जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
23 May 2020 - 8:45 pm

जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
--श्री मंगेश पाडगावकर

मागेच लिहिलं होतं-- एक दिवस दवाखाना बंद ठेवला परंतु रस्त्यावरचे स्वच्छता कर्मचारी साधे पोलीससुद्धा काम करत आहेत पाहून स्वतःची लाज वाटली म्हणून आम्ही (मी आणि बायको) दवाखाना चालू केला.

एक दिवसा आड बातमी येते अमुक डॉक्टर तमुक डॉक्टर दिवंगत झाले. त्यातून बायका जास्त तणाव घेतात. त्यामुळे बायको एक दिवसाआड डिप्रेशन मध्ये जाते. तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत. मग आपली भीती दुसरीला सांगत राहतात आणि मग सर्वानाच फुकटचं टेन्शन येते. काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो.

तिचा बराचसा सल्ला फोनवरच असतो. परंतु काही रुग्ण ताप खोकला असला तरीही तुम्हाला दाखवायचंय असा आग्रह धरतात. अगोदर ताप आला होता हे सांगत नाहीत. त्यामुळे आता ती सुद्धा लोकांवर विश्वास ठेवायला कचरू लागली आहे. बाकी दोन महिन्यात एकाही रुग्णाने टेलिफोनवर दिलेल्या सल्ल्याचे पैसे किती हे विचारले नाही.पैसे घ्यायचे नाही हे ठरवलेच होते परंतु निदान तेवढे सौजन्यही कुणी दाखवले नाही.

माझ्या कडे येणारे रुग्ण सोनोग्राफी साठी येतात त्यामुळे सुदैवाने त्यांना कोव्हीड असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मला तेवढी भीती नाही. अर्थात वेळ सांगून येत नाही. कधीतरी आपल्याला सुद्धा हा रोग होणार आहे हे गृहीत धरूनच मी चाललो आहे. मला स्वतःची चिंता नाही पण वृद्ध आईवडिलांची (८४ आणि ७८) आहे. पण जे नशिबात असेल ते मी स्वीकारले आहे.

एका मुतखडा असलेल्या रुग्णाने माझ्या सहायिकेला विचारले कि मला किती सवलत मिळेल? तिने त्याला विचारले कि दारूच्या दुकानाच्या रांगेत उभा होतास तिथे विचारलेस का किती "कन्सेशन" मिळेल ते.

दर दोन दिवसांनी तुम्ही "असे केले नाही तर तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू" म्हणून सरकारची/ महापालिका आयुक्त यांची धमकी वृत्तपत्रात वाचायला मिळते आहे.
ते पाहून काही वेळेस डोके फिरते. खरोखरच व्यवसाय बंद करून टाकावा कोणत्याही वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या क्लास मध्ये शिकवावे सहा आकडी पगार घ्यावा. पाट्या टाकून घरी यावे आणि थंड झोपावे सरकार आणि जनता झक मारली असे डोक्यात येते. ते माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. आणि क्लास मध्ये शिकवण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही.

माझी पदवी आणि पदव्युत्तर पदवी हि प्रथितयश संस्थेची असल्याने त्याला शिक्षणाच्या बाजारात भरपूर किंमत आहे आणि क्लास मध्ये मी एक वर्षं शिकवलेले सुद्धा आहे तेंव्हा त्यात नवीन काहीही नाही. (तेच ते वर्षानुवर्षे शिकवायचे हे फार कंटाळवाणे आहे म्हणून मी पुढे ते सोडून दिले)

अशीच मनस्थिती माझ्या पॆक्षा वरिष्ठ अशा अनेक डॉक्टरची आहे. आमच्या आयुष्याला पुरेल इतका पैसे कमावून ठेवला आहे. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे.

तुमच्या सेवेची कुणालाही किंमत राहिलेली नाही हे गृहीत धरले तरीही असे धमकी देणे डोक्यात जाते.

तरीही मी रोज दवाखान्यात जातो आहे. कारण साकी नाका, डोंबिवली पासून रुग्ण किती कष्ट घेऊन येतात.
कुणी मुतखड्यामुळे तळमळत आहे. कुणा गरोदर स्त्रीला बाजारात मोटारीने ठोकले आहे आणि पायाचे हाड मोडले आहे. तिला स्वतःपेक्षा आपल्या बाळाची काळजी वाटते.
कुणा स्त्रीला ११ वर्षांनी दिवस गेले आहेत पण रक्तस्त्राव होतो आहे. अशा स्त्रीला तिचे बाळ सुखरूप आहे हे दाखवताना / सांगताना तिच्या डोळ्यात जी कृतज्ञता असते त्याची किंमत पैशात होत नाही
असे रुग्ण पाहून घरी बसायची मानसिक तयारी होत नाहीये.

एक अजून गंमतशीर गोष्ट म्हणजे गेल्या दोन महिन्यात पोट बिघडलेले केवळ तीन रुग्ण आले होते. हॉटेले बंद असून लोक बाहेर न खाता घरीच खात असल्यामुळे हि एक सकारात्मक बाब दिसून आली. यातील दोन जणांनी दोन दिवसा पूर्वीचे चिकन आणि प्रॉन्स खाल्ले म्हणून पोट बिघडले आणि आज चि रुग्ण होती तिने SWIGGY वरून काही तरी मागवले म्हणून पोट बिघडले होते.

