माझा कोविड अनुभव

Primary tabs

अश्विनी मेमाणे's picture
अश्विनी मेमाणे in जनातलं, मनातलं
21 Jul 2020 - 2:43 pm

गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत. या लोकल डॉक्टर कड़े ३-४ वेळा जाण झाल होत. त्यांनी एंटीबायोटिक्स लिहून दिल आणि इंजेक्शन पण दिले. घरी आल्यावर घाम येऊन ताप उतरला आणि त्याला फ्रेश पण वाटायला लागल. शनिवारी सकाळी तो ठीक होता. नेहमी प्रमाणे त्याने व्यायाम पण केला. त्याला अजिबात थकवा न्हवता. राहिलेला दिवस त्याने असाच झोपुन होता. ताप चढत उतरत होता.
गुरुवारी जसा ताप(९९) यायला लागला तस त्याने स्वता:ला आमच्या पासून वेगळ केले होते. फक्त जेवण्यापुरत तो खाली येत होता. आमच रो हाउस आहे अणि आमची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर ताप नाही उतरला तर आपण डेंगू मलेरिया टेस्ट करू. त्याला तापा शिवाय अजुन काही लक्षणे नव्हती. आम्हाला वाटत होत नार्मल फ्लू आहे. रविवारी सकाळी त्याला ९९ ताप होता आणि मलाही. मग मात्र आम्हाला शंका आली. माझ्या नवऱ्याला अजुन तापा शिवाय काहीही नव्हत. मग मात्र डॉक्टर म्हणाले की आपण टेस्ट करू. आमच्या घरी जावेच १० महिन्याच बाळ आहे अणि सासुबाई ज्यांना दम्याचा त्रास आहे म्हणून आम्हाला कोणतीच रिस्क नको होती अणि आम्ही लगेच टेस्ट करायला गेलो.
आमच्या या डॉक्टर ची सह्याद्रि हॉस्पिटल ला ओळख होती त्यांनी कॉल करून सगळ अरेंज केले होते. दुपारी १२ च्या आसपास सैम्पल घेतला गेला आणि इथून आमची परीक्षा सुरु झाली. रविवारी सकाळी माझ्या नवऱ्याने ब्लड सैंपल पण दिला होता डेंगू अणि बाकि टेस्टसाठी. संध्याकाळ पर्यन्त ब्लड रिपोर्ट आले ते सगळे नार्मल होते. मला जास्त समजत नाही पण टेस्ट असते ज्याने समजत की काही इन्फेक्शन आहे का ते(CRP टेस्ट बहुदा. येथील डॉक्टर जास्त सांगू शकतील). हे पण नॉर्मल होता. आमच्या डॉक्टरच्या मताप्रमाणे ही टेस्ट नेगेटिव आहे तर covid ची टेस्ट पण नेगेटिव येण्याचे चान्सेस ४०-५०% आहेत. आमचे रिपोर्ट संध्याकाळ पर्यन्त येणार होते पण नाही आले. हे सगळे अपडेट आम्हाला आमचे डॉक्टरच सांगत होते. सोमवारी आम्ही आमच्या बेडरूम मधेच काम करायला सुरवात केली. दोघेही नार्मल होतो. तो एंटीबायोटिक्स घेत होता अणि मी फक्त परसटोमोल. ताप येत जात होता. थकवा वैगरे काही न्हवता. आम्ही घरच्यांपासून पूर्ण isolate होतो अणि दुपारी डॉक्टरचा कॉल आला की तुमचा इन्शुरन्स आहे का? या एका वाक्यात सगळ होता. आम्ही दोघेही Covid 19 पॉजिटिव होतो. आमच्या आरोग्य सेतु ऐप वर पण पॉजिटिवची नोंद झाली होती.
डॉक्टरांच्या मताप्रमाणे आम्ही लगेच एडमिट व्हायला पाहिजे अणि ते आमच्यासाठी बेड अरेंज करायला तयार होते. आमची लक्षणे अजुन स्ट्रांग नव्हती आणि म्हणुन बेड occupie करायची तर अजिबात इच्छा नव्हती. दोनच दिवासपूर्वी PMC ने सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी होम क्वारंटाइनच्या गाइडलाइन्स दिल्या होत्या. सायली राजाध्यक्ष यांची होम क्वारंटाइनची फेसबुक पोस्ट वाचलेली होती अणि त्यांनी त्याना अनुभव प्रत्येक दिवसानुसार खुप छान सांगितलेले आहे म्हणून मग कुठेतरी वाटत होता की नको एडमिट व्हायला. या दरम्यान आमच्या डॉक्टरच मत अस होता की लक्षणे वाढू शकतात तुम्ही एडमिट व्हा. याधीचा सहयाद्रिचा अनुभव खुप चांगला नाहीये. म्हणून मग घरचे सगळेच दीनानाथला जायला सांगू लागले. आम्हाला माहित होता की बेड नाही मिळणार तिकडे. तरी आम्ही तिकडे गेलो अणि सांगितला की पॉजिटिव आहोत. त्यानी फीवर ओपीडी तयार केली आहे. तिकडे सगळे पैरामीटर चेक केले अणि सांगितला की बेड नाहीये पण तुम्ही होम क्वारंटाइनच कंसलटेशन घेऊ शकता.

