा मारणे

रोज रोज तेच सांगायचा कंटाळा आला आहे.

हेल्मेट घाला सांगून लोक ऐकत नाहीतच परंतु तेथे त्या माणसाला स्वतःला धोका असतो येथे आपल्यामुळे इतर लोकांना धोका आहे हेही हे लोक लक्षात घेत नाहीत.

पुलं च्या भाषेत बेंबट्या आपल्या भारतीय लोकांच्या ढुंगणावर हंटरच पाहिजे हे वाक्य सतत आठवत राहते.

माहितगार's picture

9 Sep 2020 - 10:27 pm | माहितगार

बेंबट्या आपल्या भारतीय लोकांच्या ढुंगणावर हंटरच पाहिजे

:) बरीक हे खरयं. माझ्या सारख्या लोकशाहीवादी व्यक्तिला हंटर ते सुभाषचंद्र बोस असोत वा बाळासाहेब ठाकरेंनी केलेले हुकुमशाहीचे समर्थन इंदिराजींची आणिबाणी पटत नसले तरी लोकांचे बेशीस्त वर्तन पाहीले की स्वातंत्र्य आहे म्हणून आपल्यासाठीच असलेली व्यवस्था किती म्हणून वेठीस धरायची आणि याची लोकांना समज कशी येईल हा प्रश्नच पडतो. मग हुकुमशाहीचे समर्थनही पटते.

एकीकडे अँब्युलन्स आणि आयसीयु बेड्सकमी असल्याबद्दल सरकारवर टिका करणारीच मंडळी पॉझीटीव्हीटीच्या टेस्ट सगळ्या खोट्या आहेत असा कॉन्स्स्पिरसी सिद्धांत स्वतःच्या नात्यातली मंडळी गचकली -स्वतःच्या सोसायटीत दोन-चार पॉझीटीव्ह आहेत- तरी सांगतात हे परिचितांकडून ऐकुन अवघा तास भर झाला आहे. त्या नंतर तुम्ही प्रतिसादात लिहिलेली वस्तुस्थिती म्हणजे ज्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा त्यांचेही ऐकायचे नाही म्हणजे हद्द आहे.

माहितगार's picture

9 Sep 2020 - 10:33 pm | माहितगार

मी तुमचा प्रतिसाद घरात वाचून दाखवला, माझे अपत्य सध्या डॉक्टरांकडे पेशंट-लेक्चररच्या ड्युटीवर जा म्हणजे दोघांचेही काम होईल आणि करोना तेवढाच कमी पसरेल म्हणते आहे :)

दादा कोंडके's picture

10 Sep 2020 - 12:18 am | दादा कोंडके

आपला अनुभव अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल.

दुर्गविहारी's picture

10 Sep 2020 - 4:30 pm | दुर्गविहारी

विशेष म्हणजे अगदी असाच अनुभव मला ही आला. फक्त बॅटरी ऍक्टिव्हाची होती. मलाही बॅटरी बदला हेच सांगितले. मात्र मी चार्ज करून बघितली आणि गाडी चालू झाली. घाईघाईत कोणताही निर्णय न घेणे शहाणपणाचे आहे.

दादा कोंडके's picture

2 Oct 2020 - 4:26 pm | दादा कोंडके

बॅटरी कशी चार्ज केलीत? घरच्या घरी करून बघता आलं तर बरंच आहे. माझी सुझुकी स्कूटर पण बटन स्टार्टला प्रॉब्लेम देते. बाईकसारखं पटकन किक मारता येत नसल्यानं आणि प्रकृती तोळामासा असल्यानं खूप त्रास होतो.

सुबोध खरे's picture

13 Sep 2020 - 1:35 pm | सुबोध खरे

आमचे एक सर म्हणायचे
सुबोध
या जगात माणसे मूर्ख बनवायचे मशीन (CBM- C- बनाने का मशीन)घेऊन आलेली असतात. आपण सावध राहणे आवश्यक आहे.
जरा बेसावध झालात की कोणी तरी तुम्हाला मूर्ख बनवून फायदा उपटेल.

सुबोध खरे's picture

13 Sep 2020 - 1:35 pm | सुबोध खरे

आमचे एक सर म्हणायचे
सुबोध
या जगात माणसे मूर्ख बनवायचे मशीन (CBM- C- बनाने का मशीन)घेऊन आलेली असतात. आपण सावध राहणे आवश्यक आहे.
जरा बेसावध झालात की कोणी तरी तुम्हाला मूर्ख बनवून फायदा उपटेल.