आता लॉक डाउनचा दुसरा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या १० दिवसात ४ स्त्रिया नको असलेले गर्भारपण घेऊन आल्या होत्या. एकीला दोन मुलगे १४ आणि १० वर्षे दुसरीला एक मुलगा एक मुलगी ६ आणि ४ वर्षे. तिसरीच्या दोन्ही मुली १५ आणि १२ वर्षाच्या. आणि चौथीचा मुलगा १० महिन्यांचा आहे.
या सर्व स्त्रिया अर्थात विवाहित आहेत आणि जवळपासच राहणाऱ्या आहेत.

अशी स्थिती दिवाळीच्या आसपास असते. नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात.म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट दोन्ही परत भेटणारे नकोत.

माझ्या एका नातेवाईकाच्या बायकोला आणि एका वर्गमत्रिणीच्या नवऱ्याला कोविड मुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते आणि त्यांना तेथे जाताही येत नव्हते. अशा लोकांना धीर देणे आवश्यक असते. त्यात माझा एक आठवडा गेला. सुरुवातीला मुलांनी थोडी कटकट केली कि बाबा तू घरी आल्यावर सारखा फोनवर असतोस. त्यांना समजावून सांगितले कि नातेवाईकांची मनस्थिती काय आहे. आणि अमुक माणूस एक दिवसात मृत्यू पावला सारख्या बातम्या वाचून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होते, अशा लोकांना धीर देणे त्यांच्या जखमेवर फुंकर घालणे हे पण आवश्यक आहे. अर्थात मुले समंजस आहेत. दोघे आता घरी बरे होऊन परत आले आहेत

जाता जाता -- दारूची दुकाने उघडली त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट- पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एक किमी लांब रांग आणि तिला शिस्त लावण्यासाठी दुपारी १ वाजता उन्हात उभे असलेल्या पोलिसांची दया आल्यामुळे मी घरी जाऊन २ लिटर लिंबूसरबत तयार केले आणि मुलुंड पूर्वं येथे तीन ठिकाणी दारुच्या दुकानाच्या रांगा मध्ये उभे असणाऱ्या पोलिसांना देण्यासाठी गेलो.

तिन्ही रांगांत स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने उभे होते. ( खरं तर अर्ध्या रांगा याच लोकांमुळे होत्या).

पहिल्या रांगेत पोलिसाला सरबत देत असताना दोन गणवेशातील महापालिका कर्मचारी त्या पोलिसाला विनंती करत होते. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत मुलूंड स्मशानभूमीत काम करतो. पोलिसाने काय पाहिजे विचारले तर त्यांना रांगेत उभे न राहता थेट दारू विकत घ्यायची "मेहरबानी" हवी होती.

दुसऱ्या रांगेत जुन्नर जवळच्या गावातील महिला पोलीस होती. तिच्याजवळ तिचा एक गाववाला ओळख काढून गप्पा मारू लागला आणि मग हळूच दारूसाठी विनंती करु लागला.

तीन रांगातील पोलिसांना सरबत दिल्यावर मी पोलीस स्टेशन वर जेवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरबत देण्यास गेलो तेथे असलेले इन्स्पेक्टर साहेब सांगत होते. काय सांगणार डॉक्टर दोन दिवसापूर्वी स्थानिक आमदार सगळ्यांना फुकट रेशन वाटत होते (१० किलो गहू १० किलो तांदूळ ४ किलो डाळ आणि २ लिटर तेल असं काहीतरी मी एका रांगेच्या ठिकाणी बोर्डावर लिहिलेलं वाचलं होतं). त्या रांगेत असलेले निदान दहा तरी मजूर आज दारूच्या रांगेत उभे होते. पहिल्या मजुराला मी हाकलणार होतो कि दोन दिवसापूर्वी फुकट शिधा पाहिजे म्हणून रांगेत उभा होतास आणि आता दारू साठी. पण नंतर बाकी रांगेत असे भरपूर लोक दिसत होते. शेवटी मी सोडून दिले.

काही वेळाने माझ्या समोर दोन माणसे इन्स्पेक्टर साहेबाना "गूळ" लावण्यासाठी लाळघोटे पणा करत होती.
ते पाहून मला शिसारीच आली.
अर्थात मी घरी केलेले लिंबू सरबत घेऊन गेलो होतो म्हणून त्यांनी ते घेतले पण एकंदर त्यांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड ड्रिंक चा पुरवठा करणारे माझ्या सारखे इतरही लोक होतेच.

बाकी आमचे आयुष्य संथगतीने चालले आहे त्यात नवीन असे काहीही घडत नाही.

धुणी भांडी स्वयंपाक झाडू पोछा हे घरचे सर्व मिळून करत आहोत. त्यामुळे एकावर भर येत नाही आणि त्यात रडारड करण्यासारखे काहीच नाही कारण सर्वच लोक तसे करत आहेत.

मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे याची चिंता राजकारण्यांना( कोणत्याही पक्षाचे असोत), सरकारी लोकांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांना सुद्धा आहे. दुर्दैवाने त्यातील कोणालाच अशा प्रचंड प्रमाणावर असलेल्या जागतिक साथीचा अनुभव नाही. तरी आहे त्या शस्त्रानिशी ते लढत आहेत.
निदान आपण त्यांच्या श्रमात हातभार लावू शकत नसलो तरी अनाठायी टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची तरी करत नाही एवढे ध्यानात घेता आले तरी खूप आहे असेच म्हणेन.