आम्ही थोड़ा विचार करून अणि घरी बोलुन हा ऑप्शन घ्यायच ठरवल. तिकडे दोघांचे २००० घेऊन त्यांनी कंसलटेशन केले अणि घरी असतना कशी काळजी घायची याची सगळी माहिती दिली. या दरम्यान आमचा दोघांचा ताप पूर्ण उतरलेला होता अणि बाकि काही लक्षणे नव्हती. त्यांच्याच फार्मेसी मधे एक किट आहे ज्यामधे, सर्जिकल मास्क, डिसइंफेक्टर, गार्बेज बैग्स, थर्मामीटर अणि ऑक्सीमिटेर आहे. याची किंमत ३००० आहे. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला झिंक,HCQ,परसटोमोल असे मेडिसिन दिले. त्यांनी आम्हाला वेगळया रूम मधे रहा हे पण सजेस्ट केले. आम्ही या गोष्टीला नाही म्हणालो. आम्हाला सोबत राहण्याची जास्त गरज होती अस आम्हाला वाटल. तरी माझ्या नवऱ्याने एक्स्ट्रा गादी जमिनीवर टाकली अणि मी बेड वापरत होते.
मंगळवारी (७ जुलै) आम्ही सुट्टी घेतली. पूर्ण दिवस झोपुनच होतो. प्रत्येक २ तासाला आम्ही टेम्प्रेचर अणि ऑक्सीजन लेवल चेक होतो. ऑक्सीजन लेवल की ९५ च्या वर असणे खुप गरजेचे होते. कधी कधी रात्री जाग आल्यावर पण आम्ही हे चेक करायचो.दिवसातून एकदा थोड़ा रूम मधेच ३ मि पेक्षा जास्त वॉक नंतर पण चेक करायचो. ऑक्सीजन साचुरेशन हे वॉक नंतर पण ९५ च्या वर असत. आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो. इंडक्शन आम्ही वर मागवाला होता. घरचे सगळे फक्त खालचा मजला वापरत होते. आम्ही ताट रूम च्या बाहेर ठेवायचो अणि निघून गेले की मग जेवण आत घ्यायचो. पहिला पूर्ण आठवडा आम्हाला सगळ जेवण हे विचित्र लागत होते. कधी खुप खारट कधी अजिबात चव नव्हती. जेवणाची इच्छा नसायची. आम्ही पाणी भरपूर प्यायचो. दिवसातून २ वेळा काढा करून पीत होतो. १ काढा जो आयुर्वेदिक डॉक्टरने बनवाला आहे आणि दूसरा ज्या मधे गुलवेल, हळद, आल, दालचीनी,मीरे, लवंग, तूळस अणि थोड़ा गुळ असा पानी अर्ध होई पर्यंत गरम करून पीत होतो. बुधवार नंतर मला कफ आणि खोकला सुरु झाला. पण अगदीच थोड्या प्रमाणात. १-२ तासामधे एखादी उबळ येत असे. यासाठी आम्ही दीनानाथ मधे डॉक्टरांना कॉल करूँ विचारणा केली होती अणि त्यांनी फक्त ऑक्सीजन साचुरेशन वर लक्ष ठेवायला सांगितले. कॉल करण्याचे अजुन एक कारण होते की आम्हाला बघायचे होते की किती वेळामधे आम्हाला रिस्पांस मिळत आहे.
या मधे PMC कडून वरचेवर कॉल येत होते अणि तब्बेतीची चौकशी केली जात होती. एकदा त्याचे लोक येऊन पार्किंग मधे फवारणी करून गेले. दुसऱ्या आठवड्यात खुपच बरे वाटत होते. पहिल्या आठवड्यात नवऱ्याला एकदाच थोडा(99) ताप आला होता. आम्ही रोज सकाळी पूर्ण रूम सानिटाइझ करत होते. योगा करायला पण सुरवात केली. वाशरूम यूज़ नंतर पण सगळे नॉब पण स्प्रै करत होते. जेवढे लांब रहता येईल एकमेकांन पासून तेवढा प्रयन्त करत होतो.
या सगळ्या मधे मानसिक उतार चढाव पहिल्या ४-५ दिवसात खुप झाले. आपल्यामुळे बाळाला आईला त्रास होईल याची भीति वाटत होती. या सगळ्यामधे आम्ही पूर्ण वेळ काम केला. सुट्टी घेऊन आम्ही पूर्ण वेळ फक्त या बद्दल वचत होतो म्हणून एका दिवसाच्या सुट्टी नंतर आम्ही काम करायचे ठरवले. ऑफिसमधे कल्पना असल्यामुळे आमचे काम थोडे कमीच होते. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ठीक वाटत होते. आता हा तिसरा आठवडा आहे. आमच आइसोलेशन संपले आहे. आम्ही अजुनपण घरात मास्क वापरतो आहे. आता आरोग्य सेतु ऐप वर पण स्टेटस चेंज झाले आहे.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो. पण आम्ही दुसरे कुणालाही इन्फेक्ट नाही केला. जसा ताप यायला सुरवात झाली तस आइसोलेट झालो. इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो.
शेवटी मी एवढच म्हणेल आहे की घाबरू नका. शांत रहा. आम्हाला जास्त त्रास नाही झाला. पण आता पूर्ण काळजी घ्यायची ठरवल आहे. आधी किराणा अणि भाजीसाठी बाहेर जात होतो आता तेहि ऑनलाइन बघणार आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे. काही चूका असतील तर समजून घ्या.

औषधोपचारअनुभव

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

21 Jul 2020 - 3:23 pm | श्वेता२४

इतरांना मार्गदर्शक ठरतील. आजारातून बाहेर आलात व धैर्यांने परिस्थितीला सामोरे गेलात याबद्दल अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2020 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण आपला उत्तमपणे अनुभव मांडला आहे, आपण धोरोदत्तपणे परिस्थिती हाताळली. छान आणि अभिनंदन आपला अनुभव धीर देणारा आहे. आभार....फक्त डॉक्टरचं अशा परिस्थितीतही 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं.

बाकी लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

अश्विनी मेमाणे's picture

21 Jul 2020 - 4:01 pm | अश्विनी मेमाणे

धन्यवाद.. आम्हाला इन्शुरन्स वापरण्याची गरज नाही पडली. एकमेकांन सोबत होतो तर धीर देते होतो. पण बाकि घरातल्या लोकांसाठी भीति वाटत होती. त्यानी खुप खुप काळजी घेतली आमची

माहितगार's picture

21 Jul 2020 - 4:48 pm | माहितगार

.... 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं....

त्यांनी उल्लेख केलेल्या विशीष्ट हॉस्पिटलचा अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाईडचा किमान एक कर्मचारी असे खटकण्यासारखे बोलतो असा माझ्या परिचितांचाही अनुभव आहे. बहुधा वरीष्ठ मॅनेजमेंटच तसे असेल तर खालील कर्मचारी तसे वागण्य्चाची शक्यता असते.

अर्थात हॉस्पीटल मॅनेजमेंट्सनी खर्चाच्या रक्कम एवढ्यावर नेऊन ठेवल्या आहेत की इन्शुरन्स असल्याशिवाय कव्हर होणार नाही आणि नंतर पेशम्ट्सच्या मागे कुठे पळा - त्या पेक्षा स्पष्ट विचारून घ्या - असा ही होरा खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांचा असू शकतो.

लेख वाचून मनावर ताण आला. म्हणजे खालील ओळी वाचून.

आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो

कारण अधोरेखित भाग आम्हा वाचकांपैकी बहुतांश लोकांना लागू आहे. (असावा)

पण तुम्ही सुखरूप केवळ सौम्यच लक्षणांसहित बाहेर पडलात याबद्दल अभिनंदन.

