मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

Primary tabs

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
5 Aug 2020 - 2:07 pm

आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले..
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली..

अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे..

नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या.. आता डोळ्यासमोरून जात नाहीयेत.
मिपावर पण मज्जा आली त्यांच्या मुळे..

अलीकडे संपर्क कमी झाला होता, नेमके करोनाच्या आधी त्यांना मी फोन केला होता, आणि काका भेटूयात पुन्हा असे ठरवले होते.. पुन्हा तसेच दिलखुलास बोलणे झाले, पण शेवटची भेट मात्र शेवटी राहिलीच..

नेमके, आत्ताच मी त्यांची कविता कुठल्याश्या कवितेवर दिली होती..
'कारण लग्न करून तू सासरी गेली आहे.. 'ती त्यांची खरी कविता होती, कारण त्यांच्या बोलण्यातून मी कारखान्याचे, घाईचे वर्णन ऐकलेले होते..
आणखीन आता बोलू शकत नाही.. वाईट वाटले .

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

http://misalpav.com/user/2594

व्यक्तिचित्रणसद्भावना

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

5 Aug 2020 - 2:10 pm | किसन शिंदे

श्रद्धांजली

कुमार१'s picture

5 Aug 2020 - 2:10 pm | कुमार१

आदरांजली !

शब्दमेघ.. ह्या नावापुढे 'एक शापित मेघ' काढून
'मुक्त..स्वैर..स्वछंदी जीवन' हि लाईन त्यांनीच दिलेली...

Miss you काका..

आनन्दा's picture

5 Aug 2020 - 2:19 pm | आनन्दा

अकुकाका गेले?

लेखनात प्रामाणिक तळमळ असायची.

आदरांजली.

mrcoolguynice's picture

5 Aug 2020 - 2:24 pm | mrcoolguynice

श्रद्धांजली

प्रचेतस's picture

5 Aug 2020 - 2:27 pm | प्रचेतस

अकुकाकांना आदरांजली

गवि's picture

5 Aug 2020 - 2:33 pm | गवि

वाईट बातमी...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2020 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर अविकाकच्या लेखनाला नेहमी दाद देत राहीलो. फेबूवर पण ते मस्त पोष्ट करायचे.
भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

दीपक११७७'s picture

5 Aug 2020 - 2:39 pm | दीपक११७७

श्रद्धांजली

मदनबाण's picture

5 Aug 2020 - 2:54 pm | मदनबाण

श्रद्धांजली...

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
आदरांजली.

नीलकांत's picture

5 Aug 2020 - 3:25 pm | नीलकांत

अविनाश कुलकर्णी काकांना मिपापरिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.

कुमार१'s picture

5 Aug 2020 - 3:31 pm | कुमार१

सा सं
यांना एक सूचना:
आपले जे सभासद दिवंगत झालेत त्यांच्या खात्यात तशी नोंद करता येईल का?

योगी९००'s picture

5 Aug 2020 - 3:45 pm | योगी९००

भावपुर्ण श्रध्दांजली...

त्यांच्या काही लिखाणावर अत्यंत वाईट कॉमेंट झाल्या होत्या त्याची आठवण आली. लिहायचे मात्र मनापासून आणि येणार्‍या टिकेची पर्वा करायचे नाहीत.

जव्हेरगंज's picture

5 Aug 2020 - 4:20 pm | जव्हेरगंज

भावपुर्ण श्रध्दांजली

भीमराव's picture

5 Aug 2020 - 4:28 pm | भीमराव

श्रद्धांजली..
पार्वतीपती हर हर महादेव!

कुलदादा's picture

5 Aug 2020 - 4:39 pm | कुलदादा

मनःपूर्वक श्रद्धांजलि !

मला ते पुण्यातल्या शरपंजरी कार्यक्रमात भेटले होते.कार्यक्रम संपल्यावर आमचं आस्थेने बोलणं झालं होतं.नगरशी त्यांचा संबंध होता.मिरीकर वाड्याजवळ ते राहायचे कधीतरी ,नगर महाविद्यालयात ते शिकले होते.छोट्याशा भेटीतच त्यांच्या मोकळ्या हसत खेळत गप्पांनी अजूनही घर केलं होतं.खुपच मनमुराद होते अविनाश काका.भावपूर्ण श्रद्धांजली

अनन्त्_यात्री's picture

5 Aug 2020 - 4:44 pm | अनन्त्_यात्री

श्रद्धांजली.

अभ्या..'s picture

5 Aug 2020 - 4:50 pm | अभ्या..

अकुकाका एकदम कलंदर असामी होते.
रंगीला रसिला माणूस.
वाईट झाले

मनापासून लिहायचे.
टीका व्यायची लेखनावर पण कधीच प्रत्युत्तर देत नसतं.
त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो

अभ्या..'s picture

5 Aug 2020 - 6:16 pm | अभ्या..

अर्थ वेगळा होतो हो टीका व्यायची ह्याचा.
अकुकाकाना अशी श्रध्दांजली ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Aug 2020 - 5:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

एक स्वछंदी माणुस गेला,
त्यांच्या लिखाणाची नेहमी आथवण राहील.
काकांच्या आत्मास सदगती मिळो
पैजारबुवा,

प्रमोद देर्देकर's picture

5 Aug 2020 - 6:02 pm | प्रमोद देर्देकर

श्रद्धांजली

कानडाऊ योगेशु's picture

5 Aug 2020 - 7:30 pm | कानडाऊ योगेशु

भावपूर्ण श्रध्दांजली.ते मनाने नेहेमीच तरुण व खेळकर होते.

अभिजीत अवलिया's picture

5 Aug 2020 - 7:41 pm | अभिजीत अवलिया

वाईट झाले. अकुकाकांना श्रध्दांजली.