माझी वृत्ती अशी आहे कि जे वाईट घडायचे आहे ते घडून गेले आहे. येणार काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे.
त्यामुळे मला नैराश्य येत नाही.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

उत्तम लेख. तुमचे प्रत्यक्ष कामातले अनुभव वाचायला आवडत. एकूण जे काय वाचत्ये ते बघून दिसतंय कि अजून (कमीत कमी) डिसेंबर पर्यंत तरी लस येणार नाही.  औषध यायला तर अजून जास्त वेळ.  त्यामुळे सगळ्याच जगापुढे २ वाईट पर्याय आहे. 

१. संपूर्ण लॉकडाऊन करायचं - यात ज्यांचं हातावर पॉट आहे असे लोक खूप भरडले जातील. जिवंत राहतील पण अतिशय हाल होतील. पण जितके जास्त दिवस लॉकडाऊन मध्ये राहता येईल तेवढे  मेडिकल शास्त्राला आजारावर उपाय शोधायला, किमान आजाराची तीव्रता कमी करायला जास्त दिवस मिळतील. जस वरच्या प्रतिसादात डॉ खरे नि म्हटलं कि रक्तावरच्या गुठळ्यावरची औषध द्यायला सुरवात केल्यामुळे फायदा दिसलाय. 

२. लॉकडाऊन काढायचा - यात ज्याच शरीर प्रतिकार करू शकेल तो जगेल नाही तो नाही. 

जगातल्या कुठल्याही सरकार ने सध्या काहीही केलं तरी शिव्याच मिळणार आहेत. कधी कधी सगळ्याच राजकारण्यांची पण दया येते, काहीही केलं तरी कोणीतरी नावं ठेवणारा असतोच.

माझीही शॅम्पेन's picture

27 May 2020 - 1:07 pm | माझीही शॅम्पेन

डॉ साहेब , मस्त लेख आवडला खूप !!!

निनाद's picture

28 May 2020 - 10:25 am | निनाद

प्रत्यक्ष कामातले अनुभव असल्याने लेख चांगला वाटला. अजून लिहीत रहा.

पैलवान's picture

28 May 2020 - 10:43 am | पैलवान

हा विषाणू पाणी दूषित करू शकतो का?
समजा पाणी पुरवठा केंद्रातील एखादा कर्मचारी संसर्गित असेल (जलशुद्धीकरण झाल्यावर ) तर त्यामुळे पाणी दूषित होईल का?

एकाच घरात एका बादलीत पाणी घेऊन सगळे आंघोळ करतात, त्यातून कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता असते का?

हा विषाणू पाण्यात टिकून राहतो का?

मलाही हाच प्रश्न पडला आहे.
पाणी, माश्या, ओला कॅबमधे बसणे वगैरेतून संसर्गाची शक्यता आहे का ? काही दिवसानंतर मेट्रो, रिक्षा वगैरेतून जावे लागेल, तेंव्हा काय करावे ?

सुबोध खरे's picture

28 May 2020 - 11:53 am | सुबोध खरे

हा विषाणू पाण्यात फारसा जगत नाही.
त्यामुळे पाणयातर्फे याचे संक्रमण होते याला कोणताही आधार नाही. शिवाय जलशुद्धीकरणात वापरलेल्या क्लोरीन मुळे हा विषाणू निष्क्रिय होतो.
यामुळे
हा विषाणू पाणी दूषित करू शकतो का? नाही
समजा पाणी पुरवठा केंद्रातील एखादा कर्मचारी संसर्गित असेल (जलशुद्धीकरण झाल्यावर ) तर त्यामुळे पाणी दूषित होईल का? नाही
एकाच घरात एका बादलीत पाणी घेऊन सगळे आंघोळ करतात, त्यातून कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता असते का? नाही

पैलवान's picture

28 May 2020 - 12:41 pm | पैलवान

शंकानिरसन झाले.

अजून काही शंकेचा किडा वळवळला की परत विचारेल.

सुबोध खरे's picture

28 May 2020 - 11:46 am | सुबोध खरे

अद्ययावत माहिती नुसार सर्वात जास्त संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट थुंकी शिंक किंवा खोकल्यातून होते.
एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर विषाणूचे संक्रमण कमी होते( शून्य असल्याचा अद्याप तरी पुरावा नाही)

त्यामुळे जर आपण हात धूत राहिलात, तोंडावर मुखवटा घातलात, अनावश्यक गोष्टींना हात लावला नाही आणि चेहऱ्याला डोळ्यांना हात लावला नाही तर सार्वजनिक जागी मेट्रो रिक्षा इ मधून प्रवास केल्यावर आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे.

ऋतुराज चित्रे's picture

28 May 2020 - 3:36 pm | ऋतुराज चित्रे

पाण्यातून संसर्ग होत नसेल तर फक्त पाण्याने हात धुतले तर हातावरील जंतू निष्क्रिय होतात का?

सुबोध खरे's picture

28 May 2020 - 9:07 pm | सुबोध खरे

पाण्याने विषाणू धुतले जातात.
कोरोना च्या विषाणूंच्या काटेरी मुकुटाचे काटे हे चरबीयुक्त पदार्थाचे असतात ते साबणाने किंवा सॅनिटायझरच्या अल्कोहोल मुळे विकृत (डीनेचर) होतात. मानवी पेशींना चिकटण्याची आणि त्यात प्रवेश मिळण्यासाठी हे काटे आवश्यक असतात.

काट्यांच्या संरचनेत बदल झाल्यामुळे हा विषाणू आता मानवी पेशीत प्रवेश मिळवू शकत नाही. (वाकडी किंवा दाते तुट्लेली चावी कुलुपात शिरत नाही/कुलूप उघडत नाही तसे)

साबण किंवा सॅनिटायझर नसेलच तर भरपूर पाण्याने हात चोळून धुवा म्हणजे विषाणू धुतले जातील.