माहितगार's picture

21 Jul 2020 - 4:38 pm | माहितगार

सर्व प्रथम आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन. आणि असे अनुभव लेख येणे अत्यंत गरजेचे आहे त्याची मिसळपावच्या माध्यमातून भर घालण्यासाठी अनेक आभार सुद्धा. नाही म्हटले तरी अजून वर्षभरतरी सर्वांना या विषयावद्दल दक्ष रहावे लागेल. मला वाटते अनुभव लेख मिपा संपादकांनी निवडक लेखांच्या यादीत घ्यावयास हवे.

लेखिकेने सर्व काळजी घेऊन संसर्ग कुठून झाला हे लक्षात येत नाही म्हटले आहे. वस्तुतः सर्व काळजी घेतलेल्यांना संसर्गाचा मार्ग लक्षात येणे अधिक सोपे जावयास हवे आणि त्याची चिकीत्सा इतरांना ऊपयूक्त ठरु शकते. त्यासाठी आपण एखादी वस्तु कुठे विसरलो कि स्टेप बाय स्टेप कुठे कुठे काय काय केले हे लक्षात घेतो तसे करावे लागेल. जर लक्षात आले तर नेमक्या कोणत्या स्टेप्स अधिक साशंकतेच्या होत्या हे लक्षात येऊ शकेल.

कोविड - १९ चा संसर्ग लक्षण प्रथमतः २ जुलैला लक्षात आले म्हणजे संसर्ग वस्तुतः त्याच्या आधी दोन आठवड्यापासून सुद्धा म्हणजे १५ जुनच्या आसपासपासून झालेला असू शकतो. एका व्यक्तिचा संसर्ग लक्षणे दृगोच्चर होण्यापुर्वीच दुसर्‍या व्यक्तिस होऊ शकतो पण इतर फॅमिली मेंबर्सना झाल्याचे किमान उपरोक्त लेखातून तरी दिसत नाही.

इतर केसेस मध्ये फॅमिली मेंबर्सना होऊन गेला पण त्यांना काहीच लक्षणे न दिसल्याने पण कळलेच नाही असेही होऊ शकते घरात दम्याचा विकार असणारी व्यक्ती सर्वसाधारणपणे सुरक्षीत राहीली म्हणजे लेखिकेच्या पतींना लक्षणे कमी कालावधीत दृगोच्चर झाली आणि त्यांनीही घरात अधिक पसरु नये याची व्यवस्थित काळजी घेतली आणि अशी काळजी घेणे अभिनंदनास नक्कीच पात्र म्हटले पाहीजे. म्हणजे २ जुलैच्या आधी तीनेक दिवसांपासूनचा संसर्ग असण्याची शक्यता अधिक असेल का?

खालील प्रश्न विचारण्याचा उद्देश्य ब्लेम करणे नाही पण तुमच्या स्टेप्स रिकलेल्ट करण्यात आणि शक्य त्रुटीतून इतरांना शिकण्यास मदत होईल.

१) घरात घरकामासाठी कुणि मदतनीस स्त्री/व्यक्ती आहे/होती का? असेल तर त्यांच्याशी तुमचे किमान अंतर आणि मास्क आवर्जून होते का? त्यांनी स्पर्श केलेले प्रत्येक बटन वस्तु तुम्ही व्यक्ती गेल्या नंतर सॅनिटाईज केली का? - संसर्गाची हि शक्यता उपरोक्त कुटूंबा बाबत कमी वाटते, मदतनीस व्यक्तीस संसर्ग असेल तर तो पूर्ण कुटूंबात पोहोचला असता.

२) किराणा भाजी दुकान पारंपारीक आणि वेल व्हेंटीलिएटेड होते की स्वतः वस्तु निवडण्याचे सुपरमार्ट होते ?
३) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात दुकानदार आवर्जून मास्क बांधत होता का ?
४) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात तुम्ही दोघेही आवर्जून किमान अंतर पाळत होता का ? -की मास्क बांधला आहे म्हणून किमान अंतराची आवश्यकता वाटली नाही असे काही झाले, हात सॅनिटाईज करत होता का? (तुमच्या लेखावरून तरी असणार असे दिसते)
५) किराणा सामान आणि भाजी सॅनिटाईज केली का ?
६) वॉकींग सर्वसाधारणपणे किती वाजता आणि कुठे म्हणजे कित्पत लोक असलेल्या ठिकाणी केले.
७) तुमच्या दोघांपैकी कूणास चेहर्‍यास हात लावण्याची अधिक सवय आहे का? मास्क खाली सरकला तर हाताने चेहर्‍या समोरून वर करता की मास्क पूर्ण सोडवून पुन्हा बांधता?

किराणा आणि भाजी मार्फत वीषाणू संसर्गाची शक्यता कमी असेल तर वॉकींग दरम्यान झाला असण्याची शक्यता वाढत असावी. जसे की मॉर्नींग वॉक महापालीकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता काम करताना केला असेल तर संसर्ग त्यांच्या मार्फत झाला असण्याची शक्यता कित्पत आहे.

(अशा स्वरूपाचे डिटेल काँटेक्ट ट्रेसिंग व्हावयास हवे तसे काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात आरोग्य यंत्रणेकडून नाही म्हटले तरी हयगय होत असण्याची शक्य्ता वाटते. एकजरी पेशंट आढळला कि संबंधीत किराणा आणि भाजी पाला दुकानचाराचे टेस्टींग आणि दुकानापाशी सुचना फलक लावला कि जागरूकता वाढण्यास मदत होईल पण ते होताना दिसत नाही.)

