लेले

लबाड मुलगा's picture
लबाड मुलगा in काथ्याकूट
22 Dec 2007 - 3:10 pm
गाभा: 

आमच्या कॉलेजात दोन लेले होते. एक होता सुहास कमलाकर लेले. त्याला ''सुकलेले'' असे आम्ही चिडवायचो. स्वारी आजारी असायची आणि सुकलेली असायची. दुसरा लेले म्हणजे भूषण केदारनाथ लेले. हा ''भुकेलेले'' खाण्यापिण्याचा शौकीन होता. कॉलेजच्या समोर एक स्टेशनरीचे दुकान होते. मालकाचं नाव संपतराव परशुराम लेले. त्यांना आम्ही ''संपलेले'' म्हणत असू. त्यांच्या दुकानातील स्टॉक सदा संपलेला असायचा. आमचे शेजारी बन्याबापू सदाशिव लेले. सदोदित ओट्यावर बसलेले असत. ''बसलेले'' ही पदवी त्यांना शोभून दिसायची. काशिनाथ वरदराज लेले सदा ''कावलेले'' असत. तर निळकंठ जनार्दन लेले नेहमी ''निजलेले'' असत.

''सजलेले'', ''रुसलेले'', ''नसलेले'', ''असलेले'', ''पुसलेले'', ''घासलेले'', ''दमलेले'', "वारलेले","वाकलेले" असे अनेक लेले मला भेटले. त्यांची नावे काय असतील हे कृपया तुम्ही ओळखा. अजुन तुम्हाला कोणी माहित असतील तर सांगा.

मेलवरुन साभार
टंक केले पण वर्ड मधुन पेस्ट करतांना राहुन गेले

प्रतिक्रिया

मनोज's picture

22 Dec 2007 - 3:13 pm | मनोज

आपलाच,
मन्या

लबाड मुलगा's picture

22 Dec 2007 - 3:18 pm | लबाड मुलगा

टंक केले पण वर्ड मधुन पेस्ट करतांना राहुन गेले