बोलघेवडा's picture

28 May 2020 - 6:44 pm | बोलघेवडा

डॉक्टर साहेब, आपला लेख वाचला. अगदी मनापासून जस आहे तस लिहिलं आहे म्हणून आवडला. डॉक्टर आणि त्यांच्या पेशाबद्दल मनापासून आदर आहेच आणि आमच्या जुन्या जाणत्या फॅमिली डॉक्टर नी तो नेहमीच सार्थ ठरवलं आहे.

चौकस२१२'s picture

29 May 2020 - 11:49 am | चौकस२१२

त्याच पानावरील २ बातम्या १) मुख्यमंत्री महाशय नुसती टीका करतात आणि २) एक नट स्वतःच्या खिशातून याच स्थलांतरितांना मदत करतात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशात टाळेबंदी जाहीर करताना त्याची कसलीही कल्पना राज्य सरकारला देण्यात आली नव्हती. २४ मार्चला करोना सगळीकडे पसरला नव्हता. त्यामुळे टाळेबंदी जाहीर करण्याआधी मजूर-कामगारांना आपापल्या राज्यात जाण्याची संधी दिली असती तर त्यांचे हाल झाले नसते. टाळेबंदीची वेळ चुकली- मुख्यमंत्री.

प्लानिंग करुन निर्णय घेतला असे म्हणायला काहीही जागा शिल्लक राहीलेली नाही. हम करे सो कायदा. बस. निर्णय चुकला, त्यामुळे अनेकांचे हाल झाले पण हेतू 'असा असा' होता असे म्हणायलाही धाडस लागतं. दुर्दैवाने ते धाडस नेतृत्त्वात नाही. लॉकडाऊन आणि वाढणारे रुग्ण यावरुन भारतीयांना आता नेपाळ-भारत सीमा, चीन-भारत वाद, पाकिस्तानच्या कागाळ्या, या विषयांवर नेले जाईल असे वाटते. पॅकेजच्या घोषणेमुळे फार काही परिणाम झालेला दिसत नाही. बघुया काय काय होते ते....!

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

29 May 2020 - 11:20 pm | सुबोध खरे

देशात टाळेबंदी जाहीर करताना त्याची कसलीही कल्पना राज्य सरकारला देण्यात आली नव्हती.

याला काही पुरावा आहे का असंच नाक्यावर ऐकलंय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2020 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, वाचत जा हो थोडं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसे म्हणाले, मी नाही. मुख्यमंत्री यांचं अधिकृत स्टेटमेंट आहे. वर प्रतिसादात दैनिकातील बातमी आहे, त्यातल्या ओळी आहेत. मुख्यमंत्री यांच्या ट्विटर अकाउंटवर किंवा त्यांच्या कार्यालयाला पत्रव्यवहार करूनबखुलासा करून घ्यावे असे सुचवावे वाटते. किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती घ्यावी म्हणजे खुलासाही होईल असे वाटते.

अवघड आहे.

-दिलीप बिरुटे

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 12:04 pm | ऋतुराज चित्रे

मिपावरील काही सदस्य नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचे समर्थन करताना कमी पडतात, अशावेळी ते प्रतिवाद करताना वैयक्तिक पातळीवर येऊन समोरच्यावर नाक्यावरची भाषा वापरतात. हे नोटबंदी पासून चालू आहे. त्यावेळी नोटाबंदी फेल गेली हे स्वच्छ दिसत असतानाही इथे सरकारचे समर्थन करणारे विरोधकांवर तुटून पडले होते, भाषेची पातळीही खालावली होती दोन्हीही बाजूने,परंतू मिपा मालकांनी नेमके सरकार विरोधी सदस्यांना उडवले. त्यात बरेच चांगले लिखाण करणारे सदस्य होते. त्यानंतर शेफरालेले सदस्य अद्यापही त्याच प्रकारची भाषा वापरत आहेत. मी शक्यतो राजकीय चर्चेत भाग घेत नाही, परंतू ह्यावेळेस देशातील जनतेचा केंद्र सरकारच्या गाफिलपणामुळे म्हणा अथवा अतिआत्मविश्वासमुळे म्हणा जीव धोक्यात आला आहे, हे मला खटकल्यामुके केंद्र सरकारला प्रतिबंधात्मक उपाय करण्यात सपशेल अपयश आले आहे हे मी वेळोवेळी मांडले आहे. परंतू येथील एकालाही केंद्र सरकारचे समर्थन करता आले नाही. केंद्र सरकार मध्ये " आऊट ऑफ बॉक्स " विचार करणारे आहेत,परंतू त्यांचा अशावेळी वापर केला जात नाही,कारण आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी जनता ह्या देशात मोठ्या संख्येने आहे हे सरकारला माहीत आहे. आर्थिक नुकसानीपासून सुरुवात होऊन आता जीवित नुकसानीपर्यंत पोहचूनही केंद्र सरकारला विरोध करण्याची क्षमता गमावलेल्या जनतेला सलाम. लॉक डाऊन जनतेवर लादणारे १००% सुरक्षित वातावरणात आहेत, आपणच नाईलाजाने लॉक डाऊन १००% पाळू शकत नाही. आपण असुरक्षितच आहोत.
नोटबंदीमुळे नुकसान झाले असल्यामुळे विरोध केला जात आहे असे त्यावेळी नोटबंदी समर्थक विरोधकांवर आरोप करत असत. नशीब आज तशा प्रकारची भाषा वापरण्याची हिम्मत करत नाही केंद्र सरकार समर्थक. आज जात्यात आणि सुपात देशातील नागरिकच आहेत. राजा जाते फिरवतोय ह्याचेच आपण कौतुक करायचे.