किराणा आणि भाजी दुकानातून आलेला नसेल तर करोना सं

म्हणजे मॉर्नींग वॉक असेल तर महापालिकेचे सफाई कर्मचारी क्रॉस होत होते का? ( या शक्यतेने मी स्वतः आताशा मॉर्नींग वॉक टाळतोय)

अश्विनी मेमाणे's picture

21 Jul 2020 - 5:20 pm | अश्विनी मेमाणे

का? असेल तर त्यांच्याशी तुमचे किमान अंतर आणि मास्क आवर्जून होते का? त्यांनी स्पर्श केलेले प्रत्येक बटन वस्तु तुम्ही व्यक्ती गेल्या नंतर सॅनिटाईज केली का? - संसर्गाची हि शक्यता उपरोक्त कुटूंबा बाबत कमी वाटते, मदतनीस व्यक्तीस संसर्ग असेल तर तो पूर्ण कुटूंबात पोहोचला असता.
----मार्च पासून कुणीच येत नाही घरी
२) किराणा भाजी दुकान पारंपारीक आणि वेल व्हेंटीलिएटेड होते की स्वतः वस्तु निवडण्याचे सुपरमार्ट होते ?
-- दोन्ही ठिकाणी जाने झाले होते
३) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात दुकानदार आवर्जून मास्क बांधत होता का ?
--हो मास्क है नेहमीच होता
४) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात तुम्ही दोघेही आवर्जून किमान अंतर पाळत होता का ? -की मास्क बांधला आहे म्हणून किमान अंतराची आवश्यकता वाटली नाही असे काही झाले, हात सॅनिटाईज करत होता का? (तुमच्या लेखावरून तरी असणार असे दिसते) -- आम्ही दोघे वेगवेगळी बाटली सोबत ठेवायचे.
५) किराणा सामान आणि भाजी सॅनिटाईज केली का ? - हो किराना नेहमी करत होतो पण पालेभाजी नाही केली
६) वॉकींग सर्वसाधारणपणे किती वाजता आणि कुठे म्हणजे कित्पत लोक असलेल्या ठिकाणी केले. - वाकिंग ७-८ च्या मधे. ज्या मधे ३० मिन मधे ५-६ गाड्या जात असाव्यात अणि ३-४ लोक
७) तुमच्या दोघांपैकी कूणास चेहर्‍यास हात लावण्याची अधिक सवय आहे का? मास्क खाली सरकला तर हाताने चेहर्‍या समोरून वर करता की मास्क पूर्ण सोडवून पुन्हा बांधता? मास्क है पूर्ण वेळ वापरला. -- मास्क हा पूर्ण वेळ होता

माहितगार's picture

21 Jul 2020 - 10:07 pm | माहितगार

आपल्या सविस्तर ऊत्तरांबद्दल अनेक आभार. मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते. आपण नमुद केल्या इतकी तुरळक ट्रॅफीक असेल (आणि वाटेत महापालिका स्वच्छता कर्मचारी कडमडून गेला नसेल) तर वॉकींगच्या मार्गाने संसर्गाची शक्यता अत्यंत कमी वाटते. अजून एक रेअर शक्यता घरात सकाली कचरा पेटी वापस कोण घेते त्यांनी नंतर हात वॉश न करणे आणि कचरा पेटी हाताळणारा कामगार इनफेक्टेड असणे पण (तुर्तास अत्यंत रेअर धरून चालू )

संसर्ग झाला असण्याच्या दोन मुख्य जागा शिल्लक रहातात त्यात माझ्या व्यक्तिगत मते वस्तु स्वतःहून निवडण्याची सुपर मार्केट सर्वाधिक रिस्की ठरली असण्याची शक्यता वाटते कारण आत कमीत कमी लोकांना सोडणे टेंपरेचर नाही ऑक्सीजन हे सगळे बघितले आणि मास्कची अट पाळली तरी एवढ्या सगळ्यातून एखादी इनफेक्शनच्या सुरवातीच्या स्टेज मधील व्यक्ती टेंपरेचर ऑक्सीजन पॅरामीटर पूर्ण करत मास्क बांधून आत पोहोचू शकते. आत गेल्या नंतर शिंकून किंवा खोकलून गेली तरी कॉटन मास्क केवळ ६०% पर्यंतच शाश्वती देतात, आणि बाहेरची खेळती हवा नसल्याने वीषाणू अधिक काळ मॉल सुपरमार्केटच्या वातावरणात असू शकतो. आणि २ जुलै च्या आधी तीन दिवसात सुपर मार्केट मध्ये गेला नसाल तर पारंपारीक किराणा स्टोअर आणि भाजी दुकानापाशी किमान अंतर पाळले गेले नाही तुमच्या आसपास कुणि शिंकले आणि मास्क असल्याच्या भावनेत त्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले.

केवळ मास्क आणि हँड सॅनिटायझर पुरेसे नाही किमान शारीरीक अंतर पाळणे आणि सुपर मार्केटसारख्या बंदीस्त वातावरणाच्या जागा टाळणे या गोष्टींचे महत्व अधिकच अधोरेखीत होते असे वाटते.

पाला भाजी कच्ची न खाता शिजवून खाल्ली असेल तर त्या मार्गे संसर्गाची शक्यता सहसा नसावी.

आपण सविस्तर उत्तर दिलेत, आम्हा वाचकांच्या माहितीज्ञानात भर घालण्यात आपण हातभार लावलात त्याबद्दल अनेक आभार.

मराठी_माणूस's picture

22 Jul 2020 - 10:11 am | मराठी_माणूस

मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते.

म्हणजे काय ?

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 5:31 pm | चौथा कोनाडा

प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव.
मिसळपाव वरील महत्वाचा लेख.
कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव.
आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे.
माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक !
आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !

अश्विनी मेमाणे's picture

21 Jul 2020 - 5:55 pm | अश्विनी मेमाणे

धन्यवाद!!!
हा पहिलाच प्रयन्त होता लिखनाचा. माहिती सगळ्यांन पर्यन्त पोहचावी है उद्देश्य होता.
मी अणि माझा नवरा नेहमी हे बोलायचो की आपल्या माहितीत अस फर्स्ट हैंड अनुभव असलेल अस कुणी नाही.
तेह्वा वाटल न्हवत की स्वता: अनुभव लिहवा लागेल

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2020 - 7:54 pm | अत्रुप्त आत्मा

@

प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव.
मिसळपाव वरील महत्वाचा लेख.
कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव.
आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे.
माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक !
आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !

+++++१११११११

अनन्त्_यात्री's picture

21 Jul 2020 - 6:10 pm | अनन्त्_यात्री

पुन्हा काही दिवसांनी ( लक्षणे नसली तरीही) स्वॅबटेस्ट व/वा इतर कोविड विषयक टेस्ट करणे आवश्यक असते का?

अश्विनी मेमाणे's picture

21 Jul 2020 - 6:18 pm | अश्विनी मेमाणे

आम्हाला तर दीनानाथ मधून गरज नाही म्हणून सांगितला होता. आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले. १७ दिवस quarantine मधे रहा एवढच सांगितला होता त्यांनी. आणि आज आरोग्य सेतु वर पण स्टेटस चेंज झाल आहे

संजय क्षीरसागर's picture

21 Jul 2020 - 11:45 pm | संजय क्षीरसागर

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले

श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे.

