[कविता' २०२०] - चष्मा

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2020 - 4:15 pm

चष्माबिना चष्म्याचं वाचू नये, फार त्रास होतो डोळ्यांना.
खरं आहे हे वैद्यकशास्त्रानुसार! 

एकदा नंबर आला डोळ्यांना ,की चष्मा अटळ आहे. 
चाळिशी आली, की नजर त्रास देते म्हणतात!

मलाही झाला, आणि एका ठराविक नंबरचा चष्मा आला.
सुरवातीला फार बरं वाटलं, डोळे सुखावले..

म्हटलं, "किती छान आणि स्पष्ट दिसायला लागलंय!"
पण नन्तर कळलं, एकंदर चष्म्याशिवाय काही वाचताच येत नाहीये..

धर्मवादाचा चष्मा,निधर्मवादाचा चष्मा, साम्यवादाचा ,समाजवादाचा,राष्ट्रवादाचा,सेक्युलारीझमचा,
आणि मानवतावादाचाही चष्माच!!!

हे चष्मे लावल्याशिवाय आपण काहिही वाचलं,
तर अंधुक दिसण्यापेक्षाही स्पष्ट आणि पर्यायानी खरं दिसायची शक्यता अधिक!

सामाजिक दृष्ट्या उणे होण्याची शक्यता यातच अधिक आहे. 
हे उणेपण आपल्याला एकतर देवासारखं फक्त पूजनीय करून ठेवेल,
नाहीतर दानवांसारखं कायमच्या तिरस्काराचं धनी! 

मग म्हटलं चष्मा असुदेच ज्या त्या पंथातला,त्या त्या भक्तगणांशी जोडलेला ठेवणारा!
म्हणजे सगळ्यांसाठीच आपण आदरणीय म्हणजे अर्थातच अनुकरणीय नसलेले.... असे विचारवंत होऊन जाऊ!

मग चष्म्याप्रमाणे आपलाही दर्जा कायम..,आणि डोकंही कसं एकदम शांत!
फारतर नंबर वाढत जाईल त्या त्या पंथांच्या दृष्टिनुसार, तसा चष्माही बदलत जाऊ. 

म्हणजे मग मधून मधून मानवतावादाचं क्लिनर मारलं, की काचा पुसणं एव्हढं एकच काम शिल्लक राहील! 
कुण्णाची नजर नाही लागणार मग आपल्याला! 

धन्यवाद या चष्म्यांचे! आज मला एक निराळीच दृष्टी देऊन गेले ते! 
धन्यवाद ! मन:पूर्वक धन्यवाद!! शतशः धन्यवाद!!!


प्रतिक्रिया

धर्मवादाचा चष्मा,निधर्मवादाचा चष्मा, साम्यवादाचा ,समाजवादाचा,राष्ट्रवादाचा,सेक्युलारीझमचा,
आणि मानवतावादाचाही चष्माच!!!

हे चष्मे लावल्याशिवाय आपण काहिही वाचलं,
तर अंधुक दिसण्यापेक्षाही स्पष्ट आणि पर्यायानी खरं दिसायची शक्यता अधिक!

विचार मनापासुन आवडले..

कविता वाटली नाही म्हणून इतर कवितेंचा मान ठेवून +1 दिले नाही.

पण विचारांशी एकदम सहमत

प्रिती-राधा's picture

9 May 2020 - 1:32 am | प्रिती-राधा

+1

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:38 am | चांदणे संदीप

काव्य कसे म्हणावे?

सं - दी - प

स्वलिखित's picture

9 May 2020 - 8:25 pm | स्वलिखित

लावणी आवडली आपल्याला...

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:40 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

पैलवान's picture

10 May 2020 - 9:54 am | पैलवान

लेखन आवडले. पद्य नसल्याने स्पर्धेच्या दृष्टीने +१ द्यावं की नाही, विचार करतोय.
बाकी चष्मा (कसलाही) लावायची वेळ येणं, दुर्दैवीच!

प्रचेतस's picture

11 May 2020 - 8:50 pm | प्रचेतस

+१

ही आमच्या परममित्रांची कविता दिसतेय

कानडाऊ योगेशु's picture

12 May 2020 - 9:06 pm | कानडाऊ योगेशु

आवडली. छंदमुक्त कविता आहे. लिहिण्याचा फॉरमॅट वेगळा ठेवायला हवा होता.
उदा.
धर्मवादाचा चष्मा
निधर्मवादाचा चष्मा,
साम्यवादाचा ,
समाजवादाचा,
राष्ट्रवादाचा,
सेक्युलारीझमचा,
आणि..
.
.
मानवतावादाचाही चष्माच!!!

ते दोन दोन कडवे केल्यामुळे वाचकांनी यमके शोधली आणि दिसली नाहीत म्हणुन खट्टु झाले असे झाले असावे.

बरंच काही सांगण्याची ईच्छा असलेली रचना. ठीक आहे. पुलेशु.