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 2:55 pm | सुबोध खरे

चित्रे बुवा

डावी विचारसरणी असली की गोष्ट चांगली असली तरी ती वाईटच दिसते.

लॉक डाऊन नकोच होता असे तुम्हाला म्हणायचं आहे का?
तसं असेल तर त्याला पर्याय काय तो सांगा.

लॉक डाऊन साठी३ दिवस वेळ द्यायला हवा होता म्हणजे कोट्यवधी लोकांना घरी पोचवता आलं असतं अशी दरपोक्ती संक्षी यांनी केली. तो फोल आणि भंपक आहे हे स्पष्ट झालं.

तुमच्या कडे काही ठोस कार्यक्रम आहे का?

तसा अस्वल तर पुराव्यांनिशी सादर करा.

नाही तर हवेत वायबार काढून काही होत नाही

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 3:17 pm | ऋतुराज चित्रे

डावी विचारसरणी असली की गोष्ट चांगली असली तरी ती वाईटच दिसते.
इथे डावी विचारसरणी कुठे दिसली?
आंतर राष्ट्रीय प्रवाशांना फक्त १५ दिवस सरकारी खर्चाने विलागिकरण केले असते तर आज लॉक डाऊन चा काळ नक्कीच कमी करता आला असता व कोरोनाही आटोक्यात आला असता असे मी दुसऱ्या एका धाग्यावर सुचवले होते. माझ्यामते हा सर्वात सुरक्षित उपाय होता. कदाचित ही विचारसरणी डावी वाटत असेल ,परंतू अशक्य नक्कीच नव्हती.

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 3:39 pm | सुबोध खरे

किती तारखेपासून किती तारखेपर्यंत विलग करायला हवं होतं?

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 4:05 pm | ऋतुराज चित्रे

भारतात पहिला कारोनाचा रुग्ण ३० जानेवारी २०२० ला आढळला. १ फेब्रुवारी पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १५ दिवस विलग करून नंतर महिन्याभरात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद करून १५ दिवसांनी लॉक डाऊन लावता आला असता.

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 6:13 pm | सुबोध खरे

आपला बहुमूल्य सल्ला आपण सरकारला तेंव्हाच का कळवला नव्हता?

पहिला रुग्ण सापडल्यावर तिसऱ्या च दिवसापासून *बाहेरून*आलेल्या प्रत्येकाला 15 दिवस विलगिकरणात ठेवायला हवं होतं हे उच्च दर्जाचं शहाणपण जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा सुचलेलं नव्हतं हे त्यांच्या 1 फेब्रुवारीच्या पत्रकात दिसून येतंय.

द्रष्टेपणासाठी आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष करावे असा ठराव मांडून मी खाली बसतो.

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 7:16 pm | ऋतुराज चित्रे

आपला बहुमूल्य सल्ला आपण सरकारला तेंव्हाच का कळवला नव्हता?
अपेक्षीत उत्तर.
ज्याअर्थी तुम्ही किती तारखेपासून विलग करायला हवे होते असे मला विचारले त्याअर्थी तुम्हाला माझा विलागीकरणाचा मुद्दा पटला होता. आता भारताच्या दृष्टीने तुमच्या मते कोणती तारीख आणि महिना योग्य होता?

चौकस२१२'s picture

31 May 2020 - 6:54 pm | चौकस२१२

चित्रे साहेब डॉक्टर खरेंनी विशारलेले प्रश्न अगदी स्तुत्य आहेत
आपण या प्रश्नाचे वायबर ना काढता नक्की उत्तर द्या .. ( हे प्रशा माननीय बिरुटे साहेबांना पण अनेक वेळा डॉ विचारतात पण निघतातत ते फक्त वायबर )
तुम्हा सर्व विरोधकानं हे का नाही समजत कि एक तर मोदी सरकारने ने जे काय केले तसेच अनेक इतर सरकारने केले याची उदाहरण दिली तर काहीजण बोलणारे बाहेरचे ( मी) म्हणून विचारतात कि तुम्हाला येथील काय अनुभव? बरं संक्षिसारख्यांशी सहमत दाखवावे तर ते अजूनच आपल्याला शिकवतात
दुसरे असे कि यावर अगदी १००% खात्रीलायक उपाय आपल्या सारख्या विरोधकांकडे हि नाही आणि तो सुद्धा एवढया मोठया खंडप्राय देशात राबवता येईल असा..
जगात लोकांनी टाळ्या आणि क्षणी थाळ्या वाजवल्या... तरी तुम्ही "मोदीच फक्त सुचवणारे येडे असे आवाहन करतात" यावर घसरणार
जग भर "जमेल तसे स्वावलंबी व्हा " असे अनेक देशाचे पंतप्रधान म्हणता असतात आणि तश्या योजना राबवतात पण एकटे मोदीच मूर्ख कसे ?
शेवटी आपली गाडी तरी मोदी विरुद्ध अशी का येते हो?
याशिववाय राष्टरचं दृष्टीने अनके महत्वाचे आणि ना आवडणारे निर्णय घेणार पाठीचा कान असणारे सार्क २ वेलेलस स्पष्ट बहुमताने आले तरी अनेकांची नाकारघंटा टी नाकारघंटांचं चालू..
अर्थात आज पासून आपण मला हि डॉ खरे आणि मोदी महाशय यांचा आंधळा पंखा म्हणून लेबल लावाल हे गृहीत धरतो

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 7:41 pm | ऋतुराज चित्रे

यांचा आंधळा पंखा म्हणून लेबल लावाल हे गृहीत धरतो

मी आतापर्यंत येथे कोणाला कधीही कोणतेही लेबल लावलेला माझा प्रतिसाद तुम्हाला आढळला आहे का? नसल्यास निश्चिंत राहा. लेबल लावणे माझे काम नाही.