यामुळे तुम्ही ९९% बिनधास्त होता आणि ते प्रतिकारशक्ती खाली येऊ देत नाही.

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 10:26 am | सुबोध खरे

श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे.

हा सल्ला आपण कोणत्या आधारावर दिला आहे?

Silent hypoxia' may be killing COVID-19 patients.

https://www.firstpost.com/health/happy-hypoxia-in-covid-19-new-study-may...

Silent hypoxia emerges as new killer

A condition in which a person’s oxygen level in blood cells and tissues drop without any warning signs, silent hypoxia has already claimed the lives of many Covid-19 patients in the country.

https://www.newindianexpress.com/states/kerala/2020/jun/07/covid-19-comp...

कोणत्या स्टेजला किंवा निकषावर टेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा / डॉक्टर घेत असावेत हे सांगितलं तर उपयोगी ठरेल काळजी घेण्याच्या (आणि काळजी न करण्याच्या) दृष्टीने.

हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनीच लेखिकेला तसं सांगितलं आहे.

प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात आलं असतं :

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 11:01 am | सुबोध खरे

हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि त्यांना दिला होता.

आपण सर्वाना हा सल्ला कोणत्या अधिकारात देता आहात ?

मी सल्ला दिलेला नाही > डॉक्टरनी त्यांना दिलेला सल्ला एन्डोर्स केला आहे कारण माझाही अनुभव आणि विचार तसाच आहे.

तुम्ही प्रतिसाद नीट वाचत नाही का अर्थ कळत नाही ?

सल्ला कशाला म्हणतात ते पाहा :

भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.....लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.

सुबोध खरे's picture

26 Jul 2020 - 2:09 pm | सुबोध खरे

उगाच या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका.

आम्हाला तर दीनानाथ मधून गरज नाही म्हणून सांगितला होता.

त्यांच्या कडे दीनानाथ मधून पल्स ऑक्सिमीटर दिलेला होता.

त्यावर जर ऑक्सिजनची मात्रा ९५ च्या वर असेल तर त्यांना हॅपी हायपॉक्सिया नाही हे स्पष्ट समजते.

हा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता?

एखादा माणूस आपल्यासारख्याच दीड शहाणपणाचा सल्ला घेऊन घरी बसला तर प्राणावर बेतू शकते तेंव्हा असे काही लिहिण्याच्या अगोदर चार वेळेस विचार करा. हि काही बॅलन्स शीट नाही.

आपल्याला सर्वच विषयात सर्वच कळतं हा दंभ काढून टाका.

उगाच इगो प्रॉब्लेम म्हणून मी मार्च मध्ये लिहिलेल्या लेखाचा आपल्याला पाहिजे तेवढाच भाग इथे देऊन मानभावीपणा करु नका.

त्याचा इथे संबंध नाही

संजय क्षीरसागर's picture

26 Jul 2020 - 4:50 pm | संजय क्षीरसागर

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले

हा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता ?

तुम्ही (नेहेमीप्रमाणे) विपर्यास चालवला आहे > `लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '.

किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही.

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 9:51 am | सुबोध खरे

लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '.

किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही.

हैप्पी हायपॉक्सिया आपण वाचलेलाच नाही

कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतात

आपण "गौतम बुद्धा" चे अवतार असताना आपल्याला हॅपी हायपॉक्सिया कळलाच नाही?

आश्चर्य आहे

संजय क्षीरसागर's picture

27 Jul 2020 - 2:36 pm | संजय क्षीरसागर

बुद्धत्व म्हणजे

`शरीर आहे, पण आपल्याला शरीर नाही हा उलगडा होणं !'

हे रोज शरीराशीच डील करणार्‍याला कळणं असंभव,

तस्मात, त्या भानगडीत न पडणं श्रेयस !
_____________________________________________________

शिवाय तुमचा निष्कर्श नेमका हॉस्पिटलच्या डॉक्टर्स विरुद्ध आहे :

कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतात

वाचा : `आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले '

थोडक्यात, तुमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीच्या फेकाफेकीचा काहीएक उपयोग नाही.

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 7:38 pm | सुबोध खरे

उगाच या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका.

मी म्हणजे मी म्हणजे मीच असतो

असू द्या

चालू द्या

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 7:39 pm | सुबोध खरे

आपण "गौतम बुद्धा" चे अवतार असताना आपल्याला हॅपी हायपॉक्सिया कळलाच नाही?

आश्चर्य आहे

याचं तारतम्य रहात नाही.
_______________________________

असो, तरी सर्वांना उपयोग होईल म्हणून लिहितो.

कुणी कुणाचा अवतार नसतो. बुद्धत्व हे आपल्या स्वरुपाचं दुसरं नांव आहे.
रोगांची नांव आणि लक्षणं पाठ असण्याशी त्याचा काहीएक संबंध नाही.
ते डॉक्टरचं काम आहे.
____________________________________________________

आता वाफेचं तापमान, तुमच्या म्हणण्यानुसार `ज्या तापमानात विषाणु तग धरु शकत नाही' त्यापेक्षा अधिक असतांना;
`विषाणु वाफेनं मरणार नाही '

अशी छातीठोक विसंगती तुमच्याकडून का होते आहे ?

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 12:01 pm | सुबोध खरे

आता वाफेचं तापमान, तुमच्या म्हणण्यानुसार `ज्या तापमानात विषाणु तग धरु शकत नाही' त्यापेक्षा अधिक असतांना;
`विषाणु वाफेनं मरणार नाही '

तुम्ही विचार करायचंच नाही असे ठरवल्यावर कोण काय करणार?

शरीराच्या बाहेर म्हणजे निर्जीव वस्तूंवर विषाणू असेल तर तो वाफेने निष्प्रभ होईल.

विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही हे दोन ठिकाणी लिहूनही तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये

मुळात विषाणू पेशीत शिरला कि तो आपले कवच बाहेर ठेवून आर एन ए (किंवा डी एन ए ) पेशीत/ केंद्रात सोडतो आणि पेशींचा ताबा मिळवतो अशा परिस्थितीत वाफेने त्यावर काय आणि कसा परिणाम होईल.

मुळात विषाणू हा जिवंत आणि मृत याच्या सीमारेषेवर असतो. इथपासून समजावून घ्या मग अशी भंपक विधाने करा.

