[कविता' २०२०] - बिअर मात्र सुरेख होती

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 10:22 am

बिअर मात्र सुरेख होतीमूळ प्रेर्ना "पोहे मात्र सुरेख झाले" असली तरी पोहे हे चखना म्हणून खाऊ नयेत ही आग्रहाची इंन्ति.

(प्रस्तावना: दोन पेताड मित्रांच्या चोरून केलेल्या "मैफिलीतून" आपल्या सर्वांसाठी ही चिल्ड बिअर)

तळलेले शेंगदाणे विसरलास, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

इतर कोणताही चखना नव्हता, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

अगदी सुपर चिल्ड नव्हती, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

उमर खय्यामच्या रुबायांची साथ नव्हती, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

"ही" लवकर घरी येण्याचं टेन्शन होतं, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

तशी नेहेमी प्रमाणे थोडी कमीच पडली, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

काय म्हणतोस? आणखी स्टॉक आणू का? नको नको
बिअर मात्र सुरेख होती

बाकी आमचा मित्र मैफिल जमवण्यात अगदी हुशार...
आता विश्वास बसणार नाही तुमचा, म्हणून काय झालं
बिअर मात्र...


प्रतिक्रिया

सॅम's picture

19 May 2020 - 11:38 pm | सॅम

कविता मात्र सुरेख नव्हती. दुसऱ्या कवितेवर बेतलेल्या कवितेला स्पर्धेत स्थान कसे मिळाले संपादक मंडळी?

पैलवान's picture

23 May 2020 - 11:41 am | पैलवान

दुसऱ्या कवितेवर बेतलेली कविता चालणार नाही असा कुठे उल्लेख झाल्याचं आठवत नाही. चुकून वाचायचं राहून गेलं असेल तर प्लीज निदर्शनास आणून द्या.
एखादी प्रवेशिका स्पर्धेत घ्यायची की नाही, याचा निर्णय आयोजकांवर असावा. (बहुतेक तसं आवाहन मध्ये लिहिलं सुद्धा आहे)

सगळ्यात महत्त्वाचं, अगदी माझा आवडता पाळीव पशू यावर कुणी गद्य निबंध जरी लिहून पाठवला तरी त्याला नाकारण्याचा अंतिम अधिकार सदस्यांनाच आहे. त्यांनीच सुज्ञ पाने निर्णय घ्यायचाय. त्यांना नाही आवडली तर ही स्पर्धेत नाही टिकणार.

तळटीप - कविता माझी अथवा माझ्या डू आयडी ची अथवा माझ्या परिचीताची नाही.

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 12:38 am | कादंबरी...

बिअर मात्र सुरेख होती
पण कविता मात्र जमली नाही

निदान विडंबन केले असते तर काहीतरी वेगळं वाटलं असतं
असो, पुढील कवितेसाठी शुभेच्छा

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:09 am | चांदणे संदीप

बियर ऐवजी दुसरे काहीतरी घेतले असते तर पोह्याबरोबर तेही गेले असते.

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

21 May 2020 - 3:56 pm | जव्हेरगंज

बियरच्या नावाखाली सपक पेप्सी!पैलवान's picture

23 May 2020 - 11:36 am | पैलवान

स्पर्धेबाहेर प्रकाशित केली असती तर भरभरून प्रतिसाद मिळाला असता.

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 9:22 am | पाषाणभेद

कवितेचे मीम