मामाजी's picture

31 May 2020 - 3:49 pm | मामाजी

चित्रे साहेब सरकारच्या धोरणांना मिळणारा जनतेचा पाठिंबा बघुन होणारी आपली हाताशा मी समजू शकतो.. आपली विचारसरणी ही निव्वळ मोदीद्वेष या एक कलमी कार्यक्रमावर आधारीत आहे त्यामुळे आपणाला व आपल्या सहकार्यांना स्वत: चे अस्तित्व दाखवुन देण्यासाठी सतत मोदींवर चिखलफेक करावी लागते.. त्यासाठी दूसरा कोणताही मुद्दा हाती लागत नसल्यामूळे नोटाबंदी व जीएसटी सारखे, आता इतिहासजमा झालेले विषय परत परत उगाळावे लागतात.. या दोन निर्णयांसह घेतलेल्या अनेक निर्णयां नंतरसुद्धा (जे आपल्या दृष्टीने देशाला खड्यात घालणारे होते) याच जनतेने मोदींना पहिल्या पेक्षा जास्त जागांवर निवडुन आणले हे सत्य आपण केवळ मोदीद्वेषा मुळे स्विकारू शकत नाही.. याचे कारण वास्तववादी व तर्कशुदध विश्लेषण करायला मोदीद्वेषी भूमिका सोडुन जी स्वतंत्र भूमिका घ्यावी लागते ती आपण घेउ शकत नाही.. म्हणून स्वत:च्या हताश मनस्थितीचे सांत्वन करण्यासाठी असा रतीब टाकत रहावा लागतो..

चौकस२१२'s picture

31 May 2020 - 7:03 pm | चौकस२१२

मामाजी हात मिळवा आपण पण "येडे आंधळे मोदी भक्त , संघोटे , मनुवादी "वगैरे बिरुदांसाठी आता तयार व्हा... मोदींची बाजू घेण्याची हिंमत केलीत ना आता भोगा ...
मी बरेचदा लिहायचो कि अहो मी मी कोणाचाहही भक्त नाही पण आता नाहीतरी लेबल लागणारच आहेत तर आता निर्लज्ज पणे चला म्हणतो " आंधळा भक्त तर आंधळा भक्त "
सर्व चुकांसकट ज्या माणसाच्या मूळ स्वभावात ( यात वाजपेयी पण आले ) "हम रहे ना राहे भारत ये rahna चाहिये " ( मनकर्णिका) हा विचार आहे त्याला सध्या तरी आपला पाठिंबाच

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 7:27 pm | ऋतुराज चित्रे

त्यासाठी दूसरा कोणताही मुद्दा हाती लागत नसल्यामूळे नोटाबंदी व जीएसटी सारखे, आता इतिहासजमा झालेले विषय परत परत उगाळावे लागतात..
तुम्हाला का झोंबतय नोटबंदीचा विषय? फेल गेली म्हणून का? सगळा काळा पैसा गायब झाला नाही म्हणून का? अख्ख्या जगात कोणी काळा पैसा नष्ट करायला अशी युक्ती सुचली नाही ती फक्त आपल्यालाच सुचली. फक्त कोरोनावरावर मात करताना जगात कोण काय उपाय करतंय, त्यावरच आपले धोरण ठरवणार आपले केंद्र सरकार ,बरोबर ना? इथे जरा वेगळा निर्णय घ्यायची हिम्मत करायला का कचरले केंद्र सरकार?

अहो चित्रे साहेब नोटबंदीचा विषय आम्हाला नाही हो झोंबत.. आम्ही त्यावेळीही समर्थक होतो आज ही आहोत व पुढे राहू.. आपणच अकारण हा विषय काढलात बरोबर
अशावेळी ते प्रतिवाद करताना वैयक्तिक पातळीवर येऊन समोरच्यावर नाक्यावरची भाषा वापरतात. हे नोटबंदी पासून चालू आहे. त्यावेळी नोटाबंदी फेल गेली हे स्वच्छ दिसत असतानाही इथे सरकारचे समर्थन करणारे विरोधकांवर तुटून पडले होते,

माझे वैयक्तिक मत हे आहे नोटाबंदी चा घाव आपल्या सारख्यांच्या असा वर्मी बसला आहे की आपल्या मनसिक समाधानासाठी प्रत्येक वेळी नोटाबंदी फेल गेली हे मान्य करा पालूपद प्रत्येक विषयावरच्या धाग्यात आणावे लागते..

चौकस२१२'s picture

31 May 2020 - 7:29 pm | चौकस२१२

परंतू मिपा मालकांनी नेमके सरकार विरोधी सदस्यांना उडवले.
चला आपण सुटलो .. मिपामालक पण मोदी भक्त निघाले ( चित्रे साहेबांच्या नुसार )

परंतू मिपा मालकांनी नेमके सरकार विरोधी सदस्यांना उडवले.

कोणते आयडी उडवले सांगता का जरा..?

