[कविता' २०२०] - एकटेपण

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
10 May 2020 - 1:57 pm

एकटेपणजमव जमव जमवले
भांडी, गॅस, बेड, कपाट, कपडे,
टिव्ही. पुस्तके आणि काॅप्युटरसुद्धा.
माणसं सुद्धा मिळाली जन्माने,
काही जमवली निष्फळ
शेवटी उरले निर्जीव एकटेपण.

जीव लावला इथुन तिथुन,
अगदी गॅस पुसायच्या फडक्याला
दिवसभर हाती असणार्या माऊसला
आॅफिसातल्या डेस्कला
समजत राहीले हे माझेपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण

जपत गेले छंद मजेने
झाडं लावली, पुस्तकं आणली
वाचली कागदावरची निर्जीव माणसं
जीवंत माणसं वाचायची राहीली
उमजत गेले गर्दिचे फोलपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण

अपेक्षाही वाढवुन घेतल्या
पुर्णत्वाची आस लावली
जीव जाळुन घेतला
मोहमायेच्या गर्तेत खोल उतरले
उमजत गेले मायेचे रितेपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण

शेवटी रुतले गाळात
गाळ मला रुतवत चाललाय
अगदी खोल खोल
आता लक्षात आलय माझ्या
बाहेर पडणे अवघड
शेवटी उरणार नाही काहीच

नुसत्या शुन्याशिवाय


प्रतिक्रिया

वाव ..खुप अर्थपुर्ण कविता...
मनापासुन आवडली.. भारी लिहिली आहे.

+१

Cuty's picture

10 May 2020 - 5:14 pm | Cuty

+1

प्रचेतस's picture

10 May 2020 - 9:45 pm | प्रचेतस

+१

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 12:17 am | मन्या ऽ

कविता आवडली..

कौस्तुभ भोसले's picture

11 May 2020 - 1:06 am | कौस्तुभ भोसले

मस्त

बबु's picture

11 May 2020 - 12:32 pm | बबु

व्हाटस अप आणि फेसबुक्च्या आभसी गर्दीचे फोलपण जाणवुन देणारी वर्तमानाची कविता

जव्हेरगंज's picture

11 May 2020 - 4:14 pm | जव्हेरगंज

मस्त आहे.
+१


जमव जमव जमवले.....शेवटी उरले निर्जीव एकटेपण. अप्रतिम.
कशा कशात जीव अडकत असतो हे कळत नाही, बरोबर काही न्यायचे नसते हे माहित असते तरिहि ते सोडवत नाही.

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:37 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

आगाऊ म्हादया......'s picture

13 May 2020 - 8:01 am | आगाऊ म्हादया......

...पण आशय आवडला. प्रयत्न फोल नाही जाणार

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:37 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

पलाश's picture

13 May 2020 - 10:28 am | पलाश

+१
जीव लावला इथुन तिथुन,
अगदी गॅस पुसायच्या फडक्याला
दिवसभर हाती असणार्या माऊसला
आॅफिसातल्या डेस्कला
समजत राहीले हे माझेपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण
हे "गॅस पुसायच्या फडक्यापासून ते आॅफीसमधल्या डेस्क पर्यंत मोहमायेचं चित्रण खास आवडलं. :)

पैलवान's picture

14 May 2020 - 6:28 pm | पैलवान

आयुष्य अकाउंटिंग सारखं असतं.
ताळेबंद होऊन

शेवटी बाकी शून्य!

स्मिताके's picture

14 May 2020 - 9:59 pm | स्मिताके

+१

कुमार१'s picture

17 May 2020 - 12:09 pm | कुमार१

+१

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 12:45 pm | चांदणे संदीप

शेवटी उरले निर्जीव एकटेपण

क्या बीता, क्या रख्खा! ही गुलजार यांची रचना एकदा वाचून पहा असे सुचवतो.

सं - दी - प

मनिष's picture

21 May 2020 - 12:04 am | मनिष

+१

हे खासच आवडले -

उमजत गेले गर्दिचे फोलपण

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 12:57 pm | पाषाणभेद

असलीच सुरूवात होणारी कविता अडगळ आहे येथेच. अर्थात शेवट निराळा आहे.
छान

माझी कविता एकटेपणाकडे जाणार्या प्रवासाची आहे तर अडगळ घरातल्या सामानावर आहे.

सर्वाचें मनापासुन धन्यवाद!

सर्वाचें मनापासुन धन्यवाद!