या लोकांना मतप्रदर्शनाकरिता बोलावणे योग्य आहे का ?

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
31 Aug 2020 - 1:38 pm
गाभा: 

सुमारे वीस वर्षांपूर्वी सामनेनिकालनिश्चितीप्रकरणात काही क्रिकेटपटू अडकले. त्यांचे करीअर जवळजवळ संपले.
काहींनी केस लढवली. काहींवर आजीवन बंदी आली. पुढे काही वर्षांनी या लोकांना टीव्हीवर समालोचन किंवा मतप्रदर्शनाकरिता बोलावले गेले.
प्रश्न असा - गैरकृत्य केल्यामुळे गुन्हेगार ठरलेल्या लोकांना टीव्हीवर मतप्रदर्शनासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून बोलावणे योग्य आहे का ? काही वर्षांनी या लोकांवर ठपका तितका राहत नाही, असे आहे का ? एक स्पेसिफिक उदाहरण - नयन मोंगियाला मी काही सामन्यांच्या वेळी टीव्हीवर पाहिले आहे.

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

31 Aug 2020 - 1:46 pm | कानडाऊ योगेशु

प्रश्न असा - गैरकृत्य केल्यामुळे गुन्हेगार ठरलेल्या लोकांना टीव्हीवर मतप्रदर्शनासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून बोलावणे योग्य आहे का ?

उत्तर : नैतिकदृष्ट्या बरोबर नसले तरी जर नयन मोंगियाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर यष्टीरक्षणासंबंधीत काही विश्लेषणाबाबत त्याचे ज्ञान अधिक असु शकते त्यामूळे जर त्याला बोलावले असेल तर त्यात काही गैर नसावे. कायद्यानुसार जर गुन्हेगाराने योग्य ती सजा भोगली असेल तर समाजात वावरण्याचा त्याला हक्क आहे.

शा वि कु's picture

31 Aug 2020 - 4:27 pm | शा वि कु

हे पटते.

चौथा कोनाडा's picture

1 Sep 2020 - 5:57 pm | चौथा कोनाडा

काही वर्षांनंतर लोक गुन्हा आणि गुन्हेगाराचा अपराध या विषयी विसरून जातात, त्यांच्या लक्षात राहते ते त्यांचे सेलीब्रेटीत्व जे व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जाते, त्या मुळे "अशा लोकांना मतप्रदर्शनाकरिता बोलावणे योग्य आहे का ?" हा सवालच फिजूल होऊन जातो !

फेरफटका's picture

1 Sep 2020 - 7:28 pm | फेरफटका

मॅच फिक्सिंग हा भारतात कायद्यानं गुन्हा नाही असं मला वाटतं. मध्यंतरी आयसीसी ने पुढच्या दोन वर्ल्डकप्स (भारतात भरणारे) च्या पार्श्वभूमीवर असा कायदा अतित्वात यावा अशी विनंती केली होती. पण सद्य कायद्यानुसार अशी कुठलीही तरतूद नाही. बेटींग साठी ५०० रूपये दंड होऊ शकतो. त्यामुळे मोंगिया-अझहर-जडेजा प्रभृतींवर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही आणी त्यांणा कुठलीही कायदेशीर शिक्षा झाली नाही. आशियामधे मॅच फिक्सिंग कायदेशीर गुन्हा असलेला श्रीलंका हा एकच देश आहे बहूतेक.