मलाच सगळ्या विषयात सगळं समजत
मला सगळ्याच विषयात सगळं समजत
मला सगळ्या विषयात सगळंच समजत
मला सगळ्या विषयात सगळं समजतच

किंवा मी बुद्ध आहे

हा दंभ अगोदर काढून टाका

विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही

हे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ?

आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील हे तुम्हाला कळत नसण्याची शक्यता नाही. त्यामुळे तो मुद्दाच नाही.

जर तो विषाणु (तुम्ही सांगितलेल्या) तापमानाला तग धरु शकत नाही तर वाफेचं तापमान त्यापेक्षा जास्त आहे असा मुद्दा आहे.

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 7:16 pm | सुबोध खरे

विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही

हे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ?

१) आपण म्हणजे सर्व जग नव्हे

२) Ig A नावाची प्रतिपिंडे असतात. हि वजनाने शरीरात सर्वात जास्त असतात. आणि हि प्रतिपिंडे जिवाणू आणि विषाणूंना आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरकाव करण्याच्या अगोदर निष्प्रभ करतात.

उगाच आपल्यालाच वैद्यकीय ज्ञान किती आहे याचे जगाला प्रदर्शन कशाला करताय.

हास्यास्पद होते आहे

साधा मुद्दा होता आणि तुमच्याकडे (डॉक्टर असून त्याचं नक्की उत्तर नाही !)

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले

आता सांगा : व्यक्तीनी टेस्ट नेमकी केंव्हा करायला हवी ?

सुबोध खरे's picture

29 Jul 2020 - 6:22 pm | सुबोध खरे

ते Ig A वाचून आणि समजून घ्या

मग चर्चा करू.

त्याच्या संदर्भात तुमच्याकडे नक्की माहिती नाही !

आता मला सुरुवातीला विचारलेला प्रश्न स्वतःला विचारा : कोणत्या अधिकारात तुम्ही इथे निराधार लेख लिहिता ? आणि
प्रश्न विचारले की हाताशी येतील त्या लिंक्स फेकता, किंवा
काही तरी मेडीकल टर्मिनॉलॉजी वापरुन वेळ मारुन नेता !

सुबोध खरे's picture

30 Jul 2020 - 9:44 am | सुबोध खरे

मला नक्की माहिती आहे पण आपल्या सारख्या दांभिक माणसाला समजावून देण्यात मला अजिबात रस नाही कि आपल्याशी वितंडवाद घालण्यातहि मला रस नाही आणि त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही.

मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?

संजय क्षीरसागर's picture

31 Jul 2020 - 4:19 pm | संजय क्षीरसागर

१. तुम्हाला टेस्ट केंव्हा करायची याची माहिती नसल्यानं, पेशंट आला की सरसकट टेस्टचा सल्ला तुम्ही दिला.
२. आता लक्षण दिसली तरच टेस्ट करा हा मुद्दा समोर आल्यावर तुम्हाला (अज्ञानामुळे), पेशंटसना हाकनाक टेस्ट कराव्या लागल्या याचा अपराध भाव दाटून आला.
३. कुणाही प्रामाणिक व्यक्तीनं लेखिकेकडून तिला तसा सल्ला देणार्‍या डॉक्टर्सचा नंबर/ नांव मिळवून त्यांचा अनुभव विचारुन आपली कार्यप्रणाली सुधारली असती. याला प्रोफेशनॅलिजम म्हणतात.
४. त्याऐवजी तुम्ही मलाच `कोणत्या अधिकारात सल्ला देता?' असं विचारलं (आणि मानवी मनाचा सांगोपांग अभ्यास असणार्‍याशी नाहक पंगा घेतला !)
५. मग स्वतःची पुरेपूर शोभा झाल्यावर तुम्ही 'मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?' या पातळीवर उतरलात !
६. थोडक्यात, तुम्हाला पेशंटला टेस्ट केंव्हा करायला हवी याची काहीएक माहिती नाही आणि आपलं अज्ञान तुम्ही व्यक्तिगत पातळीवर उतरुन झाकण्याचा प्रयत्न करतायं !

_____________________________________

हा इगो सोडा, आणि आता तरी दोन गोष्टी करा :

१. लक्षण दिसली तरच टेस्ट करायचा सल्ला पेशंटसना द्या, ते तुम्हाला दुवा देतील, आणि
२. वाफेच्या तापमानाचा आणि तुमच्या अज्ञानाचा झोल न घालता, सर्वांना वाफारा घ्यायला सांगा.

सुबोध खरे's picture

31 Jul 2020 - 7:55 pm | सुबोध खरे

भंपक प्रतिसाद

उत्तर देण्याच्या लायकीचा नाही

तेंव्हा तुम्हीच हुशार म्हणून सोडून देऊ या

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संकेतस्थळावर सगळे सदस्य एकसमान आहेत.
तस्मात, कुणाचीही लायकी वगैरे काढायचा उद्दामपणा करु नका.
सदस्याची क्रेडिबिलीटी त्याच्या लेखनावर ठरते, डिग्रीवर नाही.

सुबोध खरे's picture

1 Aug 2020 - 12:51 pm | सुबोध खरे

तुम्हाला साधं मराठी कळत नाही का?

प्रतिसाद उत्तर देण्याच्या लायकीचा नाही असं स्पष्ट असताना तुम्ही आपली लायकी काढण्यावर घसरलात?

इतकी चिडचिड बरी नव्हे. ( आपल्याला अध्यात्म समजले असेल तर इतकी चिडचिड का होते आहे हा बाळबोध प्रश्न माझ्या बालबुद्धीला पडला आहे पण ते जाऊ द्या )

आपण महान सर्वज्ञच आहात. संतांना अध्यात्म अजिबात समजलेले नाही ते पटकन समजावून देणारे आहात.

"आपली लायकी काढावी" अशी माझी "काय लायकी" आहे?

वाचा :

मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?

30 Jul 2020 - 9:44 am | सुबोध खरे

ही हातशी येतील त्या लिंक्स फेकण्यापेक्षा जरा चिंताजनक परिस्थिती आहे.
तस्मात, माझ्या प्रतिसादांना उत्तर देतांना नीट अभ्यास करत जा आणि
व्यक्तिगत होणं टाळा म्हणजे असा तोल सुटणार नाही.