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 2:50 pm | सुबोध खरे

बिरुटे सर

या वेळेस क्षमस्व

माझी कल्पना झाली की नेहमीसारखं तुम्ही काहीतरी नाक्यावरचं ऐकीवच टाकलंय.

झम्प्या दामले's picture

30 May 2020 - 12:55 pm | झम्प्या दामले

याला काही पुरावा आहे का असंच नाक्यावर ऐकलंय?
Narcisim at its best

कानडाऊ योगेशु's picture

29 May 2020 - 11:50 am | कानडाऊ योगेशु

सोनू सूद जे करतोय ते एकाही राजकारण्याला करणे का जमू नये?

मराठी_माणूस's picture

31 May 2020 - 7:16 pm | मराठी_माणूस

इतर अनेक सरकारांनी पण असेच केले असे म्हटले जाते.
यावर एक वेगळा विचार

https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-world-of-science-faces...

चौकस२१२'s picture

31 May 2020 - 7:26 pm | चौकस२१२

"याचाच दुसरा अर्थ असा की स्पेन वा इटली वा अमेरिका वा ब्रिटन या देशाने या करोनास जसा प्रतिसाद दिला तसाच तो आपणही द्यायला हवा असे नाही."
म्हणजे थोडक्यात काय या देशांनी जसे बंदी सत्र सुरु केले तसे भारतात केले हे चुकले..
एक तर कुबेर हे या विषयातील तद्न्य नाहीत ..आणि यातून परत ."काढा शोधून, सरकार आणि मोदींना कसें दोषी / चुकीचे ठरवता येईल .." हाच एकमेव हेतू... कुबेर काय आणि सकाळचे श्रीराम पवार काय.. एका माळेचे मणी...
चाहलू राहू द्या रतीब ..

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 7:53 pm | सुबोध खरे

काहींच्या काही लिहिणे हा कुबेरांचा स्थायीभाव झाला आहे.

जसं चीन मध्ये बटण बंद केल्यावर दिवा विझतो तशी रुग्ण संख्या एक दिवसात 82 हजारावर स्थिर झाली आहे. त्याचे नंतर संक्रमण तजांबळे यावर शेम्बडे पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाही.
व्हिएतनाम मध्ये सुद्धा कम्युनिस्ट सरकार आहे त्यामुळे त्यांच्या एकंदर स्थितीवर कोण विश्वास ठेवणार.?
थायलँड चा राजा आपल्या चार बायका आणि इतर ठेवलेल्या बायका मिळून 20 जणांसकट युरोपात जाऊन बसला आहे. राजाबद्दल काहीही वक्तव्ये केल्यास 10 वर्षाची शिक्षा दिली जाते. त्यानंतर त्या देशात संपूर्ण लॉक डाऊन आहे आणि सत्य काय आहे हे समजणे कठीण आहे.

आपले म्हणणे खरे करण्यासाठी कुबेरानी प्रथम स्वीडन चे उदाहरण दिले.त्या देशाने अजिबात लॉक डाऊन केला नाही त्याचे परिणाम काय झाले हे मी दुसऱ्या ठिकाणी लिहिले आहेच.

भारताची यातील कोणत्याही देशाशी तुलना करणे हेच मुळातच चूक आहे.

पण त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे.

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2020 - 12:00 am | मराठी कथालेखक

विधान १: "भारताने लॉकडाऊन करुन चूक केली"
प्रतिवाद १: "अनेक देशांनी लॉकडाऊन केलंय. ते योग्यच आहे"
विधान २ : "तैवान, द. कोरिया, स्वीडन ई देशांनी लॉकडाउन नाही केले"
प्रतिवाद २: "भारताची इतर देशांशी तुलना करणे अयोग्य आहे"

सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 1:09 am | सुबोध खरे

म क ले
भारताने लॉक डाऊन केला ते अत्यंत योग्य आहे. याबद्दल सर्व तज्ज्ञांच्या मध्ये एकमत आहे.

भारताची तुलना बाकी छोट्या देशनशी होऊ शकत नाही याची कारणे मी इतरत्र दिली आहेत हवं तर शोधा.स्वीडनच्या स्थिती काय आणि का आहे तेही शोधून पहा

यात कुठेही विरोधाभास नाही.

असेल तर तो आपल्या मनात आहे.

सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 1:09 am | सुबोध खरे

म क ले
भारताने लॉक डाऊन केला ते अत्यंत योग्य आहे. याबद्दल सर्व तज्ज्ञांच्या मध्ये एकमत आहे.

भारताची तुलना बाकी छोट्या देशनशी होऊ शकत नाही याची कारणे मी इतरत्र दिली आहेत हवं तर शोधा.स्वीडनच्या स्थिती काय आणि का आहे तेही शोधून पहा

यात कुठेही विरोधाभास नाही.

असेल तर तो आपल्या मनात आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2020 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 3:43 pm | सुबोध खरे

बिरुटे सर
या अग्रलेखाचा आणि या धाग्याचा असमाबंध कुठे येतोय?
आपला मोदी द्वेष आपल्या जागी असू द्या
गल्ली चुकवू नका एवढीच विनंती __/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2020 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र.... सॉरी सेठ.
आपण दिसलात की नाक्यावरील गप्पांचे पाय असे आपल्याच गल्लीत येतात.
दिलगिरी व्यक्त करतो सेठ.

-दिलीप बिरुटे

डॉक.. "संस्थळावर हेल्दी वातावरणासाठी काही समजही आवश्यक असते" त्यांच्याकडे समज नसल्याने असे गल्ली चुकलेले प्रतिसाद पाडावे लागत असतील.