रातराणी's picture

5 Aug 2020 - 8:08 pm | रातराणी

श्रद्धांजली :(

टिवटिव's picture

5 Aug 2020 - 8:31 pm | टिवटिव

वाईट झाले. अकुकाकांना श्रध्दांजली.

चौथा कोनाडा's picture

5 Aug 2020 - 8:40 pm | चौथा कोनाडा

विश्वास बसत नाहीय. त्यांच्या आवडलेल्या लेखनाला दाद दिली होती.
भावपूर्ण श्रद्धांजली.

शा वि कु's picture

5 Aug 2020 - 9:01 pm | शा वि कु

श्रद्धांजली.

कपिलमुनी's picture

5 Aug 2020 - 9:02 pm | कपिलमुनी

श्रद्धांजली

Gk's picture

5 Aug 2020 - 9:16 pm | Gk

श्रद्धांजली

तुषार काळभोर's picture

5 Aug 2020 - 9:24 pm | तुषार काळभोर

अविनाश कुलकर्णी यांना श्रद्धांजली.

दुर्गविहारी's picture

5 Aug 2020 - 9:58 pm | दुर्गविहारी

भावपुर्ण श्रध्दांजली !

खिलजि's picture

5 Aug 2020 - 10:25 pm | खिलजि

अत्यंत हृदयद्रावक अप्रिय घटना .. कसे झाले हे ? गुरुदेव ,, आपल्या आत्म्यास सद्गती मिळो ... आज भरपूर वाईट वाटले हे वाचून ...

सिरुसेरि's picture

5 Aug 2020 - 10:26 pm | सिरुसेरि

भावपूर्ण श्रध्दांजली

श्वेता२४'s picture

5 Aug 2020 - 11:38 pm | श्वेता२४

भावपूर्ण श्रद्धांजली

Prajakta२१'s picture

5 Aug 2020 - 11:42 pm | Prajakta२१

भावपूर्ण श्रद्धांजली

कांदा लिंबू's picture

5 Aug 2020 - 11:57 pm | कांदा लिंबू

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.
ओम शांती.

गामा पैलवान's picture

6 Aug 2020 - 12:03 am | गामा पैलवान

अकुकाकांना श्रद्धांजली. त्यांना शांती लाभो.
-गा.पै.

श्रद्धांजली. __/\__

नि३सोलपुरकर's picture

6 Aug 2020 - 12:31 pm | नि३सोलपुरकर

भावपूर्ण श्रद्धांजली
__/\__

समीरसूर's picture

6 Aug 2020 - 1:33 pm | समीरसूर

वाईट झाले. कशामुळे गेले काही कल्पना आहे कुणाला? मिपावरील एक अतिशय सक्रिय आणि चिरतरुण सभासद हरपला. माझा त्यांच्याशी कधी थेट संपर्क नव्हता पण त्यांचे लिखाण मात्र मी वाचत असे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

मिपावरील २-३ सभासद अकाली गेले. असं कुणी गेलं की हळहळ वाटते. आयुष्याच्या क्षणभंगूरपणाचा प्रत्यय येतो. काही वर्षांपूर्वी एक यकु म्हणून सभासद होते; ते अकाली गेले (चू. भू. दे. घे. - चूक असल्यास क्षमा करावी). नंतर वरुण मोहिते, बोका-ए-आझम, आणि आता अविनाश कुळकर्णी गेले...बहुतेक सगळे अकाली गेले. अर्थात, अविनाश कुळकर्णींचे वय मला माहित नाही.

अजून कुणी गेले असल्यास कल्पना नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली

संजय पाटिल's picture

6 Aug 2020 - 2:20 pm | संजय पाटिल

अविनाश कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

अकु नेहमीच लक्षात राहतील. मिपावर खूप छान लिहायचे..
काही जण त्यांच्या लेखनाची स्तुती करायचे तर बरेचसे टर देखील उडवायचे. पण कधीही खालच्या पातळीवर येऊन वयक्तिक प्रतिसाद दिला नाही किंवा कोणाला वाईट बोलले नाही.

भावपुर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो.

खेडूत's picture

6 Aug 2020 - 6:24 pm | खेडूत

हरि ओम!

त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो.

अ.कु. गेले यावर विश्वासच बसत नाही

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Aug 2020 - 11:20 am | बिपीन सुरेश सांगळे

भावपूर्ण श्रद्धांजली
माणूस कळायच्या आधीच निघून जातो ...

चांदणे संदीप's picture

7 Aug 2020 - 2:07 pm | चांदणे संदीप

कोणी काहीही बोलले/लिहिले तरी त्यांच लेखन चालूच असायचं ते पाहून विशेष वाटायचं.

अकुकाकांना श्रध्दांजली.

सं - दी - प

जेडी's picture

9 Aug 2020 - 11:16 pm | जेडी

भावपूर्ण श्रद्धांजली

अकुकाकांना भावपुर्ण श्रध्दांजली _/\_

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Aug 2020 - 4:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अरेरे, वाईट झालं.
श्रद्धंजली!!

चलत मुसाफिर's picture

30 Aug 2020 - 7:31 pm | चलत मुसाफिर

अकुंच्या मूळ लेखाइतकेच मिपाकरांचे त्यावरील प्रतिसाद वाचनीय असायचे. मी प्रतिसादांच्या संख्येवर लक्ष ठेवुन असे. किमान 25-30 प्रतिसाद झाले की मगच लेख वाचायला घ्यायचा. एका अर्थाने वाचकाभिमुख लेखक! महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादकर्त्यांनी कितीही टांग खेचली तरी कुलकर्णी यांच्याकडून कधिही गैर शब्द आला नाही. माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती पण त्यांचे मिपावरील व्यक्तिमत्त्व हे अतिशय सरळमार्गी व आनंदी असे होते.