सुबोध खरे's picture

3 Aug 2020 - 9:45 am | सुबोध खरे

प्रतिसाद उत्तर देण्याच्या लायकीचा नाही

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 10:28 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

सल्ला आणि कल ( = ट्रेण्ड ) हे वेगळे धरावेत ना?

आ.न.,
-गा.पै.

झेन's picture

21 Jul 2020 - 6:52 pm | झेन

या त्रासातून बाहेर आलात अभिनंदन. आपला अनुभव इथे शेअर केसात धन्यवाद. आजच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही कुणाचा नंबर कधी लागेल.

कुमार१'s picture

21 Jul 2020 - 8:42 pm | कुमार१

या त्रासातून बाहेर आलात अभिनंदन .

कोहंसोहं१०'s picture

21 Jul 2020 - 9:52 pm | कोहंसोहं१०

इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो >>>>>>>>>>>>
अश्विनीजी, वर नमूद केल्याव्यतिरिक्त काही अजून खाण्यापिण्याविषयी पथ्ये पाळली होती का किंवा डॉक्टरांनी काही विशिष्ट आहार नमूद केला होता का?
हल्ली व्हाट्सएप्प मुळे अगदी मसाल्यापासून काढ्यापर्यंत बरेच काही वाचनात येत असते त्यामुळे गोंधळायला होते.

अश्विनी मेमाणे's picture

22 Jul 2020 - 10:48 am | अश्विनी मेमाणे

डॉक्टरनी अस कही खा किंवा नका खाऊ हे सांगितला न्हवत. अणि आम्ही मी जे काही आहार बद्दल लिहल आहे. ते आम्ही नेहमीच करायचा प्रयन्त करतो. भरपूर पालेभाज्या अणि फ्रूट्स नेहमीच खातो. जे काढ़ा मी म्हटल आहे ते इम्युनिटी बूस्टर म्हणून घेत होतो.
आता आम्ही फ़क्त तो आर्युर्वेदिक डॉक्टर कडून आणलेला वापरत आहोत

अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद
आणि सगळ्यांना शुभेच्छा
लेख वाचून घाबरायला झाले थोडेफार

Gk's picture

22 Jul 2020 - 7:09 am | Gk

इन्शुरन्स असेल तर तुम्हाला आयडी वगैरे आणा , असे सांगता येते , पोलिसीत विशिष्ट बोर्ड , स्पेशळ रूम द्यावी ऐसे असू शकते,

इन्शुरन्स असताना नको त्या टेस्ट केल्या की क्लेम अडकतो

नसेल आणि टेस्ट जास्त केल्या तर तुम्हाला समजनार कसे ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Jul 2020 - 9:55 am | अनिरुद्ध.वैद्य

अत्यन्त काळजी घेऊनही, हा कसा पसरतो, हे समजणं कठीण होत चाललंय. आपण सुखरुप ह्यातुन पार पडल्या, हेच बरं. अन्यथा सोशल मीडीयावर गोष्टी अतिरंजीत स्वरुप्पात वाचुन, फार टेंशन येत राहते.

आपल्याला आलेला पॉझिटिव्ह + पॉझिटिव्ह अनुभव, हा हुरुप देणारा ठरतोय :)

अश्विनी मेमाणे's picture

23 Jul 2020 - 10:46 am | अश्विनी मेमाणे

अनुभव ऐकला डॉक्टरांचा पहिला प्रश्न आम्हाला पण इन्शुरन्स रिलेटेड होता

स्वच्छंद's picture

23 Jul 2020 - 12:54 am | स्वच्छंद

आजच्या घडीला याची गरज होती. अनावश्यक भिती होती मनात, पण लेख वाचून थोडीफार कमी झाली असे म्हणायला हरकत नाही.

अश्विनी मेमाणे,

तुम्ही दोघे आजारातनं बाहेर पाडल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.

आ.न.,
-गा.पै.

भीतीदायक आहे अनुभव. इतके दिवस स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची कल्पना करूनही कसेतरी झाले. तुम्ही या सगळ्यातुन संयमाने बाहेर आलात त्याबद्दल तुमचं कौतुक वाटतंय.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 Jul 2020 - 2:34 pm | हणमंतअण्णा शंकर...

या काळात ताप आला की पहिलं कोविड डोक्यात यायला पाहिजे. तुम्हाला डेन्ग्यु मलेरिया वगैरे सांगून गंडवलं.
लक्षणांचे प्रमाण खूप ठिकाणी असं दिलं आहे -
Fever (83-99 percent लोकांना जाणवतो).
Cough (59-82 percent).
Fatigue (44-70 percent).
Anorexia: loss of appetite (40-84 percent).
Shortness of breath (31-40 percent).
Sputum production (28-33 percent).
Muscle aches (11-35 percent).

सह्याद्री आणि दीनानाथ ह्या भिकार** हॉस्पीटल्स मध्ये गेला नाहीत हे तुमचे भाग्य.

पावभाजी पण चपाती सोबत खात होतो.

हा हा हा!! तुम्ही एरव्ही आठवड्यातून कितीवेळा पावभाजी खाता???

अश्विनी मेमाणे's picture

25 Jul 2020 - 8:36 pm | अश्विनी मेमाणे

ताप आल्यावर कोविताप आल्यावर कोविड डोक्यात आलाच होता म्हणून तर माझ्या नवऱ्याने जसा ताप आला तस वेगळ करुण घेतला स्वता:ला. हे मी वर लिहल आहे. आणि बाकि काही क्लासिक कोविडची लक्षण न्हवती म्हणून मग वाटत होता नसेल ही. आणि त्याला मागच्या महिन्यात पण ताप आला होता तेव्हा कोविड न्हवता. म्हणून मग प्रत्येक वेळी ताप म्हणजे कोविड असतो अस नाही. पण दोन्ही वेळेस आम्ही विलगीकरण केलच
आणि राहिला पावभाजी तर लॉकडाउन पासून आठवड्यातून एकदा तर होतिये

मार्गी's picture

25 Jul 2020 - 5:20 pm | मार्गी

जबरदस्त! हे सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद!

माहितगार's picture

26 Jul 2020 - 7:53 pm | माहितगार

रोगांसाथींचा मुकाबला करण्यासाठी सर्वसाधारणपणे Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण असते. त्यामुळे संसर्ग ग्रस्त व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना Track करून टेस्ट करणे आणि टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास लक्षणे दृगोच्चर होण्या आधीच रुग्णाचे आरोग्य व्यवस्थापनाची दक्षता घेणे हा एक महत्वपूर्ण भाग असतो.