मजबुरी समजून घ्या. ;)

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2020 - 8:30 pm | मराठी कथालेखक

भारताने लॉक डाऊन केला ते अत्यंत योग्य आहे. याबद्दल सर्व तज्ज्ञांच्या मध्ये एकमत आहे.

हं... असेल बुवा.. किंवा ज्यांचे यावर एकमत असेल त्यांनाच तज्ञ म्हणावे बाकीचे अर्थातच टिनपाट...जशी देशभक्त आणि देशद्रोही यांच्या सोप्या व्याख्या निर्माण झाल्यात तसंच काहीसं... चालू द्या.

तज्ज्ञ याची आपली व्याख्या काय आहे?

इंग्लंड पासून चीन आपण रशिया अमेरिका सारखे सगळ्या देशानी लॉक डाऊन केलंय म्हणजे ते मूर्खच असणार. त्यांच्या कडे तज्ज्ञ लोक नाहीतच.

पण त्यांना देशद्रोही कसं म्हणणार बुवा?

सुबोध खरे's picture

5 Jun 2020 - 6:56 pm | सुबोध खरे

https://www.bloomberg.com/news/articles/2020-06-03/man-behind-sweden-s-v...

लॉक डाऊन न करण्यात आपली चूक झाली आणि यामुळे स्वीडन मध्ये खूप जास्त मृत्यू झाले असे त्यांच्या तज्ञांनि कबूल केले आहे.

आता कुबेर साहेब माफी मागतील काय?

मराठी_माणूस's picture

2 Jun 2020 - 12:18 pm | मराठी_माणूस

स्थलांतरित मजुरांच्या झालेल्या हालांच्या संबंधातील लेख

https://www.loksatta.com/vishesh-news/great-cost-of-delaying-the-return-...

Nitin Palkar's picture

2 Jun 2020 - 12:32 pm | Nitin Palkar

लेख नेहमी प्रमाणेच आवडलेला आहे. शेवटच्या वाक्यासाठी तुम्हाला सलाम! ... बाकी भुंकणाऱ्यांना भुंकत राहू दे...

वीणा३'s picture

5 Jun 2020 - 9:24 pm | वीणा३

अमित शाह यांची ४-५ दिवसापूर्वी घेतलेली मुलाखत (इतरही चॅनेल वर घेतलीये त्याच दिवशी). बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्यात.
https://www.youtube.com/watch?v=xVXVNVwUhSU

मराठी_माणूस's picture

7 Jun 2020 - 9:34 am | मराठी_माणूस

स्वीडन संबंधी पुढील माहीती
https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-sweden-is-in-t...

राघव's picture

8 Jun 2020 - 3:40 pm | राघव

चांगला लेख डॉक.

कठीण परिस्थितीमधे रॅशनली विचार करणे आणि तसेच आचरणात आणणे हे खरंच फार कठीण आहे. त्यासाठी बरेचदा बोलण्या खाव्या लागतात, विरोध झेलावा लागतो.. पण आपला हेतू चांगला असतांना हे सर्व बाजूला सरकवता येतं. अर्थात् त्यात खूप ताकद पणाला लागते हेही तेवढंच खरं.
तुम्ही हे सगळं सांभाळून आपलं कर्तव्य मनापासून करताहात याबद्दल तुम्हाला मनापासून अभिवादन. _/\_

तुम्ही मांडलेले विचार बरोबर आहेत. जर लॉकडाऊन लवकर केला नसता तर भारताला सावरण्याची संधीच मिळाली नसती.
मी तर म्हणेन लॉकडाऊन थोडा आणिक आधी करायला हवा होता. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळांचा. त्यानं कोरोना आणखी लांबला असता.

लॉकडाऊनचा विरोध करणे खरंच हास्यास्पद आहे. ज्या तयारीसाठी आणिक जवळपास २ महिने मिळालेत सरकारला, ते नसते मिळालेत तर एव्हाना परिस्थिती हाताबाहेर गेली असती. मुंबईतल्या ओळखीच्या घरी एक कोरोना केस निघाली होती. [आता निगेटीव्ह आहेत पण घरीच क्वॉरंटाईन आहेत.] तेव्हाचा त्यांचा अनुभव ऐकल्यावरून समजतंय की आत्ताच सोयी नसल्यानं परिस्थिती किती कठीण होते आहे. लॉकडाऊन नसता तर काय झालं असतं ते कुणास ठाऊक.

एक साधी आकडेवारी फरक सांगते -

पुणे: पहिली केस - ९ मार्च | एकूण केसेसः ९७०५ | अ‍ॅक्टीव केसेसः ३७८३ | बर्‍या झालेल्या केसेसः ५५१६ | मृत्यू: ४०६

नागपूरः पहिली केस - १३ मार्च | एकूण केसेसः ७४७ | अ‍ॅक्टीव केसेसः ३०२ | बर्‍या झालेल्या केसेसः ४३४ | मृत्यू: ११

आकडेवारी ८ जून दुपारी १ वाजेपर्यंत. स्त्रोतः https://bing.com/covid/local/india

लॉकडाऊन कडक पणे पाळल्या गेल्याचा सरळ फरक दिसून येतो. आणखीही कारणं असू शकतात. जसं की लोकसंख्येची घनता, तबलीगी, वगैरे.
पण एक महत्त्वाचं कारण हेही आहे - नागपुरात श्री. तुकाराम मुंढे आहेत.

खरंतर पुण्यात आणि नागपूरात आता बर्‍यापैकी मोकळीक आहे. तरीही पुण्यातला सतत वाढणारा आकडा अंगावर येतो.