[कविता' २०२०] - पोहे मात्र सुरेख झाले

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
17 May 2020 - 11:29 am

पोहे मात्र सुरेख झाले(प्रस्तावना: पती पत्नीच्या दैनंदिन "सुसंवादातून" आपल्या सर्वांसाठी हे शब्दांचे खमंग पोहे)

शेंगदाणे तळायचे विसरलीस, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

हळद जास्त झाली, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

कांदा बारीक केला नाही, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

कोथिंबीर फोडणीत टाकली नाही, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

तेलाचं प्रमाण चुकलं, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

दोन वेळेस जेवणासाठी पुरतील आता पोहे, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

काय म्हणतेस? चहा ठेवू का? नको नको
पोहे मात्र सुरेख झाले

बाकी ही स्वयंपाकात अगदी हुशार...आता विश्वास बसणार नाही तुमचा, म्हणून काय झालं
पोहे मात्र...


प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 7:16 pm | चांदणे संदीप

+१

सं - दी - प

कविता मात्र झकास झाली...
+१

तुषार काळभोर's picture

17 May 2020 - 10:21 pm | तुषार काळभोर

कविता मात्र झकास झाली...

श्रीगणेशा's picture

18 May 2020 - 6:35 am | श्रीगणेशा

+१

कुमार१'s picture

18 May 2020 - 10:52 am | कुमार१

+१

मन्या ऽ's picture

18 May 2020 - 5:43 pm | मन्या ऽ

मस्त!

रुपी's picture

19 May 2020 - 7:52 pm | रुपी

+१

कविता आवडली :)

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 12:31 am | कादंबरी...

+१
अगदी साधी रचना. अगदी दैनंदिन जीवनातील संवाद पण तरीही कविता "सुरेख" झाली

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 12:34 am | कादंबरी...

शब्द साधे आहेत, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

प्रतिक्रिया कमी आहेत, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

:-)

S@n@l's picture

21 May 2020 - 2:12 pm | S@n@l

kavita avadali. Chan ahe..

जव्हेरगंज's picture

21 May 2020 - 9:29 pm | जव्हेरगंज

फ्रेश कविता आवडली!
+१प्राची अश्विनी's picture

22 May 2020 - 11:36 am | प्राची अश्विनी

+1

मनस्विता's picture

23 May 2020 - 7:33 pm | मनस्विता

+१
आवडली, म्हणूनच प्रेरणा घेऊन काही तरी खरडायचा प्रयत्न केला.

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 9:23 am | पाषाणभेद

वाईट झाल्याचे सांगतो कुणाला! दररोजच्या जेवायचे वांधे होतील मग.