उपरोक्त धागा लेखिकेच्या घरातील सदस्यांपैकी विशेषतः एक सदस्या अस्थमाप्रवण असताना लक्षण येईपर्यंत टेस्ट न करण्याचा डॉक्टरांनी खरेच सल्ला दिला का हे जरासे अचंबित करणारे आहे. दोन शक्यता असू शकतात कुटूंबातील दोनेक व्यक्तिंना संसर्ग असल्यास इतरांना तसा तो आहे असे समजून आवश्य्क प्रतिबंधक उपाययोजना सुचवून मोकळे होणे -आणि खासगी टेस्टींगचा अनावश्यक आर्थिक बोजा टाळणे, दुसरे वर डॉ. सुबोध खरेंनी शंका व्यक्त केली तसे ऑक्झीमीटर च्या वापरावर भर देणे, तिसरी एक शक्यता टेस्टींग पद्धतीतच गलथानपणा अथवा संभाव्य त्रुटीमुळे संसर्ग न झालेल्या व्यक्तीस टेस्टींगला जाऊन संसर्ग न झाला म्हणजे मिळवले अशी परिस्थीती मुळे टेस्टींग न सुचवणे अशा प्रकारच्या शक्यता असू शकतात.

पण तरीही सल्ला अंशतः प्रस्थापित Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण बाह्य ठरत असण्याची शक्यता असावी. अर्थात प्रत्यक्षात दिलेला सल्ला , आणि समजून घेणे व त्याबद्दल पुर्नवाच्यता यातही अंशतः अंतर असू शकावे.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2020 - 11:41 am | मुक्त विहारि

आमच्या सौ. आईला पण हा आजार झाला होता. जवळ्पास १५-२० दिवस तिने पण खूप त्रास सहन केला होता.

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे की.... common sense is not so common .... तसेच ह्या आजाराबद्दल एक समजले की, covid-19 is the most unpredictable disease .... अर्थात, हे मत माझ्या तुटपुंज्या माहितीवर आधारित असल्याने, मला ह्या विषयावर जास्त वाद घालायची इच्छा नाही.

वादा वादातून सत्याची माहिती होते अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित आहे

covid-19 is the most unpredictable disease ....

१) कोणती बाह्य ल़क्षणे कुणात दृगोच्चर होतील किंवा बाह्य लक्षणे दिसून येणारच नाहीत या अर्थाने वाक्य बरोबर आहे.

२) कुणाला होईल या अर्थाने पुर्णतः बरोबर नाही, संसर्गजन्य आजारांचे होण्याची अनिश्चिती रस्त्यावरील अपघाताच्या अनिश्चिती सारखी असते, आपण स्वतः वाहन चालवण्याच्या सर्व दक्षता घेतो तशाच पद्धतीने स्वतःबाबतीत सर्व दक्षता घ्यावयास हव्यात आणि सर्वांनाही तसेच सांगून सर्वजण आदर्श वागले तर अपघात होण्याची शक्यता त्या प्रमाणात कमी होते.

३) झाल्या नंतर किती यशस्वीपणे बरा होईल ते मात्र अनेक उपजत शारीरीक क्षमता, शारीरीक स्वास्थ्याची काळजी किती घेतलेली आहे, सुयोग्य औषधोपचारांची सुप्रशिक्षीत अनुभवी डॉक्टरांकडून वेळेत ऊपलब्धता यावर अवलंबून असावे किंवा कसे

मुक्त विहारि's picture

27 Jul 2020 - 11:23 pm | मुक्त विहारि

करोना बाबत कुणालाच काहीही ठाम पणे सांगता येत नाही....कावीळ, विषमज्वर, हिवताप ह्या अशा आजाराबाबत ठोस लक्षणे असल्याने, आजार ओळखणे आणि औषधोपचार करणे सोपे जाते.पण करोना बाबत ठाम अशी कुठलीच लक्षणे नाहीत.

(सध्या तरी डोंबिवली सारख्या जागतीक केंद्रात, हा रोग पचवून फिरत असलेल्या व्यक्ती पण कमी नसतीलही... आमच्या सौ.ने ३ दिवसात ह्या रोगावर मात केली तर आमच्या पिताश्रींनी हा रोग व्यवस्थित पचवला..... सौ. आईला करोना झाल्यामुळे वडीलांची आणि बायकोची, दोघांची पण टेस्ट घेतली.वडीलांची टेस्ट नकारार्थी आली तर बायकोची होकारार्थी... बायकोने ३ दिवसांनी परत टेस्ट केली तर ती नकारार्थी आली.... डोंबिवली फिव्हरच्या बाबतीत पण असेच घडले होते.)

हे सरकारी निर्देश च आहेत असे वाटते.
कारण मुंबई,ठाणे मध्ये सुद्धा घरात covid19 positive निघाला तरी बाकी फॅमिली member madhye lakshan नसतील तर टेस्ट करू नका असाच सल्ला दिला जातो.
पण विलागीकरान चा सल्ला मात्र दिला जातो.
लक्षण च नसतील तर उपचार काय करणार.
फक्त संसर्ग वाढू नये म्हणून विलग होणे हे योग्य वाटत.

माहितगार's picture

27 Jul 2020 - 9:45 pm | माहितगार

आकडेवारी कमी दाखवणे आणि सरकारी यंत्रणेवरील ताण कमी ठेवणे यासाठी खायचे आणि दाखवायचे दात मंत्रालय+ सचिवालय मिळून करू शकते. कारण आजार वाढण्यात जनतेची चूक होत असली तरी जनता कबूल करत नाही आणि अपयशाचे खापर राजकारणी आणि अधिकार्‍यांवर येण्याची शक्यता असते त्यासाठी आकडेवारी कमी ठेवण्यासाठी केलेला जुगाड असू शकेल पण टेस्टींग्स कमी करणे शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्ट्या योग्य मार्ग नसावा.

....आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील........

वरील एका प्रतिसादातील वाक्यांश वैद्यकीय दृष्ट्या कितपत नेमका आणि बरोबर आहे हे वैद्यकीय जाणकारांकडून समजून मिळू शकेल ?

प्रचेतस's picture

30 Jul 2020 - 11:54 am | प्रचेतस

लेखिकेचा अनुभव रोचक आणि माहितीपूर्ण पण तरीही..
ह्या धाग्यावर मिपाचे दोन धुरंदर आयडी फालतू वितंडवाद घालत असल्याचे बघून मनोरंजन झाले.