[कविता' २०२०] - आपलं माणूस

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
16 May 2020 - 10:12 am

आपलं माणूसप्रत्येकाला हवं असतं,
एक आपलं.. आपलं माणूस.
आर-पार ओळखणारं, समजून-उमजून घेणारं.

खरंतर आपण सांगितलेलं, त्याला काही समजत नाही.
त्यानं सागितलेलं काही, आपण कधी ऐकत नाही.
सगळ्या आपल्या वैतागाचं, ते हक्काचं कचराघर असतं.
अन् सगळं ओतून घेऊन पुन्हा, हसू घेऊन उभं असतं!

बोलण्यासाठी तिथं, शब्दांची गरज नसते.
खरखरीत हातामागचा ओथंबलेला स्पर्श..
मनातली द्वंद्व शांतवणारं नजरेमागचं मऊ हास्य..
पुरेसं असतं.. फक्त 'असणं'!

असं आपलं माणूस असणं फार फार भाग्याचं..
असं आपलं माणूस जपणं जगावरच्या मोलाचं..
त्याचं अस्तित्वच अतीव सुंदर..भगवंताच्या तोलाचं!

--
हृदयापासून उठणारी, हाक आपण ऐकणार का?
घेण्यासाठी हपापलेलं.. मन आपलं.. देणार का?

आपण सुद्धा कोणासठी, अपार प्रेमाची घागर बनायचं असतं.
आपण सुद्धा कोणासाठी, असं, 'आपलं माणूस' व्हायचं असतं.


प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

16 May 2020 - 11:10 am | मन्या ऽ

कवितेतली कल्पना आवडली!

तुमच्या आमच्या
मनामनातलं सुखद
कल्पनाविश्व असंच असतं
त्यात अलवार मन
जपणार "आपलं माणुस"
कोणीतरी असतं

आपण सुद्धा कोणासाठी, असं, 'आपलं माणूस' व्हायचं असतं.

विचार आवडले

+1

पैलवान's picture

23 May 2020 - 11:24 am | पैलवान

कवितेला अन् प्रतिसादाला

कानडाऊ योगेशु's picture

16 May 2020 - 11:48 am | कानडाऊ योगेशु

आपण सुद्धा कोणासाठी, असं, 'आपलं माणूस' व्हायचं असतं.

वेरी वेल सेड!!!!

मोगरा's picture

17 May 2020 - 12:13 am | मोगरा

+1

कुमार१'s picture

20 May 2020 - 11:50 am | कुमार१

+१

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:02 am | चांदणे संदीप

पण गुण देण्याइतकं नाही.
पुलेशु.

सं - दी - प

प्राची अश्विनी's picture

22 May 2020 - 11:38 am | प्राची अश्विनी

+1

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 10:04 am | पाषाणभेद

दारूड्या नवर्‍याने मारले तरी बाई म्हणते काय झालं नवरा आहे माझा.
तसं.